Submitted by सप्रस on 24 August, 2019 - 01:03
भगवान कृष्णाचे नाव घेतलं की राधेचा उल्लेख हा आपोआपच येतो, इतकं राधाकृष्णाचं नातं एकरूप झालेलं होतं. राधा ही कृष्णाची निस्सीम भक्त होती. परंतु श्रीकृष्णाने लग्न केलं ते रुक्मिणीशी. काहीजणांच्या मते रुक्मिणी आणि राधा ह्या एकचं व्यक्तिरेखा आहेत. खरोखरच ह्या व्यक्तिरेखा एक होत्या की वेगवेगळ्या?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सेक्युलर लोक्स
सेक्युलर लोक्स
विजयकुलकर्णी, उदाहरणे चुकीची
विजयकुलकर्णी, उदाहरणे चुकीची आहेत. “बालवयातच लग्ने, वैधव्य , विधवा म्हणून जगताना असंख्य बंधने “ वगैरे वाईटच गोष्टी होत्या. तुम्ही त्या उदाहरणादाखल घेतल्यात याचे खूप नवल वाटले.
सनव, नाही हो, खोडसाळ प्रतिसाद अशा नजरेने मी पाहिले नव्हते.
हायझेनबर्ग यांनी लिहिलेले, जितका जुना संदर्भ तितके चांगले हे पटतंय.
ह्या सगळ्या वादाची गरजच नाही.
ह्या सगळ्या वादाची गरजच नाही. अद्वैत तत्वज्ञानाप्रमाणे रुक्मिणी आणि राधाच काय तर कृष्ण आणि राधा, कृष्ण आणि रुक्मिणी, इतकाच नाही तर तुम्ही सर्व आणि रुक्मिणी, कृष्ण, राधा, सर्वजण एकच तत्व आहात....थोडक्यात काय एकच आहात. भेद कुठेच नाही. सर्वम खलु इदं ब्रह्म: या संपूर्ण विश्वात केवळ एकच तत्व जे निर्गुण, निराकार, सत, चित, आणि आनंदरूपी आहे (आपल्या वेदामध्ये त्याला ब्रह्म म्हणले आहे). योग्य साधना करून तुम्हीच ते ब्रह्म आहात याचा साक्षात्कार करून घ्या आणि या मायाजालातून मुक्त व्हा. बाकी सर्व गौण.
क:अहं क:अहं? स: अहं स: अहं (सोहं सोहं)
कॉपीराईट बाहेर असलेले सगळे
कॉपीराईट बाहेर असलेले सगळे साहित्य (ज्यात रामायण, महाभारत, त्याच्या वेगवेगळ्या आवृत्ती, ऍनलिसीस, मूळ भाषेत, इंग्रजी-हिंदी भाषांतर, इतर काही लोकल भाषेत भाषांतर वगैरे) जालावर मोफत उपलब्ध आहे का? किंवा केंद्र-राज्य सरकारतर्फे असा कुठला प्रोजेक्ट चालू आहे का? किंवा खाजगी (वैयक्तिक खर्चातून, डोनेशन वापरून) पातळीवर हे कोणी करतंय का?
काय ठरलं मग ?
काय ठरलं मग ?
कानगोष्टी मधे राधा व रुक्मीणी
कानगोष्टी मधे राधा व रुक्मीणी या एक असतील तर वेगळ्याही होउ शकतात किंवा वेगळ्या असतील तर एक होउ शकतात. मौखीक ते लिखित या प्रवासात काहीही होउ शकत.
<भारतात मागच्या ५००० वर्षात
<भारतात मागच्या ५००० वर्षात सगळ्यात जास्त सुधारणा हिंदु धर्मातच झाली आहे. जगातला सर्वात जास्त प्रवाही धर्म / संस्कृती आहे ही.>
५००० वर्षांपूर्वी हिंदू हा शब्द अस्तित्वात होता का?
तथाकथित धर्ममार्तंड मंडळींना, फक्त वर्चस्व स्थापन करण्यासाठी देव हवा, धर्म हवा.. पण त्यातल्या चांगल्या वाईट गोष्टींचा उहापोह करायला घेतला की लगोलग तुम्ही हिंदूविरोधी ठरता, मग दुसऱ्या मिनिटात काँग्रेसी, आणि तिसऱ्या मिनिटात दहशतवादी..
उगा माझीच लाल म्हणत बोंबलत फिरणाऱ्या धर्मांधांमुळे अनेक चांगल्या धाग्यांची वाट लागली, त्यातला हा एक.
थोडासा विषयांतर करून एक
थोडासा विषयांतर करून एक प्रश्न अर्थात मी हि कुठेतरी वाचलेलाच पण उत्तर नाही मिळालं अजून,
जर कंसाला माहित होत कि देवकीचा आठवा पुत्र त्याला मारणार आहे तर त्याने देवकीलाच का नाही मारले..
जर देवकी हि त्याची आवडती बहीण होती असे म्हंटले तरी मग त्याने किमान देवकी वासुदेवाला वेगवेगळ्या तुरुंगात तरी ठेवायचे..
कंसाला देवकीच्या आठव्या
कंसाला देवकीच्या आठव्या पुत्रापासून धोका आहे हे एखाद्या कुडमुड्या ज्योतिषाने सांगितले असेल. देवकीचा आठवा पुत्र असा काय चमत्कारी असणार आहे याची कंसाला सुध्दा उत्कंठा लागली असेल म्हणून आठ पुत्र होऊ देण्याची वाट पहात असेल.
डिस्क्लेमरः भावना दुखावल्यास
डिस्क्लेमरः भावना दुखावल्यास क्षमस्व. तसा उद्देश नाही.
कृ ष्ण हे असे मिथक किंवा श्रद्धा असेल त्यांच्यासाठी हर एक वयातील व्यक्तीला भजता पूजता येइल असे दैवत आहे. बाल तरूण व विचारी वयस्कर थोर व्यक्तिमत्व. तसेच राधा व रुक्मिणी ह्या दोन्ही प्रवृत्ती आहेत. ह्या प्रत्ये क स्त्रीत असतात व प्रत्येक पुरुषात एक कृ ष्ण प्रवृत्ती असते.
जे नाते रुक्मि णी बरोबर आहे ते वेगळे राधे बरोबर वेगळा गोड वा व थोडे जास्त मोकळे पण स्वातंत्र्य कारण तिने लहान पणा पासून बघितलेले आहे. त्यामु ळे एकच स्त्री कोणासा ठी राधा - मैत्रीण सखी होउ शकते तर कोणा सा ठी तरी पट्टराणी गृहिणी, किंवा एकच स्त्री दोन्ही भूमिका यशस्वी पणे नि भावते काही नशीबवान नात्यांमध्ये. कृष्णा ची प्रत्येकी बरोबर व्यक्त होण्याची मानसिकताच वेग ळी आहे. रुक्मि णी लग्न करून आणलेली पत्नी. सांसरिक कर्तव्ये तिच्या बरोबर निभवायची, राधा म्हणजे जिच्याजवळ मनातले गुज बोलता येते. किंवा शांतता देखील प्रसन्न दैवी. दोघांना मनातले नकळत उमज ते असे ते सख्य असे ते मैत्र. असा मन का मीत भेटणे फार अवघड. म्हणून दोघींची वेगळी जागा त्याच्या जीवनात आहे. परंतु गीता दोघींपैकी कोणालाच सांगितली देखील नाही. तो पैलू निराळाच आहे.
कुठल्या तरी एका वाहिनीवर
कुठल्या तरी एका वाहिनीवर राधाकृष्ण नावाची मालिका चालू आहे किंवा होती. यात एक गोपादेवी आणि बलदेवी नावाच्या दोन नवीन देव्या आहेत. गोपादेवीची निर्मिती स्वतः भगवान शंकर करतात. खरे तर अशा कोणत्याच देव्या कुठल्याच साहीत्यात नाहीत.
मुद्दा हा कि कुणालाही वाटेल तसे स्वातंत्र्य घेऊन तो नवे पात्र निर्माण करू शकत असावा, जसे या मालिकेत झाले आहे. राधा हे पात्र असेच आठव्या शतकाच्या आसपास निर्माण झाले. तिथून पुढे त्याचे नममानसावर गारूड झाले.
पूर्वी प्रेमावर उघड बोलणे शक्य होत नसल्याने कृष्णाच्या आडून आणि त्यातही राधा कृष्णाच्या आडून बोलताना लोकांना तेव्हढेच समाधान मिळत असणार. प्रेम या विषयावर बोलणे शिष्टसंमत नसावे बहुधा. त्यामुळे भजन, कीर्तनात श्रद्धेच्या नावाखाली प्रेम हवेहवेसे वाटत असणार.
म्हणूनच राधाकृष्ण जोडी जास्त हिट झाली आणि देवळेही बनली. माझ्या माहितीप्रमाणे राधेचं एकही मंदीर नाही, राधाकृष्णाचं मंदीर आहे. यातले कुठलेही मंदीर ४०० वर्षांपेक्षा जुने नाही. चुकभूल द्यावी घ्यावी.
इस्कॉन मधे राधा रुक्मिणी
इस्कॉन मधे राधा रुक्मिणी विध्याचल पर्वताच्या जुळ्या मुली आहेत असे सांगतात. पुतना त्यांना पळवुन नेत असते. त्यातली एक विदर्भात पडते. एक बरसानात.
इस्कॉन चैतन्य महाप्रभुं ना माननारा भक्ती संप्रदाय आहे. ५०० वर्षांपुर्वी सुरु झालेला. वारकरी पंथाप्रमाणे नामस्मरणाला महत्व आहे.
शोले च्या वेळी जय संतोषी मॉं
शोले च्या वेळी जय संतोषी मॉं हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
Pages