अचाट आणि अतर्क्य गाणी

Submitted by slarti on 16 April, 2009 - 08:46

अ आणि अ गाण्यांसाठी हा बाफ. इथे गाण्याबद्दल सांगताना शक्यतो चित्रफितीचा दुवा द्या आणि दुवा घ्या.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नागराजा गाणं आत्ता बघितलं. आई गं कित्ती त्या स्टेप्स आहेत. श्री आणि जयाप्रदाला मानलं पाहिजे. मला सगळ्यात जास्त एकमेकींसमोर बसून वर-खाली डोलायची स्टेप आवडली. मंगळागौरीला घागर फुंकणे वगैरे खेळ होतात त्याचीच आठवण आली एकदम.

मला मधे ते चीत्कार "अम्मा" "अब्बा" असे ऐकू येत होते>>>
मला ते जोरात ऐकल्यावर पण तेच ऐकू आलं.... Happy

--------------
नंदिनी
--------------

जुडवां मध्ये अनू मलिकने त्याची गाण्याची हौस पूर्ण करून घेतली होती. त्याने आठ दिवस गळा बांधून ठेवला असणार अन सल्लू, कर्श्मा अन रंभा- तिघांना एकेक किलो आयोडेक्स लागलं असणार. Happy

उंची है बिल्डिंग, लिफ्ट तेरी बंद है..
कैसे मै आऊं, दिल रजामंद है!
आजा आजा आजा, बँडबाजा लेके आजा
तेरी याद सतायें, अब तो दुल्हेराजा अब तो आजा!!

तेरे वासते दौडकर आऊंगा मै
सौ सिढीयोंको भी चढ जाऊंगा मै
तू मेरा दिलबर है आना पडेगा
तुझे मेरा नखरा उठाना पडेगा

आया तुफान है, मुश्किल मे जान है
आना मै चाहूं, दिल बेइमान है..!
ऊंची है बिल्डींग...
(मध्येच समेवर आल्यागत अनू मलिकचं "हांssss" अन 'कैssssसे' किंचाळणं भयानक सुपरडूपर..)

बाकीचं गाणं लिहवत नाही, पण अनू मलिक शेवटी खालील वाक्ये विव्हळतो-

मुंबई बंद है, ट्रेन नही चलती.. (कैसे मै आऊं...)
बिजली नही है, बत्ती भी गुल है.. (कैसे मै आऊं...)

बघून घ्या.. फक्त अनू मलिकचा गळा दाबण्याचा प्रेमळ विचार मनात आणु नका. Proud

http://www.youtube.com/watch?v=G-YM4cf9b_I

मध्येच समेवर आल्यागत अनू मलिकचं "हांssss" अन 'कैssssसे' किंचाळणं भयानक सुपरडूपर..
>>>>>

अगदी अगदी...

Rofl

_______
आला रे...!!!

चित्रपटाच नाव माहित नाही. पण गोविन्दा आणी ट्विन्कल खन्ना च हे गाण..

मै लैला लैला चिल्लाउन्गा कुर्ता फाडके....
मै तेरी लैला बन जाउन्गि कुर्ता फाडके....

आणी तो गोविन्दा खरच कुर्ते फडत असतो गाण्यात (अन्गावरचे.... हो)
(कुरता का फडायचा???)

मै तेरी लैला बन जाउन्गि कुर्ता फाडके.... >> अर्रर्रर्र्... सोनल, "ते मै तेरा मजनू बन जाऊंगा कुर्ता फाडके " असं आहे. अर्था (?) चा अनर्थ(?) झाला ना.. (पांशा मोड ऑन: कितीही आधुनिक झालो तरी मजनू ने कपडे फाडून लैलासाठी विव्हळणं आणि लैलाने मजनूसाठी कपडे फाडून किंचाळलं यातला 'फरक' दुर्लक्ष करण्याजोगा नाही!! पांशा मोड ऑफ ) Rofl

Rofl आशू ...
-------------------------------------------------------------------------
Do Not Disturb … Already Disturbed !

आशु, रवीनाच्या ओठी तशा ओळी आहेत गं बाई!!
--------------
नंदिनी
--------------

रवीनाच्या ओठी ?? नंदिनी, अगं हे गोविन्दा आणी ट्विन्कल खन्ना च्या "जोरु का गुलाम" या सुप्रसिद्ध सिनेमातलं उद्यानस्थपळापळीचं गाणं आहे. Proud

ते अनारी नं १ मधलं गाणं आहे आणि त्यात रविनाच आहे Happy
-------------------------------------------------------------------------
Do Not Disturb … Already Disturbed !

मग मी जे म्हणतीये ते कोणतं?? छ्या! ऑफीसमध्ये कामं सोडून काहीतरी विचार करायला लावता बुवा ! Happy

आशु, जर माझी स्मृती दगा देत नसेल तर हे अनारी नं १ मधले गाणे आहे. यामधे रवीना आणि सिमरन होत्या आणि गोवंदाचा डबल रोल होता.
--------------
नंदिनी
--------------

ते कुर्ता फाड के रुमाल असलं काहीतरी गाणं म्हणत असशील तू . Happy
-------------------------------------------------------------------------
Do Not Disturb … Already Disturbed !

अस कुठलतरी गाण ऐकलय

बेबसी मे बे वॉच देखते है Lol
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

ते गाणं असं आहे

मै लैला लैला चिल्लाउन्गा कुर्ता फाडके....
मै तेरा मजनु बन जाऊंगा कुर्ता फाडके....
इति. गोविंदा

मै मजनु मजनु चिल्लाऊंगी कुर्ता फाडके....
मै तेरी लैला बन जाऊंगी कुर्ता फाडके....
इति. रवीना

................................
किसीनेभी तो न देखा निगाह भरके मुझे
गया फिर आजका दिन भी उदास करके मुझे....

कुर्ताफाड सब छोड छाड मै बन गया दिवाना....
अस काहीतरी पण आहे वाटत पुढे.
~~~~~~~~~~~~~~~~~~
की घेतलें व्रत न हे अम्ही अंधतेने
लब्ध-प्रकाश इतिहास-निसर्ग मानें
जें दिव्य, दाहक म्हणुनि असावयाचें
बुद्ध्याचि वाण धरीलें करिं हे सतींचे .

अरे पण ते साईड डान्सर्स चेच कुर्ते फाडतात....
आणि स्वतःचे कुर्ते कुणी फाडू नये म्हणून कुर्ते न घालता टॉप्स, जॅकेट्स असं घालतात...

तशी या सिनेमातली इतर गाणी ही अ.अ. आहेत....

पागल मुझे बना गई है सीट्टी बजाके,
आह ऊह आउच,
धीरे धीरे हम दोनोमें प्यार हुवा है पक्का... आजा बाबा हम दोनों अब कर ले नैन मटक्का... वगैरे...
_______
...मदहोश किये जाय!!!

>>ते कुर्ता फाड के रुमाल असलं काहीतरी गाणं म्हणत असशील तू .<<
ते मिरची मिरची कमाल कर गई
धोती को फाडके रूमाल कर गई
असं गाणं आहे.

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

अरे ती हिरोईन पण म्हणते कुरता फाडके... आणि बाजुच्याचा कुरता फाडते...
उद्यानस्थपळापळीचं गाणं आहे बरोबर....
आणि ती रवीनाच आहे बहुतेक.
गोविन्दा +ट्विन्कल, गोविन्दा + रवीना, गोविन्दा +तबू... अशा जोड्यान्च्या चित्रपटाचे नाव लक्षात रहात नहित...

हे आजचे गाणे.
हीमॅनजींनी पहिल्यांदा गायले आणि नाचले तेव्हा ठीक होते. पण त्यांना पुन्हा करावेसे वाटले. सुरूवातीलाच डोक्याला रिबीन सारखे काहीतरी लावलेली जयाप्रदा (तिला या गाण्यात उचलायचे आहे ही कहानी की मांग ऐकून जंजीर सारखे बर्‍याच हीरोंनी नकार दिल्यावर धर्मेंद्र कडे हा रोल आला होता म्हणतात), भडक गुलाबी स्कर्ट किंवा त्याला जे काही म्हणतात ते घालून नाचते आहे. धर्मेंद्र ची चड्डी पाहून फ्रेन्ड्स मधल्या चॅन्डलर प्रमाणे can your pant be any shorter? असे म्हणावेसे वाटते. मग पाजी एकदा एक बाजूचे व नंतर दुसर्‍या बाजूचे हात पाय हवेत उडवून नृत्य करतात. मग दोघे एकत्र लोळण घेतात.

येथे जयाप्रदाला धरणी पोटात घेइल असे वाटते. लाजून, किंवा मग धरम च्या वजनाने.

नंतर दोघे 'दिल' आणि 'राजा' मधल्या झाडापाशी येतात. पुढच्या कडव्यात धर्मेंद्र व्यायाम करतो आणि जयाप्रदा आपण नाच करू शकतो हे विसरते.
हे अजरामर गाणे येथे पाहा.

पुढच्या कडव्यात धर्मेंद्र व्यायाम करतो >>>

Rofl
_______
मैं हूं ना...!!!

फारेंडा.. अरे बाबा

हापिसात लिंक ओपन केली आणि धरमबाबाची एंट्री बघताच हसून हसून वाट लागली. Happy

कुठुन शोधतोस या लिंका???
--------------
नंदिनी
--------------

इथे फार दिवसांनी आलो... क्ष, ते दुसरे गाणे केवळ Lol साजिरा, Lol
धर्मेंद्र ची चड्डी पाहून फ्रेन्ड्स मधल्या चॅन्डलर प्रमाणे can your pant be any shorter? असे म्हणावेसे वाटते. ... नंतर दोघे 'दिल' आणि 'राजा' मधल्या झाडापाशी येतात. पुढच्या कडव्यात धर्मेंद्र व्यायाम करतो आणि जयाप्रदा आपण नाच करू शकतो हे विसरते. >>> Rofl अफाट !

  ***
  Freedom is just another word for nothing left to lose... - Janis Joplin

  हे दूरच्या टोका, हॉरिबल.!

  काय घाणेरडे दिसताहेत दोघेही.

  फारेंडा!!
  अरे डिस्क्लेमर दे ना भाऊ.. ऑफिसात बघणं म्हणजे कडेलोट आहे Lol

  >>धर्मेंद्र ची चड्डी पाहून फ्रेन्ड्स मधल्या चॅन्डलर प्रमाणे can your pant be any shorter? असे म्हणावेसे वाटते.

  Rofl अगदी!

  सुरूवातीलाच डोक्याला रिबीन सारखे काहीतरी लावलेली जयाप्रदा (तिला या गाण्यात उचलायचे आहे ही कहानी की मांग ऐकून जंजीर सारखे बर्‍याच हीरोंनी नकार दिल्यावर धर्मेंद्र कडे हा रोल आला होता म्हणतात),>>>smiley36.gifsmiley36_0.gif

  जयाप्रदाचि हेअर्-इस्टाइल बघुन एकदम "मिनी माउस "( डिस्ने मिकि माउसची जोडिदार) आठवते.smiley4.gif

  ते सॉउदीयंडन नी नॉर्थईंदियन कोम्बो पहाणं काय कमी गमतीशीर आहे. Happy

  >>>>>हीमॅनजींनी पहिल्यांदा गायले आणि नाचले तेव्हा ठीक होते. पण त्यांना पुन्हा करावेसे वाटले. सुरूवातीलाच डोक्याला रिबीन सारखे काहीतरी लावलेली जयाप्रदा (तिला या गाण्यात उचलायचे आहे ही कहानी की मांग ऐकून जंजीर सारखे बर्‍याच हीरोंनी नकार दिल्यावर धर्मेंद्र कडे हा रोल आला होता म्हणतात), भडक गुलाबी स्कर्ट किंवा त्याला जे काही म्हणतात ते घालून नाचते आहे. धर्मेंद्र ची चड्डी पाहून फ्रेन्ड्स मधल्या चॅन्डलर प्रमाणे can your pant be any shorter? असे म्हणावेसे वाटते. मग पाजी एकदा एक बाजूचे व नंतर दुसर्‍या बाजूचे हात पाय हवेत उडवून नृत्य करतात. मग दोघे एकत्र लोळण घेतात.

  येथे जयाप्रदाला धरणी पोटात घेइल असे वाटते. लाजून, किंवा मग धरम च्या वजनाने.

  नंतर दोघे 'दिल' आणि 'राजा' मधल्या झाडापाशी येतात. पुढच्या कडव्यात धर्मेंद्र व्यायाम करतो आणि जयाप्रदा आपण नाच करू शकतो हे विसरते.<<<<

  अख्खा पॅराच तुफान आहे. Rofl

  मला वाटते आहे की ते विडम्बन गीत आहे. त्यामुळे ते अशा पोरकट पद्धतीने चित्रीत केले आहे. कथेशी त्याचा कसा संबंध आहे हेही पहावे लागेल. कारण शेवटी कादरखान महोदय येतात त्यावरून हा विडम्बनाचाच प्रकार आहे. पिक्चर पाहिलाय का कुणी ?

  Pages