मोठी मिरची
मिरचीसाठी मिश्रण :
धणे+जिरे पुड / जिरे पुड
शेंगदाण्याचे कूट
चिंचेचा कोळ
मीठ
भजीसाठी :
१ वाटी बेसन पीठ (५० ग्रॅ)
२ चमचे तांदळाचे पीठ (२५ग्रॅ)
१ छोटा चमचा हळद
१ छोटा चमचा ओवा
कोथिंबीर (optional)
चवीनुसार मीठ
१/४ चमचा सोडा
तेल
पाणी
चाट मसाला / काळे मीठ
बारीक चिरलेला कांदा
१. मिरची धुवून,पुसून घ्या
२. आता ही मिरची आर्धी कापून घ्या आणि त्यातल्या बिया कढून घ्या ,त्यामूळे मिरचीचा तिखटपणा थोडा कमी होईल
मिरचीसाठी मिश्रण :
३.एका वाटीमध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट ,चवीनुसार मीठ , धणे+जिरे पुड , लागेल तसे चिंचेचा कोळ घालून मिश्रण करावे (मिश्रण जास्त पातळ करु नये )
४. आता हे मिश्रण मिरची मध्ये भरुन घ्या
भजीसाठी :
५. एका भांड्यात बेसन पीठ ,तांदळाचे पीठ , ओवा , मीठ ,हळद एकत्र करुन घ्या .
६. आता थोडे थोडे पाणी घालत मिश्रण एकत्र करुन घ्या (खुप जास्त पातळ नको)
७. आता त्यामध्ये सोडा घाला आणि सोड्यावर १ चमचा मोहन (गरम तेल)घाला ,एकत्र करुन घ्या
८. तळण्यासाठी तेल कढाई मध्ये गरम करायला ठेवा
९ . एक एक मिरची मिश्रणात घालून तेलात सोडा आणि तळून घ्या
१०. मस्त आंध्र (मिरची)भजी तयार आहेत ,त्यावर चाट मसाला/काळे मीठ , बारीक चिरलेला कांदा , सॉस (optional) घालून सर्व्ह करा
मस्त गरम गरम संपवून टाका
* मोठ्या आणि जाड मिरच्या घ्या,मिश्रण छान भरता येईल
पुर्ण रेसिपीचा व्हिडिओ :
https://youtu.be/ux6KpOMObm4
-- सोलापूर मध्ये ही भजी आंध्र भजी या नावाने प्रसिध्द आहेत त्यामुळे हेच नाव रेसिपीला दिले आहे
मस्त!
मस्त!
व्वा
व्वा
In andhra they are called
In andhra they are called mirchi bajji. No sauce only chaat masala. Also you can cut them and serve as cut mirchi. Amazing with cups of tea and friends. Feeling homesick.
मिरची बोन्दा. हैदराबादची आठवण
मिरची बोन्दा. हैदराबादची आठवण आली
व्वा! चटपटीत दिसतीये.
व्वा! चटपटीत दिसतीये.
मस्तच! पावसाळी वातावरणात ही
मस्तच! पावसाळी वातावरणात ही आंध्र भजी असेल तर मित्रांची मैफिल जमून येईल.
धन्यवाद देवकी ,बेफ़िकीर ,
धन्यवाद देवकी ,बेफ़िकीर , अमा ,टवणे सर, मन्या ऽ , नरेश माने
मस्त !!
मस्त !!
Chhan
Chhan
माझ्या बाबांना आणि बहिणीला ही
माझ्या बाबांना आणि बहिणीला ही भजी खूप आवडतात पण मी एवढं तिखट खाण ह्या जन्मी तरी शक्य नाही. शेवटचा फोटो छान.
वा मस्त!
वा मस्त!
राजस्थानात अश्या मिरच्या आत आलू भाजी सारण आणि बाहेरुन भज्या सारखे तळलेले असे देतात, मिरची वडा म्हणतात, यम्म लागतो तो पण.
मस्त.
मस्त.
ही भजी नुसती पाहूनच उचकी लागेल ..
धन्यवाद Ajnabi ,BLACKCAT , me
धन्यवाद Ajnabi ,BLACKCAT , me_rucha ,aashu29, पशुपत
कट मिरची! यम्मी!
कट मिरची! यम्मी!