गेम ऑफ थ्रोन्स - हेटर्स क्लब

Submitted by कटप्पा on 27 April, 2019 - 11:51

काय तू गेम ऑफ थ्रोन्स पहिला नाहीयस? अरे रे.. काय फायदा तुझ्या आयुष्याचा??
असली वाक्ये ऐकून कंटाळलोय.
अरे नाही बघत आणि बघायचा पण नाहीय तुमचा गेम ऑफ थ्रोन्स, आवड आपली आपली।
एक दोन एपिसोड बघितले, नाही इंटरेस्टिंग वाटत, आता काय जीव घेणार का.

हा धागा तमाम गेम ऑफ थ्रोन्स हेटर्स ना समर्पित।

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हॅ पॉ , गॉट खऱ्या आहेत, असं कोण म्हणतंय? आणि त्यांचा गोऱ्या लोकांशी काय संबंध?

कायच्या काय प्रतिसाद.

आपल्याकडच्या रामायण महाभारत या मालिका म्हणजे ती महाकाव्य नव्हेत. दोन्ही वेगळ्या गोष्टी (इथे गोष्ट म्हणजे स्टोरी नव्हे).

त्या मालिकांचा तीन दशकांपूर्वीचा काळ अनुभवलेला आहे, म्हणूनच सांगतोय.

पण भरत, सामान्यत: जी मनोधारणा दिसते ती लिहिली मी.

माझ्या प्रतिसादाला तुम्ही 'कायच्या काय' वगैरे म्हणत आहात? कश्यामुळे?

एकदा तुम्ही तुमचा प्रतिसाद वाचा आणि माझाही!

मी कलाकृती बद्दल बोलते आहे.
स्वदेशी कलाकृती आधी पहाव्यात, असे म्हणणे आहे.

बाकी तुमचे हॅपॉ, GOT, महाभारत आणि रामायण मालिकांबद्दलचे जे मत आहे, त्याबद्दल मला बोलायचे नाही. कारण तो ज्याचा त्याचा दृष्टीकोन असतो.

तुम्ही ज्याला(स्वदेशी) कलाकृती म्हणताय त्या (मालिकां)ना मी कलाकृती म्हणत नाही. पीरियड.

मग स्वदेशी आधी पहा असं म्हणायची ही गरज नाही. ज्या त्या दृ.
तुम्हांला त्रास दायक अशी आणखी एक माहिती.
मायबोलीवर पाकिस्तानी मालिका आवडणाऱ्यांनीही त्या मालिकांबद्दल भरपूर लिहिलंय.
जिंदगी गुलजार है, हमसफर , इ.

सध्या वय वर्ष 20 च्या पुढे असलेल्या बहुतेक भारतीय लोकांना बी आर चोप्रा महाभारत आणि रामानंद सागर रामायण माहीत असेल असा माझा अंदाज आहे .. बहुतेक भारतीय भाषांमध्ये त्या सगळीकडे प्रसारित झाल्या होत्या . पूर्वी घरोघरी टीव्ही नसत तेव्हा ज्यांच्या घरी टीव्ही त्यांच्या घरी या मालिका पाहायला गर्दी व्हायची , मालिकेच्या वेळात गावाकडच्या रस्त्यांवर शुकशुकाट असायचा ( ह्यात बहुधा अतिशयोक्ती असावी ) अशी सांगणारी 70s - 80s ची पिढी आहे ... निदान बहुतेकांना काही एपिसोड पाहून तरी माहीत असतीलच ...

तेव्हा आधी आपल्या देशातल्या कलाकृती बघून घ्या असं सांगणं करेक्ट नाही , बहुतेकांना त्या माहीत आहेतच .. पण आज त्या मालिकांवर भारावून जाऊन बोलावं अशी जनमानसिकता उरलेली नाही ... GOT किंवा तत्सम ऐतिहासिक कालखंड दाखवलेल्या काल्पनिक मालिकेतील एखाद्या युद्धापुढे / राजकिय डावपेचापुढे रामायण महाभारतातली युद्धं - लढाया - कारस्थानं मिळमिळीत वाटणं नैसर्गिक आहे ... मुळात तुलनाच चुकीची आहे ... त्यांचा आपसात काही संबंध नाही ... रामायण महाभारत ही हिंदू धर्माची महाकाव्यं आहेत .. त्या घटना खऱ्या होऊन गेल्या असं मानणारे भरपूर लोक आहेत म्हणून त्या काल्पनिक आहेत असा वाद घालणारे नास्तिक किंवा तत्सम पुढे सरसावतात ..

इंग्रजी मालिका मुळातच काल्पनिक आहेत , त्या कोणी खऱ्या मानत नाहीत , त्यावर होणारी चर्चा ही वेगळ्या लेव्हलची आहे - मनोरंजन करणारी - बुद्धीला खाद्य देणारी आहे ...

उद्या जर कोणी अमुक वर्षांपूर्वी खरोखरच ड्रॅगन होते / व्हाईट वॉकर ( GOT मधले ) असा दावा करायला लागलं तर त्याच्याशीही वाद होतीलच ...

बाकी मुलांनी काय पाहायचं हे त्यांना ठरवू द्यावं , म्हणजे मनोरंजनाच्या बाबतीत .. त्या वयाच्या मुलांना योग्य ते मनोरंजनाचे सगळे पर्याय उपलब्ध करून द्यावेत - म्हणजे पुस्तकं , शक्तिमान , स्पायडरमॅन , हनुमान , रामायण महाभारत , छोट्यांच्या इंग्रजी मालिका - चित्रपट .. त्यांना सूट होईल ते ती निवडतील ..

लेखक : आशुतोष निरंजन जरंडीकर

'गेम ऑफ थ्रोन्स'चा अखेरचा एपिसोड अलिकडेच आला. या मालिकेची लोकप्रियता वर्षागणिक येणाऱ्या प्रत्येक सीझनला वाढतच गेली. 'गेम ऑफ थ्रोन्स' नेमकं आहे तरी काय, ते कोणी लिहिलं, त्यात एवढं वेगळं काय आहे, त्याला एवढी वैश्विक लोकमान्यता मिळण्याचं कारण काय?

१४ एप्रिल २०१४ ची घटना. रात्री १० च्या सुमारास संपूर्ण न्यूयॉर्क मधले लोक अचानक रस्त्यावर उतरले. आतषबाजी सुरू झाली. शहरातले रस्ते रात्रीच्या वेळी गजबजले. सगळीकडे जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं. पण ह्याचं नेमकं कारण काय होतं? तर हा आनंद होता 'जॉफ्री मेल्याचा'. 'गेम ऑफ थ्रोन्स' मालिकेतील अवघ्या १९ वर्षांचा खलनायक मेला, म्हणून न्यूयॉर्क शहरामध्ये आतषबाजी होत होती. 'गेम ऑफ थ्रोन्स' या मालिकेचा प्रेक्षकांवर किती जास्त प्रभाव आहे, हे सांगण्यासाठी हे उदाहरण पुरेसं आहे!

ही घटना आहे २०१४ ची. त्यावेळी 'गेम ऑफ थ्रोन्स'चा चौथा सीझन सुरू होता. साधारण कुठल्याही सिरीजची लोकप्रियता तीन-चार सीझननंतर कमी व्हायला लागते. पण 'गेम ऑफ थ्रोन्स'चं उदाहरण फार वेगळं आहे. २०११ पासून सुरू झालेल्या या मालिकेची लोकप्रियता वर्षागणिक येणाऱ्या प्रत्येक सीझनला वाढतच गेली. ह्याचा पहिला एपिसोड साधारण २२ लाख प्रेक्षकांनी पाहिला होता आणि परवा आलेल्या शेवटच्या एपिसोडची प्रेक्षकसंख्या होती १ कोटी २० लाख. ही आकडेवारीच ह्या मालिकेबद्दल खूप काही सांगून जाते (आणि ही फक्त 'HBO अमेरिका'वर प्रीमियर बघणाऱ्यांची संख्या आहे.). त्यांचं बजेटसुद्धा पहिल्या सीझनला दर एपिसोडमागे ५ मिलियन डॉलर्सचं होतं. तेच आता एका एपिसोडमागे ४० मिलियन डॉलर्सपर्यंत गेलं आहे. सोबत एमी या दूरदर्शनसाठी मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात त्यांचं गेल्या ४ वर्षांतलं वर्चस्व निर्विवाद आहे. २०१९ मध्ये इतर माध्यमांसमोर दूरदर्शनची लोकप्रियता घटत असताना 'गेम ऑफ थ्रोन्स'च्या शेवटच्या सीझनला मिळणारी आणि वाढत जाणारी लोकप्रियता थक्क करणारी आहे.

ही आकडेवारी, लोकप्रियता, समीक्षकांनी केलेली वाहवा पाहिली की अनेक प्रश्न पडतात. जसे की, हे 'गेम ऑफ थ्रोन्स' नेमकं आहे तरी काय, ते कोणी लिहिलं, त्यात एवढं वेगळं काय आहे, याचं प्रसारण कुठे होतं, त्याला एवढी वैश्विक लोकमान्यता मिळण्याचं कारण काय, इत्यादी... १९९१ च्या सुमारास जॉर्ज आर. आर. मार्टिन या अमेरिकन लेखकाने 'अ साँग ऑफ आइस अँड फायर' ही कादंबरी-मालिका लिहिण्यास सुरुवात केली. १९९६ मध्ये त्यातली पहिली कादंबरी 'अ गेम ऑफ थ्रोन्स' या नावाने प्रकाशित झाली. त्यानंतर कालांतराने इतर कादंबऱ्या येत गेल्या. सध्या या कादंबरी मालिकेचे प्रमुख पाच आणि उपकथानक सांगणारे काही खंड प्रदर्शित झाले आहेत.

मार्टिन स्वतः सांगतो, 'माझा आवडता साहित्यप्रकार इतिहास आणि फॅन्टसी हा आहे. माझ्या देशाला म्हणजेच अमेरिकेला २०० वर्षांपेक्षा मोठा इतिहास नाहीये. त्यामुळे मी वाचलेलं ऐतिहासिक साहित्य हे युरोपचं आहे आणि त्यांच्या इतिहासाचा माझ्या लेखनावर प्रभाव आहे.' युरोपच्या इतिहासाची पाने चाळली तर इंग्लंडमध्ये १५ व्या शतकात झालेला 'वॉर ऑफ रोजेस' या नावाने प्रसिध्द असलेला दोन राजघराण्यांतील संघर्ष, स्कॉटलंडमधील कुप्रसिद्ध 'ब्लॅक डिनर' अशा ऐतिहासिक घटनांमधून मार्टिन प्रेरणा घेताना दिसून येतो.

सोबतच कॉर्नवेल, टोल्कीन, टॅड विल्यम्स या लेखकांच्या फॅन्टसी लेखनामधूनही मार्टिन प्रेरणा घेतो. म्हणूनच एक वेगळं कल्पित जग उभं करून त्याला ऐतिहासिक घटनांची जोड देत कथानक लिहिण्याची वेगळी खुबी मार्टिनच्या लिखाणातून दिसून येते. अशा तऱ्हेने त्याचे दोन्ही आवडते साहित्य प्रकार त्याने 'अ साँग ऑफ आइस अँड फायर' मध्ये एकत्र केले. इतिहासातून माणसाच्या कृती आणि त्याचं सोपं रूपक म्हणून सोबत फॅन्टसीची जोड असं काहीतरी आगळंवेगळं मिश्रण मार्टिनने ह्या कृतीतून तयार केलं आहे.

'अ साँग ऑफ आइस अँड फायर' ही काल्पनिक मध्यमयुगीन कथा आहे. सत्ता, संघर्ष आणि अस्तित्व हा या कथेचा गाभा. हा गाभा गडद आणि खोल असल्यामुळे त्याचा कथा विस्तार विस्तीर्ण आहे. त्याचा आवाका समजून घेण्यासाठी आपल्याला त्याच्या भूगोलापासून सुरुवात करावी लागेल. या अद्भुतिकेच्या नकाशामध्ये वेस्टेरॉस आणि एसॉस असे दोन भूखंड आहेत. त्यांच्या मध्ये दोन भूखंडांना विभागणारा समुद्र आहे. आणि वेस्टेरॉसच्या उत्तरेला एका बलाढ्य भिंतीपलीकडे बर्फाच्छादित प्रदेश आहे. या सगळ्या भौगोलिक रचनांनुसार येथील लोक, त्यांचे स्वभाव, उद्दिष्टे आणि गरजा बदलत जातात. एसॉस ही भूमी रुक्ष आहे. येथे शेती हा व्यवसाय अशक्य आहे. त्यामुळे येथे वसलेली शहरे व्यापारी आहेत. व्यापार, गुलामगिरी आणि पराकोटीची आर्थिक विषमता यांमध्ये तेथील माणूस गुरफटला आहे. येथील प्रत्येक शहर स्वतंत्र आहे आणि फक्त व्यापार या एकाच माध्यमातून ती शहरे जोडली गेली आहेत. या उलट अवस्था वेस्टेरॉसमध्ये आहे. येथे जमीन सुपीक आहे. सामान्य लोकांना रोजगाराच्या संधी आहेत. पण येथील प्रत्येक व्यक्ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या आयर्न थ्रोनसाठी झगडत आहे.

'अ साँग ऑफ आइस अँड फायर'चं बहुतांशी कथानक वेस्टेरॉसमध्ये घडतं. 'आयर्न थ्रोन'साठी सुरू असलेल्या टारगॅरियन, लॅनिस्टर, स्टार्क या प्रमुख कुटुंबातील संघर्षामध्ये वेस्टेरॉसमधील प्रत्येक व्यक्ती होरपळत आहे. तर दुसऱ्या बाजूला हजारो वर्षांनंतर एक मिथक बनलेला व्हाइट वॉकर्स हा मृत शत्रू परत येण्याची संभावना असल्याने मृत्यूची टांगती तलवार कायम आहे. आणि त्यामुळे जीवितांसाठी अस्तित्व हा सर्वात मोठा प्रश्न झालाय. ही कथा सत्तेचा हव्यास, त्यासाठी खेळले जाणारे डावपेच, त्यात घेतले जाणारे सूड, हिंसा, सत्तेत पाहायला मिळणारा लिंगव्यवहार, धर्म आणि मृत शत्रूची अखंड जाणवणारी भीती अशा अनेक विषयांना हात घालत पुढे जात राहते. म्हणूनच ह्या विषयांना समर्पक असं नाव पहिल्या पुस्तकाला देण्यात आलं आणि ते नाव होतं 'गेम ऑफ थ्रोन्स'. अर्थात सत्तेसाठी, राजगादीसाठी खेळला जाणारा खेळ. पुढे हेच नाव मालिकेलाही देण्यात आलं.

या पार्श्वभूमीवर २००५ मध्ये एच.बी.ओ. चॅनेलने मार्टिनची भेट घेऊन 'गेम ऑफ थ्रोन्स' ही मालिका सुरू करण्याचा निर्णय घेतला. मार्टिनच्या मार्गदर्शनाखाली डेव्हिड बेनिऑफ आणि डी. बी. वीस या दोघांनी मिळून 'गेम ऑफ थ्रोन्स' ही मालिका लिहिण्यास सुरुवात केली. पण हे कल्पित विश्व पडद्यावर साकारण्यासाठी तब्बल सहा वर्षांचा कालावधी लागला. आणि १४ एप्रिल २०११ रोजी एच.बी.ओ. या चॅनेलवर 'गेम ऑफ थ्रोन्स'चा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला.

'गेम ऑफ थ्रोन्स'बद्दल चर्चा होत असताना काही विषय हमखास कानी पडतात. त्यातील फॅन्टसी, हिंसा, नग्नता आणि लैंगिकता यावर बरीच चर्चा होत असते. पण या गोष्टी बोलताना कथाभागात असणारं त्याचं महत्त्व, लेखकाला त्याची वाटलेली गरज, याबद्दल कमी बोललं जातं ही शोकांतिका आहे. आणि या चर्चेमध्ये धर्म या संकल्पनेचा मालिकेमध्ये केलेला वापर हा महत्त्वाचा विषय तर खूपच मागे पडतो.

'गेम ऑफ थ्रोन्स'मध्ये फॅन्टसी आहे. आग ओकणारे ड्रॅगन्स, मृत शत्रू, ज्वालेतून होणारा दृष्टांत आणि बरंच काही. साधारणपणे चित्रपटात किंवा मालिकेत कथा सोपी करण्यासाठी अशा फॅन्टसीचा वापर केला जातो. पण येथे वापरण्यात आलेली फॅन्टसी कथाभागाला नियमितपणे पुढे नेते.

'गेम ऑफ थ्रोन्स'मधील हिंसा ही टोकाची आहे, हे सर्वमान्य आहे. पण ती तशी असण्यामागे सुद्धा कारण आहे. कथानकाचा कालखंड काल्पनिक असला तरी तो मध्ययुगाच्या जवळ जाणारा आहे.

त्या काळातील माणसाच्या संवेदना, समाज या संकल्पनेबद्दलचे समज, धर्माचं महत्त्व ह्यात माणसाच्या मूळ स्वभावाचे दर्शन होते. समाज आणि समाजाचे नियम तिथे खूप वेगळे पडतात आणि त्यांचं दर्शन माणसाच्या अगदी रोजच्या कृतींमध्ये दिसतं. हिंसा हा देखील त्यातलाच एक भाग.

'गेम ऑफ थ्रोन्स'च्या नग्नता आणि लैंगिकतेबद्दलही आपल्याकडे सर्रास बोललं जातं. प्रेक्षकांना आकर्षून घेणे हा त्याचा उद्देश नसून नग्नता आणि लैंगिकतेकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन ही मालिका देते. एखाद्या व्यक्तीबद्दल मत तयार करण्यासाठी लैंगिकतेसारखी खाजगी गोष्ट गरजेची नाही. तर त्याचे चारित्र्य, गुण महत्त्वाचे आहेत. ही महत्त्वाची गोष्ट 'गेम ऑफ थ्रोन्स' सहज सांगून जाते.

'गेम ऑफ थ्रोन्स' धर्म ही संकल्पना अगदी वेगळ्याच रीतीने मांडते. काल्पनिक विश्वातील काल्पनिक धर्मांचा वापर आजच्या जगातील धार्मिक टीकेचे सूत्र म्हणून वापरले जातात. नैसर्गिक आयुधं, मूर्तिपूजा, व्यक्तिपूजा अशा विविध अंगांमधून समाजावर धर्माचा असलेला पगडा, त्याच्या आहारी गेलेला समाज, कोलमडून गेलेली राजवट या सर्व गोष्टी येथे व्यवस्थित दिसून येतात.

लहान लहान संवाद-प्रसंगातून मनुष्य स्वभावातील वैश्विक सत्ये सहज सांगण्यापासून ते अॅक्शन, नाट्य, युद्ध, थरार, कॉमेडी, गूढ, भय या सर्वच विधांचा कथानकामधील स्वैर वापर त्याला इतरांपेक्षा वेगळा ठरवतो.

'अ साँग ऑफ आइस अँड फायर' ही कादंबरी-मालिका आणि त्याचं 'गेम ऑफ थ्रोन्स' या नावाने दूरदर्शन मालिकेमध्ये झालेल्या रूपांतराला कल्पित कथा, गाथा, अद्भुतिका अशा वेगवेगळ्या नावाने संबोधण्यापेक्षा 'मिथक' ही मोठी आणि सर्वसामायिक संज्ञा वापरणं उचित राहील. 'रामायण' आणि 'महाभारत' या मिथकांची ओळख असलेल्या आपणास जर 'गेम ऑफ थ्रोन्स'ला मिथक म्हणत असू तर त्याचा आवाका व्यवस्थित लक्षात येऊ शकतो. अरुणा ढेरे म्हणतात त्याप्रमाणे सगळी संस्कृती हा मिथकांचा एक महाकोश आहे. प्रभावी कलाकार काय करतो, तर जुनी मिथकं नवीन करत जातो. 'गेम ऑफ थ्रोन्स'च्या रूपातून जॉर्ज आर. आर. मार्टिनमध्ये आपल्याला तो प्रभावी कलाकार दिसून येतो. आणि एका अत्यंत प्रभावी, संघर्षमय, अनेक पैलूंनी सजलेल्या संपूर्ण मिथकाचा आस्वाद लुटल्याचा आनंद प्रेक्षकांना 'गेम ऑफ थ्रोन्स' पाहताना मिळतो!

मी मधुरा - तुमचे आक्षेप पोकळ आहेत. एक म्हणजे कला ही कला आहे. त्यात स्वदेशी /परदेशी गोरे /काळे काय? दुसरे असे की आकसापोटी हॅपॉ, गेम ऑफ थ्रोन्स इ. कलाकृती पाहिल्याच नसल्याने तुमच्या त्या संदर्भातल्या मतांना काही अर्थच उरत नाही!
रामायण महाभारताचे अनेक व्हर्जन्स निघालेले आहेत आणि ते बघणारे लाखो लोक आहेत. गेम ऑफ थ्रोन्स आणि हॅरी पॉटर बघणार्‍यांनी महाभारत पाहिलेच नसेल, त्यांना ते आवडलेच नसेल ही गृहितकं का ? एखाद्याला दोन्ही आवडू शकते की! मग त्यावर काय म्हणणे?
ओरिजिनल महाभारत , रामयण यांचे श्रेष्ठत्व मान्य असले तरी त्या माणसाला चोप्रांचे महाभारत, रामानंद सागर यांचे रामायण, स्टार प्लस चे महाभारत , कोणीतरी केलेले स्टार प्लस आणि विकिपिडिया च्या महाभारतचे भाषांतर, त्या भाषांतराचा व्हॉट्सॅप वर आलेला सारांश हेही सगळे उच्च वाटायला पाहिजे अशी सक्ती आहे का?

अरे हा हेटर्स क्लब आहेत! हे असलं येणारच! बाकी ह्यातही देशी विदेशी, आपलं झापडबंद हुचच वगैरे मानणारे बघून किवच आली. असो.

अशांना एका बाणाचे तीन बाण अन मग हळू हळू त्यांच्या पाऊस पडणाऱ्या प्रचंड क्लासिक अन अद्वितीय कलाकृती लखलाभ असोत!

मैत्रेयी,

हा हेटर्स क्लब आहे.

आणि मी घेतलेले आक्षेप पोकळ असतील नाहीतर भरीव! ते माझं वैयक्तिक मत आहे, हे लिहिलेले आहे मी.

बाकी कलाकृती ही कलाकृती असते, मग स्वदेशी असो किंवा पाश्चात्य देशांतली असो, वगैरे म्हणणाऱ्या सेक्युलर लोकांमध्ये गणती होत नाही, म्हणून माझा प्रतिसाद अपवादात्मक वाटूच शकतो.

याचा अर्थ मी भारतीय सोडून बाकी काही पाहतंच नाही असाही होत नाही. पण स्वदेशी कलाकृती आधी पहाव्यात असे वाटते. आधी नाही तर निदान नंतर का होईना पहाव्यात.

म्हणजे मी 'माझ्या नवऱ्याची बायको' न पाहता धिस इज अस पाहिलं, तर मी देशद्रोही.>>>>>>>>> Uhoh

हा निष्कर्ष कसा काढलात?

असं कुठे म्हणतेय मी?
झी च्या सगळ्याच मालिका भारतीय उत्तम कलाकृती आहेत का ???

मी महाभारत, रामायण, हनुमान चित्रपट वगैरे यांचे उल्लेख केले आहेत. आहेत की नाही?
दर्जेदार आणि फालतू हा अजून वेगळाच मुद्दा आहे. मी इथे दर्जेदार कलाकृतींबद्दल बोलते आहे.

बाकी हा नक्की GOT चाच हेटर्स क्लब आहे ना? Wink Just kidding!

माझ्याकडून या चर्चेला पूर्णविराम.

स्वदेशी कलाकृतीं जेव्हा कौतुकास योग्य असतात तेव्हा त्यांचं भरभरून कौतुक होतंच की .. इथे मायबोली वरही चित्रपट विषयक धाग्यांवर हिंदी मराठी जुन्या नव्या चित्रपटांवर , हिंदी गाण्यांवर , एका एका गायक - गायिका - संगीतकार - अभिनेता - अभिनेत्री वर कौतुकाचा मुक्त वर्षाव करणाऱ्या कितीतरी प्रतिक्रिया सापडतील ...

पण मालिकांच्या बाबतीत स्वदेशी खूप कमी दर्जाचं प्रॉडक्ट देतात हे सत्य आहे ... ज्या काही मोजक्या खरोखरच उत्तम दर्जाच्या मालिका असतील त्या कदाचित अधिक लोकांच्या पसंतीस उतरणाऱ्या नसतील - ठराविक अल्पसंख्य लोकांना आवडणाऱ्या असतील , त्यामुळे त्यावर चर्चा होत नाही .

इथले बहुतेक जण स्वदेशी ( दर्जेदार ) बघून झाल्यानंतरच विदेशी कलाकृतींंकडे वळले असावेत ...

जी ओ टी - ते काय असतं रे दादा?

काहीच कल्पना नाहीये.

हे म्हणजे पूर्वी ती जाहिरात यायची ना "अरे ये पी एस पी ओ नहीं जानता" तसं वाटतंय.

पण स्वदेशी कलाकृती आधी पहाव्यात असे वाटते
>>
मी आधीही विचारले होते, असे तुम्हाला का वाटते की स्वदेशी कलाकृती आधी पाहाव्यात?
स्वदेशीची व्याख्या काय? भारतीय माणसांनी निर्मिलेल्या? मग ऍमेझॉन प्राईम किंवा नेटफ्लिक्सच्या कलाकृतींचे काय? का भारतीय दिग्दर्शकाने दिग्दर्शन केलेल्या? त्यात भारतीय कलाकार हवेत का?
विशाल भारद्वाज यांच्या ओंकारा, मकबूल या चित्रपटांना भारतीय म्हणायचे की विदेशी?

चित्रपटा व्यतिरिक्त इतर कलाप्रकारांचे काय?

कोसला वाचावी की कॅचर इन द राय?
बारोमास की ग्रेप्स ऑफ रॅथ?
ज्या क्रमाने वाचले जाईल त्यामुळे रसग्रहणात फरक पडेल का?

गेम ऑफ थ्रोन्स मधल्या काही गोष्टी खटकतात. त्यन्नी नक्की काळ कुठला दाखवलाय तेच कळत नाही. कपडे - कापड मध्ययुगीन आणि कपड्यांचे दिझाइन आधुनिक वाटते. पात्रांची भाषा तर फारच आधुनिक आहे. ऊठसूट नव्या जमान्याच्या शिव्या देतात ते लोक. पूर्वी शिव्या वेगळ्या असतील की! शिवाय एखाद्यांच्या नावांचा शॉर्ट्फॉर्म करणे 'डॅनी' वगैरे - ही फार आधुनिक पद्धत आहे. कल्पना करा की महाभारतात भीष्माचार्य कृपाचार्याला 'हे ड्यूड' वगैरे बोलेल तेव्हा कसे वाटेल? शिवाय एकूणच मालिकेत काळ गंडवलेला आहे. जितक्या वेळेत ते ड्रॅगन मोठे होतात, तितक्या वेळेत बाकी लोकांची वये, त्यांच्या आयुषयातल्या घटना - फारच संथ चालतात आणि त्यांचे गणित जूळत नाही.

स्वदेशी जिंदाबाद!!!

मायला, सिलेक्टिव्ह आउटरेजेसमुळं आम्ही राईट्स टर्न घेतला, पण भेंडी, तिकडे रताळे अन बटाटेवडेच आहेत!

असो, आम्ही आपलं सेंट्रलच पकडतो आता.

जितक्या वेळेत ते ड्रॅगन मोठे होतात, तितक्या वेळेत बाकी लोकांची वये, त्यांच्या आयुषयातल्या घटना - फारच संथ चालतात आणि त्यांचे गणित जूळत नाही.
>>

गुड पॉईंट! ड्रॅगन हे पक्षी असल्याने इतर पक्षांप्रमाणे फार लौकर वयस्क होतात, अस मला वाटत...

बाकी तो काळबीळ येवढं टेचणीकल नसता हो जायच. ती काय डॉक्युमेंटरी थोडीच आहे.

मुद्दलातच सर्व कल्पित जग आहे. तिथे सध्या काय काळ चालू आहे, त्या काळात किती तांत्रिक प्रगती झाली आहे, भाषा कोणती बोलली जाते हे सर्व लेखकाच्या/निर्मात्याच्या हातात असणार.
त्याला आपल्या खर्‍या जगातील काळ/भाषेचे मापदंड लावणे चुकीचे ठरेल.

न्यू यॉर्क मधे रात्री आतषबाजी वगैरे? कधी ऐकले नाही. अशी काही माहिती किंव क्लिपही नाही. बार्स मधे लोक एपिसोड्स बघून तेथे सेलिब्रेशन्स करतात पण ते बंदिस्त जागेत. केवळ टीव्ही सिरीज मधल्या एखाद्या घटनेवर बाहेर येउन पब्लिक आतषबाजी वगैरे करत आहे असे कधी आठवत नाही. बिन लादेन ला मारला तेव्हा डीसी मधे लोक रस्त्यावर आले होते. फुटबॉल गेम्स नंतर शहरात लोक बाहेर येतात वगैरे असते - पण ते तेथे प्रत्यक्षात घडणार्‍या घटनांबद्दल असते.

GOT किंवा तत्सम ऐतिहासिक कालखंड दाखवलेल्या काल्पनिक मालिकेतील एखाद्या युद्धापुढे / राजकिय डावपेचापुढे रामायण महाभारतातली युद्धं - लढाया - कारस्थानं मिळमिळीत वाटणं नैसर्गिक आहे >> तसेही नाही. प्रत्यक्षातील घटना भरपूर थरारक आहेत. ८० च्या दशकातील सिरीज मधे तेव्हाच्या तंत्रज्ञानानुसार जशी दाखवली ती मिळमिळीत वाटू शकतील कदाचित. पण उद्या गॉट च्या लोकांनी रामायण किंवा महाभारतावर सिरीज बनवली तर ती कदाचित गॉटपेक्षाही भारी असेल.

या सिरीज मधला ड्रामा, संवाद, व्हिज्युअल्स इतके जबरदस्त आहेत की त्यामुळे ही सिरीज बघायला मजा येते. मी दोनदा पूर्ण पाहिली आहे. यात गोरे लोक आहेत की, देशी वगैरे काहीच संबंध नाही.

दूरदर्शनवर रामायण, महाभारत लोकप्रिय होत्या तेव्हा त्याही बघितल्या होत्या. तेव्हाही त्यातील झारे, उलथणी, डाव वगैरे सारखी दिसणारी "शस्त्रे" पाहून खूप हसलो आहे. पण काही नाट्यमय प्रसंग आवडलेही होते. त्यातील नितीश भारद्वाज पाहून असे वाटायचे की कृष्ण असाच देखणा आणि मिश्किल दिसत असेल. आताही कोणी जर चांगल्या पद्धतीने पुन्हा बनवल्या तर लोक पुन्हा बघतील. १०-१५ वर्षांपूर्वी हनुमानावर एक अ‍ॅनिमेशन फिल्म आली होती - ती ही छान होती.

पण हे सगळे "आधी" का बघावे समजले नाही. आणि यात "सेक्युलर" कोठून आले, ते ही Happy

बाकी तो काळबीळ येवढं टेचणीकल नसता हो जायच. ती काय डॉक्युमेंटरी थोडीच आहे. >> मलाही एवढी चिकित्सा एरवी करता येत नाही. पण त्यांनीच एकंदरीत तो काळ उभा करणे, ठराविक कोस्चूम वापरणे, अमुक एका प्रसंगी अमुकच कपडे घालणे, प्रत्येक प्रसंग्/व्यक्ती/पोषाखाला कारण्मीमांसा देणे - एवढे कष्ट घेत्ल्याचे सांगितले आहे. तेक्निकली खूप साऊंड असल्याच्या वल्गना ह्याचे फॅन्स करतात. मग अश्या वेळी आमच्या अपेक्षा वाढल्या असतील आणि त्यात असल्या फाल्तू चुका बोचायला लागल्या तर दोष कुणाचा?

बाकी त्या स्वदेशी/विदेशी विधानाशी पूर्ण असहमत. कलाकृती ही कलाकृती असते. तिला देश/भाषा यापलिकडे जाऊन आस्वाद घ्यायल हरकत नसावी. मला स्वतःला ती मालिका खटकली असली तरी त्यात गोरे की काळे, इन्ग्रजी की देशी - हा मुद्दा नव्हता.

पण हे सगळे "आधी" का बघावे समजले नाही. आणि यात "सेक्युलर" कोठून आले,

>>

आपल्या नेहमीच्या पब्लिकन

बाकी फार दृष्ये काळी धुरकट केल्याने पाहायचा कंटाळा आला. >> मीही पहिला सीझन - पहिला भाग त्यामुळेच पाहणे मध्येच सोडले होते. पण एक्दा मनाचा हिय्या करून पुढे बघायला गेलो, तर जिथे वेस्टेरॉस किंवा त्या डेनाय्रिसचे देश येतात, तिथे लख्ख ऊन आणि चांग्ला प्रकाश आहे. ते पाहताना डोळ्यांना तेवढा त्रास होत नाही.

मी तर शेवटच्या सीझनचा आयेमडिबीवर सिनॉप्सिस वाचून भागवलं... जस्ट कोणकोण सुखाने नांदू लागले ते पहायला.
(डेनेरिस मेली ते पाहून बाकी हर्षवायूच व्हायचा बाकी राहिला!!)

Pages