कुलदेवतेचे आयुष्यातील, मनातील स्थान, भूमिका

Submitted by सामो on 8 November, 2019 - 14:18

हिंदू धर्मात ३३ कोटी देव आहेत. राम, कृष्ण, विष्णू, विठ्ठल , शंकर, ब्रह्मदेव अशा कालापरत्वे आता मुख्य असलेल्या देवता आहेतच पण पूर्वेची देवता इंद्र, पश्चिमेची वरुण, दक्षिण - यम, उत्तर - कुबेर, वगैरे दिकपालही आहेत. अनेक देवी आहेत, काही देवींचे पुत्र जसे पार्वतीचा स्कंद व गजानन वगैरे वगैरे. कुलदेवता तर निराळ्याच - एकविरा, शांतादुर्गा, जोतिबा वगैरे.
नक्की कोणाची उपासना करायची व का? त्याचेही ढोबळ नियम आहेत.
उदाहरणार्थ - लक्ष्मीची समृद्धीसाठी, नरसिंहाची ऋणमुक्तीकरता (ऋणमोचन स्तोत्र घ्या ना), गणपतीची बुद्धीसाठी वगैरे.
.
परवाचेच उदाहरण घ्यायचे झाले तर, नवर्‍याच्या त्वचेवरील तीळाची बायॉप्सी झाली. नंतर ५-६ दिवस लागले निकाल यायला. पण तेवढ्या काळात जी घालमेल झाली ती (वाईट रीतीने) अवर्णनियच, न विसरता येणारी होती Sad पण या काळात मी कुलदेवतेला शरण गेले कारण एकच माझ्या सासूबाई तिचं नेहमी करायच्या व त्यांचे आयुष्य बरेचसे खडतर गेलेले असले तरी त्यांना दैवाची साथ होती. म्हणजे आमच्या एकविरा आईचा वरदहस्त असावा, देवीची कृपा असावी अशी त्यांची मनःशांती व धैर्य होते
मला मात्र या ६ दिवसात अचानक एकविरा देवीची आठवण आली व मी रोज स्तोत्र म्हणू लागले, तिच्या तस्बिरीपुढे उपरती झाल्याप्रमाणे, हात जोडू लागले. ६ दिवसांनी, निकाल चांगला आला, benign आला वगैरे ठीक आहे.
पण मला काही प्रश्न पडले.
(१) आपल्या जीवनात कुलदेवतेचे महत्त्व काय असते व का असते? खरच ही देवता आपल्या पाठीशी उभी रहाते का? त्या म्हणण्यात काही तथ्य आहे का?
(२) जीवनात गुरुचे महत्व काय असते व का असते?
(३) अन्य देवांचे आपल्या आयुष्यात नक्की काय स्थान असते?
उदाहरणार्थ, गेल्या काही दिवसात, मला असे आतूनच वाटले की आपल्याला यातून ना राम, ना शंकर , ना गणपती, कोणी जर बाहेर काढू शकेल तर फक्त देवी काढू शकेल. हा आडाखा कितपत अचूक आहे? मी भारतात असतेवेळी बरेचदा एकविरेला गेलेले आहे परंतु दर वेळी डोकं दुखणे किंवा काहीतरी तत्सम घडत असे. एकदा तर पायथ्याशी पोचल्यानंतर पित्त झाल्याने अन्नही उलटलेले होते.
अजुन एक ज्यादिवशी नवर्‍याचि बायॉप्सी झाली त्याच दिवशी नेमके माझ्या हातून, मराठी सप्तशती वाचणे घडले. म्हणजे मी पहील्यांदा ओढीने पूर्ण मराठी सप्तशती आयुष्यात पहील्यांदा त्या दिवशी वाचली होती सकाळी व नंतर त्याच दिवशी रुटीन चेक अपमध्ये तो तीळ सापडला व डॉक्टरांनी ताबडतोब बायॉप्सी केली. हाही योगायोगच की.
अर्थात हे सर्व श्रद्धेचे, मनाचे खेळ आहेत असेही एक म्हणता येइल पण 'कुलदेवता' याविषयी अधिकारी किंवा जाणकार लोकांचे अनुभव ऐकायला आवडतील.
______________________
दुर्गा सप्तशतीच्या शेवटच्या एका अध्यायात 'एकविरा' देवीचा उल्लेख येतो. तामसी गुणप्रधान देवी आहे असे वाचल्याचे स्मरते. म्हणजे रागीट, संतापी असावी. तसेच तिचे जे मंत्र मला सापडले त्यात तिचे नाव, महामारी, कालरात्री, क्षुधा, तृषा आदि तामसी शक्तींशी निगडीत सापडले. वरती माझा डोके दुखणे, उलटी होणे हे माझे अनुभव सांगीतले आहेतच.
______________
बायॉप्सीच्या निकालानंतर मात्र तिच्याविषयी सर्व माहीती नेट विंचरुन शोधून काढली. विष्णूदासांनी लिहीलेली स्तोत्रे, परशुरामकृत रेणुका स्तव व अनेक मंत्र. आता रोज सकाळ संध्याकाळ , तिचे स्तोत्र म्हणण्याचा नियमच स्वतःला घालून घेतलेला आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सान्वी खरच किती मोलाचा अनुभव मिळाला तुम्हाला.
मी गेल्या वर्षी पुण्यात जोगेश्वरी(=योगेश्वरी) ला गेलेले होते. मलाही ममत्व आहे या देवीचे. योगेश्वरी सहस्रनाम जपायला फार आवडते. कॉलेजात मैत्रिणीबरोबर पुणं चालत पालथं घालत असू तेव्हा हमखास जोगेश्वरी होइ.

छान धागा आणि प्रतिसाद सगळ्यांचे Happy

मला तर कुलदैवत हे मायाळू तरीही कडक अशा पित्याप्रमाणे वाटते Happy
आपल्या आयुष्याचा भार त्याच्यावर टाकून मी स्वस्थ राहू शकते Happy जप करत राहायचे, संकट तरून जाते , अनेकदा अनुभव आलाय Happy
माहेरचा खंडोबा(मैलार/ प्रेमपुरी कर्नाटक) आहे

सासरच्या लक्ष्मी नृसिंह दैवताशी मैत्री होतेय हळूहळू Happy

मला तर कुलदैवत हे मायाळू तरीही कडक अशा पित्याप्रमाणे वाटते Happy
आपल्या आयुष्याचा भार त्याच्यावर टाकून मी स्वस्थ राहू शकते Happy जप करत राहायचे, संकट तरून जाते , अनेकदा अनुभव आलाय Happy >> अगदी खरं बोललात किल्ली जी.
मी पण जेव्हा पॅनिक होते किंवा मला काही सुचत नाही निराश वाटतं तेव्हा देवीचा जप केलाय आणि मार्ग सापडलाय. विश्वस्त वाटतं..

सामो जी, abc चौकातली तांबडी जोगेश्वरी म्हणजेच
आंबेजोगाई ची योगेश्वरी देवी आहे का? असेल तर मग आतापर्यंत माहिती नव्हतं, कारण दोघींचं रूप वेगवेगळं आहे..

मला वाटतं तांबडी जोगेश्वरी पुण्याची ग्रामदेवता आहे. पुणेकर जास्त नीट सांगतील पण ती आणि आंबेजोगाई बहुतेक एक नसाव्यात.

आंबेजोगाई योगेश्वरी मूळ राजापूर तालुक्यातून (आडीवरे गावातून) तिथे गेलीय असं काहीजण म्हणतात.

भागवतजी या लेखाचा उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद.
@ सान्वी, त्या लेखातूनच -
>>>>>>>>>>जोगेश्वरीचे उल्लेख पुराणातही सापडतात असे मत कै.राजवाडे, डॉ.केतकर यांनी नोंदवलेले आहे. ‘तां नमामी जगदधात्री योगिनी परयोगिनी’ असे योगेश्वरीचे म्हणजेच जोगेश्वरीचे वर्णन भविष्यपुराणात आहे. योगिनी हे योगेश्वरीचे दुसरे नाव. योगेश्वरीचे प्राकृत रूप म्हणजे जोगेश्वरी. योगेश्वरी संज्ञेचा उलगडा मूर्तिरहस्य व्याख्येत ‘जीवेश्वरैकस्य ईश्वरी सा योगेश्वरी’ असा केला आहे. म्हणजे, जीव आणि ईश्वर यांची एकरूपता दाखवणारी ही आदिशक्ती आहे.>>>>>>>>>

शाम भागवत धन्यवाद लिंक साठी. फार सुरेख माहिती आणि देवीही प्रसन्न.

आंबेजोगाईच्या योगेश्वरीची पूर्ण मूर्ती नाहीये, मुख आहे ज्याला तांदळा म्हणतात. ते रूपही फार प्रसन्न आहे.

हो.
मी जातो बर्‍याच वेळेस. देवळाच्या समोरच्या बाजूच्या रस्त्यालगत १०० पावलांवर, चितळे (दूधवाले),गाडगीळ (सराफ) वगैरेंनी एकत्र येऊन एक चांगला भक्तनिवासही उभा केलाय. त्यात डोंबिवलीचीही माणसे आहेत. तिथल्यामानाने जरा महाग आहे, पण मला आवडला.

सद्या लॉकडाऊनमुळे सगळीच देवदर्शने थांबलीयेत. Happy

पुणेकर जास्त सांगतील म्हणून भाग घ्यायला लागला. Happy शिवाय १०० वा प्रतिसाद होता. Happy

धन्यवाद.

पुणेकर नातेवाईकांकडून तांबडी जोगेश्वरी ग्रामदेवता आहे माहिती होतं, नवजात बालकाला पण प्रथम तिच्या दर्शनाला घेऊन जातात आमचे तिथले नातेवाईक. फार बाकी माहिती नव्हती मिळाली, ती तुमच्या लिंक मुळे मिळाली Happy .

खापरेवरती सहज फिरता फिरता, महालक्ष्मीची पदे तसेच मुक्तेश्वरांच्या काव्यातील महालक्ष्मी आदि रसाळ काव्ये सापडली -
https://www.transliteral.org/pages/i140315024146/view?page=all

गोड गळा असता, चाल लावता आली असती तर नक्की ही पदे पाठ करुन गुणगुणली असती. पण अर्थात जगी राजहंसाचे चालणे डौलदार असल्याने, इतर कोणी चालूच नये काय, या न्यायाने, एकेक पद पाठ करण्याचा मानस आहे. आज संकष्टी चतुर्थी आहे - हा दिवस चांगला आहे सुरुवात करायला Happy

असा संकल्प मनात स्फुरणे हाही जगदंबेचा कृपाकटाक्षच वाटतो. असो.

पीठमध्ये जगन्माता भक्तानां वरदा स्थिता
तस्या वामे महादेवी रेणुका भक्तवत्सला

_________________

महालक्ष्मीचे घेता दर्शन| सर्व पातकांचे होय निरसन|
कोल्हापुरीचे जे अधिष्ठान|तत्समान महीमा दोहींचा||
स्तवने तोषिली जगन्माता|वरप्रदान वोपी तत्वता|
जे जे वांछी तत्वता|ते अभिष्ट फल विपश्चिता देतसे||

______________________

धन्योSहं कृतपुण्योSहं कृतार्थ तवदर्शनात|
प्रपन्नं पाही मां देवी सर्वापत्तीविनाशिनी||
अद्य मे सुदिनं मातर्घ मे सफलं जनु|
तपोSपी सफलं मेSद्य देवी त्वत्पाददर्शनात||

______________________

पीठं कोल्लापुरं नाम देवीनां प्रीतीवर्धनम|
महालक्ष्मीसनाथस्तु भैरवस्तत्र नायक:||
यस्य पूर्वे महालक्ष्मी, स्थिता कोल्ला च दक्षीणे|
कंकाली पश्चिमे देवी, महाकाली तथोत्तरे||
एता पीठेन सहिता: सिद्धराजसरोवरे|
पीठं दृष्टं समायाता, देवीनां समये तदा||

__________________________________

देव दैत्य मुकुटांच्या ज्योती| जयाते नीरांजन करीती|
त्या देवी तुझे चरणांप्रति|मंगल व्हावया नमितसे||

____________

नमस्ते जगद्धात्री सदब्रह्मरुपे
नमस्ते हरोपेन्द्रधात्रादि वंदे|
नमस्ते प्रपनैष्ट्दानैकदक्षे
नमस्ते महालक्ष्मी कोलापुरेशी||१||

विधी कृत्तीवासा, हरिर्विश्वमेतत
सृजत्यत्ति पातिती यत्ततप्रसिद्धम|
कृपालोकनादेव ते शक्तिरुपे
नमस्ते महालक्ष्मी कोलापुरेशी||२||

त्वया मायया व्याप्तमेततसमस्तम
ढ्रुतं लीलया देवि कुक्षौ हि विश्वम|
स्थितं बुद्धीरुपेण सर्वत्र जन्तौ
नमस्ते महालक्ष्मी कोलापुरेशि||

जया भक्तीवर्गा हि लक्ष्यंते एते
त्वयात्र प्रकामं कृपापूर्णदृष्ट्या|
अतो गीयसे देवि लक्ष्मीरिती त्वम|
नमस्ते महालक्ष्मी कोलापुरेशि||४||

पुनरवाक्पटुत्वादिहीना हि मूका
नरैस्तेर्निकामं खलु प्रघ्यर्से यत्|
विजेष्टाप्त्वयं तच्च मूकांबिका त्वम
नमस्ते महालक्ष्मी कोलापुरेशी||५||

यदद्वैतरुपात्परब्रह्मणस्त्वम्
समुत्थापुनर्विश्वलीलोद्यमस्था|
तदाहुर्जनास्त्वां हीं गौरिं कुमारीम|
नमस्ते महालक्ष्मी कोलापुरेशी||६||

हरीशादिदेहोत्थ तेजोमयप्र -
स्फुरच्चक्रराजाख्यलिंगस्वरुपे|
महायोगीकोलर्षिहृत्पद्मगेहे
नमस्ते महालक्ष्मी कोलापुरेशी||७||

नम: शंखचक्राभयाभीष्ठस्ते
नमस्ते अंबिके गौरी पद्मासनस्थे|
नम: स्वर्णवर्णे प्रसन्ने शरण्ये
नमस्ते महालक्ष्मी कोलापुरेशी||८||

इदं स्तोत्ररत्नम कृतं सर्वदैवम
हृदि त्वां समाधाय लक्ष्म्यष्टकं य:|
पठेन्नित्यमेष व्रजत्याषु लक्ष्मीम|
सुविद्यां च सत्यं भवत्या: प्रसीदात||९||

इति श्रीमुक्तांबास्तवकं अमलं य: प्रतिदिनम
नरो भक्त्या युक्त: पठति हृदि कृत्वा भगवतीम|
सुविद्यामैश्वर्य बहुलमिह लब्ध्वापि विबुधै
सूपूज्य: सायुज्यं व्रजति हि महेश्या पुनरयम्||१०||

गोकर्णाद्दक्षिणे भागे दशयोजनमात्रके|
सह्याद्रे दक्षीने नाम्ना कोल्लापुरं श्रुतम्||
स्वर्णरेखांकितं लिंगम नास्ति नास्ति जगत्त्रये|
वामभागाधिकं लिंगं न भूतं न भविष्यति||

स्त्रीकोल्लापुरवरेश्वर्यै स्त्रीमहालक्ष्म्यै नम:
हारीतकुलसंभूतरविदेवत्रिदंडिन:
तुष्टा कोल्लापुर्रद्देवी महालक्ष्मीरिहागता||
लक्ष्मीमहात्म्यं मंगलं महाश्री महालक्ष्म्यै नम:||

श्रुणुध्व मुनय: सर्वे श्रीदेवीचरितं शुभम|
यस्य स्मरणमात्रेण नृणां मुक्ती: प्रजायते||

पाहि देवी जगन्मात: पाही श्रीबनशंकरी|
पाही पद्मप्रिये पद्मे, पाहि श्रीसर्वमंगले||

इति स्तुत्वां महादेविं त्रिगुणां वनशंकरीम|
महाकाल्यादिरुपेण तृष्टावाथ पृथक पृथक||

श्रीगणेशं च बटुकं क्षेत्रपालं च भक्तित"|
प्रणम्य द्वारपालांश्च रंगमंडपमागत:||
गर्भागारं प्रविष्याम्बां सर्व अमंगलहारिणीम|
प्रणनाम सपत्नीक: साष्टांग वनशंकरीम||
महाकालि महालक्ष्मि महापूर्वसरस्वति|
अकारादिक्षकारांतमातृरुपिणी पाहि माम||

तत्रैका ह्युत्तरे भागे काशी भागीरथीतटे\
पंचगंगातटे दक्षे करवीरपुरीतरा||

करवीराभिधं क्षेत्रं महाराष्ट्रेषु वर्तते|
काशीतो महीमा यस्य श्रूयते हि यवाधिक:||
संद्न्या दक्षीणकाशीति प्राप्ता तेन महीयसी|
तत्र गच्चे मुने शीघ्रं चित्तं ते शांतीमेष्यति||

मातर्नमामि कमले कमलायताक्षि|
श्रीविष्णूःरुत्कमलवासिनी विश्वमात:||
क्षीरोदजे कमलकोमलगर्भगौरी|
लक्ष्मी प्रसीद सतता नमतां शरण्ये||
त्वंश्रीरुपेंद्रसदने भुवनैकमातर|
ज्योत्स्नासि चंद्रमसि चंद्रमनोहरास्ये|
सूर्ये प्रभासि च जगतित्रये प्रभासि|
लक्ष्मी प्रसीद सतता नमतां शरण्ये||
त्वं जातवेदसि सदा दहनात्मशक्तीर|
वेधास्त्वया जगदिदं सकलं विदध्यात||
विश्वंभराsपी बिभ्रुयादखिलं भवत्या|
लक्ष्मी प्रसीद सतत< नमता शरण्ये||

मराठी लोकांमध्ये कुलदैवत आहेत, त्यांची उपासना होते, माहिते असते, मला प्रश्न आहे सिंधी लोकांना ना गाव
ना त्यांचं मूळ ठिकाण भारता मध्ये मग त्यांची कुलदैवत कोण असेलं, जर कोणाला माहित असेलं तर जरूर सांगा

काल किंडलवरती 'श्री योगेश्वरी उपासना' नावाचे सृजनरंग प्रकाशनाचे पुस्तक विकत घेतले. सहस्रनामांमध्ये सौम्य नावे आहेत तशी अत्यंत विकट, विक्राळ, भीतीदायक वर्णने असलेली नावेही आहेत. वाचून ऊरात, धडकी भरते. श्री प्रकाश केतकर यांच्या खालील ब्लॉगवरतीही हे स्तोत्र उपलब्ध आहे.
http://ioustotra.blogspot.com/2018/11/shriyogeshwari-sasranam.html
मला ही देवी फार आवडते. का ते माहीत नाही. पुण्याला गेले होते तेव्हा जोगेश्वरीला जाण्याचा योग आला. कॉलेजमध्ये असल्यापासून जोगेश्वरीला मैत्रिणीबरोबर जायचे.

तांबडी जोगेश्वरी का सामो? मलाही फार आवडते. पुण्याला गेलं की दगडूशेठ आणि तांबडी जोगेश्वरी दर्शन अगदी मस्ट असतं.

श्री प्रकाश केतकर यांच्या खालील ब्लॉगवरतीही हे स्तोत्र उपलब्ध आहे. >>> बघते.

ही योगेश्वरी (स्तोत्र फोटो) माहेरची कुलस्वामिनी आहे, मराठवाड्यात आंबेजोगाई इथे आहे. मागे आम्ही जाऊन आलो. ही देवी मला खूप आवडते, तिथून मी छोटा फोटो घेऊन आले पूजेत ठेवायला. हे मागेही लिहिलेलं मी बहुतेक.

Pages