तुमच्या mobile वर कोणती रिंगटोन वाजते

Submitted by KulkarniRohini on 5 November, 2019 - 23:40

माझ्या बे मध्ये बहुत जणांकडे mi चा मोबाइल आहे. सगळीकडे तेच तेच आवाज वाजत असतात. पाहिल्यांदा जेंव्हा college मध्ये असताना mobile मिळाला तेंव्हा रोज नवी रिंगटोन मी ठेवायचे. इव्हन hellotune सुद्धा.
सध्या यात काही नाविन्य उरल नाही का ? मी सुद्धा mi ची default रिंगटोन ठेवलीये.
मागे माझी मुलगी लहान होती तेंव्हा तिच्या आवाजातले गाणे ठेवले होते . फोन वाजला की असलं भारी वाटायचं.
आज मी senorita ऐकत होते वाटलं याची रिंगटोन ठेऊ.
तुम्हाला पण ह्या गोष्टी मॅटर करतात का? त्या त्या ringtone चा पण एक काळ असतो असे वाटते का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

१) आइचा घो गाणे fm वरून डाउनलोड केलंय.
२) वाऱ्यावरती गंध पसरला . . . हेसुद्धा एफेमवरून.
ही दोन्ही गाणी जोरदार वाजतात.
३) iPhone 6 original ringtone हे वाजवून समोर मोबाईलवर रेकॉर्ड करून अगदी आप्तांसाठी रिंगटोन ठेवलाय.
४) 93.5 एफेमचे तेरे साउंड पे हुकु हुक हो गया हे एक ठेवलंय.
(( कॉपीराईटमुळे या गाण्यांच्या ओडिओ फाईल इथे देता येत नाहीत. ))

माझ्या मोबाईल मधे समोरच्याला " चाहा है तुझे चाहेंगे, सांसोमे बस जायेंगे" हे ऐकायला मिळतं.
नी मला " टुडू डुंग टुंग डुंग टुंग डुंग टुंग टु... टुंग.....टुडू डुंग टुंग डुंग टुंग डुंग टुंग टु" हे ऐकायला मिळतं.

नार्कोसचे सगळे एपिसोड बघेपर्यंत मीसुद्धा हि रिंगटोन ठेवली होती. एपिसोड बघताना कधीच स्कीप केली नाही.

२) वाऱ्यावरती गंध पसरला . . . हेसुद्धा एफेमवरून.
ही दोन्ही गाणी जोरदार वाजतात.
>>>

हि मी सुद्धा २००७ साली वापरली आहे. मस्त वाजतो त्यातला म्युजिक पीस. खणखणीत.. तेव्हा अश्या जोरदार रिंगटोन आवडायच्याच.

मला खणखणीत आणि कर्कश्य रिंगटोन ठेवणाऱ्या लोकांना काहीतरी फेकून मारायची तीव्र इच्छा असते
बरेचदा हे लोकं सायलेंट वर ठेवत नाहीत आणि लवकर बंद ही करत नाहीत
कार्यक्रम सुरू असताना, सिनेमात, नाटकात, किंवा इव्हन स्मशानातही यांचे फोन वाजतात जोरात

संताप संताप होतो अशावेळी

स्मशानात वाचुन हसू आवरेना झालं.! Biggrin
>>>

हो ना, मुळात स्मशानात फोन कश्याला हवा हेच नाही कळले. तिथे माणूस गेलाय आणि तुम्हाला फोनचे पडले असेल तर न गेलेलेच बरे Sad
आपण फोनचे फार ॲडीक्ट झालो आहोत हेच खरे..

बाकी रिंगटोन अचानक मोठ्या आवाजात वाजू नये तसेच खूप बारीक आवाजात ठेवली म्हणून आपला महत्वाचा कॉलही मिस होऊ नये हा सुवर्णमध्य साधायला एक सेटींग असते. ज्यात रिंगटोनचा आवाज सुरुवातीला अगदी बारीक असतो आणि मग हळूहळू दर सेकंदागणिक वाढू लागतो. मोबाईल ऑफिसमध्ये असताना बहुतांशवेळा जवळच डेस्कवर वा खिश्यात असतो. तेव्हा आवाज मोठा होण्याआधीच तो उचलला जातो जेणेकरून कोणाला त्रास होऊ नये. याऊलट घरी कुठेतरी पसाऱ्यात पडलेला असतो. त्यामुळे थोड्यावेळाने रिंगचा आवाज मोठा होताच कानावर पडतो आणि कॉल मिस होत नाही.

प्रत्येक मोबाईलमध्ये ही सेटींग असते की नाही माहीत नाही. पण प्रत्येकाने जरूर चेक करून ती करून घ्यावी. एखाद्याची रिंग् मोठ्याने वाजत असेल तर त्यालाही आवर्जून दाखवावी.

इतकं सेंटी काही मनात न्हवतं हो!
उलट पोट्ट्याच्या त्या सरणाभोवती फेर्‍या घालतोय. त्याच्या खांद्यावरच्या माठाला गुर्जीनी दगडाने भोक पाडलं आणि तेव्हाच पोट्ट्याच्या खिशातुन "पाणी थेंब थेंब गळं" चा गजर चालू झाला तर उपस्थितांत काय खसखस पिकेल अशा विनोदी कल्पना मनात तरंगुन जाऊ लागल्या इतकंच.

बाकी रिंगटोन अचानक मोठ्या आवाजात वाजू नये तसेच खूप बारीक आवाजात ठेवली म्हणून आपला महत्वाचा कॉलही मिस होऊ नये हा सुवर्णमध्य साधायला एक सेटींग असते. ज्यात रिंगटोनचा आवाज सुरुवातीला अगदी बारीक असतो आणि मग हळूहळू दर सेकंदागणिक वाढू लागतो. मोबाईल ऑफिसमध्ये असताना बहुतांशवेळा जवळच डेस्कवर वा खिश्यात असतो. तेव्हा आवाज मोठा होण्याआधीच तो उचलला जातो जेणेकरून कोणाला त्रास होऊ नये. याऊलट घरी कुठेतरी पसाऱ्यात पडलेला असतो. त्यामुळे थोड्यावेळाने रिंगचा आवाज मोठा होताच कानावर पडतो आणि कॉल मिस होत नाही.>>>
हो असते ना सगळ्या फोन ला
पण या लोकांकडून इतक्या टेक्निकली वागण्याची अपेक्षा खूपच होतात

अमित - सिरियसली कॉमेडी करतात हे लोक
मी प्रत्यक्ष अनुभवले आहे, वैकुंठात एक असाच महाभाग सांगत होता कोणाला तरी
मोठ्याने फोन वाजला याने उचलला आणि म्हणाला
काय नाय रे जरा आलो होतो इकडे वैकुंठात,
अरे ते हे वारले
हो ना, जणारच प्रत्येक जण कधीतरी
तू बोल काय म्हणतोय

हे ऐकून मी अवाक होण्याच्यापलीकडे गेलेलो

असो विषयावर येतो

काही पूर्वीच्या रिंगतोंन

बॉंबे बिजीम - पावसाचा मुसळधार आवाज, आणि बेभान करून टाकणारी रेहमान ची ट्यून, मनीषा बसमधून जात असते आणि पावसात छत्री घेऊन अरविंद वाट बघत असतो तो सिन

If I had a heart - वायकिंग सीरिज चे थीम सॉंग
अप्रतिम डीप बास गिटार आणि व्हायोलिन

फोन स्पीकरवर होता का?
नशिबाने नव्हता
ही सगळी एकाच माणसाची वाक्ये होती
मधली वाक्ये काय असतील ती पलीकडच्या माणसाची होती

मनिके मगे हिथे instrumental ringtone
श्रीवल्ली instrumental ringtone
Fur elise music box (ही आवडती रिंगटोन आहे)
James bond theme music on flute (ही पण खूप आवडते)
Shape of you instrumental ringtone

विनोदी कल्पना मनात तरंगुन जाऊ लागल्या इतकंच.
अमितव, ४/५ दिवसापुर्वी घडलेला किस्सा. पफ घ्यायला बेकरीवर गेलो. त्याला म्हटल २ पंजाबी नी १ चीज पफ दे. मी चीज बोलायला नी त्याच्या एफेम वर "दिल चीज क्या है" सुरु व्हायला एकच वेळ झाली. दोघं एकमेकांकडे बघुन हसलो, त्याला म्हटलं बाबारे चीजच दे तिची जान वगैरे नको मला.

(बादवे ...माझ्या पोस्टी हळु हळु सरांच्या वळणावर जात आहेत का? ( हा नकाशा ...च्या वळणावर गेलाय काय रे च्या चालीवर))

बॉन्ड Proud

मनिके मगे हिथे instrumental ringtone
श्रीवल्ली instrumental रिङ्तोने
>>>>>

ही दोन्ही गाणी चांगली आहेत.
पण या आणि अश्या बऱ्याच चांगल्या गाण्यांचे पीस रील्समध्ये ईतके वापरले जातात की नावीन्य संपते. म्हणून अशी गाणीही मग फारशी ऐकली जात नाही.

Sea shanty wellerman song

Make It Bun Dem (Skrillex)

Low Rider -ही तर खूप काळ होती माझी रिंगटोन

Love whistle -मस्त होती पण दुर्दैवाने मी याचा व्हिडीओ पहिला आणि मनच उडालं

Pages