ती गेली

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 11 June, 2019 - 09:53

ती गेली

*****

चार तपांची साथ ही सुटली
क्षणात सुटली
सौख्य सारी

आताच भेटली गमते मजला
आताच फुलला
होता ऋतु

तव गजर्या चा गंध अजून तो
बघ दरवळतो
कणोकणी

तीच सळसळ तव पदरांची
गृह चैतन्याची
साक्ष असे

आणि किणकिण देही भरली
चुड्या मधली
रुंजी घालते

येईल हाक अहो म्हणूनी
अवचित कानी
सदा वाटते

कुठे न गेलीस कधी न सांगता
मग हे आता
घडे कसे

सोबत सदैव हवी तुला ना
मग सांगना
काय झाले

गेलीस ते ही तू खरे ना वाटते
स्मरतो जरी ते
भ्रम वाटे

तुझ्या वाचून इथले जगणे
उगाच वाहने
देह जणू

हातात हात तुझा राहावा
सवेची यावा
जन्म पुन्हा

ऋणानुबंध हे कधी न मिटावे
सदैव पहावे
मी तुजला

एकच सखये हे होते मागणे
तुजला घडले
परी जाणे

तुझ्याविना मज कसले राहणे
जुनेच दुखणे
तू ते जाणे

थांब जरासी त्या दारावरती
पावुल काढती
घेतो मी ही

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!
काय आहे हे डॉक? मी विपू करतो. येथे लिहायला शब्द नाहीत.

चार तापाची साथ. ताप जरी म्हटलं तरीही ते तीन असतात. पहिलीच ओळ आहे. मला लगेच विचार करायची सवय आहे. म्हणजे संगती लावायची सवय आहे.