" कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे |
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे |
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर |"
कवयित्री इंदिरा संत यांनी 'सरकते ऋतु आणि त्या सोबत बहरणारा निसर्ग' अचुक पणे दर्शवणारे सुंदर वर्णन केल आहे. आपल्याला देखील काहीस असच वाटत असत ना ? " कोसळणार्या पावसामध्ये तल्लीन होउन चिंब भीजत रहाव, अगदी समाधी घेतल्यावर जी एकाग्रता असते त्या एकाग्रतेने स्नान करावे. मग निथळण्यासाठी सोनेरी शरदाच्या उन्हात उभे रहावे. जणू दवांत भीजलेला प्राजक्त निथळण्यासाठी शरदाचे कोवळी ऊन झेलत आहे. हेमंताचा रेशमी-उबदार शेला अंगावर ओढावा पण वस्त्र मात्र वसंतात बहरणार्या रंगी बिरंगी, सुवासिक फुला-पानांनी गुंफलेले असावे. सोबत ग्रिष्माच्या चकाकी सारखी रंगीत चोळी घालावी. आता या बरोबरच साज म्हणून गर्द विजेची माळ अगदी केवड्या प्रमाने सहज वेणीवर माळुन ऋतु सोहळ्यासाठी सज्ज असावे."
किती सुंदर भाव | अगदी तरल.
"नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली,
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी.
पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची,
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची.
कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे.
हे जीवन सुंदर आहे."
विधात्याने आपल्याला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे निसर्ग. याने आपले जीवन अधिक सुंदर झाले आहे.काळ, वेळ, ठिकाण,देश,हवामान यानुसार बदलतात ती निसर्गाची रुप. पण खरच जगाच्या पाठीवर कोठेही गेल तरीही निसर्ग एकच आहे. याला ठरावीक सिमारेषा नाही. देश नाही. धर्म, प्रांत, जात-पात काही लागू पडत नाही.
" गोठ्यातील गाई पासुन ते डबक्यातील बेडका पर्यंत, आणि गर्वाने पिसारा फुलवुन नृत्य करणार्या मयुरा पासुन ते भिरभीर करत कुंपण काठीवरती बसणार्या चतूरा पर्यंत, सगळीकडे त्याची किमया आहे. निळसर पांढ-या निसुर्डी पासून ते गोलाकार, जाळीदार थेंबांनी भरुन फुलणार्या दवबिंदू पर्यंत सगळीकडे तोची किमयागार."
पहाटेच्या वाऱ्याकडुन
थोडीशी चंचलता घ्यावी,
कोवळ्या त्या किरणांकडुन
थोडीशी कोमलता घ्यावी,
उमलत्या फुलाकडुन
नाजुकशी सुंदरता घ्यावी
थंड मंद हवेला कसं
नाजुक स्पर्शाने जाणावे.
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे.
निसर्गा कडून काय काय घ्यायचे याच कवी ईथे सुंदर वर्णन करतात. चंचलता, कोमलता आणि सुंदरता घेऊन धुंद होऊ पाहताना निसर्ग प्रेमींनी ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजेच, पण त्या बरोबरच पुढील पिढी साठी हा नैसर्गिक ठेवा जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हि काळाची गरज आहे तसेच आपली नैतिक जबाबदारी देखील आहे.
मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच कोकण या प्रत्येक विभागाने आपल्याला भरभरून नैसर्गिक विविधता बहाल केली आहे. कास पठारावर असणारे विविध प्रकारचे पक्षी व प्राणी, कामशेत, माळशेज सारखे वैविध्यतेने नटलेले घाट, अलिबाग, दापोली, मुरुड पासून रत्नागिरी पर्यंत पसरलेले समुद्र किनारे आणि त्या लगत असणारे जलदुर्ग, महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणे, बुलढाण्यातील खार्या पाण्याचे लोणार सरोवर, निघोज चे रांजणखळगे, महाराजांच्या काळातील अनेक गड, किल्ले असा भरभरून मिळणारा निसर्ग कोणाला पहायला आवडणार नाही! गर्द झाडी आणि उंचसखल डोंगराळ भाग, हिरवी गार शेत, अवखळ वाहणारी नदी, खळाळून हसणारे झरे, मोजेत वेळू मधून शीळ घालणारा वारा, किलबिलाट करणारे विहंग आणि पाण्यावरील जलतरंग कोणाला पहायला आवडणार नाही! पण आजच्या काळात वेळे अभावी म्हणा किंवा शहरीकरणाचा वाढता वेग म्हणा, अशा काही कारणांमुळे आपल्याला या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. काहीजण फक्त बागेत जाऊन ते सुख अनुभवत असतात तर काहींच्या नशिबी ते ही नाही. अशाच निसर्गप्रेमी मंडळींना जुन्या-नवीन नैसर्गिक सौंदर्याची ओळख आणि देवाणघेवाण पुढे कायम ठेवण्यासाठी हा प्रेमळ धागा चालू आहे.
(वरील मनोगत नि.ग. प्रेमी सिद्धी या मायबोली आयडीने दिले आहे.)

(फोटो मायबोली आयडी शाली यांच्याकडून साभार)
आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी
किती चातकचोचीने
प्यावा वर्षाऋतू तरी!
पावसाळ्यात बा सी मर्ढेकरांच्या ह्या ओळींचे स्मरण होत नसेल असा मनुष्य विरळाच. वर्षाऋतूत तृप्त न्हाऊन निघालेल्या धरणीने आता हिरवाकंच शालू नेसला आहे. सगळीकडे दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या नाना छटा आता नेत्रसुखद गारवा देतायेत. आषाढात गर्जत पडणाऱ्या पावसाने सगळीकडे वातावरण कुंद करून सोडले आहे. बळीराजा सुखावला आहे. आता श्रावणाचे दमदार आगमन ... पंचमीपासून सणासुदींना सुरुवात. मनुष्य हा मूळचा निसर्ग पूजक त्यात आपण भारतीयांनी आपल्या सर्व सणसभारंभात निसर्गातील प्रत्येक घटकाला यथोचित सामावून घेतलंय. आपल्या हिंदूसंस्कृतीत निरनिराळ्या पूजा आणि पूजेत वापरल्या जाणा-या पानाफुलांना विशेष महत्व आहे. श्रावणातली सगळी व्रतवैकल्य निसर्गाच्या समीप घेऊन जाणारी, निसर्ग अनुभवायला,जपायला शिकवणारी. या निसर्गाच्या गप्पांच्या ३४ व्या धाग्यावर सर्व नि ग करांचे मनपूर्वक स्वागत. हा निसर्गाच्या गप्पांचा धागा सर्वांसाठी निखळ आनंदी, ताण दूर करणारा, नवनवीन माहिती आणि अनुभवाची देवाणघेवाण करणारा आणि सर्वांगाने बहरणारा ठरो असे निसर्गदेवतेला आवाहन.
(वरील मनोगत नि.ग. प्रेमी ऋतूराज या मायबोली आयडी यांचे आहे)
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२)https://www.maayboli.com/node/63032 (भाग 33)
http://epaper.lokprabha.com
http://epaper.lokprabha.com/2334969/Lokprabha/27-09-2019#dual/46/1
पावसाळ्यातील गडकिल्ले - विनया जंगले यांचा लोकप्रभेतील लेख
नेवाळीच्या पाकळ्या लांबट
नेवाळीच्या पाकळ्या लांबट निमुळत्या असतात >> कुंदा आहे ना हा?
हा आपला नेहमीचा red whiskered
हा आपला नेहमीचा red whiskered bulbul

स्थळः अलिबाग, NIKON COOLPIX P600
मी येथे उतरणीच्या (उत्तमरंगी)
मी येथे उतरणीच्या (उत्तमरंगी) फुलांचा फोटो दिला होता. तेंव्हापासुन या वेलीवर माझे लक्ष होते. मग काही दिवसातच तिला काटेरी फळे आली. त्याचेही फोटो दिले होते. ऋतूराजने सांगितले की त्यातुन कापुस बाहेर पडेल. शेवटी इतके दिवस वाट पाहून त्यातुन बिया बाहेर आल्या. सगळीकडे या म्हाताऱ्या उडताना दिसत होत्या दोन दिवस.




ही प्रवासाला निघालेली बी. आता ही कुठे जाऊन रुजेल कुणास ठाऊक.
ही अजुन एक बी टेकऑफच्या तयारीत आहे.
या इवल्याशा बीयांमधेही इवलेसे किटक मजा करुन घेतात.
बीयांचे अजुन फोटो आहेत ते सवडीने टाकेन.
वर्षा बुलबुल मस्तच आलाय.
वर्षा बुलबुल मस्तच आलाय.

हा आमचा बुलबुल. मला हा फोटो आवडतो कारण याचे नाव शिपाई बुलबुल असुनही हा जाळीच्या आतले फळ चोरुन खातोय.
आरू, मस्त आहे लिंक ++ EKDUM
आरू, मस्त आहे लिंक ++ EKDUM JABARDAST
ही अजुन एक बी टेकऑफच्या
ही अजुन एक बी टेकऑफच्या तयारीत आहे.>>>>>बाबौ,काय धमाल फोटो आहेत. नाळ सिनेमाची आठवण झाली.त्याची सुरुवात होताना अशा म्हातार्या उडत असतात.
बुलबुलाची चोरी झकास टिपलीय.
अप्रतिम फोटो शालीदा
अप्रतिम फोटो शालीदा
शिक्रा (Shikra)
शिक्रा (Shikra)

शिकारी पक्षी आहे. आकार डोम कावळ्याएवढा असेल.
सकाळच्या कोवळ्या उन्हाची जादू
सकाळच्या कोवळ्या उन्हाची जादू.

धन्यवाद देवकी! निसर्ग इतका
धन्यवाद देवकी! निसर्ग इतका धमाल आहे की विचारु नका. आपण फक्त क्लिक करायचे.
थँक्यू ऋतूराज!
या सनबर्डने मला जरा गोंधळात
या सनबर्डने मला जरा गोंधळात टाकले आहे. याचे रंग वेगवेगळेच दिसतात नेहमी. बहुतेक प्लुमेजमुळे (plumage) रंग बदलत असावेत. नर मादी मुळेही यात फरक पडत असेल. शशांकदांनी एका पक्षीतज्ञाची ओळख करुन दिली आहे. आता त्याला विचारेन. येथेही कुणीतरी विचारले होते की सनबर्डच्या छातीवर काळी रेघा कशी काय आहे?

एकदा आला होता म्हणजे पुन्हा येईलच.


हा आहे चष्मेवाला किंवा चाळीशीवाला. (Oriental white-eye) याच्या डोळ्याभोवती पांढरी रिंग असते चष्म्यासारखी. नेमकी याने एकच फोटो काढू दिला आणि त्यावेळीही मान फिरवली.
नेहमीचे मुनिया. (Indian Silverbill) याची चोच खरच चांदीसारखी असते. माझ्याकडे एकदोन फोटो आहेत स्वच्छ चोचीचे. शोधून टाकेन.
हो शाली मी विचारलं होतं
हो शाली मी विचारलं होतं सनबर्डच्या काळ्या रेघेबद्दल. ते plumage मुळेच होतं असं कळलं नंतर.
व्हाइट आय माझा आवडता पक्षी.
तुमच्या या सनबर्डच्या पंखावर चक्क निळी झाक आहे. बर्याचदा जांभळी असते ना.
@वर्षा, हो याच्या पंखावर निळी
@वर्षा, हो याच्या पंखावर निळी झाक आहे तसेच डोक्यावर चमकदार फिरोजी रंगाचे ठिपके देखील आहेत.
नाचण किंवा नाचरा. कोकणात याला
नाचण किंवा नाचरा. कोकणात याला न्हावी का म्हणतात ते माहित नाही. इंग्रजीत फॅनटेल (Fantail)

नावाप्रमाणे हा सुरेख नाचतो. आवाजही मंजूळ असतो. माणसांना फारसा घाबरत नसला तरी एका जागी अजिबात स्थिर रहात नसल्याने फोटो काढायला मला जमले नाही व्यवस्थित. ओळखायची खुण म्हणजे याच्या शेपटीचा पंखा. या पंख्याची सतत उघड झाप सुरु असते. डोक्यावर पांढरी डिझाईन असते तसेच थोरला धोबीला असते तशी पांढरी भुवई असते. माशा, डास हे प्रमुख अन्न. हा मला आमच्या सोसायटीत खुपदा दिसतो म्हणजे हा शहरात, माणसांच्या आजुबाजूला रहातो हे नक्की. आकार चिमणीपेक्षा थोडा मोठा.
(माहिती: पक्षीतज्ञ मित्र)
ही फुले आमच्याकडे प्रत्येक
ही फुले आमच्याकडे प्रत्येक ओढ्यात, लहान नाल्यात दिसतात. कर्दळीशी साम्य आहे. याची फळेही कर्दळीसारखी दिसतात. पण याचे मराठी नाव मला माहीत नाही. विचारुन सांगेन. किंवा येथे कुणाला माहित असेल तर सांगा.


फुले:
फळे:
पिवळ्या डोळ्यांचा सातभाई.
पिवळ्या डोळ्यांचा सातभाई.



इंग्रजी नाव: Yellow-eyed Babbler. लांबी: १८ सेंमी. आकार: बुलबुल पेक्षा छोटा. ओळख: वरील बाजूस लालसर-तपकिरी व पंख बदामी. चोच जड व काळी. छाती, गळा, भुवई आणि डोळे व चोचीमध्ये पांढरा. पोट व खालील बाजू पिवळसर-तपकिरी. बुबुळ पिवळे व त्याभोवती नारिंगी कडे. आवाज: विविध मंजुळ स्वरात गातो. संपूर्ण महाराष्ट्र आढळतो. खाद्यः कोळी, कीटक, छोटी फळे तसेच फुलातील मध.
१.
२.
३.
शालीदा हे फोटो कर्दळीचेच आहेत
शालीदा हे फोटो कर्दळीचेच आहेत
ही पिवळ्या रंगात पण येते, अगदी रान माजते हिचे सांडपाण्यावर किंवा पाणथळ ठिकाणी
आज या महाशयानी. आमच्या घरी
आज या महाशयानी. आमच्या घरी भेट दिली .

नाव नाही माहित. जोडी होती.
Sorry for such a bad photo quality
मनिम्याऊ हा सुतारपक्षी आहे.
मनिम्याऊ हा सुतारपक्षी आहे. फोटो क्लिअर नाही पण नारंगी रंगावरुन हा सोनेरी पाठीचा किंवा सोनपाठी सुतार असावा. सुतार आहे हे नक्की.
होय सुतार आहे. मीदेखील एकदा
होय सुतार आहे. मीदेखील एकदा सुरारची जोडी सरसर झाडाचा बुंधा चढताना पाहीली होती.
हा आमच्याकडे (पुण्यात) नेहमी
हा आमच्याकडे (पुण्यात) नेहमी दिसणारा मराठा सुतार किंवा पगडीवाला सुतार (Yellow-Crowned Woodpecker)


.
फोटो सर्वच भारी, तो नाचण
फोटो सर्वच भारी, तो नाचण म्हणजे बुलबुल पक्षी आहे का, आमच्याइथे आहेत खूप. खिडकीत, ग्रीलमध्ये नाचत रहातात, तोंडाने आवाज करत राहतात.
बाकीचे पक्षी वरचे आमच्या आसपास दिसण्याएवढे सुदैवी आम्ही नाही
मनिम्याऊ हा सुतारपक्षी आहे>>
मनिम्याऊ हा सुतारपक्षी आहे>> +१
Greater Flameback.
फॅनटेलचा फोटो काढणे कर्मकठीण
फॅनटेलचा फोटो काढणे कर्मकठीण इतका चंचल असतो. तो एका प्रकरची शीळ इतकी मस्त घालतो की असं वाटतं की अख्खं एखादं वाक्य बोललाय.
दोन्ही सुतार मस्त. अजून हा
दोन्ही सुतार मस्त. अजून हा पक्षी बघण्याचा योग आलेला नाही माझा.
काल मला इथे (अमेरिका)
काल मला इथे (अमेरिका) सुप्रसिद्ध मोनार्क फुलपाखरांचे प्रथम दर्शन झाले. आधी मला स्ट्राइप्ड टायगर वाटले पण ते इथे आढळत नाही. शिवाय हे आकारानेही जास्त मोठे वाटले. खूप सुंदर अनुभव होता. आता ऑक्टोबरपासून ती मेक्सिकोकडे स्थलांतर करतात असं वाचलं.
आताच टिपलेली काही फुलपाखरं ..
आताच टिपलेली काही फुलपाखरं ...
इकडचा रॅट स्नेक म्हणजे
इकडचा रॅट स्नेक म्हणजे मराठीतील धामण
मनिम्याऊ आणि शालीदा ,
मनिम्याऊ आणि शालीदा , सुतारपक्षी भारीच आहेत.
वर्षाताई, खूप भाग्यवान आहेत तुम्ही.
आपल्या इथे देखील आता हिवाळ्यात स्ट्राइप्ड टायगर चे स्थलांतर चालू होते.
उनाडटप्पू , धामण आणि फुलपाखरे मस्तच.
आता फुलपाखरांचा हंगाम चालू झालाय.
Pages