Good bye from मीना उत्तरा

Submitted by मीना उत्तरा on 27 June, 2019 - 08:05

नमस्कार मंडळी,
मी मायबोली या संकेतस्थळाला रामराम म्हणण्यापूर्वी, सहज म्हणून प्रतिसाद बघत होते आणी काहिशी स्तब्ध झाले 40 जणांनी माझं लेखन डोळ्याखालून घातलं...आपुलकीने सुचना व प्रोत्साहन दिले खूप छान वाटलं...त्याच जोडीला ट्रोल करणे म्हणजे काय ? रॅगिंग नेमके काय असते ? याचा जवळून अर्थ कळला. JayantiP यांचे विशेष करून आभार कारण त्यांच्याशिवाय हे कळले नसते, या अनुभवामुळे माझे काऊंसेलर म्हणून असलेले काम अजून संवेदनशीलपणे मला करता येईल. आपल्या सगळ्यांशी अजून संवाद साधायला आवडला असता पण हे व्यासपीठ माझ्या साठी नाही. त्यामुळे लोभ असावा.
मीना उत्तरा

Group content visibility: 
Use group defaults

साधना अगदी बरोबर

इकडे स्वतः बोलवून

मला अगोदर माहिती होते माबोवर कुणाला असलं विस्कळित आवडणार नाही. हरभऱ्याच्या झाडावर चढवण्याचं काम मला आवडतं. शार्यचीन पाठीराखा घेऊन अवतरल्या आहेत लेखिका.

तिकडे हार्डली दोन तीन लाइक नि एखादी कमेंट मिळायची.

असेही प्रतिसाद दिलेत जयंती/ शशिराम यांनी.

यांची काय मजबूरी असावी तर्कही करता येत नाही.

ड्यु आयडी आणि ट्रोल म्हटल्यावर नेहेमी राजकीय धाग्यांचे नाव निघते आणि मग राजकीय धाग्यावर असणारे आमचंच नाव का घेता म्हणून आक्षेप घेतात, तर त्याचं कारण हेच आहे की म्हातारी तिकडेच परत परत जन्म घेते आणि काळही तिकडेच सोकावलाय.

सध्या हा जो ड्युआयड्यांचा सुळसुळाट झालेला आहे यावर उपाय काय ? प्रशासन तर हाताची घडी तोंडावर बोट ठेवून आहे.
राजकीय धाग्यावर भांडणारे दोन ग्रुप्स माहीत आहेत. त्यामुळे तिथले ड्युआयडी ओळखणे सोपे आहे.
पण अंबज्ञ उर्फ योगेश जोशी कि कोण आणि कल्पेशकुमार की कोण यांच्या युद्धात जे प्रजनन चालू आहे त्याचा अंदाज येत नाही. हे आयडी शिवीगाळ सुद्धा करतात. आताचे राजकीय धागे सोडून इतरत्र प्रत्येकाला त्रास देणारे आयडी बहुधा याच कारखान्यातले आहेत.

प्रशासन तर हाताची घडी तोंडावर बोट ठेवून आहे.>> प्रशासन तरी काय करणार? आज जर एक ड्यु आयडी मेला तरी दोन दिवसांनी त्याचा पुन्हा जन्म दिसुन येतो.. अन हा एकच आयडी... अगोदर शालींना त्याने ट्रोल केलं.. आता या मीना याना.. अनेक जन्म होताहेत या आयडीचे..
काहितरी ठोस पावलं उचलायला हवीतच अश्यांना..
मीना यांनी असा पळ काढण्यापेक्षा इग्नोरास्र वापरुन आपलं लिहिण्याचं काम चालु ठेवायचं.. का म्हणुन आपण विक्टिम व्हायचं कुणाचं?

ड्यु आयडी कंट्रोल करता येत नाहीत.कसे करणार?लोक नवे मेल आयडी उघडतील.मशीन बदलून किंवा काही सॉफ्टवेअर वापरून वेगळ्या आयपी ने लिहितील.
त्यांना प्रतिसाद देऊन खाद्य दिले नाही तर बहुधा पुढे त्रास वाढवू शकणार नाहीत.
आयुष्यात सगळ्या भांडणाना आपली बाजू बरोबर आहे म्हणून अनेक त्रास घेऊन चोख उत्तर देऊनच क्लोजर झाले पाहिजे असे नाहीय.भांडणं तितक्या लायकीची नाहीत.

किरणउद्दीन, तुम्ही जे लिहिले ते योग्यच पण त्याचा नेमका संदर्भ मला कळला नाही.

मीना उत्तरा यांनी सुरवातीलाच स्पष्ट केले की त्यांची फेसबुकवर लिहिली गेलेली एक लेखमाला खूप जणांना आवडली, काही जण म्हणाले मायबोलिवर लिहा, त्यांचे दिरही मायबोलीवर आहेत, त्यांच्या मदतीने त्या इथे आल्या व त्यांनी काहीतरी लिहायला सुरुवात केली. आता त्यांचे लिखाण वाईट असेल तर ते ट्रोल केले गेले (ज्याला आधी टीका म्हणायचे) तर ते समजू शकतो. जितके वाईट लिखाण तितकी जहरी टीका हेही समजू शकतो. याआधी असे अनेकदा घडलंय, मीही खूप वेळा टीका केली असणार.

पण इथे काहीतरी वेगळे घडले. एक आईडी लेखिकेला 'मीच तुम्हाला माबोवर बोलावले म्हणू लागला'. बरे, बोलावले त्याने, मग? लेखिकेने त्याची आधी खणानारळाने ओटी भरून मगच लेखनाचा नारळ फोडायला हवा होता का? लेखिकेने तसे केले नाही म्हणून त्याने 'धूर्त लेखिकेने मला डावलून इथे लिहायला सुरवात केली' अशा अर्थाचे विधान इथे केले व त्यानंतर लेखिकेच्या लेखवरील प्रतिसादांना तो स्वतःच धन्यवाद वगैरे द्यायला लागला. मी 'तो, तो' म्हणत असले तरी वर 'खणानारळाची ओटी' लिहिलेय कारण हे करणार्याने 'मी कधी स्त्री तर कधी पुरुष आयडी असतो' हेही लिहिले आहे. या आधी इतर लोकांनाही त्याने असेच कारणाशिवाय ट्रोल करून त्रास दिल्याचेही त्याने अभिमानाने लिहिले आहे.

मायबोलिवर जे राजकिय ट्रोलिंग चालते त्यापेक्षा हे वेगळे आहे. लेखनावर जहरी टीका होते त्याहीपेक्षा हे वेगळे आहे.
हे केवळ लोक इथून पळून जावेत यासाठी केले गेलेले आहे. आणि म्हणून माझा प्रश्न मायबोली प्रशासनाला आहे की ते का चालवून घेताहेत? त्यांना नवे लोक इथे आलेले नको का? त्यांना कोणी असेच पळवून लावत असेल तर काहीही न करता ते बघत बसणार का?

धन्यवाद. माझं अवतार कार्य पुर्ण झाले आहे. मी पण निघालो./ ले.

Submitted by JayantiP on 27 June, 2019 - 17:46
>>>

लेखिकेच्या या धाग्यावर हा पहिला प्रतिसाद. हा काय दर्शवतो?

भावना गोवेकर अगदी योग्य बोललात.

असल्या ड्युआयड्यांना आपणच फुटेज देतोय म्हटल्यावर ते चवताळतीलच.

साधनाताई
इथे जे काही चालू आहे त्याचा इतिहास आपल्याला माहीत असणे शक्य नाही. आपल्या समोर जे येत आहे त्यावर बोलत आहे. इथे जे काही ड्युआयडी दिसले त्यापैकीच एकाने मलाही ट्रोल केले होते. तो धागा अराजकीय आहे.

इथे लेखिका सुद्धा ड्युआयड्यांचा वापर मुक्तपणे करताना दिसतेय. त्यामुळे सहानुभूती कशी मिळेल ? ड्युआयडी विरुद्ध ड्युआयडी असे युद्ध चालले आहे. लेखिकेच्या बाजूने ज्या आयडीने प्रशासकांच्या विपूत भावनात्मक प्रतिसाद दिला आहे त्या मन्या नावाच्या आयडीने माझ्या धाग्यावर गोंधळ घातलेला आहे. माझ्या वाटेला जाण्याचे कारण समजले नाही. कदाचित कुठले तरी राजकीय मत यांना आवडले नसावे त्यामुळे डूख धरून असा प्रकार केला असावा असे वाटते. असे यापूर्वी होत नव्हते. राजकीय गोंधळ जिथल्या तिथेच...

असे व्हायला नको होते. वाईट वाटले. Sad नव्या सभासदांना अशी वागणूक मिळायला नको. मीना उत्तरा यांनी अखंड लिहीत रहावे अशी विनंती.

<< मीना उत्तरा यांच्याबाबत जे झाले हे त्यांच्या व ट्रोलरच्या इथे झालेल्या भांडणातून घडले नसून त्यांनी इथे काहीही लिखाण करू नये यासाठी झाले हे सरळ सरळ दिसून येते. हे मायबोली प्रशासनालाही दिसले असणार. तरीही हे अतिशय निंदनीय कृत्य घडत असताना मायबोली अडमीन डोळे झाकून बसले होते. >>
------- मायबोली प्रशासनाला दिसले असणार... कशावरुन हा निष्कर्ष काढला ?

अनेक धाग्यांवर लिहीलेला प्रत्येक प्रतिसाद आणि त्यातला शब्द अ‍ॅडमीन वाचत असतील का? हे असे शक्य आहे का? त्यांनी वाचले आहे, वाचुन दुर्लक्ष केले/ डोळे झाकले हे कशाच्या आधारावर?

ओके. पण यात माबो प्रशासनाने नेमके काय करायला हवे?
एक आयडी बंद केला तर नवा आयडी तयार होणार आणि होतोच आहे.
लोक नवे मेल आयडी उघडतील.मशीन बदलून किंवा काही सॉफ्टवेअर वापरून वेगळ्या आयपी ने लिहितील.>> +१
अशा ट्रोल्सना इग्नोर करणं हाच एक उत्तम उपाय आहे असं मला वाटतं. दुर्लक्ष हेच औषध आहे अश्या प्रतिसादांसाठी.
आपल्याला लिहायचं आहे तर बरे वाईट अनुभव येणारच. सोशल साईटवरच्या एका विकृत आयडीने दिलेला प्रतिसाद किती मनाला लावुन घ्यायचा, त्याला किती महत्व द्यायचं ते बघा.

आयपी अ‍ॅड्रेस ब्लॉक करता येत असेल तर किती मशीन्स बदलतील ? केवळ मायबोलीवर गोंधळ घालता यावा म्हणून दहा हजाराचा खर्च प्रत्येक वेळी कुणी करणार असेल तर त्याचा सत्कारच केला पाहीजे.

मायबोली प्रशासनाला दिसले असणार... कशावरुन हा निष्कर्ष काढला>>>

मायबोली ही खाजगी साईट आहे. आपल्या घराच्या कुठल्या कोपऱ्यात काय चाललंय हे घरमालकाला माहीत असायलाच हवे.

मायबोली व कोर्ट असा काहीसा धागा हल्लीच निघाला असता तिथे वेबमास्तरांनी येऊन प्रतिसाद दिलाच ना? याचाच अर्थ त्यांचे प्रत्येक धाग्यावर लक्ष असते/आहे. आणि ते असे हवेच कारण ही खासगी साईट आहे.

मायबोली ही खाजगी साईट आहे. आपल्या घराच्या कुठल्या कोपऱ्यात काय चाललंय हे घरमालकाला माहीत असायलाच हवे.
>>> +१

किरणूद्दीन, लेखिकेने ड्यु आईडीजचा वापर केला असे मला तरी दिसले नाही. आता तिच्या लेखावर कुणी ड्यु आयडी येऊन तिला सहानुभूती देत असतील तर त्याला ती काय करणार. या लेखिकेबाबत तरी तिने एकाचा आधार घेऊन दुसऱ्यावर हल्ला चढवला असे दिसले नाही. उलट ती गप्पच राहिली व थेट हा वर असलेला धागा काढून टाटा बाय बाय करता झाली.

इथे होत असलेल्या ट्रोलिंगमागे ऑफलाईन काय घटना कारणीभूत असतात हे आपल्याला माहीत नसते याच्याशी सहमत. शालींच्या धाग्यावर ट्रोलिंग झाले तेव्हा हाच संभ्रम निर्माण केला गेला की यामागे काहीतरी ऑफ्लाईन वाद आहेत. त्यामुळे त्यांच्या धाग्यावर जे सुरू होते ते दोन आयडीमध्ये सुरू राहिले, इतर कोणी त्यात पडले नाही. आता असे वाटते की ते दोन आईडीही एकाच माणसाने घेऊन स्वतःच दोन्हीकडुन तलवारबाजी करत राहिला. मीना उत्तराच्या धाग्यावरच्या आयडीने मी तोच तो शालींवाला हे उघड केल्यावर आणि त्याचा वरचा पहिला प्रतिसाद पाहिल्यावर त्याचा हेतू काय आहे हे स्पष्ट होते.

ट्रोलिंग रोखायचे उपाय सोशल मीडियावर असतील. मायबोलीने ते शोधावेत व अमलात आणावेत. बाकी इथे आयडी घ्यायला दोन मिनीटेही लागत नाहीत याचा अनुभव मी घेतलाय. माझ्या मुलीला तिचे इथले नवे अकाउंट मीच उघडून दिले, दोन मिनिटात काम झाले.

<< मायबोली ही खाजगी साईट आहे. आपल्या घराच्या कुठल्या कोपऱ्यात काय चाललंय हे घरमालकाला माहीत असायलाच हवे. >>
-------- असायलाच हवे असे तुम्हाला वाटते...
घर आणि मायबोली यांची सांगड काही बरोबर नाही.
मायबोलीवर अनेक धागे आहेत, आणि प्रत्येक धाग्यावरचा प्रत्येक प्रतिसाद अ‍ॅडमीन यांच्या वाचण्यात येत असेल, ते वाचत असतील असे वाटत नाही.
आता कुणी वि पू मधे तक्रार केली तर गोष्ट वेगळी.

<< मायबोली व कोर्ट असा काहीसा धागा हल्लीच निघाला असता तिथे वेबमास्तरांनी येऊन प्रतिसाद दिलाच ना? याचाच अर्थ त्यांचे प्रत्येक धाग्यावर लक्ष असते/आहे. आणि ते असे हवेच कारण ही खासगी साईट आहे.>>
-------- तिथे प्रतिसाद दिला याचा अर्थ त्या धाग्याकडे त्यांचे लक्ष गेले किंवा वेधले गेले एव्हढाच होतो. तिथे प्रतिसाद दिला म्हणजे प्रत्येक धाग्यावर लक्ष आहे, असायलाच हवे असे होत नाही.

मला या धाग्यावर वाद घालायचा नाही आहे, पण अ‍ॅडमीन /प्रशासनाच्या यांच्या मानवी मर्यादा दिसत आहेत.

<< प्रशासन तर हाताची घडी तोंडावर बोट ठेवून आहे. >>
--------- Sad
काय करणार ते ? खुप अती झाल्यावर आय डी उडवला तरी तो उपाय प्रभावहीन आहे हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. त्यांनी चर्चा करण्यासाठी एक माध्यम दिले आहे. वावरण्याचे नियम आहेत... माध्यमाचा कसा उपयोग करायचा हे आपले आपणच ठरवायचे.

सगळीकडे एकाच माणसाने लक्ष ठेवण्यात मानवी मर्यादा आहेत. पण एकाच माणसाने का करायला हवे हे सगळे? हे कोणी कसे करावे याची व्यवस्था करता येतेच की.

अर्थात मायबोली प्रशासनाने काय करावे, अमुकच करावे, तमुक करूच नये वगैरे सांगण्याचा मला काही अधिकार नाही. मी इथे सामान्य वाचक म्हणून येते, मायबोलीची मालकी माझ्याकडे नाही.

पण कुणीही उठून हवा तो धिंगाणा घालतो, सोबत अजून दोन चार आयडी बनवून तलवारबाजी करत राहतो. मनाला येईल त्याला पळवून लावतो. हे सगळे थांबवायचे उपाय प्रशासनाने शोधायला हवेत असे वाटते. मायबोलीने खूप आनंद दिलाय. पण सध्या जे चालते ते बघायचा कंटाळा आलाय आता. इथे येऊ नये असे वाटत राहते कारण येऊनही हाती फारसे काही लागत नाही.

<< पण कुणीही उठून हवा तो धिंगाणा घालतो, सोबत अजून दोन चार आयडी बनवून तलवारबाजी करत राहतो. मनाला येईल त्याला पळवून लावतो. हे सगळे थांबवायचे उपाय प्रशासनाने शोधायला हवेत असे वाटते. मायबोलीने खूप आनंद दिलाय. पण सध्या जे चालते ते बघायचा कंटाळा आलाय आता. इथे येऊ नये असे वाटत राहते कारण येऊनही हाती फारसे काही लागत नाही.>>
------ सहमत....

ते वाचत असतील तर नोंद घेतिलच...

प्रशासनाच्या बाजूने ड्युआयडीला धोपटण्यासाठी आम्ही तयार आहोत. त्या ड्युआयडीच्या ओरोजिनलला हाणू आम्ही. बाकी थंडगार पडतात.

पण कुणीही उठून हवा तो धिंगाणा घालतो, सोबत अजून दोन चार आयडी बनवून तलवारबाजी करत राहतो. मनाला येईल त्याला पळवून लावतो. हे सगळे थांबवायचे उपाय प्रशासनाने शोधायला हवेत असे वाटते. >>
+१

अविका नावाचा एक ड्युआयडी आहे. त्याने बरीच वर्षे गोंधळ घातला आहे. मिस्टर पंडीत, आनंद डॉट आणि कंपू ही विरूद्ध बाजू आहे. यांनी अविकाला श्रद्धा असताना त्रास दिला. आता श्रद्धा अनेक आयडींनी बदला घेताना दिसते. पण त्यासाठी ही कुठेही चालू होते. कुणाच्याही धाग्यावर घाण करून ठेवते. वर हिचा उल्लेख झाला की कुत्र्यासारखी अंगावर येते आणि दर वेळी अविका कुणाला त्रास देत नाही पण ही टेप वाजवते. पण हाच त्रास आहे तिचा. कोण बरोबर कोण चूक गेलं खड्ड्यात. या आयड्यांना धोपटणारच.

ही सर्व डुकरं इथून हाकलायलाच पाहीजेत.

माबो प्रशासनाने नेमके काय करायला हवे?
प्रत्येक आयडी फोन नंला कनेक्ट करणे अनिवार्य करावे. कोणी ही फोन नं नेहमी बदलत नाही किंवा चार, पांच फोन ठेवत नाही. आयडी बरोबरच फोन नंला सुध्धा नवीन आयडी कनेक्ट करण्यास मनाई करण्यात यावे.

मायबोलीवर अनेक धागे आहेत, आणि प्रत्येक धाग्यावरचा प्रत्येक प्रतिसाद अ‍ॅडमीन यांच्या वाचण्यात येत असेल, ते वाचत असतील असे वाटत नाही.

त्याची आवश्यकताही नाही. केवळ तक्रारींंकडे लक्ष्य द्यावे.

सर्व डुकरं इथून हाकलायलाच पाहीजेत.

नवीन Submitted by शंक्या on 29 June, 2019 - 13:38>>> मग सगळ्यात आधी तू फूट इथून

मी माझ्या खऱ्या नावानी आहे इथे आणी जर तू एका बापाचा असशील तर ये खऱ्या ओळखीने
बायकांवर हुशारी दाखवणारे तुझ्यासारखे खूप उपतसुम्भ बघितले त जारे तू

अविका डुक्कर, तुला तर लाथ घालून घाकललं पाहीजे. तू एका बापाची असशील तर पहिल्यांदा फोटो लाव खरा आणि फोन नंबर लिही प्रोफाईलला. भामटे डुक्कर तुझ्यामुळं चांगले लोक सोडून जायला लागलेत मायबोली. तू कोण असशील तीसमारखान तर तुझ्या घरी. इथं फुकटची मेंबरशिप घेऊन रूबाब करत जाऊ नकोस. हिंमत असेल तर स्वतःची साईट बनव आणि इथे तुझ्यासारखे डुक्कर मुक्तपणे बागडू दे. इथे नको गाढवे.

बायकांवर हुषारी दाखवणारे खूप बघितले हे आम्हाला नकोस सांगू. तू किती बघितलेत याच्याशी आम्हाला काही एक कर्तव्य नाही. इथे चांगल्या महिला आहेत. त्यांना कुणी बोल लावत नाहीत. तूच एक डुक्कर निघालीस. डुकरांसोबत भांडणं करून मायबोली घाण करून टाकलीस घाणेरडे. तुझी कहाणी ऐकून घ्यायला कुणी रिकामटेकडे नाहीत इथं.

आधी तुझं नाव नेमकं काय आहे ते स्वतः ठरव. कळलं का ?

प्रशासकांचे काम खरोखर अवघड आहे. त्यांच्या विपूत तर त्यांनाच दमदाटी झालेली दिसतेय.
मायबोलीच्या भल्यासाठी फोन नंबर सक्तीचा करण्याच्या कल्पनेला माझे अनुमोदन. हे कसे करतात हे मला माहीत नाही. पण असे झाले तर उत्तम आहे. फार तर दोन सीम असतील. दोन आयडी चालून जातील.

खरे तर ड्युआयडी आहे कि ओरिजिनल या पेक्षा कोण कसा वागतो हे दिसून येतं. अनियंत्रित ड्युआयडी रोखण्यासाठी व्हेरिफिकेशन नंतर प्रवेश देता येईल. पण प्रशासनाचे काम वाढेल. आधार कार्ड कंपल्सरी केलं तरी चालेल. प्रशासक ओळख गुप्त ठेवतातच. एखाद्याला दुसरा आयडी हवा असेल तर प्रशासनाला सांगून त्याने मिळवावा. यात अनियंत्रित आयडीजला आळा बसेल. कुणीही उठावं आणि आयडी बनवावा हे बंद होईल.

इथे काही ड्युआयडी आहेत, पण त्यांचे वर्तन इतके शालीन आहे की यांचा ओरिजिनल कसा असेल याचे नवल वाटते.

अहो पण ट्रोलिंग कुठल्या सोमी वर नसते? फेबु वर , इंस्टा वर सगळीकडेच आहे. आधार कार्ड कोणी कशाला देईल माबो वर? ओरिजिनल नाव आणि फोन नंबर तरी का देईल कोणी? पीआयआय सेफ असेल का इथे. इतकी सिक्युरिटी आहे का सर्वर ला?
ट्रोल ला दुर्लक्ष करणे हाच रियलिस्टिक उपाय आहे.

Pages