बाळाचं नाव सुचवा : ध्येयवादी - संस्कृत मध्ये सुचवलं तर अधिक उत्तम

Submitted by cvijayn on 1 July, 2019 - 19:51

आम्हाला बाळ होणार आहे, एकाच नाव असा सुचवा कि मुलगा किंवा मुलगी ला बोलता येईल असं २ किंवा ३ अक्षरी नाव सुचवा किंवा छानस बाळाचं टोपण नाव सुचवा, नाव संस्कृत मध्ये सुचवलं तर अधिक उत्तम, हि विनंती

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Unique नाव ठेवायचं म्हणून क्रियापदे ,विशेषणे सुद्धा वापरली जातात हल्ली>>>>> उदाहरणार्थ ???

सस्मित, आठवली की सांगते , आता क्लिक होत नाहीये, पण आमच्या ओळखीत एकाकडे बारसं झाल्यावर मी हा शेरा मारला होता (अर्थात, खाजगीत, घरी आल्यावर, नवऱ्याला बोलले होते)

अभिनेते आणि आमचे मित्र ओम शिंदे ... त्या दोघा भावन्डाची नावे ओमप्रकाश आणि ब्रह्मानंद अशी आहेत. वडील कीर्तनकार असल्याने त्यांनी असली भन्नाट नावे शोधून काढली. आम्ही पोरं मात्र एवढे जड नाव झेपत नसल्याने कायम ओम आणि ब्रह्माच म्हणतो.

आजकाल आणखी एक ट्रेंड आहे, couple pet name वरून मुलांची नावं ठेवणे.. रविना टंडन चं असंच आहे ना, रवी आणि वीणा आईवडिलांची नावं
उदा:
प्रल्हाद आणि निशा ह्यांची मुलगी प्रिशा

सुंदर नाव जुन्या काळात असायचं. आईच्या मावशीचं नाव होतं आणि आईच्या एका लांबच्या आजोबांचं पण नाव होतं.
किरण, सुहास, स्नेहल सारखं मुलाचं आणि मुलीच पण नाव असु शकतं सुंदर.

आजकाल आणखी एक ट्रेंड आहे, couple pet name वरून मुलांची नावं ठेवणे >>
मीरा - शाहिद (कपूर) - मीशा
आशा- अमित (पटेल) - आमिशा , अश्मित

>> मागे आमची एक नातलग म्हणाली की तात्या हे शंकराचे नाव आहे म्हणे(तिचा गुगलशोध).मी गुगलून पाहिले तर तसं काही दिसलं नाही.
>> Submitted by देवकी on 7 July, 2019 - 18:32

तात्या हे नाव सत्य तथ्य यावरूनच पुढे निर्माण झाले आहे अशी माहिती काही वेबसाईट्सवर आढळते. शंकराचे नाव, कारण "सत्य ही शिव है" Happy
https://www.myupchar.com/baby-names/meaning-of-tathya

मनिम्याऊ+१

सुमित- धनश्री=सुधांश(मुलाच नाव) माझ्या कझन सिस्टरनी ठेवलेलं नाव.

मीशा? कायतरी वाटतं नाव. Lol

मिशा हे रशियन नाव आहे. एशियाड्चे बोधचिन्ह ही होते.
शाहिद कपूरला मुलगा झाला तेव्हा आता 'दाढी' नाव ठेवतो का काय ह्या काळजीने मी धास्तावले होते...

Unique नाव ठेवायचं म्हणून क्रियापदे ,विशेषणे सुद्धा वापरली जातात हल्ली
नवीन Submitted by किल्ली on 8 July, 2019 - 16:24
<<
हो नं. हल्ली काय किल्ली बिल्ली पण ठेवतात Proud

दिवे घ्या!

तात्या हे नाव सत्य तथ्य यावरूनच पुढे निर्माण झाले आहे अशी माहिती काही वेबसाईट्सवर आढळते. >>>>>>> अच्छा,तथ्य-> तथ्या (रामा,योगाप्रमाणे)-> तात्या झाले असावे कदाचित.

झोटिंग हे नाव आहे (होतं). झोटिंगबाबा या नावावरून चौक किंवा काहीतरी आहे.
वेताळबाबा फारच कॉमन त्या मानाने.

ही असली नावं का ठेवली असतील ? वेताळाला तरी काही लोक मानतात हे ऐकून आहे.

सायकली, जपान अशी नावं पाहिली होती. वाघजई हे नाव पहिल्यांदा ऐकलं तेव्हां हसलो होतो. नंतर ते ब-याच जणींचं आढळलं.
खेडेगावात अशी नावं खूप आढळतात.

पण अगदी जडबंबाळ संस्कृत नावेच हवीत कशाला? मोठेपणी असल्या नावांमुळे मुलं ट्रोल होण्याची जास्त शक्यता वाढते, आई बाबाची हौस होते, पोराचा जीव जातो वेगळा.
लहानपणी माझ्या वर्गात एक याज्ञवल्ली नावाची मुलगी होती, तिच्या नावामुळेच मुली तिच्याशी मैत्री करायला कचरत असत. पुढे नुसती वल्ली असं नामकरण झालं. माझंही नाव महाश्वेताच श्वेता झालं, पण काही एवढं बिघडलं नाही.

तात, तात अशी परत परत हाक मारून शंकराने ओ दिली नाही म्हणून गणपतीबाप्पा ने रागाने ए तात्या अशी हाक मारली की काय?? >> Lol Lol Lol Lol

मुलासाठी - ईंद्रवदन, रोसेश, साहिल, अर्णब, दुष्यंत
आणि
मुलीसाठी - मोनिशा, सोन्या, जस्मिन, सुनेहरी

सुंदर नाव जुन्या काळात असायचं. > सुंदर पिचाई आहे ना आजच्या काळातलं.

आमच्या एका मराठी फॅमिली फ्रेंड ने मुलाचं नाव ईथन (Ethan) आणि मुलीचं नेओमी (Naomi) ठेवलं आहे. दोन्ही संस्कृत शब्द आहेत असं ते ठामपणे सांगतात.
त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ईथन म्हणजे बळवंत (Strong) आणि नेओमी म्हणजे आनंदी (Pleasantness)... थोडक्यात बळवंत आणि आनंदी अशी मुलांची पेशवेकालीन नावे आहेत असे त्यांचे म्हणणे आहे.

नाहीतरी धागा एवीतेवी घसरला आहे, म्हणून माझी पण थोडीशी भर. Light 1

देशपांडेच्या घरी चव्हाण साहेब आले..
देशपांडे आपल्या कुटुंबातील लोकांची ओळख करुन देतात..

ही माझी मोठी मुलगी राणी..
लग्ना अगोदर आम्ही मुंबईला "राणीच्या बागेत" फिरायला जायचो.. त्याचीच आठवण म्हणून हिचे नाव राणी ठेवले..

चव्हाण साहेब :
अरे वा, गोड नाव आहे..

देशपांडे :
हा माझा दुसरा मुलगा ताज..
लग्नाच्या पाच वर्षानंतर आम्ही दुसऱ्या हनीमूनला आग्रा इथे गेलो होतो.. त्याचीच आठवण म्हणून..

चव्हाण साहेब : मस्त..
खूप विचार करून नाव ठेवलं आहे..

देशपांडे : हा माझा तिसरा मुलगा कोहिनूर..

चव्हाण साहेब : क्या बात है.. म्हणजे तुम्ही लंडनमध्ये जाऊन कोहिनूर हिरासुद्धा पाहुन आलात..

देशपांडे :
नाही हो.. कोहिनूरचा काँडम घेतलेला..तो मध्येच फाटला आणि हा झाला..
त्याचीच आठवण म्हणून..

माझ्या गुजराती शेजाऱ्यांनी त्यांच्या मुलीचं नाव पहर ठेवलं आहे . मी अर्थ विचारला तर वेळ असा अर्थ सांगितला . म्हणजे प्रहर असा

तात हे संस्कृतमध्ये मोठ्या वडिलधाऱ्या माणसांसाठीचे आदरार्थी संबोधन आहे. आपल्याकडेही काही ठिकाणी मोठ्या माणसांना तात किंवा ताता म्हणतात. सुप्रसिद्ध टाटा घराण्याचे नाव आताआतापर्यंत गुजरातीत ताता असेच लिहिले जात असे.
तसेही रशियन मध्ये तात्याना तातियाना वगैरे नावे असतातच. आणि सध्या आपल्याइथे रशियन नावे ठेवण्याची टूमही आहे.

माझ्या ओळखीतली काही नावं ---
रिदम , फोरम ,विस्मय , चतुर्थी , पावणी (पावनी नाही , हिच्या आईच ठाम मत) , आगम , झुमूर (बंगालीत चांदणं , असं तिने सांगितले )

शाहिद कपूरला मुलगा झाला तेव्हा आता 'दाढी' नाव ठेवतो का काय ह्या काळजीने मी धास्तावले होते...>>> Lol

पुण्यात एका ब्युटीपार्लरचं आणि त्या पार्लरच्या मालकिणीचं नाव 'तुहिना' होतं. मला नेहमी तू हि रे..तू हि रे हे गाणं आठवायचं ते नाव वाचून. पण तुहिना म्हणजे संस्कृतात 'धुकं' म्हणे.

अंबुज - अंबुजा
विदुर - वैदेही
पंकज - पंकजा
सनव - सान्वी
रुचित,रचित - रुचिता,रचिता
मल्हार - मेघमाला
रंगनाथ - रांगोळी ,रंगोली
भुजन्ग - सर्पलता
मोती - मनी
परिचित - परिचिता (बंगाली मैत्रीण)
मेखला एक वेगळा नाव आहे
अम्बर हे नाव आपल्याकडे मुलासाठी आणि परदेशात मुलींसाठी
हे धागे बुद्धीला चान्गले चालना देतात आणि करमणूक बी करतात त्यामुळे मी आवर्जून प्रतिसाद देतो . मायबोलीकर आपल्या ओळखीत कोणी गरोदर/नवप्रसवा/प्रसुता असतील तर त्यांना आवर्जून इथे खास फर्माईश करायला सांगा Biggrin

अम्बर हे नाव आपल्याकडे मुलासाठी आणि परदेशात मुलींसाठी >>> माझ्या मुसलमान कलिग च्या बायकोचे नाव आहे

तात हे संस्कृतमध्ये मोठ्या वडिलधाऱ्या माणसांसाठीचे आदरार्थी संबोधन आहे. आपल्याकडेही काही ठिकाणी मोठ्या माणसांना तात किंवा ताता म्हणतात.>> हो, तमिळमध्ये आजोबांना ताता म्हणतात बहुतेक. म्हणजे खरंच तातवरून तात्या आलंय की काय? Lol
मनीम्याऊ, हिम असेल तुहिनाचा अर्थ. मला लक्षात नाही. पण ही बाई होती मराठीच.

माझ्या ऑफिस कलिगच्या मुलाचं नाव ठेवलयं 'स्पर्श'.

आता त्याला तुमचं बाळं कसं आहे येवढच विचारतो आम्ही... कारण 'तुमचा स्पर्श कसा आहे?' असं कसं विचारणार ना? ते पण मेल कलिगला..... Biggrin Biggrin Biggrin Biggrin

तात, तात अशी परत परत हाक मारून शंकराने ओ दिली नाही म्हणून गणपतीबाप्पा ने रागाने ए तात्या अशी हाक मारली की काय?? Wink>>>>>
हसून हसून वारले मी..
Lol Lol

तात, तात अशी परत परत हाक मारून शंकराने ओ दिली नाही म्हणून गणपतीबाप्पा ने रागाने ए तात्या अशी हाक मारली की काय?? Rofl Rofl

>> तुमचा स्पर्श कसा आहे?
Biggrin

हिंदी चित्रपटांत अमिताभ पर्व सुरु होते त्या काळात एका कुटुंबाने आपल्या मुलाचे नाव "बच्चन" ठेवले होते

तात, तात अशी परत परत हाक मारून शंकराने ओ दिली नाही म्हणून गणपतीबाप्पा ने रागाने ए तात्या अशी हाक मारली की काय? >> Lol Lol

एक प्रश्न, मा. पतंगराव कदमांचे तात मुलाची ओळख कशी करून देत असतील?

Pages