Submitted by दूरदेशीचा मित्र on 16 September, 2019 - 23:53
मनाच्या फांदीवर आलं तुझ्या विचारांचं पान
माझ्या नकळत त्याचं झालं घनदाट रान
कसं थांबवू तुझ्या आठवणींचं हे वारं
एक छोटीशी झुळूक तरी सैरावैरा सारं
झालं सुरु हे वादळ, आता ह्याला नाही थारा
डोळा पावसाची साद, हा नेहेमीचा इशारा
काही खोल जखमा वरच्या वर जगायच्या
काही तरल वेदना पुन्हा पुन्हा भोगायच्या
कधीतरी हा चंद्र जाईलच ढगांच्या मागे
सुटतीलच कधीतरी हे गुंतलेले धागे
कधीतरी ओसरेल हा मोगऱ्याचा वास
तेंव्हातरी घेता येईल मला मोकळा श्वास
तोपर्यंत मला ह्या चंद्रप्रकाशात भिजू दे
तोपर्यंत मला ह्या फुलांजवळ निजू दे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुंदर..
सुंदर..
सुरेख!
सुरेख!
अप्रतिम!
अप्रतिम!
मस्तच आहे कल्पना
मस्तच आहे कल्पना
अतिशय सुंदर आणि भावपूर्ण!!
अतिशय सुंदर आणि भावपूर्ण!!
>>>>>>>> मनाच्या फांदीवर आलं तुझ्या विचारांचं पान
माझ्या नकळत त्याचं झालं घनदाट रान
कसं थांबवू तुझ्या आठवणींचं हे वारं
एक छोटीशी झुळूक तरी सैरावैरा सारं>>>>>>>>> वाह!!
सगळ्यांचे मनापासून आभार, खूप
सगळ्यांचे मनापासून आभार, खूप प्रोत्साहन मिळाले तुमच्या प्रतिक्रिया वाचून