Good bye from मीना उत्तरा

Submitted by मीना उत्तरा on 27 June, 2019 - 08:05

नमस्कार मंडळी,
मी मायबोली या संकेतस्थळाला रामराम म्हणण्यापूर्वी, सहज म्हणून प्रतिसाद बघत होते आणी काहिशी स्तब्ध झाले 40 जणांनी माझं लेखन डोळ्याखालून घातलं...आपुलकीने सुचना व प्रोत्साहन दिले खूप छान वाटलं...त्याच जोडीला ट्रोल करणे म्हणजे काय ? रॅगिंग नेमके काय असते ? याचा जवळून अर्थ कळला. JayantiP यांचे विशेष करून आभार कारण त्यांच्याशिवाय हे कळले नसते, या अनुभवामुळे माझे काऊंसेलर म्हणून असलेले काम अजून संवेदनशीलपणे मला करता येईल. आपल्या सगळ्यांशी अजून संवाद साधायला आवडला असता पण हे व्यासपीठ माझ्या साठी नाही. त्यामुळे लोभ असावा.
मीना उत्तरा

Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद. माझं अवतार कार्य पुर्ण झाले आहे. मी पण निघालो./ ले.

JayantP यांनी ट्रोल केल्यामुळे जाताय की मायबोलीकर बोलताहेत मोठे सविस्तर भाग टाका आणि ते सविस्तर भाग तुम्ही लिहू नाही शकत म्हणून जाताय. नक्की ट्रोलर कोण? मला तर दुसरी शक्यता जास्त वाटते.

धन्यवाद सप्रस. मी कुठे ट्रोल केलंय? लोक बोलले फार त्रोटक आहे,तर मी म्हणालो फेबुवर सुध्दा कोणाला आवडत नव्हतं फार.

मीना उत्तरा तुमचे आणि कॅप्टनचे अनुभव माझ्याप्रमाणे अनेकांस वाचायला आवडत आहेत.त्या वाचकांसाठी लिहित राहा. आणि कृपया तुम्ही तुमचे लेखन कुणा एका माणसाच्या प्रतिसादांमुळे थांबवु नका.

जशास तसे मराटी बाणा.‌ तुझे आज पता चला क्या. माझ्या प्रत्येक अवताराचा दीएन्ड शिवराळ भाषेमुळे झाला होता पण मी खूप सभ्य बनलो/ली आहे.

एक सुचना, मीना यान्नी लेखन बन्द करण्याऐवजि आधी सम्पुर्ण लेखन करावे आणि ते एकाच धाग्यात प्रसिद्ध करावे.

मीना उत्तरा,

इथे न लिहिण्याच्या आपल्या निर्णयामुळे मायबोलीवर नवीन अनुभव वाचायला मिळणार नाहीत ह्याचं वाईट वाटेल.
पण 'पण हे व्यासपीठ माझ्यासाठी नाही' हे तुमचे म्हणणेही पटतंय. काही अपप्रवृत्तीच्या लोकांमुळे / आयडीं मुळे तुमचा तसा समज होणे अगदी स्वाभाविक आहे.

तुमचे लिहिणे थांबवू नका. कधीतरी फेसबूकवर तुमचे लिखाण वाचायला मिळेल ही आशा करतो. अनेक शुभेच्छा.

जेंव्हा jayantiP सारख्या ID वाल्या व्यक्ती (तो किंवा ती) स्वतःलाच देव मानायला लागतात आणि म्हणतात की त्यांचे 'अवतार' कार्य संपले तेंव्हा देवालाच विचारावं वाटलं की खरंच का तु ह्यांना देवदुत बनवलं आहेस? 'मीना उत्तरा' ह्यांना फेसबुक वरून इथे बोलावलं हे तेच/त्याच म्हणतात आणि मग इथे त्यांनी काही लिखाण करण्या आधीच त्यांना सतावतात, लोक लिहितात अजून लिहा पण 'मीना उत्तरा' ह्यांना प्रतिसाद लिहिणाऱ्यांना jayntiP हेच/ह्याच परस्पर उत्तरं देतात आणि त्यानंतर काही मंडळी विचारतात की ट्रॉलर कोण?
संतांनी पण म्हणलंय की ज्ञान हे सुद्धा ईश्वरी रूप आहे आणि जिथे त्याचा अपमान होतो तिथे तुम्ही ते देण्यात वेळ घालवू नये ! 'सप्रस' आईडी वाले तुम्ही पण फारच तीक्ष्ण बुद्धीचे निघालात की jayantiP ह्यांचे ट्रॉलिंग आणि bullying अवतारकार्य तुम्हाला कळत नाही मात्र मीना उत्तरा ह्यांना लिहिताच येत नाही हे मात्र न वाचताच समजतंय ! अरे वा द्येवा काय सोनू मानसं हायेत ही !!
'मीना उत्तरा' ह्यांना फेसबुक वर मिळालेली कित्येक लाईक्स आणि कॉंमेंट्स मी मोजली कारण मी त्यांचे अत्तापर्यंतचे 35 प्रसिद्ध झालेले फेसबुक वरचे लेख वाचलेत , जरा त्याची लिस्ट देतो ... त्यावरून ठरवा की jayantiP सारख्या व्यक्ती किती खरं बोलतात ते ...
12Jan19 - 537likes, 60 comments.
13Jan19 - 137likes, 8 comments
19Jan19 - 187likes, 30 comments
20Jan19 - 153Likes, 11 comments
26Jan19 - 80Likes, 8 comments
27Jan19- 154Likes, 9 comments
16Feb19 - 69Likes, 6 comments
17Feb19 - 124Likes, 6 comments
23Feb29 - 76 Likes, 3 comments
24Feb19 - 123 Likes, 14 comments
02March19 - 117Likes, 12 comments
03Mar19- 104 Likes, 6 comments
09Mar19- 261 Likes, 24 comments
10Mar19- 73Likes, 2 comments
16Mar19 - 138 Likes , 4 comments
17Mar19 - 61Likes, 3 comments
23Mar19 - 53 Likes, 2 comments
24Mar19 - 96 Likes, 4 comments
30Mar19 - 55 Likes, 3 comments
31Mar19 - 101likes, 4 comments
06Apr19 - 79Likes, 4 comments
07Apr19 - 62Likes, 2 comments
13Apr19 - 71Likes, 8 comments
14Apr19 - 51 Likes, 3 comments
27Apr19. - 63Likes, 8 comments
28April19 - 50 likes, 4 comments
04May19 - 60 likes, 4 comments
05May19 -43 Likes , 3 comments
11May19- 40Likes, 5 comments
12May19-33Likes, 1 comment
18May19-41Likes, 2 comments
26May19- 45 Likes, 1 comment
01Jun19 - 30Likes
08Jun19-39Likes, 3 comments
15Jun19 - 21 Likes, 8 comments
22Jun19 - 31Likes, 9 comments
हे मी मुद्दाम jayantiP सारख्या व्यक्ती त्यांच्या विविध ID च्या मार्गे किती दिशाभुल करताहेत हे समजावे म्हणून लिहिलं
मीना उत्तरा ह्यांच्यावर असे आक्रमण करण्याचे अवतारकार्य jayantiP करतात आणि इतर जण थांबवायचा असफळ प्रयत्न करतात,बाकी म्हणतात की लिहा पण मलातरी ते अशक्य दिसायला लागलेलं आहे ... jayantiP ह्यांनी आपल्या सगळ्यांच्या देखत सायबर अत्याचार करून, भ्याडपणे स्वतःचे खरे नाव लपवुन निर्भीडपणे स्वतःचे नाव लिहीणार्या, फोटो ही पोस्ट करणाऱ्या ह्या ताईंचे लेख आपल्या पासून येणं तोडलं हे jayantiP चं अवतार कार्य ! मीना उत्तरा ह्यांनी अनेक मराठी बंद पडणाऱ्या शाळा वाचवल्या आहेत ज्याचा मी साक्षीदार आहे.
असूनदे देव जे पाठवतो तेच शेवटी मान्य करायला हवं, अगदी jayantiP ह्यांचे असे सायबर अत्याचार देखील ! नुसतच 'लिहीत राहा' म्हणून कस चालणार ... ताई तुम्ही bye म्हणालात, आम्ही तुम्हाला इथे दिल्या गेलेल्या त्रासाबद्दल माफी मागतो, तुमचे चार दशकांचे कार्य चालूच ठेवा ... नमस्कार, मात्र ताई तुम्ही तारतम्य कसं ठेवायचं हे शिकवून गेलात..

मीनाजी, तुम्ही लिहीत जावे. इथे असंख्य वाचक आयडी नसलेले आणि असलेले देखील जहाजावरचे अनुभव वाचण्यासाठी आतुर आहेत. प्रत्येक जण रिप्लाय देईलच असे नाही परंतु वाचनसंख्या भरपूर असणार हे गृहीत धरून चला. फक्त काही ट्रोलिंग साठी तुम्ही इतका मोठा निर्णय घेणे बरोबर नाही.
माझेच सांगतो- मला मर्चंट नेव्ही मध्ये जायची प्रचंड इच्छा होती. परंतु काही कारणामुळे ते शक्य झाले नाही. परंतु बोटीवरच्या आयुष्याचे मला कायमच आकर्षण राहिले आहे. अगदी यु ट्यूब वर मी असे अनेक विडिओ पण पाहिले आहेत. तुमचा पहिला लेख आला आणि वाटले आता नक्कीच खूप छान अनुभव वाचायला मिळतील ज्याला आपण मुकलो आहोत. परंतु ४-५ दिवसातच तुमचा मायबोली सोडून जायचा निर्णय वाचला आणि दुःख झाले. इथे असा एकही आयडी नसेल जो कधीच ट्रोल झाला नसेल. अहो जिथे प्रत्यक्ष परमेश्वर/देव सुद्धा ट्रोल होतो तिथे आपलासारख्या पामरांची काय कथा. त्यामुळे लेखन/मायबोली सोडून देण्यावर एकदा पुनर्विचार जरूर करा.
इथे काही जणांनी तुमचे लेख लहान असतात असे सांगितले आहे. तुम्ही म्हणल्याप्रमाणे केवळ अर्धा तास रोज लिखाण करू शकत असाल तर तसे करा आणि आठवड्याच्या शेवटी एकाच मोठा लेख प्रदर्शित करा. वाटल्यास लेखाचा शेवट थोडा उत्कंठावर्धक ठेवा जेणेकरून पुढचा लेख वाचण्यास अजून गम्मत येईल. लेख छोटा असो व मोठा मी मात्र वाचेन यात शंका नाही

अरेरे, असं करू नका मीना उत्तरा जी.. आम्हाला तुमचं लेखन वाचायची उत्सुकता आहे. काही विघ्नसंतोषी लोकांमुळे तुम्ही बाकीच्या वाचकांना निराश करू नका.

मला तुमचा इथला प्रोफाइल वरचा फोटो आवडला.
तुम्ही लिहीत राहा हो.आम्ही वाचू.वेगवेगळ्या प्रोफेशन, वेगळ्या क्षेत्रातल्या लोकांचे अनुभव कागदावर येणं आवश्यक आहे.तुमचं लिखाणही चांगलं असतं.प्रत्येक भागाचा कंटेंट कमी आहे, हे बहुधा फेसबुकवर आधी प्रकाशित करण्या मुळे असावं.फेसबुकवर रीड मोअर ची लिंक क्लिक न करता पानात जितकं दिसेल तितकंच वाचण्याचा वाचकांचा कल असतो.पण इथे मायबोलीवर पानांची व्याप्ती आणि स्क्रोल स्क्रीन मोठी.त्यामुळे तुमच्या 2 भागांचा एक भाग केलात, अजून थोडे परिच्छेद पाडलेत की वाचायला अजून चांगलं वाटेल.
जिथे सोशल मीडियावर आपण एक्स्प्रेस केलं तिथे ट्रॉलर्स च्या हातात आपण तिजोरीची किल्ली दिली.आणि हे कोणत्याही, कितीही छान समजूतदार सोशल मीडिया किंवा द्रुपल साईट बद्दल खरं.ट्रॉलर्स का येतात?त्यांना तुमचं लिखाण दखल घेण्यायोग्य वाटतं म्हणून.बऱ्याच लिखाणावर अगदी ट्रॉलर्स पण येत नाहीत.कधी लेख मागच्या पानात हरवला म्हणून कधी आयडी नवा आहे पाहून लोक लेख न उघडता पुढे जातात म्हणून.

Keep writing Tai.... Ignore people's who don't Know how to write .... See ks ast tyana jamat nahi changl lihayla mg ase pratisad devun tyanch frustration kadhtat.. rikamtekdya lokancha nadalal na lagn hach upay ahe.. best luck

लिहो हो.. तुम्ही लिहा..

मला खूप जण ट्रोल करायचे, पण मी परमार्थाच्या मार्गावर रांगत असल्यामुळे, याकडे दुर्लक्ष करतो, काल मॅचमध्ये धोनी स्लो खेळला म्हणून लोकांनी त्याला ट्रोल केलं, पण तो शेवटपर्यंत राहिला म्हणून भारताचा मोठा स्कोर झाला, अन म्हणून आपण सामना जिंकला. धोनी काय सचिनलासुद्धा निवृत्त हो म्हणून ट्रोल करायचे. जिथे लोकांनी देवाला सुद्धा सोडलं नाही तिथे आपल्यासारख्या लोकांची काय व्यथा?

सगळ्यांना ट्रोल केलं जातं, किती ही मोठा किंवा छोटा इसम असू दे. ट्रोलिंग तर होतंच. ट्रोलिंग झाल्यावर वाईट पण वाटतं, पण आपण चटका बसल्यावर त्यावर फुंकर घालून, पुढे कामाला लागतो, तसंच ट्रोलिंगचं सुद्धा आहे. लिहीत राहा, चांगलं वाईट, जस जमेल तसं लिहा.

आता कसं लिहायचं किती लिहायचं, ते तुम्ही ठरवायचं, मजकूर छोटा आहे का मोठा यावर विचार करत बसू नका, लेखन साधना आहे, जसं या साधनेत तल्लीन व्हाल, तसं या सर्वातून पार व्हाल

इतक्या थोड्या लिखाणा वर इतके मानापमान का चालू राहतात नव्या सभासदांचे? मायबोली विशे ष मध्ये जाउन लेखमालिका कृपया नजरे खालून घाला. लेखकांनी किती ओरिजिनल रीसर्च, एडिटिन्ग, प्रूफ रीडिंग वर मेहनत घेतली आहे. व किती उत्तम दर्जाचे लेखन उपलब्ध केले आहे ते बघितले म्हण जे नव्या लेखकांना अजून किती पुढे जायचे आहे ते लक्षात येउ शकेल.

तुमचे लेखन परत एकदा नजरे खालून घाला, त्यात भर घाला फोटो अ‍ॅड करा चांगला क्वालिटी कंटेंट उपलब्ध करा कौतूक होईलच. आधीच अर्ध्या हळ कुंडाने गोरे होउन मान पान का करायचे.

तुमचे लेखन परत एकदा नजरे खालून घाला, त्यात भर घाला फोटो अ‍ॅड करा चांगला क्वालिटी कंटेंट उपलब्ध करा कौतूक होईलच. आधीच अर्ध्या हळ कुंडाने गोरे होउन मान पान का करायचे.>>>>+११११

मला तर गम्मत वाटली हा धागा अन काही प्रतिसाद वाचून. ५ दिवसात निवृत्ती तर महानच. जर सगळे लिखाण आधीच केले आहे तर जरा मोठे अन सविस्तर भाग टाकायचे की.
जाऊ दे आपलं , हल्ली माबो मजेशीर झालीये खूप☺️

अति संवेदनशील व्यक्ती ने सोशल मीडियावर जपूनच वावर करावा , इग्नोरस्त्र शिकावे, म्हणजे त्रास कमी होतो

मीनाताई, इथल्या असंतोषी आत्म्यांकडे कशाला लक्ष देताय? या भुतावळीला एखादे ललित लिहायला सांगा किंवा कविता करायला सांगा, ते पण जमणार नाही यांना. जरा कोणी काही नवीन चांगले लिहीले की इथली भुतावळ जाते तिथे शिते गोळा करायला.

अमा म्हणतात ते बरोबर आहे. उगाच मनाला लावुन घेण्या पेक्षा लेखनात नाविन्य आणा. त्यांची सुचना मोलाची आहे.

>>इथल्या असंतोषी आत्म्यांकडे कशाला लक्ष देताय? या भुतावळीला एखादे ललित लिहायला सांगा किंवा कविता करायला सांगा,

कशाला? आधीच कवितांच्या नावाखाली कमी का अत्त्याचार चाललेत इकडे?
त्यात अजुन ही भर कशाला?

मायबोलीवर तुम्हाला सपोर्ट करनार्यांची सख्या किती व टिका करनार्यांची कीती मोजुन बघा बरं
खात्री आहे मला सपोर्ट करनार्यांची संख्या जास्तच असेल.

# ज्याठिकाणी आपल्या (तिकडे) जाण्यामुळे, तिकडचे (सगळे किंवा काही) लोक खुष नसतील, तिथल्या (काही किंवा सर्व) लोकांच्या मनात स्नेह अथवा प्रेम नसेल, तिथे भलेही सुवर्ण वर्षाव होत असेल तरीही कधीही जाऊ नये.#
संत तुलसीराम

मीना उत्तरा यांचे इथे हे ट्रोलिंग झाले ते भयंकर होते.

त्यांची भाषा नीट नसेल/त्यांनी अगदीच दोन दोन परिच्छेद लिहिले असतील किंवा जे लिहिले ते विषयाला धरून नसेल वगैरे कुठल्याही कारणाने त्यांचे ट्रोलिंग झाले असते तर तिकडे दुर्लक्ष करता आले असते. कारण यात वैयक्तिक काहीही नसून लिहिणारा मायबोलीकर जे साहित्य मायबोलीवर प्रकाशित करून त्याचे इथले अस्तित्व दाखवत आहे ते चोखंदळ वाचकास न आवडल्याने त्यावर टीका झाली असे गृहीत धरता येते.

अशा वेळी त्या माबोकाराला 'इतरांचे लेखन वाचा मग लिहा, इतरांनी ट्रोलिंग कसे सहन केले ते बघा, मग रडा' वगैरे सल्ले दिलेले तो सहन करू शकेल. कारण ते वाचून त्यालाही कळेल त्याची चूक काय झाली.

इथे लिखाणासंबंधीत कुठल्याही बाबीवर ट्रोलिंग न होता वैयक्तिक ट्रोलिंग झाले. इतकी नीच पातळी की आपणच ती लेखिका हे दाखवायचे प्रयत्न झाले. मी लेखिकेच्या जागी असते तर जिथे पाय ठेवताच असा अनुभव येतो ती जागा अतिशय फालतू माणसांनी भरलीय हा निष्कर्ष काढून परत तिथे पायही ठेवला नसता . लेखिकेने हेच केलेय हे बघून बरे वाटले म्हणवत नाही पण तिला पर्याय उरला नाही हे वाटून गेले. आता तिचे लिखाण वाचायचे तर तिला फेसबुकवर शोधावे लागणार.

मायबोलीवर ट्रोलिंगकडे पूर्ण दुर्लक्ष केले जाते हे खूप वेळा बघितले आहे. पण हे ट्रोलिंग बहुतेकवेळी राजकीय धाग्यांवर चाले व दोन्ही बाजू तितक्याच दोषी असल्याने मी तरी हे गांभीर्याने घेतले नव्हते.

मीना उत्तरा यांच्याबाबत जे झाले हे त्यांच्या व ट्रोलरच्या इथे झालेल्या भांडणातून घडले नसून त्यांनी इथे काहीही लिखाण करू नये यासाठी झाले हे सरळ सरळ दिसून येते. हे मायबोली प्रशासनालाही दिसले असणार. तरीही हे अतिशय निंदनीय कृत्य घडत असताना मायबोली अडमीन डोळे झाकून बसले होते.

जे काही घडले ते मायबोली साईटला लज्जास्पद घडले. मायबोलीबद्दल चांगले ऐकून इथे आलेली लेखिका मायबोलीबद्दल एक वाईट प्रतिमा घेऊन गेली.

यापुढे कोणी नवीन माणसाने मायबोलीवर लिहायचा प्रयत्न केला व हेच माथी आले तरीही मायबोली अडमीन हीच भूमिका घेणार का?

साधना ताई
तुमचे माझे राजकीय मतभेद आपल्या जागी. पण आपण राजकीय विषयांखेरीज इतर धाग्यांवर आपले हे मतभेद ठेवून वावरत नाही. मला या लेखिका कोण हे ठाऊक नव्हते. हा गोंधळ झाल्यानंतरच समजले.

माझ्याही गझलांची शीर्षके या धाग्यावर ट्रोलिंग झाले आहे.
पण मी संबंधित आयडीला त्याच भाषेत उत्तर दिले आहे. आणि ते ही याच आयडीने. अर्थात त्यात इतरांना इंटरेस्ट असण्याचे कारण नाही.

ट्रोल करणारे हजारो ड्युआयडी काढून ट्रोलिंग करतात म्हणून आपणही तेच करावे याचे समर्थन नाही करता येत. इतकेच.
तुमचा प्रतिसाद दिसल्याने लिहीले. नाहीतर इथे लिहायचा विचार नव्हता.

Pages