सोळा आण्याच्या गोष्टी - नशीब - sonalisl

Submitted by sonalisl on 11 September, 2019 - 16:21

“तुमचं नक्की ठरलंय ना? तुम्ही एकमेकांच्या आठवणी पुसून टाकाल पण लोकांचे काय? ते तुम्हाला विसरणार नाहीत.”
“मी हे शहर सोडून जाणार आहे” ती म्हणाली आणि त्यांनी संमतीपत्रावर स्वाक्षरी केली.

या उपचाराने त्यांच्यातली मैत्री, प्रेम, अोढ, एकत्र पाहिलेल्या स्वप्नांबरोबर समज, गैरसमज, राग, दुरावा, कडवटपणा सगळेच संपणार होते.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

“हो आई, ही बस मिळाली तर सकाळी घरी पोचेन. नाहीतर दूसरी बस उद्या आहे. हो....हो ... ठेवतो” मोबाईलवर बोलत तो धावत होता आणि.......धाऽऽऽड!
“आईगं!” ती घुश्श्यातच डोळे मोठे करून रागवत होती, “दिसत नाही तुम्हाला? डोळे.... मोबाईल..... मॅनर्स.....” पण त्याला काहीच एेकू येत नव्हते. तो तिच्याकडे बघतच राहिला.....आणि पुन्हा नव्याने तिच्या प्रेमात पडला.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो. exactly हे नाव मला आठवत नव्हते. मी हा चित्रपट पाहिला नाही पण त्यात असेच काहीतरी आहे ना?

Mast ahe