अचाट आणि अतर्क्य गाणी

Submitted by slarti on 16 April, 2009 - 08:46

अ आणि अ गाण्यांसाठी हा बाफ. इथे गाण्याबद्दल सांगताना शक्यतो चित्रफितीचा दुवा द्या आणि दुवा घ्या.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिवाशिवी Lol त्या वयात असले गाणे!
हे गाणे पहिल्यांदाच ऐकले. तू उल्लेख केलेल्या रोशनच्या तीन गाण्यांत शब्द खरेच काहीही चालले असते.

तो बालहिरो लहानपणचा इरफान खान वाटतो. ह्या गाण्याच्या मोठेपणीच्या व्हर्जनमधे धरम सुरुवातीला एक चिठ्ठी वाचतो. त्यात "मिलेंगे" हा शब्द " मिलें गे " असा लिहिलाय.

रोबोट चित्रपटातील.... (सॉरी सॉरी रजनीकांतपटातील) "कीलीमांजारो लडकी परबत की यारो" हे असच आपल्या बाफ ची शोभा (आणि एश्वर्य ) वाढवणारं अजुन एक अप्रतीम गीत.... त्याच्या लिरिक्स पासुन, कॉस्च्युम पासुन ते नाचापर्य्ण्त सर्वच अ आणि अ आहे.... आणि एश आणि रजनी ही जोडीच इतकी अ अणि अ आहे की बाकी काहि सांगायलाच नको... तर या आणि या गाण्याचा आस्वाद घ्या!
http://www.youtube.com/watch?v=NEv9wmpok1Y!
तसे हे गाणे आहे प्रेक्षणीय .. तरिही शुद्ध मनोरंजनाचा आणि आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकांच्या सगळ्या अपेक्षा हा व्हीडीओ पुर्ण करेल असे मला वाटते!! Biggrin Biggrin Biggrin

http://www.youtube.com/watch?v=cZMCMSbSZ6o&feature=related
ह्या गाण्यावर चिक्कार चर्चा झालेली आहे. पण ह्या लिंकमध्ये त्या चित्रपटाचेही नाव कळले..... गाणॅ-'जबसे हुइ है मोहोब्बत" आणि चित्रपट "खुनी रात"...... श्र, क्ष, फारेंड, स्लार्टी...कुणीतरी प्रथितयश इथे लक्ष देतील काय? आम्हा पामरांना या संपुर्ण चित्रपटाचे रसग्रहण करायचे आहे. Happy

सन्डे मॉर्निंग लव्ह यु......ईईईईईईईईई काय आहे ते...... हाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहा

@अंजली_१२
काय ध्यान आहे ना!! आणि काय उत्साहात नाचतोय, नाही बागडतोय. ती पिरॅमिड्स लाजून चूर होतील इतका मख्ख आहे. आणि ढेरी पुढे काढून काय स्टाईल आहे!!::हहगलो:

येणार असावा Sad गोविंदा-रविना असते तर जरा तरी बरे वाटले असते. चक्रम गाणी पण धड करायचे. हे दोघे म्हणजे अगदीच कै च्या कै...

आर राजकुमारमधले गाणे आहे ते. प्रभुदेवाला म्हणावं अशी साऊथ स्टाईल नॉनसेन्स गानी हिंदीत करायची असतील तर हिरॉइन दुसरी घे. शाहिदच्या पुढ्यात सोनाक्षी म्हणजे "सिंधु कसला सिंधुदुर्ग" वाटते!!

याच सेम स्टाईलमधे रावडी राठोडमधे पण एक गाणं होतं, ते जरातरी सूसह्य होतं म्हणजे त्यात आचरटपणा अक्षयला शोभतो तरी.

"सिंधु कसला सिंधुदुर्ग" वाटते! >>> हहाहाहा... प्रभूदेवाला काय बोलायचं म्हणजे तो नगमाला घ्यायचा पुढच्या सिनेमा), जाऊ द्या झाल.

अँकी नं.१ | 16 April, 2009 - 14:04

महान अ आणि अ लिरिक्स-
मुक्काला मुकाबला, उर्वशी उर्वशी, पट्टी रॅप - हमसे है मुकाबला>>>>

कृपा करून या गाण्यांना नवे ठेवू नका. भले शब्द काहीही असतील पण बघणेबल तर नक्कीच होती. आम्ही कॉलेज ला डांस सुद्धा बसवला होता या गाण्यावर.

http://www.youtube.com/watch?v=KW6Epg5c60w

आजचे अ अ गाणे! धरणी दुभंगून पोटात घेईल तर बरे... शेवटी 'तुका म्हणे' सारख 'जयेंद्र कोळी' आहे काय????!! कहर होईल तर ते.

आझाद देश के गुलाम या चित्रपटातले शब्बीर कुमार ने गायलेले आणि ऋषी कपूरने नृत्य केलेले गाणे या धाग्यावर येऊन गेलेय का ?

नायकाला कुक्कुटपालन केंद्र सुरू करायचं असतं. पण ते एकट्याने न काढता नायिकेला सोबत घेऊन सुरू कराव याच विचाराने त्याला झपाटलेलं असतं. या विचारात फिरताना त्याला व्हिलनच्या अड्ड्यावर नायिका असल्याचं कळतं. तो वेषांतर करून अड्ड्यात जातो. नायिकेला बघताच त्याला खूप आनंद होतो आणि तो नाचू गाऊ लागतो. त्याच्या मनातला प्रश्न तो नाचत, गात विचारू लागतो. त्यासाठी कोंबड्याच्या आवाजातच तो बांग देतो आणि विचारतो..

https://www.youtube.com/watch?v=94PH-Es4-Go

https://www.youtube.com/watch?v=hst5Qb16exs

या गाण्यतले सुरुवातीचे संगीत ऐकून गाणे कोणते आहे याचा बरोबर अंदाज लावणार्‍याला निदान पद्मश्री द्यायला हवी.
काही हिंदी सिनेसंगीताचे दर्दी मी सुरुवात ऐकून गाणे ओळखतो अशा बढाया मारतात. त्यांचा पोपट करायला मस्त आहे.

"या गाण्यतले सुरुवातीचे संगीत ऐकून गाणे कोणते आहे याचा बरोबर अंदाज लावणार्‍याला निदान पद्मश्री द्यायला हवी." - हे गाणं 'ऐकून' बरोबर ओळखणार्यालाही बक्षिस द्यायला हवं. Wink Happy

त्या गाण्यात कटींग सलून मधली खुर्ची आहे गायकाच्या मागे. बहुतेक आधीच्या गाण्यात कार्यक्रम आटपलेला असावा. Happy

Pages