वास्तु ५

Submitted by जयश्री साळुंके on 15 May, 2019 - 03:12

वास्तु भाग १ https://www.maayboli.com/node/69864
वास्तु भाग २ https://www.maayboli.com/node/69911
वास्तु भाग ३ https://www.maayboli.com/node/69915
वास्तु भाग ४ https://www.maayboli.com/node/69932

वास्तु भाग ५

सई, ऋषभ, वेद, पार्थ आणि प्रज्ञा असा कॉलेज मध्ये पाच जणांचा ग्रुप होता. सगळी अगदी जिवाभावाची मित्र मंडळी. सई सोबत काय घडलं हे ऐकून सगळेच काळजीत पडले. चौघांनी लगेच गावी येण्याचा निर्णय घेतला. आणि त्यांच्या सोबत अजुन एक व्यक्ती त्यांनी घेतली, सौम्य, ऋषभ चा मामेभाऊ. सौम्य मानसोपचारतज्ज्ञ होता, यांच्या सगळ्यांपेक्षा दोनेक वर्षांनी मोठा, अतिशय शांत, कोणत्याही गोष्टीच्या अगदी मुळापर्यंत पोहचणारा. त्याने जेव्हा ऋषभ कडून सई बद्दल ऐकलं तेव्हा तो स्वतःहून गावी यायचं म्हणाला. मला तर तो पोरगा बघता क्षणी आवडला, त्याला बघितलं तेव्हाच असं वाटलं कि तो ह्या सगळ्यातून माझी आणि घरातल्या सगळ्यांची मुक्तता करेल. सौम्य फक्त मानसोपचारतज्ज्ञचं नव्हता तर त्याला बाकी पण बर्याच गोष्टीन मध्ये रस होता. त्याला आयुर्वेदातली बरीच माहिती होती, त्याला तंत्र-मंत्र देखील काही माहित होते. कृष्ण भक्त होता तो, त्यामुळे कर्मावर प्रचंड विश्वास त्याचा. सईला त्याने ऋषभ सोबत बर्याचदा बघितलं होतं आणि बघता क्षणी त्याला ती आवडली पण होती, म्हणुन त्याने मागचा पुढचा कोणताही विचार न करता या सगळ्यात उडी घेतली होती.
मी हे सगळं बघत होतो. आतापर्यंत फक्त मला एकट्याला माहित होतं कि पाणी कुठे मुरतंय. आणि याचा उगम कुठे आहे हे पण फक्त मलाच माहित होतं. माझी प्रचंड इच्छा होती कि कोणीतरी त्या जागेपर्यंत पोहचावं आणि हे सगळचं थांबवावं. त्या रुसलेल्याची शांती करावी, म्हणजे सगळं ठीक होऊ शकेल. पण रुसलेल्याला पुन्हा पुन्हा भडकावलं जात होतं, जो भडकावत होता त्याला शक्ती पाहिजे होती, जगावर राज्य करायची ताकद पाहिजे होती, आणि मल्हाररावांच्या एका कृतीमुळे त्याच्या इच्छांची पूर्णता होताना त्याला दिसत होती. त्याने आजवर सहा बळी घेतले होते, सुरुवात झाली होती ती सईबाईंपासून, त्यानंतरचे पाच बळी तर अगदी कोणाला न कळत घेतले गेलेले, कोणाला शंका पण नाही आली कारण त्या पाचही मुली वेगवेगळ्या कारणांनी आणि वेगवेगळ्या काळात विहिरीत पडलेल्या, त्याला घाई नव्ह्तीचं मुळी, त्याची तपस्या कमीत कमी सहाशे वर्षांपासून चालू होती.
आता मीच जरा अजुन मागे जाऊन सांगतो, घराचं बांधकाम होण्याच्याही किती तरी वर्षांपूर्वी त्या विहिरीच्या जागेवर एक अघोरी तपस्या करत होता. त्या काळात मनुष्य कमी आणि जंगल मोठ होतं त्यामुळे त्याची तपस्या अगदी शांततेत चालू होती. त्याला जास्त काही नको होतं, फक्त काळ्या शक्तींना ह्या जगात जागा करून द्यायचं काम करायचं होतं त्याला. आणि स्वतःसाठी म्हणुन फक्त जगावर राज्य करायची हौस होती. तेव्हा मी पण नव्हतो, कारण मी म्हणजे वास्तु, बांधकाम सुरु झालं त्यानंतर माझा जन्म झाला, पण इथल्या झाडांनी, मातीने, पक्षांनी हे सगळं बघितलेलं. आणि मी हि सगळी माहिती त्यांच्याकडून ऐकलेली, ऐकली कसली, मीच त्यांच्याकडून काढुन घेतलेली.
तर झालं असं कि सहाशे वर्षांपासून त्याची तपस्या चालू होती, मग हळु हळु जंगलात बाकी माणसं पण यायला लागलीत, त्याने ती जागा सोडली आणि अजुन जंगलात गेला, आणि काही महत्वाच्या पूजांसाठी फक्त तिथे यायला लागला. पण इतक्या वर्षांच्या तपामुळे आणि अघोरी पुजांमुळे त्या जागेवरसुद्धा परिणाम झालेला. मग तिथे घर बांधलं गेलं. मल्हाररावांनी विहीर बांधली ती जागा त्याची होती, आणि विहीर बांधण्यापूर्वी एकदा असाच पूजेला आलेला असतांना मल्हाररावांच्या पहिल्या बायकोने त्याला बघितलेलं. मुलाच्या जन्मासाठी म्हणुन त्यांनी उपाय विचारला, याने उपाय सांगितला पण बाळाच्या जन्मानंतर सात लग्न न झालेल्या पण वयात आलेल्या मुलींचा बळी मागितला. कुमुदिनीबाईंनी त्याला तेव्हा एकदाच बघितलेलं त्यांनी बाकी सर्व उपाय केलेत, सात काळ्या बाहुल्या त्या जागेवर पुरून ठेवल्यात. पण बाळाचा जन्म झाल्यानंतर त्यांना ह्या गोष्टीचा विसर पडला, जेव्हा आठवण झाली तेव्हा विहिरीचं बांधकाम पुर्ण होऊन तिथे पाणी होतं, आणि सात मुलींचा बळी देण त्यांच्या मनाला पटत नव्हतं, याचाच परिणाम म्हणुन त्याने कुमुदिनीबाईंचा जीव आणि पहिला बळी त्याच घरातल्या मुलीचा घेतला. आणि आता वेळ आलेली त्याचा शेवटचा बळी घ्यायची.
मल्हाररावांनी विहिरीच्या बांधकामाच्या वेळी मिळालेल्या बाहुल्या फेकून दिलेल्या पण त्या जास्त दूर नव्हत्या फेकल्या बाकी सहा बाहुल्या तर जळल्या होत्या पण तरी त्यांचं अस्तित्व तिथेच होतं, आता उरली होती एक शेवटची बाहुली. आणि इथेच सुरुवात होणार होती ती एका मोठ्या आणि शेवटच्या युद्धाची. सौम्य येतांना पुर्ण तयारीने आलेला, येतांना त्याने सईच्या वडिलांनी ऋषभ ला पाठवलेला फोटो बघितला तेव्हाच त्याला बरंच काही खटकल होतं पण नेमकं काय हे त्याचं त्याला पण कळत नव्हतं. त्यामुळे त्याने सगळ्या बाजूने आधीच तयारी करून ठेवली होती.
क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आताच चार भाग वाचून प्रतिक्रिया दिलेली आणि पाचवा भाग पण हातात आला Happy छानच चालू आहे कथा..त्यात वाडा ही कथा सांगतोय असे दाखवलेत ते छानच वाटते

कथेत पुढे काय होणार याची उत्सुकता वाढवणारा भाग. Happy
पण तब्येत महत्वाची,पहिले पुर्ण ठणठणीत बरे व्हा.मग कथेचे पुढचे भाग टाका.