सोलपूरची आंध्र (मिरची) भजी by Namrata's CookBook :७

Submitted by Namokar on 5 July, 2019 - 09:52
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मोठी मिरची
मिरचीसाठी मिश्रण :
धणे+जिरे पुड / जिरे पुड
शेंगदाण्याचे कूट
चिंचेचा कोळ
मीठ

भजीसाठी :
१ वाटी बेसन पीठ (५० ग्रॅ)
२ चमचे तांदळाचे पीठ (२५ग्रॅ)
१ छोटा चमचा हळद
१ छोटा चमचा ओवा
कोथिंबीर (optional)
चवीनुसार मीठ
१/४ चमचा सोडा
तेल
पाणी
चाट मसाला / काळे मीठ
बारीक चिरलेला कांदा

क्रमवार पाककृती: 

१. मिरची धुवून,पुसून घ्या
२. आता ही मिरची आर्धी कापून घ्या आणि त्यातल्या बिया कढून घ्या ,त्यामूळे मिरचीचा तिखटपणा थोडा कमी होईल

मिरचीसाठी मिश्रण :
३.एका वाटीमध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट ,चवीनुसार मीठ , धणे+जिरे पुड , लागेल तसे चिंचेचा कोळ घालून मिश्रण करावे (मिश्रण जास्त पातळ करु नये )
Screenshot_2019-07-05-18-49-48-132_com.google.android.youtube.jpg

४. आता हे मिश्रण मिरची मध्ये भरुन घ्या
Screenshot_2019-07-05-18-50-34-603_com.google.android.youtube.jpg

भजीसाठी :
५. एका भांड्यात बेसन पीठ ,तांदळाचे पीठ , ओवा , मीठ ,हळद एकत्र करुन घ्या .
६. आता थोडे थोडे पाणी घालत मिश्रण एकत्र करुन घ्या (खुप जास्त पातळ नको)
७. आता त्यामध्ये सोडा घाला आणि सोड्यावर १ चमचा मोहन (गरम तेल)घाला ,एकत्र करुन घ्या
८. तळण्यासाठी तेल कढाई मध्ये गरम करायला ठेवा
९ . एक एक मिरची मिश्रणात घालून तेलात सोडा आणि तळून घ्या
Screenshot_2019-07-05-19-52-48-534_com.google.android.youtube_1.pngScreenshot_2019-07-05-18-53-19-708_com.google.android.youtube.png
१०. मस्त आंध्र (मिरची)भजी तयार आहेत ,त्यावर चाट मसाला/काळे मीठ , बारीक चिरलेला कांदा , सॉस (optional) घालून सर्व्ह करा
मस्त गरम गरम संपवून टाका
image 2_1.jpg

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

* मोठ्या आणि जाड मिरच्या घ्या,मिश्रण छान भरता येईल
पुर्ण रेसिपीचा व्हिडिओ :
https://youtu.be/ux6KpOMObm4

-- सोलापूर मध्ये ही भजी आंध्र भजी या नावाने प्रसिध्द आहेत त्यामुळे हेच नाव रेसिपीला दिले आहे

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Use group defaults

In andhra they are called mirchi bajji. No sauce only chaat masala. Also you can cut them and serve as cut mirchi. Amazing with cups of tea and friends. Feeling homesick.

Chhan

वा मस्त!

राजस्थानात अश्या मिरच्या आत आलू भाजी सारण आणि बाहेरुन भज्या सारखे तळलेले असे देतात, मिरची वडा म्हणतात, यम्म लागतो तो पण.

मस्त.
ही भजी नुसती पाहूनच उचकी लागेल ..