मॅरेज Mystique ! ( भाग ३ )

Submitted by र. दि. रा. on 7 May, 2019 - 12:20

मागील भागाचे धागे :
भाग १ :- https://www.maayboli.com/node/69844
भाग २ :- https://www.maayboli.com/node/69853

भाग ३ :

लॅव्हिश ब्रेकफास्ट झाल्यावर बापुरावांनी ऍडव्होकेट चंद्रचुडाना फोन करून आपण मुंबईला येऊन हॉटेल ला मेरीडनला थांबल्याची खबर दिली.आता काय दिवस रिकामाच होता . दिमतीला ला मेरीडन हॉटेल होते.ऐश करावी तेवढी थोडी होती.हॉटेलच्या लग्झरी वातावरणात वावरताना छान वाटत होते.फाईव्ह स्टार हॉटेलात केदार पहिल्यांदाच आला होता.त्यामुळे तो अगदी भारावून गेला होता.

मंडळींनी दुपारी नॉनव्हेज जेवण घेतले . थोडी वामकुक्षी, नंतर चहा असे मस्त एन्जॉय केले. सहाच्या सुमाराला चंद्रचूड वकील आले . सोबत एक ज्यूनिअर वकील तिळवे आले होते. वेळ न घालवता चंद्रचूड म्हणाले “सांगा,काय वाद आहे”

केदारने व्यवस्थित ब्रीफिंग केले.अधून मधून वकील साहेब “जागा दिल्याचा हुकूमनामा बघू?” “खाते उतारा झालाय का ?” असे प्रश्न विचारून नीट माहिती घेत होते.त्यांच्या नजरे समोर सगळे चित्र तयार झाल्यावर ते म्हणाले

“ तिळवे, मी तुम्हाला मुद्दे सांगतो तुम्ही नोटिंग करून घ्या. --

सुमारे पंच्च्याहत्तर वर्षापूर्वी त्यावेळचे भद्रावतीचे संस्थानिक वीरभद्र डबीर यांनी सरस्वती विद्या प्रसारक मंडळी या संस्थेची
स्थापना केली.आणि संस्थेला शाळा बांधण्यासाठी मरगळमाळ मधील नऊ एकर जागा हुकूमनामा करून
दिली. सुरुवातीला संस्थेने दोनचार वर्ग बांधले असतील .तरीही राजेसाहेबांनी दीर्घ मुदतीचा विचार करून नऊ एकर जागा
दिली . कारण शैक्षणिक संस्था पिढ्या न पिढ्या चालणार असतात आणि कालानुरूप त्याची जागेची गरज वाढत असते .
ही शैक्षणिक संस्था सरकारी होती आणि जागाही सरकारीच आहे .त्यामुळे इथे जागेचे हस्तांतर झालेले नाही तर फक्त जागा
विशिष्ठ करणासाठी इयरमार्क केली आहे . त्यामुळे सरकारांनी दिलेला हुकूमनामा यथास्थित आहे .

ज्या अर्थी जागेचे नाव मरगळमाळ असे आहे , म्हणजे एखाद्या मोहिमेवर जाण्या आधी सैनिकांची जमवाजमव आणि सराव
इथे होत होता . त्या अर्थी ही जागा सरकारी आहे . ही जागा खाजगी असू शकत नाही. या उपर जागेच्या मालकी संबधात
वादीकडे काही पुरावा असेल तर वादीने हजर करावा. सेशन कोर्टाने सुमोटो डीआयएलआर यांचा अहवाल मागवण्याची
गरज नाही. सध्या शैक्षणिक इमारती , लायब्ररी , प्रयोगशाळा, खेळाची मैदाने या मध्ये पाचसहा एकर जागा व्यापलेली आहे
आणि रिकामी जागा संस्थेला नजीकच्या काळात नवीन कोर्सेस सुरु करण्यासाठी लागणार आहे . समाजाला अत्यंत
आवश्यक असणाऱ्या शिक्षण संस्थेकडील जागा तूर्तास अतिरिक्त वाटत असली तरी ,इतर कुणीही त्यावर अशा तऱ्हेने हक्क
सांगू नये . तरी राजेंद्रसिंह डबीर यांचा दावा मुळातच खारीज करण्यात यावा”

चंद्रचुडांचे डिकटेशन संपले. मिनिटभर शांतता पसरली नंतर चेअरमन म्हणाले
“वा: ! वकीलसाहेबानी काय छान पॉइंटस काढलेत.आमची काळजीच मिटली.”

चंद्रचूड म्हणाले “उद्या तुम्ही ऑफिसला या.मी नसेन .पण तिळवे तुम्हाला अपिलाचा ड्राफ्ट दाखवतील तुमची केस तेच चालवतील .मी गाईड करेन.”

“चालेल साहेब,आम्ही उद्या येतो”,

“तुम्ही आणखी एक काम करा.तुमचे नवीन काय काय प्रोजेक्ट्स आहेत त्याचा ठराव करा .आणि त्यानुसार ब्लू प्रिंट तयार करून लावा.म्हणजे जागा रिकामी दिसणार नाही ‘”

चेअरमन म्हणाले “हो साहेब. गेल्यावर पहिले हेच काम करतो.”

“बराय.निघतो .”

“आभारी आहे साहेब. तुम्ही आमच्यासाठी इतक्या तातडीने धाऊन आलात“

चंद्रचूड वकील गेल्यानंतर चेअरमन म्हणाले “रानडे सर ,आता मी आणि बापूराव भद्रावतीला निघतो.तुम्ही उद्या तिळवे वकिलाच्या मागे लागून अपील तयार करून घ्या.तुम्हाला सह्याचे अधिकार आहेत ना ?”.

“हो.”

चेअरमन आणि बापूराव गेल्यावर एवढ्या मोठ्या सूट मध्ये केदार एकटाच राहिला .

______________________________________

दुसरे दिवशी तिळवे वाकीलाकडचे काम संपवून केदार टॅक्सी करून हॉटेलवर आला . त्याला खूप प्राउड फील आला होता. कोर्टाचे काम छान मार्गी लागले होते . त्याच्या कामाचे कौतुक झाले होते . हॉटेलचे अलिशान वातावरण, तिथे वावरणारे यशस्वी बिझनेसमन आणि त्यांच्या गर्विष्ठ बायका , त्याची सरबराई करणारा विनयशील सेवक वर्ग,एका वेगळ्याच जगात आपण आलो आहोत असे त्याला वाटू लागले . तो लाउंजमध्ये एका कोपऱ्यातल्या सोफ्यावर विसावला.एवढ्यात त्याच्या लक्षात आले की मिनाक्षीला फोन करून खुशाली कळवली पाहिजे.फोन रिसीव्ह करताच मिनाक्षी रागानेच म्हणाली -

“ हॅलो फोन करायला आता फुरसत मिळाली का? ”

“अग, हो .कामही खूप होती.आणि चेअरमन सतत बरोबर होते . ते गेले तेव्हा कुठे मला सवड मिळाली ”

“ठीक आहात ना तुम्ही ?”

“नुसता ठीक नाही.एकदम मजेत आहे. काय अलिशान हॉटेल आहे .ब्रेकफास्ट काय ,जेवण काय ,नुसती चैन चालली आहे.”

“ पुरे पुरे.आता या परत .नाहीतर आम्हाला विसरूनच जाल”.

”अग,मीना ,तू आणि आश्विन या ना इकडे..चेअरमन परत गेलेत.एवढ्या मोठ्या सूटमध्ये मी एकटाच आहे.तुम्ही दोघे या .मस्त ऐश करू “

”काहीतरी काय बोलताय.असे तडकाफडकी मला येत येइल का ? तुम्हीच करा मजा.”

“मी एकटा काय मजा करणार?”

”मग बघा तिथे कोणी मिळते का?”

जेंव्हा केदार एकटाच हॉटेलात आला तेंव्हाच रिसेप्शानिस्ट रवीने त्याला पहिले . त्याने लगेच जग्गुला फोन केला “जग्गुसाब तुम्हारा बंदा आया है.अकेला है.”

‘‘ रवी मै तुरंत निकलता हू. फिरभी मुझे आनेमे आधा घंटा तो लगेगा . उसे रोक के रखना”

‘‘ हा.आप आरामसे आईये .मै उसे रुकनेको बोलता हू “

रवी केदारच्या जवळ आला आणि अदबीने उभा राहिला. केदार फोनमध्ये म्हणाला
“ मीना मला भेटायला कोणीतरी आलेत.मी तुला नंतर फोन करतो.” फोन कट करून तो म्हणाला “ यस प्लीज ”

“ तुम्ही अर्धा तास इथे थांबू शकाल का ? ”

“ हो, थांबेन की.काही काम आहे का? ”

“ तुम्हाला भेटायला जग्गू ओसवाल येणार आहेत ”

“ जग्गू ओसवाल कोण?”

“ जग्गू म्हणजे रेवती देवींचे सेक्रेटरी”

“ पण त्यांचे माझ्याकडे काय काम असणार.”

“ येतायतच ते.आल्यावर तेच सांगतील. मी तुमच्यासाठी कॉफी पाठवतो ”

केदार चांगलाच विचारात पडला.रेवतीच्या सेक्रेटरीचे आपल्याकडे काय काम असणार ? बहुतेक आपल्याला सिनेमात काम मिळणार असेल ? किंवा ऍड करायला मिळणार असेल .काहीही असू दे.बिचकायचे नाही. हा चान्स सोडायचा नाही.तो उत्सुक मनाने जग्गुची वाट पाहू लागला . त्याला फार वेळ पहावी लागली नाही. ऍश कलरच्या जीन्सवर फुलाफुलाचा बुशशर्ट घातलेला,चाळीशितला गृहस्थ त्याच्या समोर हासत मुखाने उभा होता तो म्हणाला

“ हाssय,आय एम जग्गू ”

उठून उभा रहात केदार म्हणाला “हाय, मायसेल्फ केदार रानडे ”

जग्गू म्हणाला “ यहा बहुत भीड है .पीछे गार्डनमे बैठते है ”

जग्गू त्याला घेऊन गार्डनमध्ये आला.गार्डन मध्ये दहा बारा लहान कॅनोपी होत्या.ते दोघे एका कॅनोपीमध्ये बसले.जग्गू केदारकडे सूचक नजरेने पाहत होता.पण बराच वेळ झाला तरी बोलायला सुरुवात करेना.केदारच म्हणाला “मै भद्रावतीमे एक स्कूलमे चिटणीस पदपे काम करता हू .कॉलेजके दिनोमे मै ड्रामामे acting करता था .अभीभी स्कूलके कल्चरल ऍक्टिव्हिटी मैही देखता हू .”

केदारच्या बडबडीकडे जग्गुचे लक्ष नव्हते तो म्हणाला “मेरा कुछ अलगही काम है ”

“हा.बोलिये ना .”

“ आप रेवतीदेवीको तो पहेचानतेहि होगे ”

“ हा . उन्हे कौन नही पहेचानता ”

“ अण्णासाब रेवतीकी शादी करवाना चाहते है ”

“अण्णासाब कौन ?”

“ अण्णासाब याने की रेवतीके पिता ”

“ अच्छा ”

“ और अण्णासाबने दुल्हा ढूंढनेकी जिम्मेदारी मुझपर सौपी है.”

“ तो मै क्या मदद कर सकता हू ”

“ मै चाहता हू की आप रेवतीकेसाथ शादी करे”.

“ये कैसे मुमकिन है. रेवती जैसी मशहूर फिल्मस्टार मेरे जैसे सामान्य आदमीकेसाथ शादी कैसे करेगी ? ”

“आप कर्णिक फॅमिलीको जानते नाही.वो मिड्लक्लाससे उभारकर आये है.और आजभी उनका बर्ताव मिड्लक्लास जैसा ही है .मै आपको एक उदाहरण देता हू , कोई त्योहार हो,जैसे की संक्रांत .रेवती डायरेक्टरसे लेकर स्पॉटबॉयतक खुद तिलके लड्डू बाटती है.बहुत कॉर्डियल है वो लोग.”

“फिरभी मुझे देखे बिना ,जाने बिना वो शादी कैसे करेगी. ”

“वो क्या है, कुछ कारणवश रेवती और अण्णासाबको अलग अलग रहेना जरुरी है .लेकीन मुंबई जैसे शहरमे अलग रहेना पोसिबल नही है .और लोगोकोभी शक होगा की ये क्या लफडा है . रेवती अकेली क्यो रहेती है ?.तो गुरुजीने बताया की उसकी शादी कर देनेपर लडकी पराई हो जाती है .फिर उनको एकही घरमे रह्नेमे कोई दिक्कत नही ”

“अच्छा झूटमुठ की शादी करनी है”.

“ नही, नही.ये शादी झूटमुठकी नही है.फिलहाल हम शादी डिक्लेअर नही कर सकते.उचित समयपर शादीका ऐलान करेंगे.तबतक ये शादी दोनो तरफसे सिक्रेट रहेगी.”

खर म्हणजे जग्गू परेशान झाला.रेवती बरोबर लग्न करण्याच्या प्रपोझलमध्ये इतक्या शंका कोणी काढेल असे त्याला वाटलेच नव्हते.आपण प्रपोज करायचे आणि समोरच्याने उपकृत भावनेने ते स्वीकारायचे अशी त्याला सवय होती.पण तो केदारला सहन करत होता कारण हे सावज अण्णासाहेबांच्या पसंतीस येईल असा त्याचा विश्वास होता.केदार गप्प राहिल्यामुळे त्याने विचारले “तो क्या निर्णय हुवा.”

“ मुझे तो ये बहुत अजीब लगता है .जायदादके लिये झुटी शादी करते है ,मातापिता के हठपर झुठी शादी होती है . लेकीन आप जो कारन बोल रहे है वो बहुत अटपटा लगता है.”

“ तुम्हे शक करनेकी कोई जरुरत नही. हम जिम्मेदार लोग है .हम तुम्हे किसी प्रकारका धोका नही देंगे.और दे भी न ही सकते.सोचो ना .क्या बिगाड सकते है हम तुम्हारा ?”.

“ लेकीन मेरी समझमे नही आ रहा है की ,इस शादीके लिये मुझे क्यू चुना है”

“मैने पहेलेही कहा है की दुल्हा ढूढनेकी जिम्मेदारी अण्णासाबने मुझपर सौपी है . और मैने तुम्हे चुना है. मै कलसे तुम्हे देख रहा हू ,तुम बहुतही जंटलमन हो.तुम रेवतीको ब्लॅकमेल नही करोगे.और शादिकी बात सिक्रेट रखोगे .इतना मै यकीनके साथ कहे सकता हू”

“जग्गुसाब आपने मुझे समझानेकी बहुत कोशिश की है. लेकीन मुझे हिचकिचाहट होती है .रीअली सॉरी “

“ऐसे मत कहो .मैने अचानकसे शादिकी बात छेडी इसलिये तुम्हारे मनमे शक पैदा हुवा .तुम रातमे इतमीलानसे सोचो.हम कल फिर मिलते है “ दोघेही उठले .

जग्गू म्हणाला “क्या मै तुम्हारी फोटो खीच सकता हू”

“हा लीजिये ना”
जग्गुने त्याचा एक क्लोज अप घेतला आणि दुसरा थोडा दुरून घेतला .

“अच्छा कल फिर मिलेंगे”
___________________________

जग्गू हॉटेलातून निघाला आणि थेट बंगल्यावर पोहोचला.अण्णासाहेब हॉलमध्येच काम करीत बसले होते.जग्गूला पाहून ते म्हणाले “काय जग्गू, आज सायंकाळी कसा काय आलास.”

“आपको याद है. चार महिने पहिले आपने मुझपर एक जिम्मेदारी सौपी थी”

“ कुठल्या जिम्मेदारी बद्दल बोलतोयस ?”.

“ रेवतीजीकी शादिकी जीम्मेवारी”.

“ अच्छा .अच्छा .मिळाला का मुलगा ?”

“हा. मिला है . वो हॉटेल ला मेरीडनमे रुका है .मेरी अभी अभी उसकेसाथ बात हुई.”

“आपल्या अटी त्याला मान्य आहेत का ? त्याला म्हणावे हे लग्न अगदी गुपचूप झाले पाहिजे.आणि लग्नानंतर काहीही संबंध ठेवायचा नाही.रेवावर काहीही हक्क दाखवायचा नाही “

“हा सब बताया है “

“इन जनरल लडका ठीक है ना.”

”बिलकुल .पढा लिखा है. किसी स्कूलमे नौकरी करता है .थरो जंटलमन है.ये देखिये ना .मैने उसकी फोटोभी खिंचवाई है “

फोटो पाहून अण्णासाहेब म्हणाले “खरच, सज्जन दिसतो पोरगा.”

एवढ्यात रेवती आली .तिला पाहून जग्गू चपापला.रेवती म्हणाली “काय चाललेय तुमचे.”

कोणीच काही बोलेना .तीच पुढे म्हणाली “माझ्या लग्नाबद्दल चर्चा चालू असेल ना ?”

अण्णासाहेब म्हणाले “बैस मी तुला सांगतो.जग्गुला एक मुलगा भेटलाय .तो शिकलेला आहे,सज्जन आहे.एकदा लग्न करून टाकू म्हणजे तो विषय संपून जाइल.भिजत घोंगडे किती दिवस ठेवायचे ?”

“ पण आईचा विरोध आहे, तर नको ना ? कशाला मुद्दाम तिला दुखवायचे? ”

“ तिला मी समजाऊन सांगतो . ”

“ बर. करा काय करायचे ते . पण सांभाळून . नंतर अंगलट यायला नको” रेवती उठून निघाली जग्गुने हाक मारली

“ रे वss तीssss.”

रेवतीने मागे वळून पहिले. जग्गुने तिचा फोटो काढला आणि मोबाईल मधले app वापरून केदार रेवतीला खेटून उभा आहे असा फोटो स्क्रीनवर तयार केला. तो फोटो पाहून रेवती खूष झाली.पण कृतक कोपाने म्हणाली

“काही तरी असतंय तुझ”

अण्णाचीही उत्सुकता ताणली गेली त्यांनी “बघू बघू” म्हणत मोबाइल वरचा फोटो पहिला त्यांनीही खुशीचा
अभिप्राय दिला. “मग लग्नाची तारीख ठरवायची का ?”

“अभी उसने फायनली हा नही कहा है . मै कल उसे मनाता हू .फिर तारीख पक्की करते है”

“तुझ्या सारखा पटवून देणारा असल्यावर तो काय नकार देणार?”

“चलो मान लेते की कल वो हा कहेगा.तो परसो संडेको शादी रख सकते है”

“चालेल. मी सगळ्या नोकरांना रजा देऊन टाकतो.तू आणि पार्टनर असलात म्हणजे पुरे”

“नौकारोको छुटी मत दिजीये.फिर उनको शक हो जायेगा.वैसेभी ड्रायव्हर और सेक्युरिटीवाले तो रेहेंगे. उससे अच्छा है की हम नौकरोको बता देते की रेवतीको कुछ पिडा है और पंडितजीने उसकी शादी कर देनेकी सलाह दी है.इस तरह हम उनको हमारे प्लॅनमे शारिक करते है.शादीकेबाद उनको बढीया खाना और बक्षिसी दे देना.वो खुश हो जायेंगे”

“ जेवणाचा आणि व्याप कशाला? ”
“ शादी है और खाना नही ? ठीक नही लगेगा.खाना रखनेसे फंक्शन ग्रेसफुल हों जाता है”.
“ ठीक है मै केटरर को बोलता हू .कल तू उसको शादीकेलिये तैयार कर.”
“ हा. वो मै कर दूंगा ”

( क्रमशः )

Group content visibility: 
Use group defaults

केदारची पहिली प्रतिक्रिया ‘मै शादीशुदा हूं और मेरा एक बेटा भी है‘ असायला हवी होती (ना)?> >>>>+ १

आणि लगेच लग्नाची तयारी केटरर वैगेरे Uhoh बाजारात गहु आणि करायच्या पोळ्या.

अण्णासाहेबांचा नक्की काय प्लान असेल बरे??
===

> बापूराव चौगुलेना जी जागेची केस आठवली ती स्वातंत्र्यपूर्व काळातली होती.त्यावेळी भद्रावती हा जिल्हा झाला नव्हता.तर ते स्वतंत्र संस्थान होते,त्यावेळचे संस्थानिक वीरभद्र डबीर यांनी सरस्वती विद्या प्रसारक मंडळीना शाळा बांधण्यासाठी ही मरगळ माळावरची नऊ एकर जागा दिली होती.आणि आता पंच्याहत्तर वर्षानंतर संस्थानिक वीरभद्र डबीर यांच्या भावाच्या नातवाने केस केली होती की ही जागा त्यांच्या कौटुंबिक मालकीची असून वीरभद्र डबीर यांनी त्यांच्या लहान भावाच्या संमती शिवाय ही जागा परस्पर विद्या प्रसारक मंडळीना दिली.तरी त्यांच्या हिश्श्याची एक एकर दहा गुंठे जागा त्यांना परत मिळावी. >
> सुमारे पंच्च्याहत्तर वर्षापूर्वी त्यावेळचे भद्रावतीचे संस्थानिक वीरभद्र डबीर यांनी सरस्वती विद्या प्रसारक मंडळी या संस्थेची
स्थापना केली.आणि संस्थेला शाळा बांधण्यासाठी मरगळमाळ मधील नऊ एकर जागा हुकूमनामा करून
दिली. सुरुवातीला संस्थेने दोनचार वर्ग बांधले असतील .तरीही राजेसाहेबांनी दीर्घ मुदतीचा विचार करून नऊ एकर जागा
दिली . कारण शैक्षणिक संस्था पिढ्या न पिढ्या चालणार असतात आणि कालानुरूप त्याची जागेची गरज वाढत असते .
ही शैक्षणिक संस्था सरकारी होती आणि जागाही सरकारीच आहे .त्यामुळे इथे जागेचे हस्तांतर झालेले नाही तर फक्त जागा
विशिष्ठ करणासाठी इयरमार्क केली आहे . त्यामुळे सरकारांनी दिलेला हुकूमनामा यथास्थित आहे .
ज्या अर्थी जागेचे नाव मरगळमाळ असे आहे , म्हणजे एखाद्या मोहिमेवर जाण्या आधी सैनिकांची जमवाजमव आणि सराव
इथे होत होता . त्या अर्थी ही जागा सरकारी आहे . ही जागा खाजगी असू शकत नाही. या उपर जागेच्या मालकी संबधात
वादीकडे काही पुरावा असेल तर वादीने हजर करावा. सेशन कोर्टाने सुमोटो डीआयएलआर यांचा अहवाल मागवण्याची
गरज नाही. सध्या शैक्षणिक इमारती , लायब्ररी , प्रयोगशाळा, खेळाची मैदाने या मध्ये पाचसहा एकर जागा व्यापलेली आहे
आणि रिकामी जागा संस्थेला नजीकच्या काळात नवीन कोर्सेस सुरु करण्यासाठी लागणार आहे . समाजाला अत्यंत
आवश्यक असणाऱ्या शिक्षण संस्थेकडील जागा तूर्तास अतिरिक्त वाटत असली तरी ,इतर कुणीही त्यावर अशा तऱ्हेने हक्क
सांगू नये . तरी राजेंद्रसिंह डबीर यांचा दावा मुळातच खारीज करण्यात यावा” >

सरकारच अस्तित्वात नसताना, संस्थानातली जमीन सरकारी असू शकते का विचार करतेय...

मी मॅरेज mystique ही कथा मी मायबोलीवर प्रकाशित करीत आहे . वरील प्रतिक्रियांबद्दल मी खालील खुलासा करत आहे.

ही कथा कादंबरी स्वरूप म्हणजे बऱ्यापैकी मोठी म्हणजे पंधरा ते सोळा भागांची आहे. तसेच ही एक " गूढ कथा " आहे. जे संदर्भ आणि काही घटना ह्या अत्ता जरी काही अंशी अस्थायी वाटू लागल्या तरी ते संदर्भ आणि त्या घटनांचे अर्थ कथेच्या उत्तरार्धात हळू हळू उलगडू लागतील . तसेच एक कथानक मध्येच सोडून दुसरेच कथानक मधेच कसे काय बरे सुरु झाले? असे वाचकांना वाटण्याचीही शक्यता आहे .

आपल्या प्रतिक्रिया बद्दल आभारी आहे .