हिंदू धर्मात ३३ कोटी देव आहेत. राम, कृष्ण, विष्णू, विठ्ठल , शंकर, ब्रह्मदेव अशा कालापरत्वे आता मुख्य असलेल्या देवता आहेतच पण पूर्वेची देवता इंद्र, पश्चिमेची वरुण, दक्षिण - यम, उत्तर - कुबेर, वगैरे दिकपालही आहेत. अनेक देवी आहेत, काही देवींचे पुत्र जसे पार्वतीचा स्कंद व गजानन वगैरे वगैरे. कुलदेवता तर निराळ्याच - एकविरा, शांतादुर्गा, जोतिबा वगैरे.
नक्की कोणाची उपासना करायची व का? त्याचेही ढोबळ नियम आहेत.
उदाहरणार्थ - लक्ष्मीची समृद्धीसाठी, नरसिंहाची ऋणमुक्तीकरता (ऋणमोचन स्तोत्र घ्या ना), गणपतीची बुद्धीसाठी वगैरे.
.
परवाचेच उदाहरण घ्यायचे झाले तर, नवर्याच्या त्वचेवरील तीळाची बायॉप्सी झाली. नंतर ५-६ दिवस लागले निकाल यायला. पण तेवढ्या काळात जी घालमेल झाली ती (वाईट रीतीने) अवर्णनियच, न विसरता येणारी होती
पण या काळात मी कुलदेवतेला शरण गेले कारण एकच माझ्या सासूबाई तिचं नेहमी करायच्या व त्यांचे आयुष्य बरेचसे खडतर गेलेले असले तरी त्यांना दैवाची साथ होती. म्हणजे आमच्या एकविरा आईचा वरदहस्त असावा, देवीची कृपा असावी अशी त्यांची मनःशांती व धैर्य होते
मला मात्र या ६ दिवसात अचानक एकविरा देवीची आठवण आली व मी रोज स्तोत्र म्हणू लागले, तिच्या तस्बिरीपुढे उपरती झाल्याप्रमाणे, हात जोडू लागले. ६ दिवसांनी, निकाल चांगला आला, benign आला वगैरे ठीक आहे.
पण मला काही प्रश्न पडले.
(१) आपल्या जीवनात कुलदेवतेचे महत्त्व काय असते व का असते? खरच ही देवता आपल्या पाठीशी उभी रहाते का? त्या म्हणण्यात काही तथ्य आहे का?
(२) जीवनात गुरुचे महत्व काय असते व का असते?
(३) अन्य देवांचे आपल्या आयुष्यात नक्की काय स्थान असते?
उदाहरणार्थ, गेल्या काही दिवसात, मला असे आतूनच वाटले की आपल्याला यातून ना राम, ना शंकर , ना गणपती, कोणी जर बाहेर काढू शकेल तर फक्त देवी काढू शकेल. हा आडाखा कितपत अचूक आहे? मी भारतात असतेवेळी बरेचदा एकविरेला गेलेले आहे परंतु दर वेळी डोकं दुखणे किंवा काहीतरी तत्सम घडत असे. एकदा तर पायथ्याशी पोचल्यानंतर पित्त झाल्याने अन्नही उलटलेले होते.
अजुन एक ज्यादिवशी नवर्याचि बायॉप्सी झाली त्याच दिवशी नेमके माझ्या हातून, मराठी सप्तशती वाचणे घडले. म्हणजे मी पहील्यांदा ओढीने पूर्ण मराठी सप्तशती आयुष्यात पहील्यांदा त्या दिवशी वाचली होती सकाळी व नंतर त्याच दिवशी रुटीन चेक अपमध्ये तो तीळ सापडला व डॉक्टरांनी ताबडतोब बायॉप्सी केली. हाही योगायोगच की.
अर्थात हे सर्व श्रद्धेचे, मनाचे खेळ आहेत असेही एक म्हणता येइल पण 'कुलदेवता' याविषयी अधिकारी किंवा जाणकार लोकांचे अनुभव ऐकायला आवडतील.
______________________
दुर्गा सप्तशतीच्या शेवटच्या एका अध्यायात 'एकविरा' देवीचा उल्लेख येतो. तामसी गुणप्रधान देवी आहे असे वाचल्याचे स्मरते. म्हणजे रागीट, संतापी असावी. तसेच तिचे जे मंत्र मला सापडले त्यात तिचे नाव, महामारी, कालरात्री, क्षुधा, तृषा आदि तामसी शक्तींशी निगडीत सापडले. वरती माझा डोके दुखणे, उलटी होणे हे माझे अनुभव सांगीतले आहेतच.
______________
बायॉप्सीच्या निकालानंतर मात्र तिच्याविषयी सर्व माहीती नेट विंचरुन शोधून काढली. विष्णूदासांनी लिहीलेली स्तोत्रे, परशुरामकृत रेणुका स्तव व अनेक मंत्र. आता रोज सकाळ संध्याकाळ , तिचे स्तोत्र म्हणण्याचा नियमच स्वतःला घालून घेतलेला आहे.
कुलदेवतेचे आयुष्यातील, मनातील स्थान, भूमिका
Submitted by सामो on 8 November, 2019 - 14:18
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नामस्मरण सुरु करण्याचा उद्देश
नामस्मरण सुरु करण्याचा उद्देश वेगळा व वैयक्तिक होता. माझ्या स्वर्गवासी आईला ती जिथे कुठे असेल, तिथे लाभ व्हावा, तिचे रक्षण व्हावे - या हेतूने मी संकल्प केला. समोरच्याला गंध लावते वेळी आपल्या बोटांना ते पहील्यांदा, लागते. दुसर्याला फुले देताना, आपली ओंजळ आधी सुगंधी होते याचा प्रत्यय आला.>> धनश्री, किती छान विचार!
सर्व वाचकांचे, प्रतिसाद
सर्व वाचकांचे, प्रतिसाद देणार्या मैत्रिणींचे, सर्व माबोकरांचे आभार. माझ्याकरता हा लहानसा चमत्कारच आहे. यालाच अनुभूती म्हणतात. तुम्हाला पटलेले असते. अन्य कोणाला ना पटते ना पटवता येते.
देवी अतोनात रीचेबल आहे, अन्निध आहे, तिचे लक्ष आहे. याचा अनुभव आहे हा.
.
चींटी पायल बाजे पैर।
साहेब सुनता है सब लहर
सामो छानच अनुभव
सामो छानच अनुभव
तुझा उद्देश देखील उत्तम होता
धन्यवाद झकासराव
धन्यवाद झकासराव
सामो किती छान अनुभव गं
सामो किती छान अनुभव गं
थँक्स किल्ली.
थँक्स किल्ली.
सामो खुप छान अनुभव. आणि
सामो खुप छान अनुभव. आणि धन्यवाद देवीच्या ३२ नाम स्तोत्र आणि त्याचे महत्व इथे सांगितलेत त्याबद्दल. कालपासूनच सुरू केले आहे बघू कसे जमते ते
मेघ फार छान होणार
मेघ फार छान होणार
कन्फेशन - सवयीने पुन्स्श्च ऊ
कन्फेशन - सवयीने पुन्स्श्च ऊ चल खाल्लेली आहे.
मी जर एका ठरा विक वेळी एकटी बसले नाही, माणसात राहीले तरी ही सव य निघुन जा वी.
याचा अर्थ देवीची कृपा पातळ झाली का? तर नाही. देवीची नावे घेतेवे ळी मला नखे खाण्याची उसांतच मिळत नसे. ३२ वेळा ते स्तोत्र म्हणुन मग मी ब्राउझ करण्यस च्या मन स्थितीत रहात नसे व त्यामुळे नखे कुर त डली जात नसत.
हे तर्काधिष्ठित कार ण होते.
————
परत ३२ दिवसांचा जप सुरु केला आहे. माझा पिंड आहे. पण चमत्कार काही नव्हता
प्रामाणिक शंका आहे एक इथे
प्रामाणिक शंका आहे एक इथे बऱ्याच जणांनी कोपिष्ट वगैरे देवतांबद्दल उल्लेख केलाय उग्रदेवता वगैरे .हि कोपिष्ट देवमंडळी फक्त सोवळं ओवळं ,पूजाअर्चेमधल्या तांत्रिक fault झाल्यावर कोप करतात कि बाकी आजूबाजूला चालू असलेल्या बलात्कार ,चोऱ्या ,भ्रष्टाचार ,हिंसा ,निर्दोष लोकांचे हाल याबद्दल पण कधी मधी रागावून इंटरफिअर करतात ?कि तिथे नशीब आणि प्रारब्ध वगैरे गोळी देतात ?
कुलदेवतेचे आयुष्यातील, मनातील
कुलदेवतेचे आयुष्यातील, मनातील स्थान, भूमिका निश्चितच महत्त्वाची असते. आपापल्या कुलाचाराप्रमाणे कुलदेवतेची उपासना, पूजा अर्चना, कर्मकांड करणे हे फलदायी असते.
या विषयावर खूप आधी काही लेख
या विषयावर खूप आधी काही लेख माझ्या वाचनात आलेले, पण कॉपीराईट मुळे इथे डकवू शकत नाही.
परवा संपूर्ण दुर्गा सपतशती
परवा संपूर्ण दुर्गा सप्तशती पळवत वाचली. पळवत म्हणजे त्या सुरथ राजाचे, त्या वैश्याचे भाग सोडून, स्तोत्रे, स्तुती आणि लढाईचे भयंकर वर्णन वाचून ७०० श्लोक पूर्ण केले आणि मला वाटले आपल्याला हे रोज वाचता आले तर काय बहार येइल. पण इतके श्लोक रोज शक्य नाहीत म्हणुन मन किंचित खट्टु झाले.
.
पण आज मला मनीष लेखवार अत्री यांचे - बीजमंत्रात्मक दुर्गा सप्तशती पुस्तक मिळाले.
आणि अर्ध्या तासात सप्तशती वाचता येते. असे लक्षात आले.
---------------------
संस्कृत वर्णमालेतील प्रत्येक अक्षर मातृका आहे. अश्या ५१ मातृका आहेत हे माहीत होते. किंबहुना ५१ नर मुंडांची माळा जी काली गळ्यात घालते - त्या ५१ वर्णाक्षर मातृका आहेत असे वाचले/ऐकले होते.
--------------
जेव्हा आपण एखादा शब्द उच्चारतो तेव्हा मनात ज्ञानाचे स्फुरण होते. आपल्याला अर्थ कळतो. कसा कळतो? नक्की ज्ञान कसे स्फुरते?
.
मन्त्राणां मातृका देवी
शब्दानां ज्ञानरूपिणी।
ज्ञानानां चिन्मयातीता
शून्यानां शून्यसाक्षिणी।
यस्याः परतरं नास्ति सैषा दुर्गा प्रकीर्तिता॥
माझ्या मते तरी कुलदैवत
माझ्या मते तरी कुलदैवत चमत्कारिक वैगेरे असे काही नाही. 'कुळ' या शब्दाचाच मुळात अर्थ आपण शोधायला पाहिजे. शोध आणि तर्काचा आधार घेतला तर या शब्दाचा अर्थ आपल्याला समजण्यास मदत होते. भारत हा मुळातच प्राचीन शेतीप्रधान देश आहे. जेव्हा अनेक शेतकरी कुटुंब एकत्र येतात तेव्हा एक कुल बनलं असे समजले जाते. मग त्या कुळातील माहित असलेली सर्वात पहिली व्यक्ती असते त्याची पूजा करणे किंवा त्यांचे स्मरण करण्याची परंपरा आहे. आपण आजही काही लग्नांमध्ये टाक बनवलेलं पाहतो. हयात नसलेल्या आई वडील किंवा आजी आजोबांचे ते टाक असतात. असाच कुठला तरी प्राचीन टाक आपण आपल्या घरात बघत असतो आणि कुलदैवत म्हणून त्याची पूजा करीत असतो. मुळात कुलदेव किंवा कुलदेवी सुद्धा तुमच्या आमच्या सारखी हाडामासा ची माणसाचं होऊन गेली आहेत. जी माणसं आज या जगातच नाहीत ती काय आपल्या आयुष्यात प्रभाव पडणार. मुळात मनुष्य देहच आपला जन्मापासून मरेपर्यंत देव असतो. आपण हा देह सोडून जगात बाकी सगळ्याची पूजा करत फिरतो. जेव्हा असले फाजील चमत्कारिक विचार आपल्या समाजातून नष्ट होतील तेव्हाच आपला समाज आणि देश खऱ्या अर्थाने संपन्न होईल.
Pages