अचाट आणि अतर्क्य गाणी

Submitted by slarti on 16 April, 2009 - 08:46

अ आणि अ गाण्यांसाठी हा बाफ. इथे गाण्याबद्दल सांगताना शक्यतो चित्रफितीचा दुवा द्या आणि दुवा घ्या.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हथकडी मधलं एक गाणं आहे -

एल एम एल बाबा एल एम एल , एल एम एल बाबा एल एम एल
लेट्स मेक लव्ह बेबी ....लेट्स मेक लव्ह बेबी
जी टी एच बाबा जी टी एच होने दे बाबा जी टी एच
गो टु हेल बेबी ......गो टु हेल बेबी

www.youtube.com/watch?v=lVdRvV4HQl4 इथे बघा . गोविंदा अन शिल्पा शेट्टी Lol

**********************************************
ऐसी चले जब हवा ........ इश्क हुआ ही हुआ !!

दिप्या Lol खरंच अशक्य आहे हे गाणं

त्या दुसर्‍या बीबीवर या गाण्यावर बरीच चर्चा (येथे साधारण पानाच्या मध्यावर बघा) झालेली आहे, पण केवळ या बीबीची शोभा वाढवण्यासाठी आणि सर्वोच्च रेटिंग मिळण्याचा चांगला चान्स असल्याने येथे टाकत आहे. कदाचित ऑल टाईम टॉप ५ मधे राहील कायम हे.

http://www.youtube.com/watch?v=bGAzvYZYzPU

या गाण्याला विश्लेषणाची गरज आहे का?

दीप्या...>>> भन्नाटच रे !!

०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

क्ष, अशक्य टिप्पणी Rofl
सायो, भाग्य :d

फारेंडा, १०० वर्ष जगशील! हा बीबी पाहताच, मला तेच गाणं आठवलं Rofl
तू दिलेल्या बाफवर महान चर्चा घडल्या होत्या..

क्ष!!! Rofl गाणं पहायची हिम्मत होत नाहीये! Lol

गाणं पहायची हिम्मत होत नाहीये! >>> इथली काही मंडळी नागिन वैगेरे मालिका बघुच कश्या शकतात ? Wink

०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

अरे केदार, हल्ली सासवांचा त्रास नसलेल्या परदेशस्थ गृहिणींना "भांडण झाल्यावर स्वयंपाकघरात फुत्कार कसे टाकायचे" याचं ज्ञान घरबसल्या कसं मिळणार? अशा निव्वळ सामाजिक जाणिवेतून या मालिकांकडे बघावे (मालिका बघाव्यात असं मी म्हणत नाहिये :))

क्ष!!! Proud Proud
धन्य त्या मालिका..आणि धन्य त्या परदेशस्थ फुत्कार टाकणार्‍या गृहिणी...

०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

'प्रेमाअगन' मधिल title song आणि 'हम तुम्से मुहब्बत कर्ते है' गाणि पाहुन मला फर्दिन खान आणि त्या नविन हिरोइन चि दया आलि....
खरच त्या गण्यच्या Choreographerला worst dance चा award द्यय्ल हव...
ते गाण बघुन हसु थम्बत नहि... इत्क्या भयानक स्टेप्स अहेत....

विश्वस नसेल तर जरुर पहा...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आयुष्य सुन्दर आहे, त्याला आणखि सुन्दर बनवुया....!!!!!
Donate Eye - Bring Light to Blind...!!!

"भांडण झाल्यावर स्वयंपाकघरात फुत्कार कसे टाकायचे" >>> का? का? का?
फुत्कार फक्त स्वयंपाकघरातच का? घरभर का नाही? असे बोलून, स्त्रियांचे आयुश्य फक्त चुलीपर्यंतच लिमिट करण्याचा प्रयत्न करता तुमच्यासारखी लोकं. Proud

क्ष... अ आणि अ गाण्याचे तितके अ आणि अ वर्णन करून आपण फारच मझा आणलात बुवा..
=========================
नूतन वर्षाभिनंदन..

पाहिलं मी ते क्षगान! बाप्रे! बघे बघेपर्यंतच दमले मी! Proud
काय नाचल्यात श्री न् जयाप्रदा! कसला आवेश आणि चापल्य होतं दोघींमधेही! त्यांचाही विश्वास बसणार नाही आता Happy बाकी गाणं म्हणजे डोक्याला ताप आहे नक्की.. Proud

बर, पुढे काय झालं? मला जाम उत्सुकता आहे, नागराज आले का? आणि त्यांना खलनायक अवतार समाप्ती केली का? पिस्तुलाच्या गोळीचा नागाने फुत्कार टाकून निषेध व्यक्त केला का? त्यांना लढाई संपल्यावर श्री आणि जयाने श्रमपरिहारार्थ (कॉफी नसलेलं) दूध दिलं का? नागराजाने प्रसन्न होऊन त्यांना राजेश खन्ना आणि जीतेन्द्रपासून मुक्ती दिली का? पुढे झालं तरी काय? अन् कसं???????????????

आजाओ आजाओ खुलासा देनेवाले आजाओ
Proud

घरी बसुन वाचण्यालायक मटेरिअल आहे अगदी.. इथे उगाच हसु दाबावे लागते आणि मग हाल होतात...:)

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

फारएंड मला वाटले तेच गाणं निघाले तू दिलेल्या लिंक मध्ये. अत्यंत अ आणि अ आहे ते.
कसला मठ्ठ चेहर्‍याचा आहे तो हीरो. शाळेत ३री-४थीत असतांना सुद्धा यापेक्षा चांगला नाच बसवतात लोक.

>>>>इथली काही मंडळी

पांशमो ऑनः काय रे केदार, आयडी घेऊन बोलायला घाबरतो काय? योगाला आले ना कधी तर तुझ्यासमोर दूध घातलेली कॉफी न पिता फुत्कार टाकेन हां, लक्षात ठेव. Wink पांशमोऑफ

टिव्हीसमोर बसलं की मालिका न बघताही क्लिप्स नजरेला पड्तातच. नाहीतर नागलोक,नागा डान्स मला कशाला नी कधी बघायला मिळाला असता? Proud

'हा बाफ आणि त्यावरच्या लिंक्स खाता पीताना वाचू/बघु नये' अशी सूचना लावा! अफाट आहे.

फारेंडा, पूनमला अनुमोदन. ते गाणे (!!!!!!!!) म्हणजे टॉप वनच्या गाण्यांपैकीच आहे.

  ***
  दिसेल दुसरे ते डोळ्यांविण. सरेल मणक्यामधला ताठा.
  पिशी मावशी वदेल सारे... जपून जा, पण जरूर गाठा ! (विंदा)

  फारेंडा, कोण तो मठ्ठ हिरो नी कोणता पडिक पिक्चर. हॉरिबल आहे दोन्ही.

  मेरे बाप की बेटी मेरेको भाई बोलती
  मेरे बाप की बीवी मेरेको बेटा बोलती
  मेरे मां का भाई मेरेको भांजा बोलता
  मेरे भाई की बेटी मेरेको चाचा बोलती
  मेरे बाप का बेटा मेरेको भय्या बोलता...

  लहान मुलांना सहजासहजी गाण्याच्या माध्यमातून नात्यांची ओळख करुन देणार्‍या या अभिनव गाण्यात सलमान खान नाच करत होते आत्ताच टीवीवर... जोडीला संजूबाबा Happy

  ज्यांची मुलं लहान आहेत त्यांनी मुलांना नाती शिकवण्यासाठी या गाण्याचा जरुर वापर करा...
  ~~~~~~~~~

  मीनु Happy Happy Happy Happy

  दूध घातलेली कॉफी न पिता फुत्कार टाकेन हां>>>> त्यालाच घाबरतोय ना मी, सायो Wink

  ०-------------------------------------------------०
  नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
  आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

  >>काय नाचल्यात श्री न् जयाप्रदा
  पूनम,
  दोघी जबरी नाचल्यात हे मात्र खरं! त्यांतही श्रीदेवी चापल्यात आणि जयाप्रदा अचूकतेमध्ये अग्रेसर! फक्त तो नागा सांबा भयानक! ज्या कुणी शोधून काढली ती स्टेप त्या माणसाचे चारी (:P) पाय धरायला हवेत!

  त्यानंतर अर्थातच समस्त नागजमात त्यांच्या मदतीला धावून येते आणि प्रचंड अ.आणि अ. फाईट होऊन चित्रपट (एकदाचा) संपतो!
  पण घाबरू नका (पक्षी, एव्हढ्यांत सुटलांत असे नाही).. अजून एक गाणं आहे त्याच्यातच.. त्यांतल्या राजेशखन्ना प्राण्याच्या हरकती आणि त्याचे शब्द बघता इथे दुसरा लेख येण्याची शक्यता नाकारता येत नाही Happy
  हे ते गाणं --- आय्य्ययो गर्मी है, कहां है ... सांसो मे
  राजेश खन्नाला जितेंद्र चावला होता की काय कुणास ठाऊक या वेळेला.. काय ते कपडे! काय त्या तंग विजारी!! आणि काय त्या अदा..
  गाण्यात एके ठिकाणी (पहा जागा २:५०) दोघं फुलांच्या ढिगार्‍यांत झाकले जातात. . "तिथेच त्यांना वर माती घालून गाडा रे!" असा जोरकस विचार आल्याशिवाय राहत नाही .. Proud

  अरे क्ष ने दिलेले गाणे पूर्वी एका मल्लू चित्रपटावरूने घेतलयसे वाटते. कारण त्यातले नायक देखिल असेच कपडे घालतात. फक्त श्री आणि जयाची साडी बदलली आहे.. मागच्या नाचात श्री नाही तरी घामाने भिजलीच होती Proud
  http://www.youtube.com/watch?v=I2SJY-0O9YI हे त्या क्षगानचे साउथी रुप!

  आईग. हसून हसून खल्लास..
  फारेंडच्या गाण्यातील मनुष्य आहे तरी कोण ? कोणीतरी माझे अज्ञान दूर करा प्लीज, प्लीज..
  स्लार्टी, क्ष, अँकी, सायो, भाग्या, मिनू, सिंडी- Rofl

  'जबसे हुई हैं मुहब्बत' इतकं बेफाट गाणं(त्यातल्या त्यात जरा बरं) , नाच आणि हिरो हिरॉइन मात्र कुठ्ठेच बघीतले नाहीत.

  नाही, नाही, मनु. साऊथच्या डब केलेल्या पिक्चर नी गाण्यापुढे हा काहीच नाहीये. खूप सुसह्य.

  ते गरमी है "अ आणी अ" award घेते lyrics साठी. मिटिंग सुरू होती म्हणून मी कमी आवाजात ऐकत होतो तर मला मधे ते चीत्कार "अम्मा" "अब्बा" असे ऐकू येत होते, म्हटले असेल बाबा सवय. Lol

  राजेश खन्नाचे आविर्भाव निव्वळ अशक्य. शक्ती कपूर परवडला Lol

  क्ष, तुला शाळेत संदर्भा सहित स्पष्टिकरण हा आवडता पर्श्न होता का ? Happy

  Pages