Good bye from मीना उत्तरा

Submitted by मीना उत्तरा on 27 June, 2019 - 08:05

नमस्कार मंडळी,
मी मायबोली या संकेतस्थळाला रामराम म्हणण्यापूर्वी, सहज म्हणून प्रतिसाद बघत होते आणी काहिशी स्तब्ध झाले 40 जणांनी माझं लेखन डोळ्याखालून घातलं...आपुलकीने सुचना व प्रोत्साहन दिले खूप छान वाटलं...त्याच जोडीला ट्रोल करणे म्हणजे काय ? रॅगिंग नेमके काय असते ? याचा जवळून अर्थ कळला. JayantiP यांचे विशेष करून आभार कारण त्यांच्याशिवाय हे कळले नसते, या अनुभवामुळे माझे काऊंसेलर म्हणून असलेले काम अजून संवेदनशीलपणे मला करता येईल. आपल्या सगळ्यांशी अजून संवाद साधायला आवडला असता पण हे व्यासपीठ माझ्या साठी नाही. त्यामुळे लोभ असावा.
मीना उत्तरा

Group content visibility: 
Use group defaults

इकडे प्रत्येक समुहावर मॉडरेटर नेमावेत.जे जूनी लोकं असतील. त्यांनी प्रतिसाद,धागा अलाव करायचा की नाही हे ठरवावे. प्रशासक सगळीकडे लक्ष ठेऊ शकत नाहीत.

च्रप्स
मायबोली वर घरगुती वातावरण होते पूर्वी. ज्यांना फेसबुक हवे ते तिकडे जातीलच. पण अशा साईट्सवर वाईट पद्धतीचे ट्रोलिंग होऊ नये ही अपेक्षा असते लोकांची. फेसबुक इतका अफाट पसारा तर नक्कीच नाही इथे. त्यामुळे आधार कार्ड नंबर असेच नाही, ड्रायव्हिंग लायसेन्स जरी दिले तरी चालेल. इथले प्रशासक कुणालाही खरी ओळख सांगणार नाहीत हा विश्वास ज्यांना आहे तेच थांबतील. ही फक्त सूचना आहे हो.

फेसबुक वर सुद्धा आता ड्युआयडी बनवणे अवघड झालेले आहे हे पाहिले असेल. तसेच फेक आयडी म्हणून रिपोर्ट केले की त्याला ओळख पटवायला सांगतात. ड्युआयड्यांनी उपद्रव होतो हे फेसबुकने पण मान्य केलेले आहे. त्यांनी मान्य केलं ना केलं तरी भरमसाट संख्येने केवळ ट्रोलिंगसाठी बनवलेले ड्युआयडी येणे बंद झाले तर फरक पडेल की. इथे ब्लॉक ची सुविधा नसल्याने ट्रोलिंगमुळे मनःस्ताप होतो. प्रत्येकाला इग्नोर करणे जमतेच असेही नाही. नाहीतर प्रशासकांची विपू वाचनीय बनली नसती.

IMO याला दोन उपाय -
1. धाग्यावर येणारा प्रतिसाद आधी धागलेखकाला दिसावा, त्याने approve केले की मगच जनतेला दिसावा.
2. धागालेखकाला त्याच्या धाग्यातील नको ते प्रतिसाद डिलीट करण्याचा अधिकार असावा( youtube pattern)

जर लोकांना काही आयडी त्रास देत असतील.तर मॉडरेटर कडे तक्रार करावी. त्यांनी समज द्यावी. पुढे काही दिवस आयडी बंद करावा. तरीही फरक पडत नसेल तर आयडी उडवावा. मुख्य म्हणजे काही तरी ओळखीचा पुरावा असेल तरच प्रवेश दिला जावा.

मायबोली हा एक मोठा मोकळा हॉल आहे जिथे आपापले वेगवेगळे गट (धागे) करून सर्वजण गप्पा मारत आहेत. मग काय होणार अजून.

पार्टीशन/कुलुपे (म्हणजे धागे तसेच आयडी ब्लॉक करण्याची सोय) मिळत नाही तोवर हे चालूच राहील.

अतुलजी+१११११,कुलुपांची सोय झाली तर बरेच होईल.
तसेच इथे येणार्या प्रत्येकाला फक्त मेल आयडी ऐवजी ओळख पटवण्यासाठी फोन नंबर देणे बंधनकारक असेल तर फार बरे होईल.
अशाप्रकारच्या सुधारणा लवकरात लवकर झाल्या तर बरे होईल असे वाटते.

इथेही ड्युआयड्यांनी पायधूळ झाडून झाली आहे तर...
प्रशासनाने ड्युआयडी साफसफाई अभियान हाती घ्यावं. तोपर्यंत काही दिवस सुट्टी घ्यावी असं वाटतंय.

ट्रोलिंग रोखणे फार गरजेचे आहे, मागे एका लेखावर अज्ञात आणि त्यांच्या फॅन आयडी नी वादा वादी करून धाग्याची पार वाट लावली होती।
तेंव्हा मला वाटत होते धाग्याला कुलूप लावावे।
नंतर माझा एक धागा हायजॅक देखील केला गेला तेंव्हाही कुलूप लावावे वाटत होते।

>>माझं मत कुणी विचारात घेतले का? मॉडरेटर विषयी.<<
हा प्रकार करुन झालेला आहे पुर्वि. ऑब्वियस्ली इट डझंट वर्क...

ट्रोलिंग इज ए स्टेट ऑफ माइंड. आज सेंसिबल लिहिणारा, उद्या एखाद्या विषयावर/धाग्यावर ट्रोल ठरु/करु शकतो. यावर उपाय एकच - डु नॉट फिड दि ट्रोल. पिरियड...

निव्वळ ट्रोलच्या त्रासामुळे लेखिकेने घेतलेला हा निर्णय पटला नाहि. एस्पेशियली त्यांची कौंसलिंगची बॅग्राउंड असल्यामुळे त्यांचा हा निर्णय बुचकळ्यात पाडणारा आहे. कौंसलर्स डोंट रन अवे फ्रॉम दि केऑस, दे टर्न निगेटव आस्पेक्टस इंटु पॉझिटिव रिझल्ट्स, असा माझा समज आहे. तर ते असो.

माबो सारख्या सोशल मिडियावर लिहिणार्‍यांनी केवळ स्वतःच्या समाधानाकरता लिहितं व्हावं. लेखनावर आलेले पॉझिटिव्/निगेटिव कामेंटस हा एक धुरळा मानुन आपली वाटचाल पुढे चालु ठेवण्यातंच शहाणपणा आहे; हा माझा न मागता दिलेला सल्ला. बाकि सुज्ञास सांगणे न लगे... Happy

हर्पेन, तुम्ही खूपच क्यूट आहात.
Submitted by भरत. on 29 June, 2019 - 13:01
<< Rofl

***

राज हा आयडी हॅक झाला असावा असा संशय येतो आहे.

एचटिटिपिएस साईट्सनांही मर्यादा आहेत? हॅकींग होऊ शकते? का हा एक धुरळाच आहे?
इतर बऱ्याच सभासदांनी समजावल्यावरही ट्रोल आईडी गप्प बसतच नव्हते.
मायबोलीच्या धोरणानुसार कोणतीही शिवीगाळ , वैयक्तिक शेरेबाजी न करताही ट्रोलिंग करता येतं याचा नमुना आहे.
बाहेरच्या कोणत्या साईटवर ( फेसबुक/वाटसप/किंवा इतर ) काही हेवेदावे असण्याचा प्रस्तुत लेखनात काय संबंध? आणि तो किती ताणायचा? क्रेडिट दिल्यावरही आणखी काय आख्खी बोट उचलून द्यावी अशी अपेक्षा आहे का? क्याप्टनना लिहायला वेळ होत नाही सलग म्हणून लेखिकेचा उपाय.
लेखनाच्या प्रयत्नांतून बोटीवरच्या आयुष्याची थोडीफार कल्पना येऊन वाचक वाढले असते. मुळात साहसीपणाचा तुलनात्मक अभाव असणाऱ्या या देशात कुणी काही सांगत असल्यास त्यावर पाणी टाकून नामोहरम करण्याचा परिणाम आपण भोगतो आहोतच. आणखी काय सांगणार?
इतर आईडींनी मांडलेली मतेही विचार करण्यासारखी आहेत.
मायबोली यातुनही तरते या विश्वासामुळेच दूर गेलेले परत येतात.

यातील फोन नंबर व ओटिपी च्या माध्यमातून आयडीची ओळख पटवणे या प्रकाराला माझे अनुमोदन.

ज्यांना स्वतःचे आयपी लपवायचे असतात ते लोक व्हीपीएन सॉफ्टवेअर वापरतात, किंवा ग्लोबल प्रॉक्सी लिस्ट मधून एखादा प्रॉक्सी अड्रेस उचलून तो वापरतात. आयपी ब्लॉक करून एका व्यक्तीला कधीच रोखता येत नाही.

फोन नंबर व ओटीपी च्या माध्यमातून ड्यु आयडींवर आळा नक्कीच घालता येऊ शकतो.

आता एव्हढं लिहिल्यावर मला ट्रोल करण्याचा प्रयत्न होईल, तर अशा ट्रोलर्सच्या माहितीसाठी सांगतो की आयटी सेक्युरिटी आर्किटेक्चर व इन्वेस्टीगेशन हा माझ्या दैनंदिन कामाचा भाग आहे, त्यामुळे वरील गोष्टी मी लिहिल्या.

बहुतेक मोबाईल ऑपरेटर्स ठरावीक क्षेत्रात मोबाईल फोन्सना NAT मधून प्रायव्हेट आयपी ऍड्रेस देऊन, एकाच पब्लिक आयपीवर ठेवतात. (तुमच्याच घरात, तुमचा आणि इतरांचा सर्व्हिस प्रोव्हायडर एकच असेल तर तुमचा आणि इतरांचा पब्लिक आयपी ऍड्रेस तपासून बघा.)
कंपनीत एकाच पब्लिक आयपी मागे सगळे लोक असतात.
या कारणामुळे आयपी ऍड्रेसनुसार ब्लॉक करणे शक्य नाही.
मोबाईल ओटीपी व्हेरिफिकेशन जरी ठेवले, तरी घरातील / मित्रपरिवारापैकी जे मायबोली वापरत नाहीत त्यांचे नंबर देऊन आठ दहा ड्यु आयडी काढणे कठीण नसावे.

तेव्हा ट्रोल्सना फीड न करणे हा उपाय अंमलात आणणे या च्रप्स आणि राज यांच्या मताशी सहमत.

कोणी आयडी मुद्दाम त्रास देतोय हे धागालेखकाला व इतरांनाही कळतंच (उदा. जयंतीपी या आयडीने जे केले) त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणे याला अनुमोदन.
आणि दुसरा मॉडरेटरचा उपाय पण चांगला आहे. अ‍ॅड्मिननी ४-५ जणांची खातरजमा करुन एक टीम करावी व त्यांना एक गुप्त धागा चालु करुन द्यावा व टीमला त्या गुप्त धाग्यावर चर्चा करुन तो आयडी काढुन टाकायचे अधिकार द्यावेत. असेही होऊ शकते की टीमला सगळीकडे लक्ष ठेवायला जमेलच असे नाही. त्यामुळे इतर वाचकांना असेह आयडी दिसले तर गुपचुप त्या टीमला कळवावे व टीम त्याची दखल घेईल. हवी तर ८-९ जणांची टीम बनवा व बदलत रहा म्हणजे सगळ्यांवर ओझं येणार नाही. अ‍ॅड्मिन किती लक्ष ठेवणार? त्यांनी मायबोली फुकट उपलब्ध केलीये हेच खुप मोठे आहे. कोणाच्या घरी पाहुणे म्हणुन गेलो तर यजमानांनीच सगळे करु दे मी नाही मदत करणार असे म्हणतो का? नाही. तसेच मायबोलीच्या घराला समजा.
अर्थात अ‍ॅड्मिननी विचार केला असेलच व त्यांचे काही नियम असतीलच पण या आयडींनी ऊत आणला आहे खरं.

आणि हो, तरीही असे आयडी येतच राहिले तर दुर्दैव आपले व मायबोलीचे.

बरोबर सुनिधी. मला हेच सांगायचे होते. कारण फेसबुक वर ग्रुप बनवताना ग्रुप adminप्रवेश देतात व पोस्ट अप्रुव्ह करतात. सदस्यांनी तक्रार केली तर action ही घेतात. अजून काही मॉडरेटर असतात पोस्ट अप्रुव्ह करायला.

इथे प्रतिसाद अप्रूव करायचे काम जरा अवघड पडेल कारण रोज हजारो प्रतिसाद येतात. पण वेडा आयडी दिसला की काढुन टाकता यायला हवा.

मी मराठी साईट्स वर 2004 पासून आहे.पोस्ट मॉडरेशन ठीक आहे, पण कमेंट मॉडरेशन ने संकेतस्थळ लोकप्रियता बरीच कमी होते.शिवाय काही ठिकाणी ज्या चालू घडामोडी बद्दल लिहिले असेल त्या परिस्थितीतच कमेंट अप्रुव्ह होईपर्यंत बदल होऊ शकतो.एकंदर वाचन केले असता इथले गाव, देश गप्पा वाले बीबी दर अर्ध्या मिनिटाला आधीच्या कमेंट ला अनुसरून काहीतरी लिहीत असतात.प्रत्येक कमेंट अप्रुव्ह मग पब्लिश केली तर ही उस्फुर्तता राहील का?
कमेंट ला 1 किंवा जास्त फ्लॅग आल्यास बघून काढण्यायोग्य वाटल्यास काढणे/ऑब्जेक्षन वाले फ्लॅग वाढल्यास मिटून ठेवणे(उघडण्यास कष्ट होतील असे करणे)हा बरा उपाय वाटतो.

फेसबुक धर्तीवर माबो जाहिराती ंं सह बनवली व सदस्य होण्यासाठी नाममात्र पाचशे रुपये वार्षिक शुल्क आकारले तर बरेच प्रश्न सुटतील आणि सदस्यत्व ओळखीच्या पुराव्यावर आधारित असेल. ज्यांना सभासद नाही व्हायचं ते फक्त वाचू शकतील असे काही तरी असावे.

Pages