तुमच्या mobile वर कोणती रिंगटोन वाजते

Submitted by KulkarniRohini on 5 November, 2019 - 23:40

माझ्या बे मध्ये बहुत जणांकडे mi चा मोबाइल आहे. सगळीकडे तेच तेच आवाज वाजत असतात. पाहिल्यांदा जेंव्हा college मध्ये असताना mobile मिळाला तेंव्हा रोज नवी रिंगटोन मी ठेवायचे. इव्हन hellotune सुद्धा.
सध्या यात काही नाविन्य उरल नाही का ? मी सुद्धा mi ची default रिंगटोन ठेवलीये.
मागे माझी मुलगी लहान होती तेंव्हा तिच्या आवाजातले गाणे ठेवले होते . फोन वाजला की असलं भारी वाटायचं.
आज मी senorita ऐकत होते वाटलं याची रिंगटोन ठेऊ.
तुम्हाला पण ह्या गोष्टी मॅटर करतात का? त्या त्या ringtone चा पण एक काळ असतो असे वाटते का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

You and I, in this beautiful world,
Green grass, blue skies,
In this beautiful world

मी फोनमध्ये असलेल्याच रिंगटोन ठेवतो. काही दिवस मायबोली गणेशोत्सवातली चैतन्य दीक्षित यांच्या बासरीवादनाची रिंगटोन ठेवली होती.
अनेक मायबोलीकरांनी मायबोली शीर्षकगीताची रिंग टोन ठेवली होती.

जसा मूड तशा फोनमधल्या गाण्यांच्या रिंगटोन ठेवल्या जातात. सध्या संजीव अभ्यंकरांच्या आवजातलं ' तू असतीस तर ' हे गाणं आहे रिंगटोन, त्यात सुरुवातीला असलेला संदेश कुलकर्णीच्या आवजातला शेर मला प्रचंड आवडतो Happy
नवऱ्यासाठी माझं all time favorite 'तुमसेही' गाणं आहे ringtone म्हणून सेट केलेलं Happy

माझी डिफॉल्ट एम आय ची रिंग टोन आहे.
आधी बदलायचो आता कंटाळा आलाय.

एकदा नगरला सिंघम पाहत होतो. त्यात गोट्या (सचिन खेडेकर) ची रिंगटोन ढिंकचिका ढिंकचिका...ए.ए.ए.ए अशी असते. नमकी तीच रिंगटोन माझ्या मोबल्यामध्ये त्यावेळी होती. सिनेमात त्याच्या फोनची रिंगटोन वाजली अन मला माझाच फोन वाजला का असे वाटले.

अवांतर: रिंग टोन तुम्ही किती बदलता, नवनविन रिंग टोन ठेवता का? वॉलपेपर नेहमी बदलता का? यावरदेखील मानसशास्त्रीय अभ्यास झाला आहे.
असे वारंवार बदलणं अन न बदलणेदखील कोणतातरी अनुक्रमे मानसीक आजार असतो किंवा टेक्नो फोबीआ असतो. तुम्ही टेक्नो सॅवी आहात का नाही हे देखील त्यावरून ठरते.

कॉलर ट्यून हा आणखी संशोधनाचा अन धाग्याचा विषय ठरू शकतो.

उमेदवार सदस्यांनी या सल्ल्याचा विचार करून धागा काढावा.

मीनाक्षी माझ पण same तुम से ही गाणं होत नवऱ्या साठी. नवीन मोबाइल आला आणि सेट नाही केलं सध्या.

मी सध्या एका व्यक्तिसाठी "कुछ ना कहो, कुछभी ना कहो" ही ट्यून मोठ्या प्रेमाने ठेवली आहे. >>> माझ्या ओळखीतल्या अजून एका व्यक्तीने हीच ट्यून ठेवली आहे. त्यांना फोन केल्यावर ते लवकर उचलत नाहीत आणि त्यामुळे जवळ जवळ सगळं ऐकावं लागतं -
क्या कहेना है
क्या सुनना है
मुझको पता हैं
तुमको पता हैं

Lol

सुनता है गुरु ग्यानी
ही कबीरांची रचना
पं.कुमार गंधर्व गाताहेत

मला कुणीही फोन केला की!

माझी रिंगटोन हे गाणेच ठेवले आहे. सुरुवातीपासूनच्या म्युजिकसह.
मी यावर स्टेजवर डान्स केला असल्याने जेव्हा जेव्हा वाजते उठून नाचावेसे वाटते.
दोनेक वर्षे झाले. अजून बोअर झालो नाही या रिंगटोनला.. Happy

https://www.youtube.com/watch?v=bh2O4oyB1UM

Can we have this kiss forever

हे गाणं वाजला की आमचा ओड्या पण बघायला लागतो मी कुठं आहे ते

Family member साठी - iPhone 6 original ringtone (Android वर!!! :P)
Office शी संबंधित लोकांसाठी - Landline ची असते तशी बेल
इतर सर्व कॉल्ससाठी - Mi Classic ringtone

Pages