रुक्मिणी आणि राधा एकच होत्या का?

Submitted by सप्रस on 24 August, 2019 - 01:03

भगवान कृष्णाचे नाव घेतलं की राधेचा उल्लेख हा आपोआपच येतो, इतकं राधाकृष्णाचं नातं एकरूप झालेलं होतं. राधा ही कृष्णाची निस्सीम भक्त होती. परंतु श्रीकृष्णाने लग्न केलं ते रुक्मिणीशी. काहीजणांच्या मते रुक्मिणी आणि राधा ह्या एकचं व्यक्तिरेखा आहेत. खरोखरच ह्या व्यक्तिरेखा एक होत्या की वेगवेगळ्या?

Group content visibility: 
Use group defaults

राधा विवाहित स्त्री होती. कृष्णावर मोहित होणाऱ्या साऱ्या गोपिकांपैकी एक.

कृष्णाने तिला चांगलाच लळा लावला होता. बाकी त्यांच्या वयात खूप अंतरही होते (कृष्ण लहान, राधा मोठी) आणि नाते सुद्धा प्रियकर-प्रेयसीचे नव्हते. भक्ती आणि स्नेहाचे होते.

रुक्मिणी कृष्णाची प्रेयसी होती. तिचे लग्न शिशुपालशी ठरले होते. तिने कृष्णाला चिठ्ठी पाठवून बोलावून घेतले. आणि कृष्णाने येऊन तिला पळवून नेले. पुढे त्यांचे लग्न झाले.

काय आहे ह्या देवांच्या गोष्टी आहेत आणि खुप खुप वर्षांपुर्वी घडलेल्या आहेत त्यामुळे खरे काय खोटे काय यात नशिरता फक्त मनोभावे भक्ती करावी.

अभिनव Lol
हा वेगळाच मुद्दा आहे. पण खरा आहे.

माझ्या कडूनही त्यात भर......रुक्मिणी एक राजकुमारी होती. आणि राधा एक सामान्य नगरवासी.

राधेचं पात्र महाभारतात नाही.
जयदेवाच्या 'गीतगोविंद'मध्ये राधा आणि अनय सर्वप्रथम भेटतात. आणि त्यातील वृंदावनदेखील काल्पनिक. जयदेवाच्या म्हणण्याप्रमाणे त्याने ब्रह्मवैवर्त पुराणाचा आधार घेतला असला तरी राधा आणि वृंदावन हे जयदेवाचंच क्रिएशन. त्यामुळे बर्‍याच ठिकाणी अनयचा उल्लेख अय्यन असा होतो.
अनय या शब्दाचा अर्थ 'दुर्दैवी', 'आजारी', 'जुगारात वापरला जाणारा फासा' असा आहे.
महाभारतात एक राधा मात्र आहे, कर्णाची आई, अधिरथाची बायको.

भागवतात आराधिका म्हणून एक गोपीचं नाव आहे, तिच्याच कथेसारखी कथा ब्रह्मवैवर्त पुराणात राधेची कथा म्हणून येते. पण आपण ज्या राधेशी परिचित आहोत ती प्रथम गीतगोविंदातच येते.
जाता जाता, सुधीर कक्कर नामक मनोविश्लेषकाने राधा-कृष्णाच्या गोष्टीवर लिहिलेले विवेचन अतिशय रोचक आहे. ज्यांच्या धर्मभावना सहजासहजी दुखावल्या जात नाहीत, किंवा अस्तित्वात नाहीत त्यांनी जरूर वाचा Proud

मी हरिविजय काढून पाहिलं. (लहानपणी वाचलं होतं). त्यात जे लिहिलंय ते एखाद्या धार्मिक म्हणवल्या जाणार्‍या ग्रंथात लिहिलं जाऊ शकलं म्हणजे कोणे एके काळी आपण काय होतो!

काय सांगण्यासारखे नाही ते. उगीच आपलं देव म्हणवले गेले आहे म्हणून "भावनेचा प्रश्न" वगैरे बाबी येतात. अन्यथा वस्तुनिष्ठ संशोधन केले तर फार वेगळे व्यक्तिमत्व समोर उभे राहते.. म्हणतात ना "वो करे तो कृष्णलीला हम करे तो कॅऱ्याक्टर ढिला"

वरदा लिंक द्या की>> अजून जगातलं सगळं लिखित ज्ञान आंतर्जालावर उपलब्ध नाही. सुधीर कक्कर यांची अनेक पुस्तके आहेत , त्यातलं 'टेल्स ऑफ लव्ह, सेक्स अ‍ॅन्ड डेंजर' नामक पुस्तक वाचा. ऑनलाईन आवृत्ती असेलही उपलब्ध, अर्थातच पैसे मोजावे लागतील.

भरत, आपल्या सध्याच्या समाजातली नैतिकतेची अनेक मूल्ये व्हिक्टोरिअन पठडीतील आहेत. पारंपरिक समाजाची घडण अर्थातच वेगळी होती. उगा आजच्या श्लीलाश्लीलतेची पुटं चढवून आम्ही कित्ती उदात्त म्हणण्यात काही अर्थ नाही.

अनय या शब्दाचा अर्थ 'दुर्दैवी', 'आजारी', 'जुगारात वापरला जाणारा फासा' असा आहे. >>> तरी लोक हौसेहौसेनी आपल्या मुलाचं नाव अनय आणि मुलीचं अनया का ठेवतात?

राधेचं गाव बरसाना आहे असं वाचलं आहे. ते मथुरेजवळ कुठे तरी आहे. रुक्मिणी महाराष्ट्रातील राजकन्या होती. शिशुपाल नवरा मी न वरी, श्रीकृष्ण नवरा मी नवरी. असा काही अलंकार शाळेत शिकलो आहोत आपण. बहुतेक श्लेष अलंकार असावा.

मूळ ब्रह्मवैवर्त पुराण अस्तित्वात नाही. किंवा ते हरवलं अथवा नष्ट झालं आहे असं म्हणूयात. उपलब्ध ब्रह्मवैवर्त पुराणात देव आणि देवी यांची जंत्री आहे.
त्यामुळे राधेचं मूळ जयदेव आहेत हे सध्याचे वास्तव आहे.

ब्रह्मवैवर्त पुराणाची पीडीएफ प्रत
https://sanskritdocuments.org/doc_purana/TOC_Purana/TOC_Brahmavaivarta_M...

कृष्ण यादव कुळात जन्माला आला. तो वसुदेव व देवकी यांचा पुत्र. कंस हा त्याचा मामा. सुभद्रा आणि द्रौपदी या दोन्ही भगवान श्रीकृष्णाच्या बहिणी. पैकी सुभद्रा ही सख्खी, तर द्रौपदी ही मानलेली बहीण होती. बलराम त्याचा भाऊ आहे. रुक्मिणी, सत्यभामा, जाम्बवती, सत्या, लक्ष्मणा, कालिन्दी, भद्रा, मित्रविन्दा अशा श्रीकृष्णाला आठ पत्‍नी होत्या.

राधा
संपादन करा
ब्रह्मवैवर्तपुराण या ग्रंथात राधा ही कृष्णाची परमप्रिया आहे असा उल्लेख आहे. राधा ही कृष्णाची प्रेयसी किंवा भक्त होती. राधा व कृष्ण हे मूळचे सांख्यशास्त्रातील प्रकृती व पुरुष होत, असे काहींचे मत आहे. राधा हे कृष्णाचेच स्त्रीरूप आहे व कृष्णच राधेचे पुरुषरूप आहे', असेही म्हटले जाते. कृष्ण अगदी लहान असताना ज्या गोपिकांबरोबर खेळत असे त्यांपैकी एक राधा होती. राधेचे कृष्णावर मनापासून प्रेम होते. राधा विवाहित होती, तिच्या पतीचे नाव अनय.
>> विकीमहाराज म्हणतात.

शोधा
रुक्मिणी
इतर भाषांत वाचा
या पानावर बदलांसाठी लक्ष ठेवा.
संपादन करा
रुक्मिणी ही कृष्णाची पत्नी होती. हिच्या पित्याचे नाव भीष्मक असून आईचे नाव शुद्धमती होते. भीष्मक विर्दभाचा राजा होता. रुक्मिणीच्या मोठ्या भावाचे नाव रुक्मी (संस्कृतमध्ये रुक्मिन्‌).

जीवन
संपादन करा
रुक्मिणीचे लग्न शिशुपालाशी होण्यापूर्वीच श्रीकृष्णाने तिला तिच्या इच्छेनुसार अंबामाता मंदिरातून पळवून नेले आणि तिच्याशी विवाह केला. पुढे त्यांना जो मुलगा झाला त्याचे नाव त्यांनी प्रद्युम्न असे ठेवले.

जेव्हा यादवांचा संहार झाला तेव्हा रुक्मिणीने अग्निप्रवेश करून आत्महत्या केली
>> विकीमहाराज म्हणतात.

Rukhmini swayamvar vacha, sarv mudde vyavasthit samajtil>>>>. +११११

प्रभाकर बोकील यांच्या 'दुर्गाबाईंचा विठोबा' या लोकसत्तेतील लेखातून:
राही अन रखुमाबाई’ या विठ्ठलाच्या आरतीत भेटणाऱ्या विठ्ठलाच्या दोन राण्या. राही ही कृष्णाची प्रेयसी राधा, पण विठ्ठलाची मात्र राणी. रखुमाबाई वा रुक्मिणी तर तशीही राणीच. पण दोघांची देवळं पंढरपुरात वेगळी. राही आल्यामुळे रुक्मिणी रुसली हे ओव्यांतून जनमानसात ठसलेलं कारण. पण विठ्ठल-रुक्मिणी यांच्या या चिरविरहाची विलक्षण लोककथा दुर्गाबाईंच्या ‘पैस’ या लेखसंग्रहात आहे.

लोकसत्ता मधील लेखाची लिंक:
https://www.google.com/amp/s/www.loksatta.com/chaturang-news/durgabai-bh...

ज्यांचे लग्न ठरत नाही त्यांनी रुक्मिणी स्वयंवर वाचावे असे म्हणतात. त्यामुळे लग्न ठरते असा समज आहे. आता विवाहित लोकांनी वाचले तर काय होईल? :विचारात पडलेला बाहूला:

नवीन Submitted by अदीजो on 24 August, 2019 - 16:41
>>>> हरे राम हे असे पण आहे का? अशा जोड्या अनादीकाळा पासून आहेत तर.

चिनूक्स, वरदा, आणि इतरही अनेकांचे माहितीपूर्ण आणि संयत प्रतिसाद वाचून डोळे खरोखरीचे निवले. महाभारतावरच्या आधीच्या काही धाग्यांतले प्रतिसाद वाचून डोळ्यांना शिणवटा आला होता. आता शांत वाटतेय.

आता वरील प्रतिसादात संपादन करता येत नाहीये म्हणून नव्याने प्रतिसाद लिहित आहे. वरती लिहिताना मी माझ्या अर्धवट आठवणीतून लिहिलेला होता (पुराणविषयक). मघाशी संदर्भ बघितला तर भागवतात आराधित असा शब्द आहे (आराधिका नव्हे) आणि तो रासलीलेशी संबंधित आहे पण राधेचं नाव कुठेच नाहीये
ब्रह्मवैवर्त खूप उशीरा लिहिलं गेलेलं पुराण आहे. इ.स. च्या दहाव्या शतकात बंगाल प्रदेशात रचलं गेलं असं सर्वमान्य मत आहे. मात्र आपल्यापर्यंत पोचलेली आवृत्ती ही पंधराव्या शतकाच्या आसपासची आहे. या पुराणात राधेचा स्पष्ट उल्लेख आहे पण त्यात त्याच्या रचनाकाल आणि रचनास्थल यांचा गीतगोविंदाशी असलेला घनिष्ट संबंध बघता आश्चर्य असं काही नाही. ब्रह्मवैवर्त हे कृष्णाला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेले पुराण आहे. यातली राधा - कृष्ण जोडी आपल्याला परिचित असलेल्या समीकरणाचीच आहे, त्यात इरॉटिसिझम आहे आणि राधा - कृष्णाचं लग्न झाल्याचाही उल्लेख आहे. काही विद्वानांच्या मते गीतगोविंद किंवा ब्रह्मवैवर्ताने एकमेकांकडून हे चित्रण घेण्याऐवजी तिसर्‍याच मूळ एखाद्या स्रोताकडून घेतले असावे.

रुक्मिणी विठ्ठलाची राणी मानली गेली, त्यात विठ्ठलाच्या मूळ धनगरी/पशुपालक समाजाच्या दैवतापासून वैष्णवीकरणाचा जो प्रवास झाला त्याची परिणती आहे (अधिक संदर्भासाठी ढेर्‍यांचे पुस्तक वाचणे)

Pages