रुक्मिणी आणि राधा एकच होत्या का?

Submitted by सप्रस on 24 August, 2019 - 01:03

भगवान कृष्णाचे नाव घेतलं की राधेचा उल्लेख हा आपोआपच येतो, इतकं राधाकृष्णाचं नातं एकरूप झालेलं होतं. राधा ही कृष्णाची निस्सीम भक्त होती. परंतु श्रीकृष्णाने लग्न केलं ते रुक्मिणीशी. काहीजणांच्या मते रुक्मिणी आणि राधा ह्या एकचं व्यक्तिरेखा आहेत. खरोखरच ह्या व्यक्तिरेखा एक होत्या की वेगवेगळ्या?

Group content visibility: 
Use group defaults

आता विवाहित लोकांनी वाचले तर काय होईल? :विचारात पडलेला बाहूला:

Submitted by पाथफाईंडर on 24 August, 2019
>>> आयुष्यात दुसरा/री येईल की.

विवाहित असताना वाचलं तरी तेच फळ मिळेल जे मिळावं म्हणून अविवाहित लोकं वाचतात. दोन दोन लाडू! पहिला लाडू आवडला व पोट भरलं असेल तर नका वाचू. अजून लाडू पाहिजे असणाऱ्यांनी वाचावं.
शादी का लाडू म्हणायचंय मला.

जोवर माहिती ईंटरनेटवर डिजिटल स्वरूपात ऊलब्ध नाही, विदेशी संशोधकांनी पुस्तके लिहून त्यातली माहिती विकिपिडियावर दिली जात नाही किमानपक्षी झी, स्टार वरच्या मालिकेमध्ये ती माहिती दृष्यस्वरूपात दाखवत नाहीत तोवर पुराण ग्रंथांबिंथांमध्ये लिहिलेले आम्ही सत्य मानत नाही. अशा ग्रंथांमधली माहिती संदर्भासहित सांगणे म्हणजे आपल्या खर्‍या ईतिहासाची मोडतोड करणे आहे असे आम्ही मानतो.

स्वतः फार धार्मिक नसल्याने खरे खोटे फरक पडत नाही पण मायबोलीवर अशा या कथांची चर्चा होते तेव्हा, जर या कोणत्या पुस्तकात नकारात्मक पद्धतीने गेल्या असतील तर ‘तेच कसे खरे’ हे म्हणायची पद्धत जाणवते. ती तरी पुस्तके खरी कशावरुन?

सुनिधी, धर्मभावनेचा उल्लेख केलास म्हणजे माझ्या प्रतिसादाविषयी लिहिले आहेस असे समजून प्रतिसाद लिहिते आहे -
मी उल्लेख केलेल्या पुस्तकांत नकारात्मक पद्धतीने काही गोष्ट बघणे वगैरे काही नाहीये. तर ही मिथककथा समाजात का व कशी आली असेल यावर एका नामवंत तज्ज्ञ मनोविश्लेषकाने लिहिलेले विवेचन आहे. आपल्याला सहसा देव-देवतांचे असे विश्लेषण वाचायची सवय नसते म्हणून मी तिथे तसे लिहिले आहे.
यात कुठेही खरे-खोटे असे मूल्यमापन येतच नाही. तेव्हा तीच पुस्तके खरी असा अट्टाहासही नाही. एक पूर्ण वेगळा सामाजिक मानसिकतेचा पैलू आपल्यासमोर हे पुस्तक मांडते. एवढेच. तू स्वतःच वाचून किंवा चाळून बघ ना...

ओके.
तुझाच प्रतिसाद असं नाही , एकुणच जाणवते. ते चूक किंवा बरोबर असेही म्हणत नाही.
जसं वर लिहील्याप्रमाणे अशी पुस्तके आवर्जुन शोधुन वाचली नाहीत पण सहज हाती लागले तर नक्की वाचीन. पण म्हणजे ती त्या लेखकांनी त्यांच्या अभ्यासानुसार , आकलनानुसार लावलेले लॉजिक वापरुन लिहिलेली पुस्तके असा मी अर्थ घेते.

सुरुवातीचा चिनूक्स यांचा प्रतिसाद आवडला.

सुनिधी , खोडसाळ प्रतिसादकांबद्दल +१

असे लोक एकीकडे आम्ही नास्तिक आहोत, हे सगळं थोतांड आहे म्हणतात आणि दुसरीकडे त्यात कुठे काही टीका करण्याजोगे /नकारात्मक असेल तर ते तितकंच exclusively खरं मानतात जे बरेचदा नंतर घुसडलेलं किंवा डाउटफुल असतं. इतकं डेस्परेशन कशाला..तुमचा नाही विश्वास तर पूर्णच सोडून द्या की.

सुनिधी ज्याला नकारात्मक म्हणताहेत, ते कोणे एके काळी नकारात्मक नव्हतं, आपण आता त्याला तसं ठरवलंय, हा माझा (आणि वरदा यांचा) मुद्दा होता.
ते खरं किंवा खोटं मानण्याचा प्रश्न येत नाही .

नकारात्मकतेच्या मुद्द्यावर :- सहमत आहे.
ह्यात श्रद्धेचे स्पिरिट पडल्याने सगळॅ प्रकरण एक केऑस-कॉकटेल झाले आहे.
नकळत्या वयात एखाद्या मिथकाला वा त्यातील एखाद्या व्यक्तीमत्वाला श्रद्धास्थान मानण्याचे संस्कार झाले आणि पुढे 'माझे श्रद्धास्थान माझ्या मनाला आनंद होईल, पटेल (मॉरल लेवलवर) असेच असले पाहिजे' असे ठरवले की तसे ठरवणार्‍याच्या 'मॉरल थ्रेशोल्ड आणि श्रद्धास्थानाचे आयुष्यात असलेले महत्व' ह्यांच्या तीव्रतेनुसार मिथकाची एक नवी रिविजन आपोआप केली जाते. तर कधी स्वार्थापायी हा ऊपद्व्याप जाणूनबुजून केला जातो.
जेवढा मॉरल थ्रेशोल्ड कमी आणि श्रद्धास्थानाचे आयुष्यातले महत्व जास्त तेवढे हे मिथक श्रद्धेच्या नावाखाली गुडीगुडी किंवा अगदी ऊलट असण्याकडे मिथकाच्या प्रत्येक रिविजन्स जायला लागतात.

दुसरा आस्तिक/नास्तिक असण्याचा मुद्दा- तर आस्तिक्/नास्तिक असण्याशी ह्याचा थेट काहीच सबंध नाही. तसा संबंध वरवर स्पष्ट दिसत असला आणि तो लावणे एकदम सोपे असले तरी. Neither a believer nor a atheist but one can simply be a purist. (a person who insists on absolute adherence to traditional rules or structures, especially in language or style.)
एखादा सश्रद्ध आहे की अश्रद्ध हे अ‍ॅबस्ट्रॅक्ट आहे. पण त्या भावनेच्या मुळाशी असलेल्या मूल स्त्रोताचा ( ग्रंथसंपदा, वेद वा पुराण) आणि त्याच्या अनुषंगाने येणार्‍या साहित्याच्या मूळ स्त्रोताशी असलेल्या सबंधाचा (साहित्यातील पात्र वा प्रसंगांच्या सत्यतेचा नव्हे) आणि शुचितेचा आग्रह कोणीही धरू शकतो, नव्हे प्रत्येकाने श्रद्धा बाजूला ठेऊन धरावाच.

असा आग्रह धरल्यास वरचा नकारात्मकतेसंदर्भातला बाय-प्रॉडक्ट मुद्दाही ऊद्भवणार नाही की खरे खोटे करण्याचीही गरज नाही. त्यासाठी मूळ स्त्रोताकडे वा त्या मूळ स्त्रोताचा संदर्भ घेऊन निर्मिलेल्या साहित्याशी प्रामाणिक राहणे महत्वाचे. मूळ स्त्रोत कोणता ह्यावर एकमत न होणे सहज शक्य आहे पण त्यावर 'विज्ञानशास्त्र प्रमाणित जुन्यातला जुना' हा ऊपाय मान्य करणे शक्य आहे.

एखाद्या पुस्तकात पंधराव्या शतकातील संदर्भ असतील तर ते मानवाच्या ज्ञात इतिहासापेक्षा प्राचीन आहे असे समजलेच पाहीजे, कारण त्यानंतरच्या पाच शतकांनंतरच्या प्रगत मानवांचा अट्टाहास,,, मग त्याने ते न वाचताच हे असे असेल तर, तसे असेल तर, असे अंदाज करत मांडलेले मत का असेना.

हायजेनबर्ग , परफेक्ट.

<असे लोक एकीकडे आम्ही नास्तिक आहोत, हे सगळं थोतांड आहे म्हणतात आणि दुसरीकडे त्यात कुठे काही टीका करण्याजोगे /नकारात्मक असेल तर ते तितकंच exclusively खरं मानतात जे बरेचदा नंतर घुसडलेलं किंवा डाउटफुल असतं. इतकं डेस्परेशन कशाला..तुमचा नाही विश्वास तर पूर्णच सोडून द्या की.>
हायजेनबर्ग यांनी जे म्हटलंय त्याचं पर्फेक्ट उदाहरण. या प्रतिसादाचा व्यत्यास - स्वतःला आस्तिक म्हणवणारे हे काही लोक ( आपल्या / सध्याच्या ) मोरल कंपासमध्ये बसतं तेवढंच exclusively खरं मानतात आणि जे पटत नाही ते घुसडलेलं आणि डाउटफुल आहे, असं म्हणतात.

मी वर उल्लेख केला ते हरिविजय सतरा-अठराव्या शतकात श्रीधर स्वामींनी लिहिलंय. माझ्याकडे त्याचं गद्यरूप आहे. त्याच्या प्रस्तावनेत म्हटलंय की ईश्वरभक्तीचा मुलांमध्ये असलेला नाद पुराणांमधील या कथा दृढ करतात. याचाच अर्थ हा ग्रंथ भक्तिभावाने वाचण्यासाठीच लिहिला गेलाय.
त्यात आता आपल्याला न रुचणार्‍या काही गोष्टी आहेत. पण तीन शतके त्या भक्तिभावाने वाचल्या गेल्या आहेत. म्हणजे त्या त्या काळातल्या आस्तिकांनाही त्याबद्दल आक्षेप नव्हता .

आता या गोष्टी रुचत नसतील एकतर समाजाची मोरल कंपासची कल्पना बदलत गेली (वरदांनी व्हिक्टोरियन मोरालिटी बद्दल लिहिलंच आहे)

अथवा /आणि देवांबद्दल अवतारांबद्दल असं काही ऐकण्याची तयारी राहिली नाही.

आता साहित्याच्या मूलस्रोताबद्दल - या साहित्यात जी भर पडत गेली ती त्या त्या काळच्या समाजमानसाचं आणि समाजव्यवहाराचं प्रतिबिंब आहे आणि म्हणून तीही महत्त्वाची आहे.

इथे आस्तिक असण्या- नसण्याचा काहीही संबंध नाही.

. या प्रतिसादाचा व्यत्यास - स्वतःला आस्तिक म्हणवणारे हे काही लोक ( आपल्या / सध्याच्या ) मोरल कंपासमध्ये बसतं तेवढंच exclusively खरं मानतात आणि जे पटत नाही ते घुसडलेलं आणि डाउटफुल आहे, असं म्हणतात.

तसं नाहीये. कोणि genuine interest पोटी हरिविजय/भागवत / ज्ञानेश्वरी/रामायण /गीता /वेद यांचा अभ्यास करत असेल, काही विरोधी किंवा नवीन मत मांडत असेल तर ते ऐकून घेण्याची, consider करण्याची तयारी आहे. दरवेळी गीता वाचताना जसे नवे insights मला सापडतात तसेच नवे प्रश्नही पडत असतात. बदलत गेलेले cultural norm हा तर एक known concept आहेच. तसंच दुसऱ्या बाजूला सनातनी लोक जे चुकीचे interpretation करतात त्याना expose करणंही आवश्यक असतंच.

पण जे नास्तिक आहेत, किंवा नॉन हिंदू आहेत त्यांनी उगाच अपप्रचार करायला, अजेंडा चालवायला हिंदू धर्माबद्दल सिलेक्टिव्ह कमेंट करू नयेत असं वाटतं. (हे तुमच्याबद्दल लिहिलेलं नाही.)

<पण जे नास्तिक आहेत, किंवा नॉन हिंदू आहेत त्यांनी उगाच अपप्रचार करायला, अजेंडा चालवायला हिंदू धर्माबद्दल सिलेक्टिव्ह कमेंट करू नयेत असं वाटतं>

२ ते अभ्यासक असले तर?
३. हेतूंबद्दल शंका .
४. सिलेक्टिव्ह हे कोण ठरवणार?

हिंदू धर्मात नास्तिकांनाही जागा आहे.

आपल्याला रुचत नाही, ते बोलणारा नास्तिक, अहिंदू आहे, असं लेबल ला वलं जातंय का?

१. का? धर्माची चिकित्सा हा टॅबू आहे का? मग सुधारणा कशी होणार? सुधारणा करणार्‍यांना त्या त्या काळात धर्ममार्तंडांचा जाच सहन करावा लागलाच होता. पुढे जाऊन त्यांचेही पंथ निर्माण झाले. मग ते मुख्य धर्मप्रवाहात सामील करून घेतले गेले)

२ ते अभ्यासक असले तर?
>>
अभ्यासक असणे आपोआप तुम्हाला हा हक्क देत नाही की तुम्ही कोणाच्या श्रद्धास्थानांचा अपमान करत सुटावं, त्याची प्रतिमा मलिन करावी, तुमची श्रद्धा सोडुन आमच्याकडे या असे बोलावे. हे सोडुन करत असेल तो खरा अभ्यासक.
अभ्यासामधुन नकारात्मक निष्कर्ष निघत असतील, तर ते मांडण्याची एक पद्धत असते. अपमानच केला पाहिजे हा काही नियम नाही.

३. हेतूंबद्दल शंका .
पुरावे नसताना किंवा ऐतिहासीक घटनांच, आजच्या काळात विपरीत अर्थ लावुन त्या व्यक्ती किंवा तो समाज यांना नामोहरम करणे, असा हेतु असेल तर त्यावर शंका घेतली जाणाराच. काल परवाच तुमच्या पक्षाच्या लोकांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचा अपमान केलाच की. परत एकदा. तुम्ही धागे काढले का त्यावर? निषेध नोंदवला का? मोर्चे काढले का? मग तुमच्या हेतूवर शंका का घेण्यत येऊ नये?

४. सिलेक्टिव्ह हे कोण ठरवणार?
ज्यांनी चुकीचं वागण्याची सुरुवाती नाही केली ते.

आपल्याला रुचत नाही, ते बोलणारा नास्तिक, अहिंदू आहे, असं लेबल ला वलं जातंय का?
>>
हेच काय, कोणतेही लेबल कोणीही इथे कोणालाही लावत नाहीये. पण असे "अतिहातवारे करुनच्या स्ताईलमधे" विचारलेले प्रश्न तुम्ही इथे नाही विचारलेत तर तुमचे हिंदूना नामोहरम करण्याचे मनसुबे कसे फळाला येतील?

१. का? धर्माची चिकित्सा हा टॅबू आहे का? मग सुधारणा कशी होणार? सुधारणा करणार्‍यांना त्या त्या काळात धर्ममार्तंडांचा जाच सहन करावा लागलाच होता. पुढे जाऊन त्यांचेही पंथ निर्माण झाले. मग ते मुख्य धर्मप्रवाहात सामील करून घेतले गेले)
>>
भारतात मागच्या ५००० वर्षात सगळ्यात जास्त सुधारणा हिंदु धर्मातच झाली आहे. जगातला सर्वात जास्त प्रवाही धर्म / संस्कृती आहे ही.
पूर्ण रेकॉर्डेड इतिहास आहे.
हिंदु धर्मीयच हा पुढाकार घेण्यात सुरुवातीला होते. अनेक घरांत व संस्थात काही वाईट लोक असतात तसे इथेही होते, त्यांचा विरोध न जुमानता, सामान्य बहुसंख्य हिंदु धर्मीयांनी हा बदल स्वीकारलाच आहे.
आता जरा हिंदु धर्माला आराम द्या. दुसरीकडे बघा जरा. मागचा अनेक वर्षांचा बॅकलॉग बाकी आहे. त्यामुळे भारत मागे राहतोय. तो बदला जरा.

श्रद्धास्थानांच्या खाजगी बाबी, कोण प्रेयसी, कोण बायको, होती का नव्हतीच, हे सगळे खुलेआम जगासमोर ताठमानेने विचारता येते त्यावर चर्चा करता येते, कारण हिंदु धर्मीय व संस्कृती प्रवाही व सर्व विचारांना सामावुन घेणारी आहे.
हे प्रवाहीपण व सामावण्याची वृत्ती स्वतः हिंदु धर्मीयांमुळेच आहे. त्यांचा स्वतःचाच खुले विचार करण्याचा स्वभाव आहे.
असे प्रश्न उपस्थित करुनही प्रश्न विचारणारा व इथे चर्चा करणारे सगळे हिंदुच आहेत. ते ही सन्मानाने.

असे चर्चासत्र, व प्रश्न इथे विचारण्याची परवानगी इथले प्रशासन देते, कारण हिंदुंवर असलेला विश्वास.
हे तुमच्यासारख्यांना बघवत नाही म्हणुन तुम्हाला किस पाडायचाय, नको तु मुद्दे उपस्थित करायचे आहेत.

<तुम्ही इथे नाही विचारलेत तर तुमचे हिंदूना नामोहरम करण्याचे मनसुबे कसे फळाला येतील?> हेच लेबल आहे.

<म्ही कोणाच्या श्रद्धास्थानांचा अपमान करत सुटावं, त्याची प्रतिमा मलिन करावी, तुमची श्रद्धा सोडुन आमच्याकडे या असे बोलावे.>
अजूनही मुद्दा कळलेलाच नाही. अमुक एका गोष्टींमुळे तुमचं श्रद्धास्थान मलीन होतं अ सं तुम्ही ठरवताय, त्या गोष्टी समाजमानसात कित्येक शतके आहेत. धार्मिक म्हणवल्या जाणार्‍या साहित्यात आहेत. त्या गोष्टींमुळे आपलं श्रद्धास्थान मलीन होत नाही, असं समजणारे लोक आहेत, इतकी शतकं होते. आता तुम्ही तुमच्या मलीनतेच्या क ल्पना त्यांच्यावर लादताय.

या पुस्तकांमध्ये जे लिहिलं गेलंय त्यामुळे कृष्ण वाईट ठरतो, असं तुम्ही ज्यांना लेबल लावताय त्यांच्यातलं कोणीही म्हणत नाहीए.

तुम्ही पिढ्यानपिढ्या चालत आलेलं कृष्णचरित्र कोणत्या अधिकारात एडिट आणि सेन्सॉर करताय?

<भारतात मागच्या ५००० वर्षात सगळ्यात जास्त सुधारणा हिंदु धर्मातच झाली आहे. जगातला सर्वात जास्त प्रवाही धर्म / संस्कृती आहे ही.?> सुधारणा करणार्‍यांना त्या त्या काळात काय वागणूक मिळाली? - मोजकीच उदाहरणं घेऊया - ज्ञानेश्वर, तुकाराम, राजा राममोहन रॉय.
त्या त्या वेळच्या धर्ममार्तंडांची आणि तुमची भाषा एकच आहे.

३. संदर्भहीन.

<हे तुमच्यासारख्यांना बघवत
<तुमचे हिंदूना नामोहरम करण्याचे मनसुबे >
लेबल.

तुम्ही सुचवताय की मी हिंदू नाही. कशाच्या आधारावर?

आतापर्यंत चर्चा ऑब्जेक्ट्व्हली चालली होती. तुम्ही त्याला व्यक्तिगत दोषारोप , अकांडतांडवाचं रूप दिलंत. तुमचा हाच अ‍ॅप्रोच राहणार असेल, तर तुमचे प्रतिसाद इग्नोर केले जातील.

अजूनही मुद्दा कळलेलाच नाही. अमुक एका गोष्टींमुळे तुमचं श्रद्धास्थान मलीन होतं अ सं तुम्ही ठरवताय, त्या गोष्टी समाजमानसात कित्येक शतके आहेत. धार्मिक म्हणवल्या जाणार्‍या साहित्यात आहेत. त्या गोष्टींमुळे आपलं श्रद्धास्थान मलीन होत नाही, असं समजणारे लोक आहेत, इतकी शतकं होते. आता तुम्ही तुमच्या मलीनतेच्या क ल्पना त्यांच्यावर लादताय
>>
Biggrin
अहो मी कशाला काही कुणावर लादेल. हिंदु लोकं आहेत ही. आता तुम्हीच नाही का एवढा विखारी प्रचार करत आहात?
इथेच काय इतरत्र कुठेही मी किंवा इतर कोणी अशा कोणत्या ऐतिहासीक गोष्टींमुळे (proven facts) आमची श्रद्धास्थानं मलीन होतायत , अस काही ठरवत नाही आहोत. आमच्याकडे असे ठरवणारी कोणतीही केंद्रीय संस्था नाही.
पण त्या घटनांचा आजच्या काळात विपरीत अर्थ लावुन आजच्या हिंदु लोकांना बदनाम करणे हा आमचा अपमान आहे व ते चुकीचे आहे.
या गोष्टी उजेडात आणणारे संशोधक हिंदुच होते. त्यावर काव्य रचणारेही हिंदुच होते. सामान्य जनतेने सगळ्यांना सामावुन घेतले आहे.

या पुस्तकांमध्ये जे लिहिलं गेलंय त्यामुळे कृष्ण वाईट ठरतो, असं तुम्ही ज्यांना लेबल लावताय त्यांच्यातलं कोणीही म्हणत नाहीए.
>>
हे काय?

तुम्ही पिढ्यानपिढ्या चालत आलेलं कृष्णचरित्र कोणत्या अधिकारात एडिट आणि सेन्सॉर करताय?
>>
एल. ओ.एल.
जर हे सेन्सोर आहे तर तुम्हाला कसे कळले? जगाला कसे कळले?
करा की ढिगाने प्रिंट. कोणीही अडवणार नाही तुम्हाला.

सुधारणा करणार्‍यांना त्या त्या काळात काय वागणूक मिळाली? - मोजकीच उदाहरणं घेऊया - ज्ञानेश्वर, तुकाराम, राजा राममोहन रॉय.
>>
ती कुणाला नसती मिळाली? साध्या नेहमीच्या बँकेच्या ब्रांचमधे पण सुधारणेला विरोध करणारे डझनभर नग असतात.
विरोध झाल्यावर सामान्य बहुसंख्यांनी तो मानला का? की तो झुगारुन पुढे गेले ते बघा.

त्या त्या वेळच्या धर्ममार्तंडांची आणि तुमची भाषा एकच आहे.
>>
हो आणि तुमची आणि ....

आतापर्यंत चर्चा ऑब्जेक्ट्व्हली चालली होती. तुम्ही त्याला व्यक्तिगत दोषारोप , अकांडतांडवाचं रूप दिलंत. तुमचा हाच अ‍ॅप्रोच राहणार असेल, तर तुमचे प्रतिसाद इग्नोर केले जातील.
नवीन Submitted by भरत. on 25 August, 2019 - 09:46
>>
तुम्ही हिंदु लोकांवर व धर्मावर शिंतोडे उडवत असताना तुमचे समविचार गप्प राहुन मजा बघत होते तोपर्यंत सर्व ऑब्जेक्टीवली चालले होते का?
आणि आरसा दाखवल्यावर चुकीच्या दिशेने गेली का चर्चा? मग तुम्ही इग्नोरच करा माझे सत्य मुद्दे.

अभिनव, तुमचीच दोन वाक्ये एकत्र ठेवून वाचा - "तुम्ही कोणाच्या श्रद्धास्थानांचा अपमान करत सुटावं, त्याची प्रतिमा मलिन करावी"
<इथेच काय इतरत्र कुठेही मी किंवा इतर कोणी अशा कोणत्या गोष्टींमुळे आमची श्रद्धास्थानं मलीन होतायत , अस काही ठरवत नाही आहोत. >

तुमचे सगळेच प्रतिसाद काही वेळाने शांत डोक्याने सलग वाचा.
याबबात हेमाशेपो.

बदल केला आहे.
आता तुम्ही थोड्यावेळाने शांत डोक्याने ते नीट वाचा आणि मग ठरवा काय ते.
तुमच्यासाठी हेमाशेपो .

अय्यो, माझ्या एका फिदी स्मायलीने माझा प्रतिसाद खोडसाळ वगैरे वाटून इतका पोस्टींचा धुरळा उडाला की काय?
शेवटच्या काही प्रतिसादांत नक्की मुद्दा काय, कोणाला काय म्हणायचं आहे हे मला नीटसं कळलं नाहीये (माबुदोस) त्यामुळे त्याला पास देते. पण माझा प्रतिसाद खोडसाळ मानणार्‍यांनी खुशाल मानावा. काही फरक पडत नाही.
मी या विषयाची अभ्यासक आहे. त्यात आस्तिक आहे का नास्तिक याचा संबंधच येत नाही. माझा अभ्यासाशिवाय कुठला अजेंडा नाही. कुणाला काय वाटावं यावर माझं नियंत्रण नाही. मी जे काही पुस्तक वगैरेचे संदर्भ दिलेत त्यातही बदनामीकारक खोडसाळ नकारात्मक काही आहे असं मला वाटत नाही. मुळात कथांमध्ये जे काही आहे त्याचेच विश्लेषण आहे. हां, आता भरत यांनी म्हणल्याप्रमाणे आपल्या बदललेल्या आधुनिक मॉरल कंपासमध्ये लोकांना असं काही देवांबद्दल वगैरे विवेचनात्मक लिहिलेलं (भक्तीभावाने लिहिलेलं सोडून) वाचायची सहनशक्ती संकोच पावत चालली आहे. त्याप्रमाणे जर इथल्या आस्तिक भक्तांना त्रास होत असेल तर वाचू नका ना ती पुस्तकं. मूळ कथा सगळे ऐकतात वाचतात की! आता आहेत भारतीय मिथककथांमधले देव माणसासारख्याच गुणावगुणांचे, षड्रिपुंंपासून त्यांचीही सुटका बरेचदा नाहीचे. मग त्यात इतका भक्तांचा जीव जळायचं कारण नाही. किंवा देवांची प्रतिमा मलीन व्हायचाही प्रश्न उद्भवतो असं वाटत नाही. तसं कुणाला वाटत असेल तर हास्यास्पद आहे!
असोच.
या धाग्यावर जी माहिती मला देण्यासारखी होती (पुराणांचे मूळ संदर्भ वगैरे) ती झाली आहे देऊन, तेव्हा इथे आणखी लिहिण्यात आणि पोस्टींच्या धुळवडीत रस नाहीये.

धार्मिक मिथके कशी आली, ती कसकशी विकास पावत गेली याचा अभ्यास केवळ त्या धर्माच्या आणी सश्रद्ध लोकांनीच करावा हा आग्रह अनाठाई, संकुचीत व असुरक्षित आहे. आपल्या देवाबद्दल कुणी एखादे पुस्तक लिहिले आणी केवळ तेवढ्याने आपल्या श्रद्धास्थानाला धक्का बसला, आपल्या धार्मिक भावना दुखवल्या असे वाटणार्‍यानी मुळात आपली भक्ती तरी खरी आहे का याचे आत्मपरिक्षण करावे.

मी आस्तिक नाही, पण असलो असतो तरीही असे एखादे संशोधनपर पुस्तक लिहिले म्हणून त्रागा करून घेतला नसता. ते पुस्तक न वाचायचे स्वातंत्र्य मला आहेच, शिवाय त्यातल्या चुका दाखवणारा लेख /पुस्तक लिहायचे ही.

"नकारात्मक" वाचून मजा वाटली. मुळात हे जे आहे ते नकारात्मक आहे ही समजूत आपण ज्या व्हिक्टोरियन समाजाकडून कॉपी केली त्या समाजानेही हे मागे सोडले आहे पण आपण कवटाळून बसलो आहोत. चाय से किटली गरम !
पूर्वी मुलींची बालवयातच लग्ने होत, त्यातल्या काहिंच्या नशीबी बालपणीच वैधव्य येत असे. विधवा म्हणून जगताना असंख्य बंधने असत. देवळात सायंकाळी चालणारी प्रवचने हाच काय तो विरंगुळा. पुराणीक बुवाही अशा "नकारात्मक" गोष्टी रंगवून रंगवून सांगत. त्यात काहीही चुकिचे वावगे व नकारात्मक असे मला वाटत नाही. सुदैवाने त्या काळी "नकारात्मक" चे तुणतुणे वाजवून त्या बिचार्‍या महिलांच्या जीवनातल्या थोडाफार आनंदा वर पाणी ओतणारे नव्हते !

Pages