कुंडली/पत्रिका : खरे की थोतांड

Submitted by DJ. on 13 March, 2019 - 05:37

जन्मकुंडली

जन्मकुंडली ही एक समाजाला लागलेली एक कीड असे मला मनापासुन वाटते. मुल जन्माला आले की 'जन्मकुंडली काढुन घ्या' असे सांगणारे कुणीतरी उपटतेच. एकवेळ जन्माचा दाखला उशिरा काढला तरी चालेल पण जन्मकुंडलीआधी काढा असे सांगणारे महाभागही असतात. एखाद्या गर्भार स्त्रीला डॉक्टरांनी ९ महिने + ९ दिवस धरुन जो प्रसुती दिवस सांगितलेला असतो नेमका तोच दिवस कसा खराब आहे हे सांगणारा महामुर्ख त्या कुटूंबाला भेटतो आणि होणार्‍या बाळाच्या भवितव्याबद्दल नको त्या चिंता निर्माण करुन ठेवतो. इकडे बाळाची होणारी आई, वडील, अजोबा, आज्जी सगळे डॉक्टरला विनंती कम जबरदस्ती करुन त्या अपेक्षीत दिवसाच्या आधीच एखादा चांगला दिवस बघुन डिलिव्हरी करा म्हणुन भुणभुण लावतात. डॉक्टरने असमर्थता दाखवली तर सरळ डॉक्टरच बदलतात. अशा महामुर्ख कुटूंबाला त्या होणार्‍या बाळाच्या आणि आईच्या आरोग्याची जराही फिकीर नसते. मी तर एक महाभाग कुटूंब असे पाहिले आहे की त्यांना पितृपंधरवड्यात जन्मणारे बाळ नको होते. डॉक्टरांनी नेमकी पंधरवड्याच्या शेवटाची तारीख दिलेली. काहिही करुन ते बाळ पितृपंधरवड्याच्या आधी अथवा नंतरच जन्मावे म्हणुन त्या कुटुंबाने अक्षरशः १२ दिवस आधीच जन्माला घालायला भाग पाडले. त्यानंतर ते बाळ अशक्त आहे म्हणुन ८ दिवस काचेच्या पेटित ठेवले होते. बाळाच्या आजी-आजोबांच उत्साह दांडगा. येणार्‍या-जाणार्‍या प्रत्येक परिचिताला आपल्या पराक्रमाची रसभरीत वर्णने करताना थोडीसुद्धा शरम वाटत नव्हती.

पत्रिका

जन्मकुंडली चांगली यावी म्हणुन मुलांचा जन्म हव्या त्या दिवशी करुन घेणार्‍या कुटुंबांचा हुशारपणा बघत असतानाच मागे एकदा पत्रिका देखिल बदलुन लग्न लावणारे कुटूंब पाहण्यात आले. त्यांच्या मुलीच्या लग्नकुंडलीत मंगळ होता. त्यामुळे तिचे लग्न ठरत नव्हते. दिसायला देखणी आणि चांगल्या पगाराची नोकरी असुनही लग्न ठरण्यात अडाचणी येऊ लागल्या तेव्हा त्या काकांनी तिच्या जन्माचा दिवसच बदलुन घेतला. १ दिवस आधी जन्मवेळ दाखवल्यामुळे तिच्या पत्रिकेतुन मंगळ आपोआप अंतर्धान पावला आणि लगेच लग्न ठरले. तिच्या लग्नाला आता १० वर्षं झाली. २ मुले आहेत. सगळे सुरळीत चालु आहे.

मला अजुनही आठवते की मी एकदा आजीला विचारले होते की तिचे लग्न कुंडली पाहुन झाले का? तर ती "नाही" म्हणाली होती. माझ्या आई-वडिलांचे लग्न देखिल कुंडली न बघताच झालेले. म्हणजे कुंडली पहाण्याचे फॅड गेल्या २०-३० वर्षांपासुन सुरु झाले असावे असा माझा कयास.

कुंडली आणि पत्रिका हे थोतांड आहे यावर मी ठाम आहे पण एखाद्या अंधपणे विश्वास ठेवणार्‍याला खालील प्रश्न विचारले तर मात्र त्यावर समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत :

- चांगली वेळ पाहुन मुल जन्माला घालायला लावणारे निसर्गाच्या विरोधात जाऊन बाळाचे भविष्य सुरक्षीत करु शकत असावेत का?
- सिझरेयन बाळाची जन्मवेळ खरी मानावी का?
- कुंडली आणि पत्रिका यांवर विसंबुन लग्ने ठरवणार्‍यांच्या आजि-आजोबांनी पत्रिका पाहुन लग्न केलं होतं का?
- कुंडली/पत्रिका या फक्त ठराविक धर्मातील मुला/मुलींनाच कशा काय लागु होतात?
- मंगळ ग्रह एखाद्या मुस्लिम, जैन, परशी, शीख, बौद्ध,ख्रिस्ती समाजातील मुलांना/मुलींना त्रासदायक कसा काय नसतो?

हे सर्व थोतांड आहे हे थोड्या विचाराअंती कोणालाही कळु शकेल परंतु ज्यांची उपजिविका या गोरख धंद्यावर चालते त्यांनी अशा कुंडाल्या-पत्रिका बघुन समाजाला फसवण्याचा उद्योग अविरत चालु ठेवला आहे आणि तो फोफावतो आहे हे बघुन समाज कोणत्या दिशेस जातोय हा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. सरकार अशा फसवेगिरी करणार्‍यांवर वचक ठेवण्यास कमी पडत आहे तरिही आपण आपल्या घरच्यांना, नातेवाईकांना, परिचितांना समजावुन सांगुन या थोतांडापासुन नक्कीच दूर ठेऊ शकु असे वाटते.

Group content visibility: 
Use group defaults

एका जोतिषी महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर कथित बलात्कार केल्याप्रकरणी एका टीव्ही अभिनेत्याला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. एका महिला ज्योतिषावर या टीव्ही कलाकाराने बलात्कार केल्याचा पीडित महिलेचा आरोप आहे. या कलाकाराने बलात्काराचा व्हिडिओ तयार करून त्या द्वारे तो ब्लॅकमेल करत असल्याचाही महिलेचा आरोप आहे.

https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/tv-actor-cum-sing...

तिला भविष्य समजले नाही?

मी तर त्यात स्वतः कधी विश्वास ठेवला नाही पण उच्य शिक्षित(अगदी युरोपिअन देशात शिक्षण घेऊन आलेल्या)आणि आर्थिक बाबतीत अत्यंत उच्च स्थान समाजात असलेल्या लोकांना सुद्धा ज्योतिष,कुंडली ह्या गोष्टीवर विश्वास असलेलं बघितलं आहे
त्यांची शास्त्र आणि धोतांड ह्या मधील फरक समजण्याची कुवत असताना ,
आणि एक अनुभव माझ्या मित्रा विषयी मी कधीच विसरू शकणार नाही,
तो सरकारी नोकरीत असताना सुद्धा त्याची कुंडली बघून असे सांगण्यात आले की तो नोकरी करूच शकत नाहीं ,नोकरी करण्याचा योग नाही
तेव्हा आम्हाला हसू आले पण त्या कुंडली बघणाऱ्या स्त्री नि ठामपणे सांगितलं होतं हा नोकरी करणार नाही ह्याच्या कुंडलीत परदेशी जाऊन उद्योग उभा करण्याचा योग आहे
आणि नंतर काही वर्षांनी कंटाळून त्याने नोकरी सोडली आणि आश्चर्य म्हणजे आज तो दुबई मध्ये स्वतःच्या व्यवसाय मध्ये स्थिर आहे
दुसरी गोष्ट सर्वच धर्मात ashya गोष्टी असतात पण बहुतेक हिंदू लोक दुसऱ्या च्या धर्मात जास्त डोकावत नाहीत त्या मुळे त्या आपल्याला माहीत नसतात
ठराविक लोकांना स्वतः पेक्षा हिंदू धर्मात लुडबुड करण्याची दांडगी हौस असते त्यामुळे ते फक्त हेटाळणी करतात

२०१९ चे निकाल लागतील तेव्हा होईल की दूध का दूध पानी का पानी... ज्यानी ज्यानी कुंडली मांडून ठामपणे सांगीतले की अमुक अमुक उमेदवार १००% निवडून येणार ...

माझ्या मते ज्योतिष हे शास्त्र आहे.
चन्द्र-सूर्य यांच्या प्रभावामुळे ( गुरुत्वाकर्षण) महासागरांना भरती ओहोटी येवू शकते. विविध ऋतू इथे अवतरतात, प्रुथ्वीवरची स्रुष्टी सूर्याच्या आणि प्रुथ्वीच्या कालबद्ध संचारामुळे जगते.
त्याचप्रमाणे मानवी देहावर (शरीरातल्या केमिस्ट्रीवर ) त्यांचा प्रभाव होणे अशक्य का वाटते ?
त्यात विशिष्ठ ग्रहांच्या एकमेकांच्या सापेक्ष स्थानामुळे (जन्मवेळीच्या) काही स्वभावविशेष , गुणधर्म मनुष्यात येतात हे मानायला वाव आहे.
मग मानवाला यात(जंन्मवेळची ग्रुहस्थिती आणि मनुष्याच्या जीवनातील घटना) काहीतरी नाते आहे हे जाणवले असावे आणि त्याने आभ्यास करून नोंदी करून ठोकताळे बांधायला सुरूवात केली असावी आणि शेकडो वर्षांच्या मंथनातून हे डेटा बेस्ड शास्त्र उभे राहिले असावे.
अर्थातच यात कित्येक एकेमेकां-सापेक्ष पॅरामीटर्स आहेत. ज्यांचा तौलनिक परिणाम अचूक सांगणे त्यामुळे क्लिष्ट झाले आहे. त्यातून ज्योतीष सांगणारा , त्याचा आभ्यास आणि कुवत यावर अचूकता अवलंबून असते.
प्रत्येक शास्त्राचा गैर वापर हा मनुष्याच्या स्वार्थी व्रुत्तीतून होतो.. त्यामुळे त्या शास्त्राला दोष देणे अयोग्य आहे.

पण या शास्त्रालाही मर्यादा आहेत. जसे की मोठ्या आपत्तीमुळे शेकडो लोक एकाच वेळी म्रुत्यूमुखी पडतात त्यांच्या पत्रिका कुठे सारख्या असतात ?
तसेच एकाच वेळेला शेजारच्या कॉटवर जंन्मलेल्या दोन मुलांचे आयुष्य किती वेगळे असते !!

क्रुपया ज्या वाचकांचे मत या विचाराशी जुळत नाही त्यांनी विचारावर कमेंट करावी ... लेखकावर नाही.

जर ज्योतीष हे खरेच शास्त्र असेल तर बाळाच्या आईच्या बीजाचे फलन ज्या दिवशी झाले त्या दिवसाची ग्रहदशेवरुन कुंडली तयार करायला हवी. मुल जन्माला येण्या-आधी ते ९ महिने आईच्या पोटात वाढत असते. बाळाचा जन्म तर हवा त्या दिवशी करवता येतो (ग्रहदशा पाहुन). Proud

Dj आणि फिल्मी तुम्हाला नसेल विश्वास तर काही हरकत नाही
ते तुमचं मत आहे आणि ते फक्त तुमच्या पुरतेच लागू आहे
ज्यांचं विश्वास आहे त्यांना तुमच्या विरोधी मताशी काही देने घेणे नाही।
आणि महत्वाचं त्या विषयात तुम्ही सखोलपणे अभ्यास सुद्धा केला नाही त्यामूळे तुमचे मत किंवा विचार हे उथळ आहेत

पशुपत यांच्या मतांशी सहमत

जगात कितीतरी खोटे डॉक्टर, भोंदू ज्योतिषी लोकांसारखाच सुखेनैव धंदा करतात. अशा खोट्या डॉक्टरांना संदर्भ पकडून समस्त वैद्यक विद्या किती फालतू आहे आणि सगळे डॉक्टरच कसे भोंदू आहेत हे सांगणे म्हणजे मूर्खपणाचा कळस होईल.

तेच या धाग्यात ज्योतीषाबाबत चाललेय.

नवीन Submitted by DJ. on 10 May, 2019 - 02:23... I think there is difference between egg, zygote, embryo and hatchling /newbie/ young one.... त्यामुळे तुम्ही मांडलेला मुद्दा बिलकुल पटत नाही आणि म्हणून Submitted by Rajesh188 on 10 May, 2019 - 02:39 हे पारडे जड़ म्हणावे लागतेय.

मग फक्त मनुष्यप्राणीच का बरे ज्योतिष शास्त्राचा बळी..? आमच्याकडच्या म्हशी, शेळ्या, कुत्रं, मांजर यांना पण का बळी करवुन घेऊ नये..?? त्यांच्यावर सुद्धा ग्रहदशेचा परिणाम होत असेलच की.. जसे म्हशीचा मंगळ व्ययस्थानात आला म्हणजे ती गाभण राहण्याची शक्यता असेल तेव्हाच तिला रेडोबाकडे नेता येईल.. काये की ग्रहदशा न बघता गेलं की उगीच ३-४ हेलपाटे मारुन वेळ्+पैसा खर्च होतो.. त्यापेक्षा जोतीशाला १०-५ रुपये देऊन कुंडली काढुन घेतलेली बरी.. कसे..? Proud

जगात कितीतरी खोटे डॉक्टर, भोंदू ज्योतिषी लोकांसारखाच सुखेनैव धंदा करतात. अशा खोट्या डॉक्टरांना संदर्भ पकडून समस्त वैद्यक विद्या किती फालतू आहे आणि सगळे डॉक्टरच कसे भोंदू आहेत हे सांगणे म्हणजे मूर्खपणाचा कळस होईल.
<<
९०% डॉक्टर भोंदू असले तरी १०% उत्तम व जेन्युइन आहेत, व बेसिकली वैद्यकात "शास्त्र" आहे.

ज्योतिषी १००% भोंदू आहेत. त्यात सायन्स उर्फ "शास्त्र" कुठेच नाही.

अंधश्रद्धा निर्मूलन समिती वा पूर्वी अब्राहम कोवूर यांनी दिलेले आव्हान आजवर कुणाही कुडमुड्या/वा तथाकथित भारी ज्योतिषाने स्वीकारलेले नाही.

आव्हान सिंपल आहे.

३० कुंडल्या देणार. प्रत्येकावर ३ प्रश्न.

१. हा बाई आहे की माणूस
२. विवाहित की अविवाहित
३. जिवंत की मृत?

"स्टॅस्टिकली सिग्निफिकंट" प्रमाणात उत्तरे खरी यायला हवीत.

"पॅरासिटामॉल ची गोळी खाल्याने ताप कमी होतो." यामागे शास्त्र आहे. "शनीची शांती केल्याने धंदा चालतो" यामागे शून्य आहे. पण बुद्धीभेद करवून घेतलेल्या डोक्यानेच विचार केला तर वर उर्धृत केलेल्या प्रतिसादासारखे लॉजिक ओकले जाते. Lol

ग्रहगोलांच्या चालीने जर बरे-वाईट होणार असेल, तर त्यापुढे तुम्ही काय उत्पाटून घेणार की तुमची 'ग्रहदशा' सुधारेल? ग्रहगोलांची चाल कोणता देव बदलतो? किंवा आजवर बदलली? अन तीही कुण्या इंडिव्हिज्युअलसाठी? तीही याप्रकारे की बाकी दुनियेला फायदेशीर ठरणारा तोच उच्चीचा रवी याच्याकरता नीचेचा होणार?

उगंच चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने भरती येते वगैरे दाखले देत, पशुपतांनी दिलंय त्यासारखं लॉजिक येतं.

कमकुवत मनाला बरं वाटावं म्हणून घेतलेल्या कुबड्यांपैकी एक कुबडी आहे फक्त ही. काही मायनर अ‍ॅन्क्झायटी डिसॉर्डर्स साठी बरी.
पण याचे १००% काउन्सेलर्स या अधीच अडल्यानाडल्या येड्याला मूर्खात काढायचेच काम करत असतात.
असो.

सध्या थांबतो.

Everything before but is horseshit! GoT

मला लई आवडला हा डायलॉग

"चन्द्र-सूर्य यांच्या प्रभावामुळे ( गुरुत्वाकर्षण) ..... त्याचप्रमाणे मानवी देहावर (शरीरातल्या केमिस्ट्रीवर ) त्यांचा प्रभाव होणे अशक्य का वाटते ?" -

सापेक्ष अंतर, गुरुत्वाकर्षणाचा फोर्स, मानवी देहाचं आकारमान, वस्तुमान ह्या सगळ्याच्या गणिताचा निष्कर्ष, असा प्रभाव पडत नाही असं सांगतो. पृथ्वीच्या इतक्या जवळ असताना, दुसर्या कुठल्याही ग्रहगोलांच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव, पृथ्वीच्या प्रभावापेक्षा वरचढ होऊन इतक्याश्या मानवी शरीरावर परिणाम करेल ही शक्यता जीवशास्त्रीय दृष्ट्या अशक्य आहे.

समजा वादासाठी एक क्षणभर असं गृहीत धरलं की असा काही परिणाम होतो, तर तो त्या भौगोलिक क्षेत्रातल्या सर्व सधारणतः समान वस्तुमान आणी आकारमान असणार्या प्राणिमात्रांवर सारखाच होईल, जे घडत नाही.

असो. हा विश्वास आणी मतांचा प्रश्न आहे, त्यामुळे वाद / चर्चेने काही साध्य होणार नाही. पण पशुपत ह्यांनी उपस्थित केलेला प्रश्न जेन्युइन वाटला, म्हणून माझ्या बुद्धीनुरूप उत्तर दिलं.

लोक हुशार आहेत त्यांना चांगलं वाईट मधील फरक समजतो
आणि सर्वाना निसर्गाने बुद्धी बहाल केली आहे त्यामुळे
कुंडली शास्त्र आहे की धोतांड हे ज्याचे त्याला ठरवू ध्या तुमचे विचार त्यांच्या वर का ladtay

सती जायची प्रथा उगाच बंद केली. हुंडा प्रथा बंद करायला कायदा केला कशाला. लोकांना ठरवू द्यायचे ना चांगले वाईट काy आहे ते... कोकेन, एलएसडी साग्ल्यावारचे ब्यान काढा.... लोकांना बुद्धी दिली आहे निसर्गाने...

हेला आणि भरत तुम्हाला विषय काय chalay ह्याच्या शी काही संबंध नाही हिंदू द्वेष तुमच्या रक्तात भिनलाय
ठीक आहे हिंदूंना काही फरक पडत नाही
कुंडली आणि भविष्य ह्याची तुलना सतीच्या प्रथेशी करणे ह्या मधून तुम्ही किती कलुषित मनोवृत्ती चे आहात ह्या वर शिक्का मोर्तब होत आहे

हेला भरत हे हिंदूचे हितचिंतक आहेत भोंदू प्रथा आणि समाजांना उघडे पाडण्याचे काम करतात. राजेश अन शशांक सारखे लोक तर मला वाटते हिंदूचे अधिकाधिक स्खलन कसे होईल व ते पारतंत्र्याच्या/कर्मकांडाच्या अंधारयुगात कसे जातील याला हातभार लावतात.

भोंदू कोणी ठरवायचे !
आपले आपणच का Lol
सो कोल्ड विज्ञान (?) निष्ठ लोकांनी राबवलेली माकडापासून उत्क्रांत होत पुढे माणूस बनला ही खरी भोंदू प्रथा आहे ! त्याबद्दल कधी फारसे आक्षेप नोंदवलेले आढळले नाहीत ...इकडे

सो कोल्ड विज्ञान (?) निष्ठ लोकांनी राबवलेली माकडापासून उत्क्रांत होत पुढे माणूस बनला ही खरी भोंदू प्रथा आहे ! त्याबद्दल कधी फारसे आक्षेप नोंदवलेले आढळले नाहीत ...इकडे
Submitted by वीक्ष्य on 13 May, 2019 - 07:28

ते आजही तसेच वागत असल्यामुळे आक्षेप कसे काय नोंदवतील?

>>>हे सर्व थोतांड आहे हे थोड्या विचाराअंती कोणालाही कळु शकेल परंतु ज्यांची उपजिविका या गोरख धंद्यावर चालते त्यांनी अशा कुंडाल्या-पत्रिका बघुन समाजाला फसवण्याचा उद्योग अविरत चालु ठेवला आहे

+१ लाख

अंधश्रद्धा सर्वच धर्मात आहेत फक्त हिंदूंच्या च चवट्यावर आणायच्या आणि हिंदू ची बदनामी करायची हा उद्योग आपल्या देशात तेजीत आहे ,
बाकी धर्माच्या अंध श्रध्दा विषयी कधी चर्चा होते का ?
उलट त्या बाकी समाजापासून लपवून ठेवल्या जातात
कोण्ही तो विषय जरी काढला की अल्पसंख्याक लोकांवर अन्याय होतोय असा गळा सर्व समाज सुधारक काढतील

बाकी धर्माच्या अंध श्रध्दा विषयी कधी चर्चा होते का ?
उलट त्या बाकी समाजापासून लपवून ठेवल्या जातात>> तुम्ही का काढत नाही इतर धर्मीयांच्या अंधश्रद्धांवर स्वतंत्र धागा..? सर्व धर्मातील ठरावीक घटकांच्या पोटभरु उद्योगासाठी फालतु आणि ढोंगी प्रथा बंद व्हाव्यात या साठी आपण सर्वांनी प्रयत्न करायलाच हवेत.. हो क्की नाही..??

हिंदू धर्मातील चांगली शिकवण ह्या वर कधीच चर्चा होत नाही
तथाकथित पुरोगामी फक्त चूक दाखवतात पण त्यांनी कधीच चांगल्या गोष्टींचं कौतुक केले नाही त्या मुळे हल्ली मला आशा लोकांचा तिरस्कार वाटतो
आई वडिलांवर प्रेम करा
वयाने मोठ्या लोकांचा आदर करा
पर धर्मात हस्तक्षेप किंवा टीका करू नका, ईश्वर एकच आहे फक्त मार्ग वेगळे आहेत हे फक्त हिंदू धर्मच शिकवतो बाकी धर्म दुसऱ्या धर्मातील लोकांना मृत्यू दंड ध्या हे शिकवतो.
मनुष्य हत्या करू नका त्याच्या पापाचा हिशोब ईश्वर ठेवतो आणि तोच न्याय करील हे सुद्धा हिंदू धर्माच शिकवतो बाकी धर्म हत्या करा हे शिकवतात

Pages