आयुष्य weds स्वप्न

Submitted by प्रतिक सोमवंशी on 1 May, 2019 - 21:27

एकदा की नै, स्वप्नांच आयुष्याशी लग्न होत. लग्नाच्या वऱ्हाडात आशा, अपेक्षा, इच्छा, आकांक्षा हे सगळे नातेवाईक आलेले असतात. जोडपं खूप आनंदात असत, कारण आहेरात खूप सार सुख आणि समाधान आलेलं असत. पण त्यांना माहीत नसत स्वप्नांच्या कुंडलीत एक वर्तमान नावाचा मंगळ घर करून बसलेला असतो.
तस दोघांचे विचार एकमेकांच्या पूर्ण विरुद्ध, आयुष्य reality मध्ये जगायच आणि स्वप्ने fantasy मध्ये. जसे जसे दिवस पुढे गेले तस तस आयुष्य आजारी पडू लागल. स्वप्नांना तो दवाखान्याचा खर्च आता परवडणार नव्हता last stage च्या cancer सारख झाल होत आयुष्याच , आता त्याच्या हृदयाचे ठोके cardiogram वर हळू हळू एका सरळ रेषेत चालायला सुरुवात झाली होती . भूतकाळ नावाच्या नामांकित डॉक्टरांनी एव्हाना सांगून टाकलय, कमी दिवस राहिलेत त्याच्याकडे, आम्ही सगळे प्रयत्न करून थकलोत आता इथून पुढे देवाची कृपा. आता आयुष्याला जगवण्याचा एकच उपाय आहे काहीतरी करून त्याच्या शेवटच्या इच्छा पूर्ण करणे. स्वप्नांनी त्या इच्छा पैशाने विकत घेता आल्या असत्या तर केंव्हाच पूर्ण केल्या असत्या पण त्यांना विकत घ्यायला लागत ते समाधान आणि आहेरात आलेलं समाधान केंव्हाच संपून गेलंय. मग काय, स्वप्नांनी ते भविष्याकडून उधार आणल एका अटीवर, की त्यांना तडजोड करावी लागेल. आता मात्र स्वप्नांना तडजोड करन भाग होत काहीही करून स्वतःच नमत घ्याव लागणार होत, मग त्यात स्वतःचा बळी गेला तरी हरकत नव्हती पण ज्याने त्यांच्यावर जीवापाड प्रेम केल त्या आयुष्याला जगवणे जास्त गरजेचे होते.
शेवटी, केली स्वप्नांनी तडजोड, स्वतःच्या इच्छा, आकांक्षाशी कायमचे नाते तोडून टाकले. आणि आयुष्याच्या जगण्यात एक नवीन आशा आणून ठेवली, कदाचित पुन्हा प्रेम होईल त्यांच पण सध्या इथे काडीमोड घेणेच आयुष्याला जगवण्यासाठी महत्वाचे ठरेल, आणि तेच केल स्वप्नांनी. आता आयुष्य जगतय पण त्याला एक खंत कायम सलत राहणार स्वप्नांनी त्याला जगवण्यासाठी स्वतः तडजोड केली आणि स्वतःला लांब केल त्याच्यापासून. अजूनही जिवंत आहेत ती स्वप्ने कुठेतरी मनाच्या शहरात एका अडगळीच्या गल्लीत, धूळ खात पडलेली, अजूनही आठवण काढून रडत बसतात आयुष्याची, अजूनही आस लागलेली आहे त्यांना कधीतरी तो येईल त्यांचे अश्रू पुसून त्यांना प्रेमाने जवळ करेल आणि पुन्हा त्यांच्यासोबत जगेल. आयुष्याला पण येते हो त्यांची आठवण कारण पहिल प्रेम कुणी कधी विसरत का?
©प्रतिक सोमवंशी
Follow me for more writing
Instagram @shabdalay

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुपच सुंदर!!

पण ऐवढ्या सुंदर कल्पकतेला एकही प्रतिसाद का नाही? Uhoh