बाळाचं नाव सुचवा : ध्येयवादी - संस्कृत मध्ये सुचवलं तर अधिक उत्तम

Submitted by cvijayn on 1 July, 2019 - 19:51

आम्हाला बाळ होणार आहे, एकाच नाव असा सुचवा कि मुलगा किंवा मुलगी ला बोलता येईल असं २ किंवा ३ अक्षरी नाव सुचवा किंवा छानस बाळाचं टोपण नाव सुचवा, नाव संस्कृत मध्ये सुचवलं तर अधिक उत्तम, हि विनंती

Group content visibility: 
Public - accessible to all site users

।आणखी काही --
ह्रिदय , मुद्रा , तीर्थ , तीर्था ,वृष्टी .

मिहिका ऐकले होते. >>> मिहिकाचा अर्थ दवबिंदू असं मला कोणीतरी सांगितलं होतं. नाव छान आहे मात्र, आवडतं मला.

आमच्या ऑफिसमध्ये एक टेम्पोवाला सही करताना कंपूटर अशी सही करायचा, तो त्याचे नाव तेच आहे असे सांगायचा

>> ध्येयवादी - संस्कृत मध्ये सुचवलं तर अधिक उत्तम

लक्ष्य... हे नाव यादृष्टीने योग्य वाटते. धाग्यात आधी कुणी सुचवले असेल तर माहित नाही.

लक्ष्य....हे बऱ्याच पूर्वी ऐकले आहे.पण बोजड वाटते.हल्ली शौर्य नावाची चलती आहे.मागे यश बरेच ऐकले होते तसे.

माझ्या ऑफिस कलिगच्या मुलाचं नाव ठेवलयं 'स्पर्श'.>>>
एकता कपूर छाप हिंदी सिरिअल्समधून आलेलं फॅड आहे हे...
स्पर्श, वंश, अंश, नक्ष, अक्ष..
' स्पर्श्' असं म्हणायचं असतंय ते..

हे वाचून किमान कोणती नावे ठेवू नयेत इतके जरी धागाकर्त्याना समजले, तरी भरपूर झाले असे म्हणतो.

रच्याकने. अजून एक न ठेवण्याचे नांव :

परिणिता.

अक्ष, कक्ष, खक्ष, गक्ष, घक्ष.
चक्ष, छक्ष, जक्ष, झक्ष,
टक्ष, ठक्ष, डक्ष, ढक्ष.
तक्ष, थक्ष, दक्ष, धक्ष, नक्ष.
पक्ष, फक्ष, बक्ष, भक्ष, मक्ष.
यक्ष, रक्ष, लक्ष, वक्ष, शक्ष.
षक्ष, सक्ष, हक्ष, ळक्ष, ज्ञक्ष.
याप्रमाणे काहीही.
याशिवाय क का कि की ख खा खि खी + क्ष अश्या बाराखड्यासुद्धा शोधता येतील. काहीतरी मिळेलच.

Submitted by हीरा on 9 July, 2019 - 22:23
<<
अ ची बाराखडी राहिली. अन मुख्य म्हणजे, ते ञ, ङ आणि ण राहिलेत की.
ङक्ष ञक्ष आणि ण्क्ष.

अन हो, हे महत्वाचे:
ऋ ऽ क्ष!!

बापरे, हा धागा ऑफिस मधे उघडायलाच नको. तुफान विनोदी , हसणं थांबवताच येत नाहिये. Rofl
काय एकेक नावं आणि काय एकेक प्रतिसाद. मला माबो ह्या साठीच खुप आवडते. खुसखुशीत उत्तरं Happy

D Lol

आज एक गाडीवर नाव वाचले

"अवषेश"

डोके फोडणारी बाहुली वाचा इथे>>>>ते गाडीचे नाव असेल. वेगवेगळ्या गाडयांचे पार्ट जोडून बनवली असेल ती गाडी.

Pages