राहुन गेले..

Submitted by मन्या ऽ on 29 July, 2019 - 13:54

राहुन गेले..

तुझ्यासवे अवखळ
बालपणीचे ते क्षण
पुन्हा एकदा
वेचायचे होते
ते क्षण वेचणे
राहुन गेले

तुझे जीवनगीत
ऐकत तुझ्या
कुशीत रातभर
जागायचे होते
ते जागणे आता
राहुन गेले

तु शिकवलेस
मज चालावयास
तुला आधारासाठी
हात देणे राहुन गेले

तुझ्याकडुन अजुन
जगरहाटीचे नियम
शिकायचे होते
पण ते नियम
शिकणे राहुन गेले

तुझ्यासोबत अजुन
थोडे जगायचे होते
मनसोक्त बोलायचे होते
चांदण्यात नहायचे होते
तुझ्या कुशीत
झोपायचे होते
तुझ्याकडे हट्ट
करायचे होते
तुझ्या कुशीत
एकदा रडायचे होते
पण पण
ते सारे काही
राहुन गेले
तुझ्या आठवणींत
आजी,मी आज
पुन्हा एकदा
हरवुन गेले

तु प्रेमाने मज
सारेकाही दिलेस
तु मात्र एक
संधीही न देता
निघुन गेलीस
तुझ्यासोबतचे ते
गोड क्षण जगायचेत
पुन्हा एकदा
पण तेही तुझ्यासारखेच
अनंतात विरुन गेले..

(Dipti Bhagat)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा आयडी गेल्यानंतरच्या नैराश्यातून बाहेर पडून नवीन कविता लिहीली याबद्दल अभिनंदन.
>> त्या आयडीची भयंकर धास्ती कुणी घेतली होती हे सूर्य प्रकाशाप्रमाणे स्पष्ट आहे. तो आयडी कुणाच्या नैराश्याचे कारण होता हेही सगळ्यांना माहीत आहे. मन्या माबोवरील सडक्या आयडींच्या कोल्हेकुईला फाट्यावर मारून छान छान कविता, लेख लिहा. शुभेच्छा!

Pages