महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी महायुतीला जनतेनं कौल दिला होता पण बंद दाराआड निवडणुकीपूर्वी घडलेल्या चर्चेत काय ठरले होते,यावर सेनेने मुख्यमंत्री पदावर दावा सांगितला आणि भाजपने नकार दिला आणि येथेच युतीचे बारा वाजले .बरे जनतेनं कुणा एकाला कौल दिला नाही तर युतीला बहुमत दिले त्यामुळे सेनेशिवाय भाजप सरकार स्थापन करु शकत नाही अशावेळी सेनेने मागिल पाच वर्षाच्या काळात भाजपने केलेल्या अपमानाचा वचपा काढला त्यात गैर काहीच नाही कारण भाजपने सेनेची केलेली फरपट सेना विसरु शकत नव्हती,त्यात आघाडीचे संख्याबळाची साथ घेऊन सेनेचा मुख्यमंत्री बसवणं सेनेला सहजशक्य होते आणि आहे पण सेना भाजप आपणास दिलेला शब्द पाळील या आशेने यानंतर राहिली शब्द काय दिला होता हे जनतेला कधिच कळणार नाही कारण शहांनी आजच सांगितले की बंद दाराआड झालेली चर्चा उघड करण्याची आमची संस्कृती नाही त्यामुळे खोटं कोण बोलतोय हे जनतेला कधिच कळणार नाही.याकालावधीत राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू केली त्याच समर्थन शंहांनी केले .आता राज्यात महाशिव आघाडीच्या बैठका सुरू आहेत याचं काळात राणेंनी भाजपचे सरकार आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले तर निंबाळकरांनी राष्ट्रवादी चे आमदार संपर्कात असल्याचे सांगितले याचाच अर्थ महाराष्ट्रात भाजपचे ऑपरेशन लोटस सुरू झाले आहे कुठलाही विधिनिषेध न बाळगता भाजप सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करणारच हे ठरले आहे. अशा स्थितीत कौन बनेगा मुख्यमंत्री हा प्रश्न जनतेला पडला आहे.
कौन बनेगा मुख्यमंत्री ॽ
Submitted by ashokkabade67@g... on 14 November, 2019 - 12:36
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
>>> बाकी सेना नेत्यांचे जाऊदे
>>> बाकी सेना नेत्यांचे जाऊदे ते बरेच काही बरळत असतात... ऊद्धव ठाकरेंचा प्रचार सभेचा वा पत्रकार परिषदेचा विडिओ असल्यास जरूर शेअर करा , का ते थोड्यावेळात लिहितो. >>>
https://marathi.abplive.com/videos/uddhav-thackeray-uncut-speech-in-mumb...
https://www.google.com/amp/s/www.esakal.com/maharashtra/next-cm-maharash...
https://www.google.com/amp/s/www.loksatta.com/maharashtra-vidhansabha-el...
https://www.google.com/amp/s/www.bbc.com/marathi/amp/india-49739375
जून महिन्यात माध्यमांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी आदित्य ठाकरे यांना पसंती दर्शवली होती.
राऊत म्हणाले होते, "महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून तरुण चेहऱ्याची गरज आहे, जो महाराष्ट्राला दिशा देऊ शकतो. महाराष्ट्रातील लोकही आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारतील."
त्यानंतर भाजपचे नेते आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते की, "यावेळीही भाजपचाच मुख्यमंत्री होईल. मित्रपक्षांसोबत 220 जागा जिंकून आमचा मुख्यमंत्री बनवू."
मुनगंटीवारांना उत्तर देताना युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई सुद्धा म्हणाले होते की, "भाजपचे अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात निर्णय झालाय की, महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद प्रत्येकी अडीच वर्षं दिले जाईल."
आता चर्चा पे चर्चा सुद्धा
आता चर्चा पे चर्चा सुद्धा लोकांना नकोशा झाल्यात.
तिन्ही पक्षाचे एकमत होत नाही अशी शंका येते आहे.
त्यात वेगवेगळे नेते परस्पर विरोधी स्टेट ment देत आहेत.
ह्या सर्वांना वैतागून मनसे आणि वंचित च नशीब पालटू नये म्हणजे झाले
मोदींबद्दल आदर म्हणजे शहा
मोदींबद्दल आदर म्हणजे शहा-फडणवीसांबद्दल नाही. रीड बिटवीन द लाइन्स. >>>
वरीलप्रमाणेच मी काही कुठे लिहिलं असेल तर दाखवा. उगाच शिवसेनागिरी करण्याची गरज नाही.
---------
सत्तेसाठी काहीही हे भाजपचं आता एकमेव तत्त्व आहे.
नवीन Submitted by भरत. on 16 November, 2019 - 08:32>>>
अगदी अगदी, बाकीचे सर्व पक्ष केवळ लोककल्याणासाठी एकत्र येतात....
भाजप संघाच्या मुशीतून आणि
भाजप संघाच्या मुशीतून आणि कुशीतून आलेला. चाल, चरित्र, चेहरा असलं काय काय बघणारा.
म्हणून त्याचं कौतुक हो.
आता तो आणि इतर पक्षांत का ही ही फरक नाही म्हटल्यावर कोणालाच काही बोलायला नको. होकीनै?
आता तो आणि इतर पक्षांत का ही
आता तो आणि इतर पक्षांत का ही ही फरक नाही म्हटल्यावर कोणालाच काही बोलायला नको. होकीनै?
नवीन Submitted by भरत. on 16 November, 2019 - 11:0 >>>
नक्कीच, भाजपाने युधिष्ठिर बनण्यापेक्षा चाणक्य बनणे कधीही चांगले आहे.
राउतानी मोदींबद्दल प्यार का
राउतानी मोदींबद्दल प्यार का इजहार करणं हा आघाडीवर दबाव ठेवण्याचा प्रयत्न असेल.
काहीच नाही जमलं तर - डेली सोपमध्ये एरवी गायब असणारा नायक जसा रविवारच्या महाएपिसोडमध्ये वेळेवर प्रकट होऊन सोशिक नायिकेची बाजू घेऊन खलनायिकेला सुनवतो तसे मोदी मातोश्रीवर जाऊन काहीतरी सोल्यूशन काढतील.
>>मोदी मातोश्रीवर जाऊन
>>मोदी मातोश्रीवर जाऊन काहीतरी सोल्यूशन काढतील.<<
उम्मीद पे दुनिया कायम है. बट सिरियस्ली गाय्ज, वेकप अँड स्मेल द कॉफि...
तिकडे पवारसाहेब, नवरदेव आणि वरातीचा घोडा तयार असुनहि (आमदार घरवापसी, नाशिक महापौर इ. करता) वेळकाढु धोरण अवलंबवतायंत. आणि हे येडे समजतायत कि महाशिवआघाडिचं अजुन काहि नक्कि ठरंत नाहि, म्हणुन सरकार आम्हिच बनवणार...
>>>>अगदी अगदी, बाकीचे सर्व
>>>>अगदी अगदी, बाकीचे सर्व पक्ष केवळ लोककल्याणासाठी एकत्र येतात....<<<<<

370, 377 , मंदिर , 3 तलाक
370, 377 , मंदिर , 3 तलाक साठी एकत्र जमलेल्या पार्टीनी आता शरयू नदीत स्वाहा व्हावे
अवतार समाप्त
२०१८ मध्ये मोदींना
२०१८ मध्ये मोदींना रोखण्यासाठी बेंगलोरमध्ये एकत्र येऊन एकमेकांचे हात उंचावून युती करणाऱ्या पार्ट्यांनी आता नागझरीत स्वाहा व्हावे किंवा मक्केला जाऊन जमजमच्या ओढ्यात उडी घ्यावी.
अवतार समाप्त.
ते स्वाहा होताना कलमा पढायला तू पण जा रे गाझी विनायक कागलकर.
ब्लॅक कॅट
ब्लॅक कॅट
तुमचे विचार प्रगती चे विचार नाहीत ,आधुनिक विचार नाहीत.
अत्यंत मागास धार्मिक विचार आहेत .एक तर येथील 80 ते 90 टक्के मुस्लिम हे धर्मांतरित आहेत..
ह्यांना मुस्लिम जगतात काडीची किंमत नाही..
बांगला देशातील धर्मांतरित बंगाली भाषिक मुस्लिम लोकांवर किती अत्याचार मुस्लिम लोकांनी केले हे माहीत असेलच..
जागतिक शक्तिवान देशात एक पण मुस्लिम देश नाही .
कारण वैचारिक मागास पना.
फक्त संयुक्त अमिरात हाच भाग श्रीमंत आहे ते भारतीय मुस्लिम धर्मीय लोकांपेक्षा खूप वेगळे आहे .धर्माच्या नावा वर फालतुगिरी संयुक्त अमिरात मध्ये खपवून घेतली जात नाही.
त्या मुळे हिंदू वर टीका
करण्याचा अधिकार नाही..
जमलं तर विषयाला धरून कमेंट करा नाही जमत तर फक्त वाचा
https://www.indiatoday.in
https://www.indiatoday.in/india/story/report-gdp-growth-upa-nda-1319909-...
कब है शपथविधी?
कब है शपथविधी?
मांडवली पूर्ण झाल्यावर
मांडवली पूर्ण झाल्यावर
(No subject)
चिटूर शब्द तुम्हाला इतका
चिटूर शब्द तुम्हाला इतका झोंबून घेवू नका..... तुमचे पक्ष नाहीत चिटूर.... सत्ता करणारेत ते आता स्थापन ब्लॅकमेलर पार्टीला घेवून Wink
नवीन Submitted by खरा पुणेकर on 15 >>>>
ये केळ्या सेना बीजेपी गेली फाट्यावर तू तुझं बोल संघोट्या
वारे फिरले,
वारे फिरले,
बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिनाच्या सगळ्या पेपरात भरपूर बातम्या आहेत,
हावडीची एकपण बातमी नाय आज,
ये केळ्या सेना बीजेपी गेली
ये केळ्या सेना बीजेपी गेली फाट्यावर तू तुझं बोल संघोट्या
Submitted by NEILSAGAR on 17 November, 2019 - 12:22. >>>
आता इथे संघ कुठून आला मध्येच?
खपू, तुमच्याबद्दल थोडी माहिती द्या या भाऊंना. म्हणजे तुमचे बालपण कुठे गेले, तुमचे छंद काय, सध्याच्या ब्लाकमेलींग बद्धल तुम्हाला काय वाटते वगैरे वगैरे.....
कोण कुणाला ब्लॅकमेल करत आहे ?
कोण कुणाला ब्लॅकमेल करत आहे ?
यांचं सरकार आलं की
यांचं सरकार आलं की शेतकऱ्यांना कसं गप्प करतात, पीक विमा देतात का हे पाहायचं आहे.
काल सुप्रीम कोर्टात गंमत झाली
काल सुप्रीम कोर्टात गंमत झाली ,
डी के शिवकुमार वर सरकारने टाकलेल्या आरोपपत्रात डी के च्या नावाआधी माजी अर्थमंत्री लिहलेले वाचून कोर्ट बुचकळ्यात पडले .
याचे कारण लक्षात येताच सगळ्यांचेच चेहरे पाहण्यासारखे झाले.
डी के चे वरचे आरोपपत्र हे चिदंबरम यांच्या आरोप पत्रावर कॉपी पेस्ट करून बनविण्यात आले होते .
https://www-indiatoday-in.cdn.ampproject.org/v/s/www.indiatoday.in/amp/i...
**
राज्यातील सत्ता समीकरणानंतर
राज्यातील सत्ता समीकरणानंतर ताणलेल्या संबंधामुळे अखेर युतीचा पोपट आज अधिकृतरित्या मरण पावला आहे. शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्याची घोषणा भाजपाकडूनच करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली. प्रल्हाद जोशी म्हणाले की, शिवसेनेच्या मंत्र्याने राजीनामा दिला आहे. एनडीएच्या ते बैठकीलाही आले नाहीत. त्यांच्यासाठी विरोधी बाकांवर बसण्याची सोय केली जात आहे.”
विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत असताना मुख्यमंत्रीपदावरून युती फिस्कटली. मुख्यमंत्रीपद हवच अस सांगत शिवसेनेनं भाजपाला दूर सारत राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मदतीनं मोर्चे बांधणी सुरू केली आहे. सत्तास्थापनेसंदर्भात तिन्ही पक्षातील बोलणी अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान, “शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा हवा असेल, तर त्यांनी ‘एनडीए’त राहायचं की बाहेर पडायचं यांचा निर्णय घ्यावा, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले होते. त्यामुळे राष्ट्रवादी व काँग्रेससोबत जाण्यापूर्वी शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शिवसेना ‘एनडीए’तून बाहेर पडल्याची चर्चा सुरू होती. मात्र, याबाबत दोन्ही पक्षांकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती. “शिवसेनेच्या मंत्र्यांने राजीनामा दिला आहे. त्यामुळे हवा तो अर्थ तुम्ही काढू शकता,” असं शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत म्हणाले होते.
पी चिदंबरम यांना जामीन
पी चिदंबरम यांना जामीन नाकारणार्र्या कोर्टाच्या आदेशातही काही परिच्छेद असेच कॉपी पेस्ट केलेले आहेत.
https://www.thehindu.com/news/national/sections-from-unrelated-case-foun...
काहीही करा, पण यांना अडकवा नाहीतर तुमचा जस्टिस लोया होईल असे आदेश सुटले असावेत.
एकदा काँग्रेस ,राष्ट्र वादी
एकदा काँग्रेस ,राष्ट्र वादी आणि सेनेचे सरकार बनलं आणि सेना काँग्रेस / राष्ट्र वादी च्या सल्ल्यानी चालली तर bjp ला सात जन्म घ्यावे लागतील सरकार पाडण्यासाठी.
महाराष्ट्र मधील हिंदू कधीच कट्टर आणि धर्म वेडा नव्हता आणि आमचे इथले स्थानिक मुस्लिम बांधव सुद्धा कधीच धर्म वेडे नव्हते.
काही लोकांमुळे भेद निर्माण झाला..
Totally agreed
(No subject)
भरतजी इतकेही खरे लिहू नकात.
भरतजी इतकेही खरे लिहू नकात. आजकाल खरे बोलणार्याला यू ए पी ए लावायची फॅशन आली आहे.
ऊद्धव ठाकरेंची आणि पर्यायाने
ऊद्धव ठाकरेंची आणि पर्यायाने शिवसेनेची विचारसरणी पहायची असेल तर हा ११ वर्षे जुना विडिओ पहा. ७ मिनिटांपासून पुढे.
२००८ मध्येही शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, ऊद्धव मुख्यमंत्री होणार हे तुण्तुणं चालूच होतं. आधी निवडणूक जिंका मग मुख्यमंत्री ठरवू हे ऊठांचे स्वत:चे वाक्य आहे.
पूर्वपरिस्थितीचा एक ऑब्जेक्टिव रिव्यू,
भाजपने फडणवीस युतीचे मुख्यमंत्री असे ठासून सांगतांना १६४ पैकी १०५ एवढे प्रचंड जनमत मिळवले. ही लोकांनी फडणवीसांच्या पाच वर्षांच्या कारभाराला दिलेली पसंती आणि हाच मुख्यमंत्री पाहिजे म्हणून दिलेला पाठिंबा आहे, असे मला वाटते.
कित्येक दशकानंतर पूर्ण पाच वर्षे पदावर राहिलेला मुख्यमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्राला दिला. वसतंराव नाईकांनंतर (१९७५) एकही मुमं आपला ५ वर्षांछा कार्यकाळ पूर्ण करू शकलेला नाही. खुद्द शरदपवारांना टोटल ६ वर्षांसाठी तीन वेगवेगळ्या टर्म लागल्या. भाजपातले अंतर्गत प्रतिस्पर्धी, खडसे/मुंडेंसारखे ज्यांच्यावर आरोप झाले अशा नेत्यांची हाताळणी , शिवसेनेसारखा होस्टाईल मित्रपक्ष बरोबरीला घेणे, शेतकरी आत्महत्या, मराठा आरक्षणावरून पेटलेले रान, विद्यमान मंत्रांना तिकिटे नाकारणे अशा नाना गोष्टी त्यांनी यशस्वी रित्या हाताळाल्या आणि ते सुद्धा ईमेज क्लीन ठेऊन. कुठलाही मोठा घोटाळा वा निर्णयाचा ब्लंडर न करता. जनतेने त्यांच्या नेतृत्वाला पुन्हा सत्तेवर आण्ण्यासाठी त्यांना आणि त्यांच्या मित्रपक्षाला मत दिले. प्रशासन, राजनिती आणि पब्लिक ईमेज सगळ्या आघाड्यांवर ते मुख्यमंत्री म्हणून चागल्या गुणांनी ऊत्तीर्ण झाले असावेत आणि म्हणूनच भाजप ह्या एका व्यक्तीमागे खंबीरपणे ऊभा राहिला आहे असे मला वाटते. ह्याचा अर्थ फडणवीसांचे सगळे प्रशासकीय निर्णय सर्वांना पटले असे नाही ऊदा. आरे. पण एक निर्णय म्हणजे पाच वर्षांची कारकीर्द नव्हे.
(जस्ट एक ऊदाहरण म्हणून... ओबामाच्या मेडिकल प्लॅन विधेयकावर सर्व स्तरातून टीका झाली पण लोकांनी ओबामा वाईट लीडर आहे असे म्हंटले आणि त्याला पुन्हा निवडून दिले नाही असे झाले नाही)
फडणवीस/मोदी भाजपासाठी मते खेचून आणाणार हेशिवसेनेने ओळखले होते. अर्ध्या जागाच लढत असल्याने भाजपाला पूर्ण बहुमत मिळणार नाही हे देखील शिवसेनेला माहित होते. युती म्हणवत त्यांनी भाजपाला गाफील ठेऊन निवडणुकांचा निकाल लागताच डाव साधला.
फडणवीस मुख्यमंत्री का नको ह्याची केस तर शिवसेनेनी बनवायला हवी की नको. त्यांचे दोष जनतेला सांगायला हवेत की नको. आदित्य ठाकरे किंवा स्वतः ऊद्धव किंवा शिंदे, देसाई शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा तर द्या पटवून जनतेला युतीचा मुख्यमंत्री म्हणून तो फडणवीसांपेक्षा सरस कसा?
मला वाटते हा सगळा मामला आहे पाच वर्षात मलाईदार खात्यांवर शिवसेनेला हात मारायला न मिळणे ह्याचा. शिवसेनेकडे राज्याच्या पहिल्या १३ महत्वाच्या आणि अतिमहत्वाच्या खात्यांपैकी फक्त ६ व्या नंबरचं एकमेव खातं आहे. ह्या बदल्यात त्यांना बीएमसीवर पूर्ण कंट्रोल मिळाला. पण बीएमसी हे जेमतेम पक्षाचा खर्च चालवण्याईतपतच पुरणारा स्त्रोत आहे. आणि पक्ष मजबूत आणि पक्षी गब्बर करायचे असतील तर राज्यातली मलाईदार खातीच हवीत जी त्यांना मिळत नव्हती आणि फडणवीसांच्या 'न खाऊंगा न खाणे दुंगा' अॅटिट्युडमुळे आणि भाजपाला मिळणार्या बहुमतामुळे ह्या खात्यांविना भाजपाबरोबर राहणे नुकसानदायक होऊ लागले तेव्हा शिवसेनेने हा मार्ग निवडला. कदाचित ही शिवसेनेची आर्थिक स्त्रोत मिळवण्यासाठीची सर्वायवल बॅटल सुद्धा असू शकते.
आता सत्तेत आल्यावर राज्यात त्यांना मुख्यमंत्रीपद आणि काही मलाईदार खाती मिळतील पण बीएमसीमध्ये पाठिंबा मिळवतांना घ्यावे लागणारे वाटेकरी वाढल्याने आणि तुल्यबळ भाजप विरोधीपक्षात गेल्याने, बीएमसीतून येणारा मलिदा कमी होईल.
पैसा नाही तर पक्षाला बळकटी नाही आणि अशा पक्षातल्या लीडरचे स्थान धोक्यात येते. 'हा आमचा मुख्यमंत्री' हे सांगून जर निवडणुका होत असतील तर जनतेला जास्त क्लॅरिटी मिळते. मला वैयक्तिकरित्या हा प्रकार आवडतो. लोकसभेतही हे बघितले आहे. क्लीअर मँडेट मिळण्यासाठी नेत्याचा चेहरा पुढे असणे महत्वाचे आहे. पक्षांना फडणवीस, ठाकरे, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण असे चेहरे लाभले की निवडप्रक्रिया सोपी जाते.
>>> फडणवीस मुख्यमंत्री का नको
>>> फडणवीस मुख्यमंत्री का नको ह्याची केस तर शिवसेनेनी बनवायला हवी की नको. त्यांचे दोष जनतेला सांगायला हवेत की नको. >>>
फडणवीस मुख्यमंत्री म्हणून नको असं सेना म्हणतच नाही. अडीच वर्षे सेनेचा मुख्यमंत्री व पुढील अडीच वर्षे भाजपचा हेच सेना सांगत आहे.
>>> भाजपने फडणवीस युतीचे मुख्यमंत्री असे ठासून सांगतांना १६४ पैकी १०५ एवढे प्रचंड जनमत मिळवले. ही लोकांनी फडणवीसांच्या पाच वर्षांच्या कारभाराला दिलेली पसंती आणि हाच मुख्यमंत्री पाहिजे म्हणून दिलेला पाठिंबा आहे, असे मला वाटते. >>>
भाजपला एकट्याच्या जीवावर इतकी मते मिळालेली नाहीत. यात सेनेचीही मते आहेत तसेच ऱासप, रिपब्लिकन इ. च्या उमेदवारांनी कमळ चिन्हावर लढून मिळवलेली मते आहेत.
>>> युती म्हणवत त्यांनी भाजपाला गाफील ठेऊन निवडणुकांचा निकाल लागताच डाव साधला. >>>
युतीसाठी भाजप नेते आग्रही होते व तेच मातोश्रीवर जाऊन युती करून आले. भाजपचे चाणक्य सेनेचा डाव न समजण्याइतके अजाण होते? का निकालानंतर आपल्याला बहुमताइतक्या जागा सहज मिळून सेनेची गरज लागणार नाही हा फाजिल आत्मविश्वास होता?
>>> प्रशासन, राजनिती आणि पब्लिक ईमेज सगळ्या आघाड्यांवर ते मुख्यमंत्री म्हणून चागल्या गुणांनी ऊत्तीर्ण झाले असावेत आणि म्हणूनच भाजप ह्या एका व्यक्तीमागे खंबीरपणे ऊभा राहिला आहे असे मला वाटते. >>>
फडणवीस बऱ्याच आघाड्यांवर (रस्ते, पाणी, वीजपुरवठा, टोलमाफी इ.) सपशेल अनुत्तीर्ण झालेत व निकालानंतर ते उघड होईल हे त्यांना स्वत:ला माहिती होते. म्हणून तर त्यांनी भाजपचे दरवाजे उघडून मेगाभरती करून अनेक गणंग पायघड्या घालून सन्मानपूर्वक भाजपत आणले. हे गणंग भाजपच्या तिकिटावर निवडून येतील व आपल्याला उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक ते ग्रेस मार्क यांच्यामुळे मिळतील या भ्रमात ते होते.
अडीच वर्षे सेनेचा मुख्यमंत्री
अडीच वर्षे सेनेचा मुख्यमंत्री व पुढील अडीच वर्षे भाजपचा हेच सेना सांगत आहे. >> हे जनतेला मत मिळण्याआधी सांगितले होते का? जनतेने युतीला आणि पर्यायाने फडणवीसांना पाच वर्षांसाठी निवडून दिले ना? अडीच वर्षानंतर त्यांच्या प्रफॉर्मन्स वर त्यांना बदलायचे की ठेवायचे हा निर्णय अडीच वर्षानंतर करता आला नसता का?
शिवसेनेने जोशींना काढून राणेंना मुख्यमंत्री का बनवले होते? मुख्यमंत्रीपद म्हण्जे आरतीचं तबक आहे का प्रत्येकाने दोन मिनिटे फिरवा?
भाजपला एकट्याच्या जीवावर इतकी मते मिळालेली नाहीत. यात सेनेचीही मते आहेत तसेच ऱासप, रिपब्लिकन इ. च्या उमेदवारांनी कमळ चिन्हावर लढून मिळवलेली मते आहेत. >> हेच शिवसेनेला मिळालेया मतांबाबतही म्हणता येते.
का निकालानंतर आपल्याला बहुमताइतक्या जागा सहज मिळून सेनेची गरज लागणार नाही हा फाजिल आत्मविश्वास होता? >> १६४ पैकी १४५ जवळजवळ ९०% जागा कुठल्या पक्षाला आजवर मिळाल्या आहेत? असा आत्मविश्वास ठेवतो का कोण? मागच्या वेळी केवळ १५ वगैरे सीटांसाठी शिवसेनेशी युती केली ना भाजपने? मग ह्यावेळी ते बहुमताच्या जवळ पोहोचले असते तर युती तोडली असती असे का वाटते?
हे गणंग भाजपच्या तिकिटावर निवडून येतील व आपल्याला उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक ते ग्रेस मार्क यांच्यामुळे मिळतील या भ्रमात ते होते. >> हे सगळे निवडणुकीआधी जनतेला माहित होते ना.. तरी युतीला स्पष्ट बहुमत मिळाले ना? मग आता असे-तसे म्हणण्यात काय अर्थ आहे.
>.>> जनतेला मत मिळण्याआधी
>.>> जनतेला मत मिळण्याआधी सांगितले होते का? जनतेने युतीला आणि पर्यायाने फडणवीसांना पाच वर्षांसाठी निवडून दिले ना? अडीच वर्षानंतर त्यांच्या प्रफॉर्मन्स वर त्यांना बदलायचे की ठेवायचे हा निर्णय अडीच वर्षानंतर करता आला नसता का? >>>
हे सेना नेत्यांनी प्रचारात अनेकदा सांगितलंय. जनतेने फक्त फडणवीसांना निवडून दिलंय? सेना मतदारांनी सेनेचा मुख्यमंत्री अडीच वर्षे होणार म्हणूनच युतीला मत दिले असेल ना? कोण मुख्यमंत्री होणार हे पर्फॉर्मन्सवर अवलंबून नव्हते. सर्व पदांचे व जबाबदाऱ्यांचे समसमान वाटप या अटीवरच युती झाली होती. जर पर्फॉर्मन्सचा विचार केला तर फडणवीस १ दिवस सुद्धा मुख्यमंत्री होण्यास पात्र नाहीत.
>>> शिवसेनेने जोशींना काढून राणेंना मुख्यमंत्री का बनवले होते? मुख्यमंत्रीपद म्हण्जे आरतीचं तबक आहे का प्रत्येकाने दोन मिनिटे फिरवा? >>>
हास्यास्पद प्रश्न. भाजपने कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड अशा अनेक राज्यात ५ वर्षांच्या काळात तीन तीन मुख्यमंत्री बदलले होते. तेव्हा ते आरतीचं तबक होतं का?
>>> हेच शिवसेनेला मिळालेया मतांबाबतही म्हणता येते. >>>
बरोबर. भाजपने १०५ जागा स्वबळावर मिळविलेल्या नाहीत व सेनेने सुद्धा ५६ जागा स्वबळावर मिळविलेल्या नाहीत.
>>> मग ह्यावेळी ते बहुमताच्या जवळ पोहोचले असते तर युती तोडली असती असे का वाटते? >>>
हो. १२५+ जागा मिळाल्या असत्या तर १०१ टक्के युती तोडली असती किंवा सेनेला किरकोळ मंत्रीपदे देऊन घ्यायचं तर घ्या नाहीतर निघा अशी ताठर भूमिका घेतली असती.
>>> हे सगळे निवडणुकीआधी जनतेला माहित होते ना.. तरी युतीला स्पष्ट बहुमत मिळाले ना? मग आता असे-तसे म्हणण्यात काय अर्थ आहे. >>>
बहुमत युतीला मिळालंय, फक्त भाजपला नाही.
>>ये केळ्या सेना बीजेपी गेली
>>ये केळ्या सेना बीजेपी गेली फाट्यावर तू तुझं बोल संघोट्या<<

लैच झोंबल की रे तुला.... तुझ्यासारख्यांच्यासाठीच लिहल होत
ठेवणीतले आयडी बाहेर पडतात अश्या निमित्ताने
सेक्रेड गेम्स महाराषट्रा
सेक्रेड गेम्स महाराषट्रा पोलिटिक्स https://www.youtube.com/watch?v=jNzf9kSCKWk
आत्ता लोकसत्तामधे खालील बातमी
आत्ता लोकसत्तामधे खालील बातमी वाचली ती अशी: शरद पवार यांना माध्यमांनी महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबद्दल प्रश्न विचारला. तेम्व्हा पवार म्हणाले, “भाजपा-शिवसेनेने सोबत निवडणूक लढवली होती. तर राष्ट्रवादीने काँग्रेससोबत निवडणूक लढवली. त्यामुळे त्यांनी त्यांचा मार्ग निवडावा. आम्ही आमच राजकारण करू,” या त्यान्च्या विधानाचा अर्थ काय? काही गडबड दिसत आहे. उद्या कळेलच.
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/maharashtra-vidhansabha-election2019-news/ncp-p...
याला गुगली म्हणतात?
आता खरंच कंटाळा आलाय किंवा
आता खरंच कंटाळा आलाय किंवा इंटरेस्ट गेलाय. किमान शेतकऱ्यांसाठी तरी कोणी नीट सरकार स्थापन करायला हवं होतं, त्यांना अत्यंत तुटपुंजी मदत जाहीर झालीय. फार वाईट वाटतं बातम्या बघून, त्यांचे हाल बघून. सगळे दाखवतात आम्ही शेतकरी प्रेमी आणि आम्हालाच कळवळा त्यांचा, बोलाची कढी आणि बोलाचा भात. सगळेच आपापले इगो कुरवाळत बसतात, फक्त आपला स्वार्थ बघतायेत. यात कोणाही एका पक्षाला दोष देत नाही, सगळे एका माळेचे मणी आहेत.
राष्ट्रपती राजवट असेल तर जास्त मदत देता येत नाही का, देता येत असेल तर द्यायला हवी होती.
राष्ट्रपती राजवट असेल तर
राष्ट्रपती राजवट असेल तर जास्त मदत देता येत नाही का, देता येत असेल तर द्यायला हवी होती. >>>
मदत फक्त शेतकर्यांना का मिळावी हाही एक प्रश्न आहे. कितीतरी लोकान्चे सन्सार पुरामुळे उध्वस्थ झाले. व्यापार्यांचा माल वाहुन गेला / सडला, गोठेवाल्यांची जनावरे बुडुन मेली.. त्यांनाही सरकारने मदत करावी. त्याशिवाय आताच कितीतरी लोकांना लेओफ् च्या नावाखाली बहुराष्ट्रीय कंपन्यांनी काढुन टाकलंय. त्यांनाही सरकारने मदत करायला हवी.
सर्वांना करावी आणि मिळावी.
सर्वांना करावी आणि मिळावी. शेतकऱ्यांनी पिकवले तर आपण खाणार म्हणून त्याचं आधी नाव येतं डोळ्यासमोर (त्यात सर्वच पक्ष आम्हीच कसे शेतकऱ्यांचे कैवारी दाखवत आहेतना) पण मुळात देता येते का जास्त प्रमाणात रा राजवट असताना आणि देता येत असेल, करता येत असेल तर सर्वांनाच स्टेप बाय स्टेप द्यावी.
मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष बंद आहे त्यामुळे रुग्णांना त्रास होतोय , तोही सुरु करावा मुखत्वेकरून. हे सर्व tv बघून मनात आलं ते लिहिलं.
हे सेना नेत्यांनी प्रचारात
हे सेना नेत्यांनी प्रचारात अनेकदा सांगितलंय>> मी तुम्हाला ह्या आधी बरेचदा म्हणालो ठाकरे प्रचार सभेत वा पत्रकार परिषदेत हे बोलल्याचा पुरावा द्या. जो तुम्ही अजुनही देऊ शकले नाही.
जर पर्फॉर्मन्सचा विचार केला तर फडणवीस १ दिवस सुद्धा मुख्यमंत्री होण्यास पात्र नाहीत.>> हे मला तुम्हाला वाटून काय उपयोग. जनतेला असे वाटत नाही, जनतेने मुख्यमंत्री म्हणून त्यांना पूर्ण बहुमत दिले आहे.
Objectively विचार करून पहा एकदा.
. १२५+ जागा मिळाल्या असत्या तर १०१ टक्के युती तोडली असती किंवा सेनेला किरकोळ मंत्रीपदे देऊन घ्यायचं तर घ्या नाहीतर निघा अशी ताठर भूमिका घेतली असती.>> केंद्रात शिवसेनेची शून्य टक्के गरज असून तोडली का युती? असे जर तर वर 101 % हमी देणे हास्यास्पद नव्हे का?
बहुमत युतीला मिळालंय, फक्त भाजपला नाही.> nope, युती आणि भाजपचा मुख्यमंत्री म्हणुन फडणवीस ना मिळाले आहे.
जनतेने मुख्यमंत्री म्हणून
जनतेने मुख्यमंत्री म्हणून त्यांना पूर्ण बहुमत दिले आहे
?
ते झारखंड मधे आणि बिहार मधे
ते झारखंड मधे आणि बिहार मधे भाजपच्या मित्रपक्षांनी काडिमोड का घेतला ??
सेनेने आपलं राजकीय भवितव्य पणाला लावलं आहे. जिंकले तर भाजपाला महाराष्ट्रच काय पण येत्या निवडणुकांमधे स्थानिक पक्षांना गोजारल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, जर सेना ह्यावेळी तहात हरली तर तिचे अस्तित्व पुसुन जाईल
पूर आले गणपतीच्या वेळेस.
पूर आले गणपतीच्या वेळेस. निवडणुका झाल्या दिवाळीच्या आधी. पूरग्रस्तांना अजूनही मदत पोचली नाही? बरोबर. तेव्हा सरकार महाजन आदेश यात्रांत मग्न होतं.
>>>
>>>
मी तुम्हाला ह्या आधी बरेचदा म्हणालो ठाकरे प्रचार सभेत वा पत्रकार परिषदेत हे बोलल्याचा पुरावा द्या. जो तुम्ही अजुनही देऊ शकले नाही. >>>
जरा वाचन वाढवा. याच धाग्यात याच पानावरचा पहिला प्रतिसाद पहा.
Submitted by पुरोगामी on 16 November, 2019 - 08:42
>>> जनतेने मुख्यमंत्री म्हणून त्यांना पूर्ण बहुमत दिले आहे.
Objectively विचार करून पहा एकदा. >>>
जनतेसमोर सेनेचा अडीच वर्षे मुख्यमंत्री व समसमान पदे व जबाबदाऱ्यांचे वाटप हा सुद्धा पर्याय होता. त्याला अनुसरून मतदान झाले असणार. पूर्ण ५ वर्षे फक्त फडणवीस मुख्यमंत्री हा पर्याय विशेषत: सेनेच्या मतदारांसमोर नव्हता. सेनेचा मुख्यमंत्री अडीच वर्षे हा पर्याय त्यांच्यासमोर होता. जर सर्व जनतेला फडणवीसच हवे होते, तर भाजपला एकट्याला १४४+ किंवा त्याच्या जवळपास जागा जनतेने दिल्या असत्या.
>>> केंद्रात शिवसेनेची शून्य टक्के गरज असून तोडली का युती? असे जर तर वर 101 % हमी देणे हास्यास्पद नव्हे का? >>>
केंद्रात युती तोडली नाही कारण राज्यात सेनेची आंत्यंतिक गरज होती.
>>> युती आणि भाजपचा मुख्यमंत्री म्हणुन फडणवीस ना मिळाले आहे. >>>
नाही. मुख्यमंत्री म्हणून फक्त फडणवीसच हा पर्याय जनतेसमोर नव्हता.
पण आता ही चर्चा कशाला?
पण आता ही चर्चा कशाला? बिहारमध्ये महागठबंधनाला बहुमत मिळालं होतं. त्यांनी संसारही मांडला होता. तिथेही युवराजांना उपमुख्यमंत्रीपद दिलं होतं मग नितीशनी लालूशी काडीमोड घेऊन सुशील मोदींशी म्होतूर लावलाच की. तसंच हे.
जरा वाचन वाढवा. याच धाग्यात
जरा वाचन वाढवा. याच धाग्यात याच पानावरचा पहिला प्रतिसाद पहा.
Submitted by पुरोगामी on 16 November, 2019 - 08:42 >> तो प्रतिसाद वाचला आहे. त्यात कुठली प्रचार सभा आहे आणि ठाकरे 'मुख्यमंत्री शिवसेनचा होणार आहे' असे कधी म्हणाले सांगता का? मुंबई आणि राज्यात ऊद्धव आणि आदित्य ठाकरेंनी एवढ्या प्रचारसभा घेतल्या, पत्रकारांनाही बाईट्स दिले काही सॉलिड असायला हवे ना ठाकरे ऊवाच.
जनतेसमोर सेनेचा अडीच वर्षे मुख्यमंत्री व समसमान पदे व जबाबदाऱ्यांचे वाटप हा सुद्धा पर्याय होता.>> कसा? हे जनतेला कोणी सांगितले?
केंद्रात युती तोडली नाही कारण राज्यात सेनेची आंत्यंतिक गरज होती. >> हे पुन्हा subjectively बोलणे झाले. असे तुम्हाला-मला वाटते, ह्याला काही पुरावा?
पूर्ण ५ वर्षे फक्त फडणवीस मुख्यमंत्री हा पर्याय विशेषत: सेनेच्या मतदारांसमोर नव्हता. सेनेचा मुख्यमंत्री अडीच वर्षे हा पर्याय त्यांच्यासमोर होता. >> तोच प्रश्न. हे जनतेला कोणी सांगितले? पुन्हा सेनेच्या नेत्यांनी म्हणू नका. स्वतः ठाकरेंनी जनतेला सांगितले जसे फडणवीसांनी आणि मोदींनी संगितले असे ऊत्तर असेल तरच ह्या विषयावर पुढे बोलण्यात अर्थ आहे.
नाही. मुख्यमंत्री म्हणून फक्त फडणवीसच हा पर्याय जनतेसमोर नव्हता. >> दुसरा कोणता पर्याय होता? शिवसेनेचा असे ऊत्तर असेल तर कोण?,
ठाकरेंनी दिला का? हे सुद्धा सांगा.
मी कुठेतरी बातम्यांच्या
मी कुठेतरी बातम्यांच्या लिंक्स दिल्या होत्या. जनसत्ता आणि लोकसत्ता. त्यात फडणवीसांनी मुख्यमंत्री शिवसेनेचा या दाव्याला उत्तर दिल्याचं म्हटलंय. की मी भाजपचा मु ख्य्मंत्री आणि शिवसेनेचा. याचा अर्थ सेना आपला मुख्यमंत्री व्हायला हवा, होणार, असं म्हणाल्याचं फडणवीसां पर्यंत पोचलंय. त्यांच्यापर्यंत पोचलं म्हणजे जनतेपर्यंतही पोचलंच असेल. मी सामना वाचत नाही. आणि लोकसत्तेतल्या मराठी वृत्तपत्रांतल्या निवडणूक प्रचाराच्या बातम्याही फक्त नजरेखालून घातल्या होत्या. पण सामना या मुखपत्रात तसा दावा केला नसेन?
मी कुठेतरी बातम्यांच्या
मी कुठेतरी बातम्यांच्या लिंक्स दिल्या होत्या. जनसत्ता आणि लोकसत्ता. >> भरत बातमीदारांच्या स्पेक्युलेटिव बातम्या नकोत. ह्या विडिओ आणि सोशल मिडियाच्या जमान्यात ठाकरेंचा एक विडिओ असू नये मुमं शिवसेनेचाच होईल असे म्हणणारा, ठणकाऊन सांगणारा?
सामना आपण वाचायची गरज नाही. सामनामध्ये लिहून आले की त्यावरून सगळीकडे त्याचे दाखले देत चर्चा घडवून आणल्या जातात.
अशी चर्चा घडल्याचे ऐकले असल्यास मलाही ती बघायला आवडेल.
की मी भाजपचा मु ख्य्मंत्री आणि शिवसेनेचा. >> बरोबर. फडणवीसांनी हे ईतके क्लिअर म्हंटले असेल त्यावर मोदींनी शिक्कामोर्तब केले असेल तर जनतेच्या मनात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हा संदेह रहायलाच नको.
No discussion on Maharashtra
No discussion on Maharashtra government formation, says Sharad Pawar after meeting Sonia Gandhi
साहेब दिल्लीला श्रीमती सोनियांना भेटून आले पण महाराष्टाच्या सत्ता स्थापनेबद्दल काहीच बोलणी झाली नाहीत.
https://timesofindia.indiatimes.com/india/sharad-pawar-meets-sonia-gandh...
मग साहेब काय दिल्लीच्या प्रदूषणाबद्दल गप्पा मारायला गेल्या होत्या?
सोनिया बाई आता त्यांना चकरा मारायला लावत आहेत का? जुनं उट्ट काढण्यासाठी?
पण शपथविधी कधी आहे?
पण शपथविधी कधी आहे? इथे कुणी शिवसैनिक असेल तर सान्गेल काय ?
>त्यावर मोदींनी शिक्कामोर्तब
>त्यावर मोदींनी शिक्कामोर्तब केले असेल तर जनतेच्या मनात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हा संदेह रहायलाच नको.?
मला लोकस्त्तेच्या सब- हेडलाइन्स आठवताहेत. मोदींनी प्रचारसभेत सेनेचा उल्लेख केलाच नाही.
व्हि डियो शोधण्यात इंटरेस्ट नाही.
२०१४ ला निवडणुक पश्चात युती केली. आता निवडणूक पूर्व युती तोडली. झालं .
परत होणारच नाही, असंही नाही. मुंबई मनपाच्या कंत्राटदारांवर आयकर खात्याच्या धाडी पडल्यात.
>>> त्यात कुठली प्रचार सभा
>>> त्यात कुठली प्रचार सभा आहे आणि ठाकरे 'मुख्यमंत्री शिवसेनचा होणार आहे' असे कधी म्हणाले सांगता का? >>>
मी दिलेल्या सर्व लिंक्स सेनेच्या प्रचारसभांचा माध्यमातून आलेला वृत्तांत आहे. माध्यमांनी खोटा वृत्तांत लिहिला असा दावा असेल तर माझा पास.
बाकी इतर प्रश्नांचे अनेकदा उत्तर दिल्याने परत तेच तेच लिहायचा उत्साह नाही.
Pages