तुमच्या mobile वर कोणती रिंगटोन वाजते

Submitted by KulkarniRohini on 5 November, 2019 - 23:40

माझ्या बे मध्ये बहुत जणांकडे mi चा मोबाइल आहे. सगळीकडे तेच तेच आवाज वाजत असतात. पाहिल्यांदा जेंव्हा college मध्ये असताना mobile मिळाला तेंव्हा रोज नवी रिंगटोन मी ठेवायचे. इव्हन hellotune सुद्धा.
सध्या यात काही नाविन्य उरल नाही का ? मी सुद्धा mi ची default रिंगटोन ठेवलीये.
मागे माझी मुलगी लहान होती तेंव्हा तिच्या आवाजातले गाणे ठेवले होते . फोन वाजला की असलं भारी वाटायचं.
आज मी senorita ऐकत होते वाटलं याची रिंगटोन ठेऊ.
तुम्हाला पण ह्या गोष्टी मॅटर करतात का? त्या त्या ringtone चा पण एक काळ असतो असे वाटते का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

माझा फोन बरेच दिवस सायलेंट असतो तसा. पण मी ठेवलेल्या रिंगटोन
शिवाजी महाराजांची गारद (कॉलेज)
पाटील आला (कॉलेज)
तूयो : narcos चे टायटल साँग (जॉब लागल्यापासून सर्वाधिक काळ)
The Good, the bad and the ugly BGM (आवडते खूप, पण पुन्हा पुन्हा ऐकून नावीन्य जाते म्हणून जास्त दिवस नाही ठेवत)
Pirates of Caribbean ची थीम (current, पण खूप कॉमन आहे, बदलतो आज)
मन सुद्ध तुझ ( कॉफी आणि... मध्ये ऐकून आवडलेली, पण 8 दिवसात बंद केलेली.

लम्हा लम्हा गॅंगस्टर
https://youtu.be/VGYfbc6qWFM

या गाण्यातील ११ ते २३-२४ सेकंदापर्यंतचा म्युजिक पीस कट करून ठेवलेला. फर्स्ट जॉबला असताना. पण तो दोनच दिवस टिकला.
कारण हि टोन माझ्या एका सिनीअर मुलीला आवडली. ती सुद्धा चारच दिवसात माझी क्रश झालेली. त्यामुळे तिचे मन राखायला/जिंकायला मी तिच्याशी हि रिंगटोन शेअर केली. आणि माझी बदलली. तिच्या फोनमध्ये ती पुढे सहा महिने वर्षभर वाजत होती. वाजायची तिथे आणि गुदगुल्या मला ईथे व्हायच्या Happy

तसेही हि टोन तिलाच सूट करत होती. माझ्या तेव्हाच्या ईमेजला जात नव्हती. मी त्यानंतर दूरी गाण्याचा मुखडा ठेवला होता. म्युजिक पीस नाही तर आतिफचा आवाज. एकदम खणखणीत आणि दमदार..

मन सुद्ध तुझ ( कॉफी आणि... मध्ये ऐकून आवडलेली)
>> डबल सीट मध्ये आहे ना ते गाणं? आणि मूळ गाणं प्रभातच्या बहुतेक 'कुंकू' सिनेमात?

गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमही खूप वर्षे ही रिंगटोन होती.ऐकल्यावर खूप प्रसन्न वाटते.आणी अंगावर काटापण येतो.

गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमही खूप वर्षे ही रिंगटोन होती.ऐकल्यावर खूप प्रसन्न वाटते.आणी अंगावर काटापण येतो.
>>>>

+७८६
मी सुद्धा ठेवलेली ही.
गणपतीच्या दिवसात मी बाप्पांच्या गाण्यांच्याही बरेच रिंगटोन ठेवायचो. मराठीत खूप छान गाणी आहेत गणपतीची. मन प्रसन्न आणि वातावरण मंगल करून टाकणारी..

https://youtu.be/6gb5A8R3dkg
माझी रिंगटोन... TravelXP theme.
यामुळे जग किती सुंदर आहे आणि मला अजून काय काय बघायचंय याची आठवण आणि उमेद राहते. पाच वर्षांपासून हीच वापरते, आवाज सूदींग आहे अलार्मिंग नाही. तो व्हिडिओ बघायलाही सुंदर आहे.

रमा माधवाचे जिथे चित्त लागे , याचे सुरुवातीचे बासरीवरील म्युझिक मागील १५ वर्षे रिंगटोन आहे, काही काळ आनेवाला पल चा इंट्रो पीस पण होता

Pages