दगडोबाच्या मुलीचे स्वप्न..

Submitted by Happyanand on 9 November, 2019 - 10:23

मेघांचे कमंडलू लवंडले आणि कोरडी ठीक्कुर पडलेली काळी माती जराशी ओलवली.
पावसाचे ते काही थेंब अंगणात खाट टाकून झोपलेल्या दगडोबा च्या ही अंगावर पडले आणि त्याला जाग आली. तो तडक उठला नी झपाझप पावले टाकीत तांब्याच्या माळाकडे जाऊ लागला. पहाटे चे तीन वाजले होते. मागून त्याच्या कारभारणी ने आवाज दिला," आव धनी अाव कुठं निघालास इतक्या रातीचं?".
मागे वळुन दगडोबा यावढच बोलला की.." आलोच तांब्याच्या माळावरून"..
उरल्या सुरल्या कडब्याच्या पेंढ्या तो ताडपत्रिने झाकल्या आणि घराकडे निघाला. गेल्यावर्षी बी पाऊस झाला च नव्हता पण जो थोडा फार झाला त्याच्यात च हा शाळू केला नी या कडब्याच्या पेंढ्या त्यांने चिंगी साठी ठेवल्या होत्या.
चिंगी म्हंजे दागडोबा ची गाय. खीलारी होती तेवढीच शिल्लक होती आणि एक तान्हं वासरू एक बैल मागच्या खेपेला दुष्काळाने मेला आणि दुसरा दगडोबा ने गावातल्याच एकाला विकून टाकला होता..
४ वाजता दगडोबा घरी आला.
जरा वेळ पढगी ला निजला आणि त्याच्या डोक्यात काय आल परत तांब्याच्या माळावर गेला.
वावरांची अक्षरशः तळी झाली होती. रातभर पाऊस पडला होता अख्खा पावसाळ्याचा कसूर त्याने एका रात्रीत काढला होता.
आषाढात , श्रावणात एक ठीपुस पडला नाही . लोकांची उभी पिके करपून गेली पण काल रातरीपासून त्याने थैमान च घातले होते म्हणा. दगडोबाच लक्ष त्याच्या शेताकडे गेले आणि त्यांनी आवंढा च गिळला. गेल्या ४ वर्षात पाऊस पडेना म्हणून त्याने तालुक्याच्या एका शिकल्या सवरल्या माणसाच्या सांगण्यावरून कमी पाण्याचं पीक म्हणून पतपेढी च कर्ज काढून माळावर कोरफड लावली होती. वाटलं होत ह्या येळी तरी दिवाळी सोन्याची जाईल. पण पावसाने आक्खी कोरफड वाहून गेली होती.
त्याच्या स्वप्नांना पावसाने पाण्यात बुडवून बुडवून खलास केले होते ८ वाजता घर आला तेव्हा पुरता भिजला होता फक्त पावसाने नाही तर नियती ने त्याच्या स्वप्नांच्या केलेल्या खुनाच्या रक्ताचे शिंतोडे त्याच्या अंगावर उडाले होते.
अंगातली कापडं काढून त्याने भिंतीवरील खुटी ला टांगली एक पाईजामा घालून टावेल अंगावर घेऊन तो कुडकुडत चुलीपुढे शेकत बसला.. चुलिपुढला निखारा सारखं विझत होता कारभारणी ने वर पाहिले तर , बाहेर पावसाची धार आणि दगडोबा च्या डोळ्यातून आसवांची धार सतत चालू होती.
कारभारणी त्याच्या चहा चा पेला पुढे सरकवला आणि ती ही डोळ्याला पदर लावून बसली. आणि तिच्या गळ्यात दोन नाजूक हाथ पडले..... कोणाचे??.. अरे हा निकिता दगडोबची लाडकी मुलगी त्याचा एकमेव आधार..
अडाणी असूनही त्यांनी एकाच मुलीवर ऑपरेशन केलं होतं गावतली आणि भावकीमधली बरीच जन बोलत होती " दगड्या अजुन एक होवू दे , म्हातारपणात आधार होईल पोरगा झाला तर .. पोरीचं काय लोकाच्या घरीच जाणार"..
पण दगडोबा बोलायचा "आधीच इथे खायचं वांधे दोन दोन पोरं कशी सांभाळायची..आणि पोरगा पोरगी काय करता हीच पोरगी माझं सपान पूर्ण करील"...
निकिता आता १० वी ला होती. अभ्यासात ही लई हुशार. एकदम ब्येस.. पहिलीपासून पहिला नंबर सोडला नव्हता.. वक्तृत्वाची आवड ... तालुक्याचं स्पर्धेमध्ये बरीच बक्षीस मिळाली होती तिला एकदा तर कलेक्टर च्याच हातानं बक्षीस भेटले होते..
तिला कृषी अधिकारी नाहीतर तहसीलदार व्हायचं होतं... का?... हेच का??
ती लई पुरानी स्टोरी हाय. असाच ४–५ वर्षांपूर्वी दुष्काळ पडला होता तवा सरकार नी मदत जाहीर केली हुती तवा काही सरकारी माणसे आली होती शेताचा पंचनामा करायला... पण ती नंतर कधी फिरकली च नाहीत.. दादांना काही मदत मिळाली नाही. निकिता दगडोबा ला दादा म्हणायची.
एक दिवस तिने दादा ला विचारले.." दादा ती सरकारी माणसे शेत पाहून गेली ती पैसे कधी घेऊन येणार..?"
दगडोबा." माहीत नाही ग बाळा शेतकऱ्याच्या शेतापर्यंत फकस्त पंचनामा करायला च सरकारी माणसं येतात मदत घेऊन नाही."
निकिता." कोण असतात ते. कोण येतं आपले शेत पंचनामा करायला. कोणाकडे येतात सरकार चे पैसे"
दागडोबा. " बघ सरकार कडून कलेक्टर कड आणि आणि त्याच्यकडून मग आपल्याला द्यायला हि कृषी अधिकारी तहसीलदार तलाठी येतात बघ."
निकिता च ठरले आपल्याला मग कृषी अधिकारी च व्हयाच..
आणि आपल्या दादा सारख्या अनेक शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळवून द्यायची.
निकिता जोमाने अभ्यास करून १० वी ला तालुक्यात पहिली आली १२ ला तालुक्याला एस टी नी जायची गावापासून ७ km चालून एस टी पकडायला लागायची.. रातीला बापसोबत कांद्याला पाणी द्यायची..
शेतात काम करून आई दादा ल मदत करून निकिता ने अभ्यास केला ..
१२ वी ला ८५ टक्के पाडले पुण्याला आली .. ४·५ चांगल्या मैत्रिणी मिळाल्या रूम करून राहू लागली.. एका ग्रंथालयात नोकरी मिळाली .. कामाबरोबरच अभ्यास होवू लागला..
रात्र शाळेत प्रवेश घेतला.. पुण्यात अश्या रात्र शाळा बऱ्याच आहेत.. जिथे अनेक मुले दिवसा काम करून रात्री शिक्षण घेतात..
पाहता पाहता निकिता पदवीधर झाली..
Mpsc ला prelium पास झाली.. पुढे main दिली.. पास झाली इंटरव्ह्यू झाला सगळे झाले.. निकिता तहसीलदार झाली....
निकिता च मन आनंदाने आल्हादून गेलं होत.
गेली ३ वर्षे तिने गावाला पाहिलं नव्हते.
तिला ती ओढ स्वस्थ बसू देत नव्हती..
आज तिची सगळी स्वप्ने पूर्ण झाली होती..
तिला कधी एकदा गावी पोहचतीय असे झाले होते.. क्षणभर वाटले शेजारच्या चीमा काकी ल फोन करून दादा आई ल बातमी द्यायला सांगू.. पण नको आपण स्वतःच सांगू surprise देवू..
एव्हाना बातमी वृत्तपत्रांमध्ये आली होती पण गावात काय रोज पेपर येत नव्हता एखादा माणूस तालुक्याला गेला की आणायचा...
इकडे गावाला वेगळीच गोष्ट चालू होती.. दगडोबा च शेतीसाठी च कर्ज आणि मुलीला पुण्याला शिक्षणाला पाठवायला जे कर्ज घेतले होते त्याचे हफ्ते थकले होते..
भरणारच कसा पाऊस च पडत नव्हता आणि पडला तर पिकाला भाव भेटत नव्हता. तरी बी गेल्याच्या गेल्या वर्षी कांद्याला चांगला भाव मिळाला तेव्हा त्याने निम्मं कर्ज फेडले होते .. आणि कारभारणी साठी एक डोरले केलं..
नाहतरी आधी नुस्त च काळ मनी होतं गळ्यात तिच्या पण.. पुढे ते पण मोडून दिले हफ्ते फेडायला.. पण तरी कर्ज काय फिटले नाही..
आज पतपेढी ने त्याच्या घराचा लिलाव केला होता. संसार उघड्यावर पडला होता. अब्रू चे धिंडवडे निघत होते.. दागडोबा हाथ जोडून विनवनी करत होता.. पण व्यर्थ..
इकडे निकिता एस टी मधून उतरून चालत होती अजुन ही गावापर्यंत एस टी येत नव्हती म्हणून तिला चालत च जावे लागणार होते.. गावतल्या लोकांकडे मोटारसायकली होत्या ते आपले किक मारली की तालुक्याला जायचं...
निकिता गावात पोहचली तर तांब्या च्या माळावर बरीच गर्दी दिसत होती.. तिने कान देवून ऐकले तरी तिची आय हंबरडा फोडत होती.. तिच्या हातातून बॅगा गळून पडल्या ती धावत निघाली..
तांब्याच्या माळावर बाभळी वर तिच्या दादा च प्रेत लटकले होते.. तिच्या डोळ्यातील आसवे डोळ्यात च गोठली होती.. नियती ने पुन्हा एकदा मुस्काटात मारली होती.. तिची स्वप्न तर पूर्ण झाली होती पण ज्याच्यासाठी ही स्वप्ने पाहिली तो आधारवड मात्र हरपला..
त्याच दिवशी तिने शपथ घेतली.. मी ज्या तालुकयात तहसिलदार म्हणून जाईल निदान त्या तालुक्यातील तरी माझा दादा सारखा एक ही शेतकरी आत्महत्या करु नये यासाठी जीवाचे रान करील मी...
.
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.. आणि शुद्धलेखन चुकांबद्दल क्षमस्व.. नवीन नवीन लिहायला सुरुवात केलीय.. टंकलेखन करायला थोडा प्रॉब्लेम येतोय...

छान

Thanks