सर्पणाला एकदा पालवी फुटली

Submitted by सिद्धेश्वर विला... on 5 July, 2019 - 05:57

सर्पणाला एकदा पालवी फुटली

त्यालाही जगण्यात मजा वाटू लागली

सर्पणच ते चुलीत जळायचेच होते

इतरांसारखेच राख होऊन वर जायचे होते

प्रेतांच्या ढिगाऱ्यात असेच पडून होते

स्वगत सर्पणाचे ==

फुंकलास का जीव तू या शुष्क देहात ?

कधी राख होईन , हि भीती मनात

पुन्हा जन्म घेऊनि काय रे तो अर्थ

जगावे वाढावे ते कोणा प्रित्यर्थ ?

उभा जीव अमुचा तुझ्या लेकरांशी

ती खेळती नित्य आमुच्या जीवाशी

कुणी तोडे पान, कुणा आवडे फुल

कुणी घेई जीव ,पेटवण्यासाठी चूल

किती देऊ फळे , जरी आमुची बाळे

तरी नाही शमले त्यांचे नीच चाळे

आम्ही वाढतो देण्यासाठी ते श्वास

ते श्वास घेता घेता घेती आमचाच घास

गतजन्मी असणार नक्की जन्म मानवाचा

ते पाप फेडण्या पुनर्जन्म झाडाचा

{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

ही कविता अजूनही खूप उंचीवर गेली असती . सर्पणाचे स्वगत न होता कवीचे स्वगत झाले असते तर . सुंदर निरीक्षण व कविता

धन्यवाद डॉक्टर साहेब .. आपले बारीक निरीक्षण बरेच काही सांगून गेले .. धन्यवाद आपल्या मार्गदर्शनासाठी

==) ==)

होय ,, पण संपर्ण होऊन वरच जाणार होते ,,

इतर प्राणिमात्रांचे पण तेच असते

उभा जन्म जातो पोटासाठी

कधी आपल्या तर कधी इतरांच्या

धन्यवाद पद्म साहेब

खान साहेब चालतील असेही अभिप्राय पण देत राहा आणि वाचत राहा ..