Submitted by सिद्धेश्वर विला... on 5 July, 2019 - 05:57
सर्पणाला एकदा पालवी फुटली
त्यालाही जगण्यात मजा वाटू लागली
सर्पणच ते चुलीत जळायचेच होते
इतरांसारखेच राख होऊन वर जायचे होते
प्रेतांच्या ढिगाऱ्यात असेच पडून होते
स्वगत सर्पणाचे ==
फुंकलास का जीव तू या शुष्क देहात ?
कधी राख होईन , हि भीती मनात
पुन्हा जन्म घेऊनि काय रे तो अर्थ
जगावे वाढावे ते कोणा प्रित्यर्थ ?
उभा जीव अमुचा तुझ्या लेकरांशी
ती खेळती नित्य आमुच्या जीवाशी
कुणी तोडे पान, कुणा आवडे फुल
कुणी घेई जीव ,पेटवण्यासाठी चूल
किती देऊ फळे , जरी आमुची बाळे
तरी नाही शमले त्यांचे नीच चाळे
आम्ही वाढतो देण्यासाठी ते श्वास
ते श्वास घेता घेता घेती आमचाच घास
गतजन्मी असणार नक्की जन्म मानवाचा
ते पाप फेडण्या पुनर्जन्म झाडाचा
{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वाह ! मस्त !
वाह ! मस्त !
मस्त लिहिता आपण..!
मस्त लिहिता आपण..!
अप्रतिम भाऊ,खूप छान आणि मस्त
अप्रतिम भाऊ,खूप छान आणि मस्त शब्दरचना.
धन्यवाद धन्यवाद आपल्या
धन्यवाद धन्यवाद आपल्या प्रतिसादासाठी , त्रिवार धन्यवाद सर्वाना
ही कविता अजूनही खूप उंचीवर
ही कविता अजूनही खूप उंचीवर गेली असती . सर्पणाचे स्वगत न होता कवीचे स्वगत झाले असते तर . सुंदर निरीक्षण व कविता
धन्यवाद डॉक्टर साहेब .. आपले
धन्यवाद डॉक्टर साहेब .. आपले बारीक निरीक्षण बरेच काही सांगून गेले .. धन्यवाद आपल्या मार्गदर्शनासाठी
सर्पण सपर्ण झाले !
सर्पण सपर्ण झाले !
==) ==)
==) ==)
होय ,, पण संपर्ण होऊन वरच जाणार होते ,,
इतर प्राणिमात्रांचे पण तेच असते
उभा जन्म जातो पोटासाठी
कधी आपल्या तर कधी इतरांच्या
सर्पण सपर्ण झाले ! >>>> वाह
सर्पण सपर्ण झाले ! >>>> वाह क्या बात !
अतिसुंदर !!हि तुमची शैली
अतिसुंदर !!हि तुमची शैली आवडली
धन्यवाद आपल्या प्रतिसादासाठी
धन्यवाद आपल्या प्रतिसादासाठी
सरपणाबरोबर अशा कवितांची कागदं
सरपणाबरोबर अशा कवितांची कागदं चुलीत घातली तर चूल ढणढणा पेटेल.
छान कविता...
छान कविता...
धन्यवाद पद्म साहेब
धन्यवाद पद्म साहेब
खान साहेब चालतील असेही अभिप्राय पण देत राहा आणि वाचत राहा ..
चंद्रशेखर गोखल्यांचा
चंद्रशेखर गोखल्यांचा ऋणनिर्देश करायला हवा होता.
आजवर तुम्हाला ईग्नोरच केलय
.