मॅरेज Mystique ! ( भाग ४ )

Submitted by र. दि. रा. on 8 May, 2019 - 12:12

मागील भागाचे धागे :
भाग १ :- https://www.maayboli.com/node/69844
भाग २ :- https://www.maayboli.com/node/69853
भाग ३ :- https://www.maayboli.com/node/69865

भाग ४ :-

जग्गूचा निरोप घेऊन केदार त्याच्या रूममध्ये आला.तो पार भाम्बावून गेला . अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात घोंगावू लागले .
जग्गू म्हणाला ते खरे असेल का ? रेवतीला कसली पिडा आहे म्हणून तिचे लग्न करणार ? रेवती आणि तिचे वडील इतके अंधश्रध्द असतील ? का खरे कारण दुसरेच काहीतरी आहे ? असे खोटे खोटे लग्न करून आपला काय फायदा ? खरे म्हणजे आपण विवाहित आहोत हे सांगून टाकायला पाहिजे होते. म्हणजे पुढचा सगळा प्रश्न मिटला असता . लगेच केदारने स्व:तची समजूत घातली . खरे लग्न असते तर नक्कीच सांगितले असते . पण हे लग्न खोटे खोटे आहे त्यामुळे आपले पहिले लग्न झाले असले किंवा नसले तरी काही फरक पडत नाही . आणि तसेही आपण उद्या जग्गुला नकार कळवून मोकळे व्हायचे उगीच नसती झंझट नको . मनाशी नकारार्थी निर्णय घेतल्यावर त्याला हायसे वाटले . पण मनातून रेवती जात नव्हती .

रात्र होई पर्यंत तो रुममध्येच बसून राहिला . त्याला जेवायला जायचे होते .पण त्याला रुमच्या बाहेर पडायची भीती वाटायला लागली .जग्गुचे बोलणे कोणाला कळले तर नसेल ना ?

उलट सुलट विचार मनात गर्दी करत होते . आपण जर या लग्नाला नकार दिला तर आपण एका संधीला मुकणार तर नाही ना ?.आपण असेच बिचकत बिचकत जगणार आहोत का ? थोडे धाडस दाखवायला काय हरकत आहे ?

त्याने रूम सर्व्हिसला फोन करून जेवणाची ऑर्डर दिली.अर्ध्या तासाने रुमबॉय आला . तो डायनिंग टेबलावर डिश मांडायला लागला .
केदार म्हणाला “राहूदे . मला जेवायला अजून अवकाश आहे”

वेटर जेवण ठेऊन निघाला . केदारने त्याला विचारले “हे जग्गूसाहेब इथे नेहमी येतात?”

“हो ! जवळ जवळ रोजच”

“माणूस कसा आहे ?“

“काय विचारता साहेब ? फार राजा माणूस ? आणि सिने इंडस्ट्रीत कसला वट आहे त्यांचा? का हो साहेब, त्यांनी तुम्हाला काही ऑफर दिली आहे का?”
“ऑफर तर दिली आहे .पण रोल फारसा बरा नाहीय”

“साहेब,रोल चांगला किंवा वाईट नसतोय . आपण त्याचे सोने करायचे असतेय . आणि तुमच्यावर जग्गू साहेबांची मर्जी आहे . बघा तुम्हाला कुठल्या कुठे नेऊन ठेवतात”

“फार छान सल्ला दिलात तुम्ही. मी तर हो म्हणू का नाही सांगू अश्या संभ्रमात होतो.”

“हा चान्स सोडू नका साहेब “

रूमबॉय बरोबरच्या संभाषणातून एक बाब स्पष्ट झाली, निदान जग्गू फसवणारा तरी नाही . _________________________________________

अश्विन संध्याकाळी खेळायला खाली गेला होता . तो रात्र झाली तरी वर आला नाही.मीनाक्षीने बाल्कनीतून
हाक मारली “आश्विन वर ये .मी चकोल्या केल्यात .गरम गरम खाऊन घे “

एक वात्रट मुलगा म्हणाला “काकू मी पण येऊ”

“ये.तू पण ये.तुझ्यामुळे तरी तो घरी येइल”

अश्विन आला ,तिने चकोल्या डीशमध्ये वाढून घेतल्या. अश्विन म्हणाला “बाबा नाही आले?”

“दिसतायत का तुला ?”

“पण का नाही आले ?मी त्यांना फोन करू ?”

“नको. मी मघाशी फोन केला होता”

“काय म्हणाले बाबा?” .

“ते म्हणाले त्यांना खूप काम आहे. सारखा सारखा फोन करून त्यांना त्रास देऊ नका”

“पण तू तर म्हणत होतीस की मला वेळ नाही .तिथेच कोणी मिळते का बघा .असे का म्हणालीस”

“बरेच लक्ष असते की तुझे.,बाबा म्हणत होते की त्यांना रविवारी सुटी आहे तर तुम्ही पण या.”

”मग जाऊ या ना आपण.मला मुंबई बघायची आहे.मला समुद्रपण बघायचा आहे”

“असे एकाएकी कसे जाता येईल .आपण दिवाळीच्या सुटीत मुंबईला जाऊ या “

अश्विनचा मित्र विराज आला आणि दारातच उभा राहिला.

मिनाक्षी म्हणाली “अरे दारात का उभा आहेस ?आत ये ना”

“मी अश्विनला घरी न्यायसाठी आलोय .”

“अरे इतक्या उशिरा ? आता जाणार कधी . परत येणार कधी ?”

“त्याचा आज आमच्याकडे नाइट आऊट आहे”

”काय सगळे परस्पर ठरविता रे तुम्ही . आता मी घरी एकटी राहू का? आज तू आमच्या कडे रहा.पुढच्या शनिवारी आश्विन तुमच्याकडे येइल.”

“माझा नाइट सुट आणला नाहीय. मला नाइट सूट शिवाय झोप येत नाही “

“फारच लाड चाललेत ह ! मी रमाकांत भाउजींना फोन करून तुझे कपडे मागवून घेते.”

मीनाक्षीने मधुराला फोन केला . मधुरा म्हणाली “अग,एवढे करण्यापेक्षा तू पण इकडे रहायला ये ना ? मी ऑमलेट ब्रेड करते”

“आमचे जेवण झालय.तुझ्याकडे कॉफी घेऊ .”

विराज आणि आश्विन खूष झाले.एकमेकांना टाळ्या देऊन त्यांनी आनंद व्यक्त केला.

मिनाक्षी म्हणाली “सगळ तुमच्या मनासारखे करून घ्या “ ______________________________________________

केदारला सकाळी अंमळ लवकर जाग आली.शनिवार असल्याने कोर्टाला सुटी होती . पण तिळवे वकिलानी काही पूर्तता करायला सांगितले होते . त्यासाठी आवरुन बाहेर पडत असताना केदारच्या मनात विचार चक्र चालूच होते . आधी त्याने निर्णय घेतला होता की नकार देऊन मोकळे व्हायचे . पण Room boy म्हणाला ही संधी सोडू नका .त्याची मनस्थिती पुन्हा दोलायमान झाली .
तिळवे वकिलांनी सांगितल्याप्रमाणे, त्याने एक इंजिनिअरिंग फर्म शोधून काढली ,तिथल्या ड्राफ्टसमन कडून त्याने रीव्हाईज ब्लूप्रिंट तयार करून घेतला . तिळवे खूष झाले ते म्हणाले “आपली केस एकदम फुलप्रूफ झालीय.तुम्ही सोमवारी हायकोर्टात या,अपील दाखल करून टाकू”.

केदार परत हॉटेलवर आला . आता जग्गू येइल, त्याला काय सांगायचे. त्याचा निर्णय होइना. तो रूममध्ये आला तर त्याचा मोबाईल वाजत होता. त्याने घाईघाईने फोन घेतला .

मिनाक्षी बोलत होती “अहो कुठे आहात तुम्ही ?.आणि फोन का उचलत नाही ?. सकाळपासून मी चारदा फोन केला.”

“अग ! सकाळी मी लवकर वकिलाकडे गेलो .तेंव्हा गडबडीत फोन हॉटेलमध्ये विसरून गेलो.पण एवढे काळजी करण्यासारखे काय आहे . मी चांगल्या हॉटेलात आहे.सुरक्षित आहे “

“का कोण जाणे पण मला खूप काळजी वाटली “

“अजिबात काळजी करू नकोस .मी अगदी मजेत आहे “
“बरे झाले बाई.ठेवते .“
मिनाक्षीच्या फोनमुळे त्याने पुन्हा नकार देण्याचा निश्चय केला.

थोड्याच वेळात रिसेप्शनमधून रवीचा इंटरकॉमवर निरोप आला की जग्गू साहेब अर्ध्या तासात येताहेत.कृपया रूममध्येच थांबा .
जग्गुने आल्याआल्या प्रश्न केला “क्या हाल है”

“रातभर मैने बहुत सोचा ,लेकीन मुझे लगता है की मै इस झमेलेमे ना पडू तो अच्छा है.”

“इसमे कोई झमेला नही है.ये कार्यक्रम रेवतीजीके घरपर होगा . सिर्फ घरके लोग मौजूद होंगे.तुम्हारे साथ रेवातीकी शादीकी रस्मे होंगी . बादमे खाना होगा . सवेरे दस बजेसे दोपहरके दो बजेतक सब हो जायगा”

“वो सब ठीक है .लेकीन रेवतीको कुछ पिडा है इसलिये उसके साथ शादी करना कितना अजीब लगता है रेवती फिल्म लाइनमे है . तो उसने ऐसी बातोपर विश्वास रखना ठीकही है . लेकीन मैने अंधश्रद्धाका अनुपालन किया तो लोग मुझपर हसेंगे”.

“नही.यहाँ लोगोका कुछ संबंध नही . क्योकी ये बात पुरी तरहसे सिक्रेट रहनी चाहिये . हम तो पुरी सिक्रेसी रखेंगे.और आपभी ये बात किसीको नही बतायेंगे “

“मेरे मनमे और भी प्रश्न है ”

“तो पुछो ना.”

“वैसे भी ये झुठमूटकी शादी है .ठीक है ! लेकीन ऐसी शादी करनेसे मेरा क्या फायदा?.”

“मान लो की तुमने शादिकेलीये हा कर दिया . तो तुम्हारी शादी कल हो जायगी . तुम्हारे लिये कलका दिन कितना सुनेहरा होगा . रेवतीकेसाथ फेरे होंगे , तुम लोग एक दुसरेको माला पेहेनाओंगे, तुम्हारा रेवतीकेसाथ खाना होगा . ये कितना थ्रिलिंग एकस्पीरीएंस होगा ? हो सकता है तुम्हारा और कर्णिक परीवारका मेलजुल बढेगा . तुम्हारा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा हो ही जायगा . रेवतीको सिर्फ देखनेकेलीये लोग उसके बंगले के सामने घण्टाघण्टा खडे रहते है . यहा तो रेवती तुम्हारी दोस्त बन जायगी”.

“आपने बहुत अच्छी तरहसे मुझे समझाया , फिर भी मेरा मन कतराता है”

“कतराने जैसी कोई बात नही . तुम हमारी मदद कर रहे हो | .तो हम तुम्हे धोखा कयो देंगे |. ”

“आपने इस काम केलिये मुझे कयो चुना?”

“क्योकी आप थरो जंटलमन है.मुझे यकीन है की बादमे आप रेवतीको ब्लॅकमेल नही करोगे”

“आपने मेरी फोटो रेवतीको दिखाई क्या?”

“अच्छा हुवा आपने याद दिलाया” असे म्हणून जग्गुने मोबाईलमधला एडीट केलेला फोटो त्याला दाखवला रेवती आणि तो एकमेकाला खेटून उभे आहेत असा फोटो पाहून त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले . तो फेक फोटो आहे हे माहित असूनही तो लाजला . जग्गू म्हणाला “अभी भी कोई शक है?”
केदारने मान हलवून आता काही शंका नाही असे सूचित केले . जग्गुने सोयीस्कररीत्या त्याचा अर्थ लग्नाला होकार असा गृहीत धरला.

तो म्हणाला “ तो जैसा मैने पहेले कहा , कल सबेरे रेवतीके बंगलेपर शादी होगी. शादीमे सिर्फ घरके लोग होंगे.आपको लेनेकेलीये रेवतीकी गाडी आयेगी . गाडी नंबर ४१४१. ब्लॅक लोगन गाडी है. बस, आप नऊ बजे तैयार रहेना.और कुछ पूछना हो तो पुछो.”
“कुछ नही.”.
आपल्यावर होकार लादला गेलाय हे त्याच्या लक्षात आले पण निक्षून नकार द्यावा असेही त्याला वाटले नाही .

जग्गुने त्याचे व्हिझीटिंग कार्ड केदारला दिले आणि म्हणाला “कोई भी प्रॉब्लेम हुवा तो मुझे फोन करना. इसपर मेरा फोन नंबर है. तो मै चलू ?. मुझे कुछ तैयारी करनी है”
“ ओके बाय .”
जग्गू लगबगीने बाहेर पडला.तो गेल्यावर केदारला चुटपूट लागली . आपला निर्णय चुकला तर नाहीना ? आपण विवाहित आहोत हे सांगायचे टाळले ,त्यामुळे काही प्रॉब्लेम तर होणार नाहीना अशी शंकाही भेडसावत होती.

पण दुसरीकडे त्याला खूप रोमांचकारी सुद्धा वाटत होते.उद्या दिवसभर आपण रेवतीच्या घरी पाहुणा म्हणून वावरणार आहोत. थोड्या कालावधीसाठी का असेना आपण कर्णिक कुटुंबाचा घटक असणार आहोत.आणि जग्गू म्हणाला ते खरे झाले तर रेवती आपली कायमची मैत्रीण होणार आहे . Not bad .

( क्रमशः )

Group content visibility: 
Use group defaults

सध्या, मी मॅरेज mystique ही कथा मी मायबोलीवर प्रकाशित करीत आहे . मागील, "भाग ३" वर उमटलेल्या प्रतिक्रियांबद्दल मी खालील खुलासा करत आहे.

ही कथा कादंबरी स्वरूप म्हणजे बऱ्यापैकी मोठी म्हणजे पंधरा ते सोळा भागांची आहे. तसेच ही एक " गूढ कथा " आहे. जे संदर्भ आणि काही घटना ह्या अत्ता जरी काही अंशी अस्थायी वाटू लागल्या तरी ते संदर्भ आणि त्या घटनांचे अर्थ कथेच्या उत्तरार्धात हळू हळू उलगडू लागतील . तसेच एक कथानक मध्येच सोडून दुसरेच कथानक मधेच कसे काय बरे सुरु झाले? असे वाचकांना वाटण्याचीही शक्यता आहे .

आपल्या प्रतिक्रिया बद्दल आभारी आहे .