थायलंड सफर, माहिती.

Submitted by चंबू on 7 August, 2015 - 00:05

नोव्हेंवर मधे थायलंडला ३ दिवसांची भेट देण्याचे ठरवलेय. बरोबर बायका-मुले आहेत, बँकॉकच्या आसपासची कोणती ठिकाणे फिरू शकतो? हॉटेल बुकींग बद्दल, तेथील साईटसिईंग च्या पॅकेज बद्दल..जी काही माहिती असेल ती द्या. भारता बाहेरचं 'सिटी लाईफ' बरेच बघितलेय, तेव्हा निसर्गाशी जवळीक असणारी ठिकाणं बघायला आवडेल. थायलंड मधे कुणी जास्त मायबोलीकर असतील असे वाटत नाही, त्यामूळे माहिती असणार्‍या कुणीही सल्ला दिला तरी स्वागतच!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निसर्गाशी जवळीक असणारी ठिकाणं बघायला आवडेल >>>> पटायाच्याजवळ नाँग नूच गार्डन आहे - जी मला तरी खूप आवडली... ( nong nooch ). तिथलाच एलिफंट शो देखील खूप प्रेक्षणीय... मुलांना तर अतिशय आवडेल ...

केसरी आणि वीणा वर्ल्डच्या या टूरच्या आयटनरीज वाचून काढा. वीणाताईंनी वेळोवेळी थायलंडबद्दल खूप लिहिलंय. नेटवर मिळेल ते. ते ही वाचा. ट्रिपअ‍ॅडवायझरवर ही खूप माहिती मिळेल.

हो मामी, तूम्ही दिलेल्या लिंका बघितल्या आहेत पण कधी कधी अशी काही माहीती मिळते जी या प्रोफेशनल टूरवाल्यांकडून अशक्य असते. ट्रिपअ‍ॅडवायझर वर नव्हतो गेलो.. बरे झाले सांगितले, लगेच बघतो.

चंबूजी, फुकेत हे ठिकाण बॅंकॉक पासून ८५० km वर आहे. ( १ तासाची फ्लाइट). तिथे जर जाऊ शकलात तर अवश्य जा. फी- फी आयलंड ची एक टूर तिथून निघते. डोळ्याचे पारणे फेडणारा निसर्ग तुम्हाला बघायला मिळेल.जेम्स बॉन्ड आयलंड देखील फार प्रेक्षणीय आहे. पण फिफी आयलंडसाठी एक संपूर्ण दिवस राखून ठेवावा लागेल. फुकेतहून स्पीडबोटने साधारण तास दीड तास प्रवास केला की फीफी आयलंड ला पोहोचता येईल.

पत्ताया साधारण २ तासाच्या ड्राइव वर आहे. पत्तायाला जाण्यासाठी बॅंकॉकहून सुपेरवे/ सुपर एक्स्प्रेसवे आहे. पत्तायात तसं बघण्यासाठी काही खास नाही पण जर तुम्हाला किंवा मुलांना वॉटर स्पोर्ट्स मध्ये इंट्रेस्ट असेल तर जाता येईल. स्ंनोर्क्लिंग ( पाण्याखाली चालणे) त्यात मजेशीर प्रकार आहे. कोरल आयलंड सुद्धा बघता येतील ( आम्हाला ते कृत्रिमरित्या लावलेले असावेत अशी शंका होती Uhoh )

जर तुम्ही स्वत:च टूर अरेंज करणार असाल तर बरोबर भरपूर खाऊ घेऊन जा. मांसाहार करणार्‍या लोकांचे सुद्धा थायलंडमध्ये हाल झालेले बघितले आहे आणि जर तुम्ही शाकाहारी असाल तर खूपच कमी पर्याय उपलब्ध आहेत. शेंगदाणे, चिप्स यावर देखील फिश पाऊडर स्प्रिंकल केलेली असते. भाषेमुळे पॅकेटवर मजकूर वाचता येणे शक्य नसते अश्यावेळी चित्र पाहूनच थोडीफार कल्पना येते. मॉल मध्ये असलेल्या फूड कोर्टात उभे राहणे देखील अवघड होते इतका सी फूड च उग्र वास तिथे येतो. काही भारतीय रेस्तौरंट्स देखील आहेत परंतु आमचा अनुभव तरी चांगला नव्हता. ना quantity,ना quality, ना hospitality..सगळीच मारामार. किम्मत मात्र चोख. फळे मात्र मस्त मिळतात. ड्रॅगन फ्रूट देखील छान वाटले.

बर्‍याचदा अमेरिकन डोलर्स घेवून जावून तिथे baht (थाई करंसी) मध्ये convert करण्याचा सल्ला दिला जातो. पण माझ्यामते ते महाग पडते. तुम्ही इथूनच baht घेऊन जाऊ शकता आणि बर्‍याच ठिकाणी डोलर्स अॅक्सेप्ट करत नाहीत.

बॅंकॉक मध्ये montean नावाचे एक हॉटेल आहे. आमचा तरी त्या हॉटेलचा अनुभव खूप चांगला होता. तुम्ही tripadviser वा तत्सम साइटवरून बूकिंग करू शकता.

संपूर्ण थायलंड मध्ये नाइट मार्केट्स फार प्रचलित आहेत. तिथे कलाकुसरीच्या फार अप्रतिम वस्तू मिळतात. शॉपिंगसाठी प्लॅटिनमप्लाझा नावाचा मॉल चांगला आहे.सगळंकाही एकाच ठिकाणी.

एक टीप : तिथे कोणाच्याही डोक्यावर हात ठेवू नका किंवा प्रार्थना करत असलेल्या व्यक्तीच्या पाठीमागे उभे राहू नका. थाई लोकात ही अत्यंत घृणास्पद गोष्ट समजली जाते. त्यांच्या राजा किंवा राणीबद्दल बोलतांना अत्यंत आदरार्थी शब्दांचा वापर करा. राजा/ राणी हा फार संवेदनशील विषय आहे त्यांच्यासाठी.

बापरे ! सकाळी सकाळी फारच झालेत सल्ले...... Lol

स्नू चांगली माहीती,

बंकोक वरुन पटायाला जाताना चांगला झु आहे. तो बघु शकता. त वाघा बरोबर फोटो काढु शकता.

नेचर ची आवड असल्यास बंकोक वरुन ९०० किमी उत्तरेला चांग माई , चांग राई , golden triangle ( जिथे लाओस आणि ब्र्म्हदेशाचे सिमा आहे. तिकडे जाउ शकता

तीनच दिवसांची ट्रिप आहे बँकॉक ला..तर ही ठिकाणे पाहा..मुलं बरोबर आहेत म्हनून पटाया रेकमेंड नाही करत

. The Grand Palace, Temple of the Emerald Buddha and Wat Arun (the Temple of Dawn) are an absolute must.

Sampran Elephant Ground & Zoo, Safari World , or the Crocodile Farm

Chatuchak Weekend Market for last-minute souvenirs and funky knick-knacks.

Dinner Cruise on Chao Praya River

बीच मस्ट असेल लिस्ट वर तर बँकॉक जवळ छाम बीच वर जा.. cha -am or visit Hua hin beach

Popular water sports in Cha-Am include riding the banana boat and renting a jetski. There is no parasailing, windsurfing or water-skiing.

to see the bridge on river kwai and beautiful nature go to Kanchanaburi

बॅंकॉक मध्ये एक फ्लोटिंग मार्केट देखील आहे. आम्ही गेलो तेव्हा पूर आल्याने बंद होते. ते देखील बघता येईल.