"नारळी पौर्णिमा स्पेशल" ओल्या नारळाच्या पोळ्या by Namrata's CookBook : १५

Submitted by Namokar on 13 August, 2019 - 16:01
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

naralachya polya (2)up.jpg

ओलं खोबर (२५०ग्रॅ. )
गूळ/साखर(१५० ग्रॅ. )
वेलची पुड
तुप
गव्हाचे पीठ (१५० ग्रॅ. )
तेल
पाणी
मीठ
up.jpg

क्रमवार पाककृती: 

१. सगळ्यात आधी कणिक मळून घेऊ
२. एका परातीमध्ये गव्हाचे पीठ ,त्यामध्ये चवीनुसार मीठ घ्या ,लागेलतसे पाणी घालून कणिक मळून घ्या
n1 (1).jpg
३. कणिक मळून झालीकी ,एका कापडामध्ये झाकून ठेवा
n1 (2).png
४. ओलं खोबर खोउन घ्या/ छोटे तुकडे करुन मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या
n1 (3).pngn1 (5).png
५. गॅसवर पॅन गरम करायला ठेवा
६. आता त्यामध्ये बारीक केलेले नारळ घालून मध्यम गॅसवर परतून घ्या
साधारण खोबऱ्यातील ओलसरपणा कमी होईपर्यंत ८-१० मिनीटे परतून घ्यायचे आहे
n1 (6).jpg
७. आता पॅनमध्ये खोबर्याचा किस एका बाजूला करुन गूळ घाला (गॅस मंद आचेवर करुन घ्या)
n1 (7).jpg
८. गूळ थोडेसे पातळ झालेकी किसलेले खोबरे त्यामध्ये एकत्र करुन घ्या
९. आता त्यामध्ये वेलची पुड घालून एकत्र करुन घ्या
n1 (8)up.jpg
१०. (गॅस मध्यम आचेवर करुन घ्या) १५ मिनीटे हे मिश्रण परतायचे आहे
साधारण मिश्रण थोडे जाडसर होत आलेकी गॅस बंद करुन मिश्र्ण थंड करुन घ्यावे
n1 (9)up.jpg
११. आता कणकेचे गोळे करावे.
१२. कणकेच्या गोळ्याची पुरी लाटून त्यामध्ये सारण भारुन पुरीच्या सर्व बाजू एकत्र आणून बंद करावे.
n1 (10)up.jpg
१३. थोडे पीठ लावून पोळी अलगद लाटून घ्यावी
n1 (11)up.jpg
१४. (गॅस मध्यम आचेवर करुन घ्या) तवा गरम करून पोळ्या तूपावर खरपूस भाजून घ्या.
n1 (12)up.jpgnaralachya polya (3)up.jpg

अधिक टिपा: 

*ओल्या खोबऱ्या ऐवजी सुक्या खोबऱ्याचा किस देखील वापरु शकतो
*या पोळ्या २ दिवस टिकतात.
*या साहित्यामध्ये बरोबर ६ पोळ्या होतात
रेसिपीचा पूर्ण व्हिडीओ : https://youtu.be/yr3-1_rlUCg

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेगळीच पा कृ. छान वाटतेय, पोळी लाटणं आणि भाजणं हे कौशल्याचे काम आहे ह्या पा कृ मध्ये. सारण फुटून बाहेर येउ शकतं, तवा चिकट होउ शकतो गु पो सारखा.

फायनल प्रॉडक्ट छान दिसतंय.
पण गूळचूण म्हटलं की उकडीचे किंवा तळणीचे मोदक /करंज्याच हे समीकरण डोक्यात फिट आहे. घावण भूतकाळात जमा झाले. त्यामुळे पोळ्या कशा लागतील, असं वाटतं.

अहाहा.... सुंदर.
आत्ताच जेवण झाले व फार गोड आवडत नसले तरी खाव्याशा वाटल्या.

मस्तच रेसिपी.
आम्ही गुळा-नारळाच्या पुर्या/घारे करतो. आज पण करणार आहे.
किट्टु२१- उद्या रेसिपी टाकते.

मी करेन उद्याला बहुतेक. ओल्या नारळाच्या गुळाच्या करंज्या प्रचंड आवडतात पण तळणीचा खटाटोप असल्यान नाहिच करत तर आता हे करेन. तुमचा ब्लॉग चाळायचा आहे.

तुम्ही, माहितीचा स्त्रोत नाहि लिहिला(असेच विचारतेय).
तामिळ लोकं बनवतात मैदा वापरून अशीच त्याला थेंगाइ पोळी म्हणतात.

छान आहे रेसीपी . मला तांद ळाच्या पीठापेक्षा कणीकेचे मोदक आवडतात. त्यामुळ ह्या आवडतील.
घरी खव्याच्या , शेंगदाण्याच्या पोळ्या करतात आई , सासुबाई वगैरे. पण खोबर्‍याच्या कधी पाहिल्या नव्हत्या. विचारून बघते करतात का आमच्याकडे.

तुमचा प्रोफाईल फोटो फारच सुरेख आहे.

धन्यवाद BLACKCAT , देवकी, कुंद ,धनुडी,किल्ली, वावे ,भरत. ,अश्विनी डोंगरे , झंपी,प्राचीन ,सुनिधी , 'सिद्धि',किट्टु२१,anjali_kool , sonalisl,प्रभा ,झंपी ,Submitted by सीमा