कुंडली/पत्रिका : खरे की थोतांड

Submitted by DJ. on 13 March, 2019 - 05:37

जन्मकुंडली

जन्मकुंडली ही एक समाजाला लागलेली एक कीड असे मला मनापासुन वाटते. मुल जन्माला आले की 'जन्मकुंडली काढुन घ्या' असे सांगणारे कुणीतरी उपटतेच. एकवेळ जन्माचा दाखला उशिरा काढला तरी चालेल पण जन्मकुंडलीआधी काढा असे सांगणारे महाभागही असतात. एखाद्या गर्भार स्त्रीला डॉक्टरांनी ९ महिने + ९ दिवस धरुन जो प्रसुती दिवस सांगितलेला असतो नेमका तोच दिवस कसा खराब आहे हे सांगणारा महामुर्ख त्या कुटूंबाला भेटतो आणि होणार्‍या बाळाच्या भवितव्याबद्दल नको त्या चिंता निर्माण करुन ठेवतो. इकडे बाळाची होणारी आई, वडील, अजोबा, आज्जी सगळे डॉक्टरला विनंती कम जबरदस्ती करुन त्या अपेक्षीत दिवसाच्या आधीच एखादा चांगला दिवस बघुन डिलिव्हरी करा म्हणुन भुणभुण लावतात. डॉक्टरने असमर्थता दाखवली तर सरळ डॉक्टरच बदलतात. अशा महामुर्ख कुटूंबाला त्या होणार्‍या बाळाच्या आणि आईच्या आरोग्याची जराही फिकीर नसते. मी तर एक महाभाग कुटूंब असे पाहिले आहे की त्यांना पितृपंधरवड्यात जन्मणारे बाळ नको होते. डॉक्टरांनी नेमकी पंधरवड्याच्या शेवटाची तारीख दिलेली. काहिही करुन ते बाळ पितृपंधरवड्याच्या आधी अथवा नंतरच जन्मावे म्हणुन त्या कुटुंबाने अक्षरशः १२ दिवस आधीच जन्माला घालायला भाग पाडले. त्यानंतर ते बाळ अशक्त आहे म्हणुन ८ दिवस काचेच्या पेटित ठेवले होते. बाळाच्या आजी-आजोबांच उत्साह दांडगा. येणार्‍या-जाणार्‍या प्रत्येक परिचिताला आपल्या पराक्रमाची रसभरीत वर्णने करताना थोडीसुद्धा शरम वाटत नव्हती.

पत्रिका

जन्मकुंडली चांगली यावी म्हणुन मुलांचा जन्म हव्या त्या दिवशी करुन घेणार्‍या कुटुंबांचा हुशारपणा बघत असतानाच मागे एकदा पत्रिका देखिल बदलुन लग्न लावणारे कुटूंब पाहण्यात आले. त्यांच्या मुलीच्या लग्नकुंडलीत मंगळ होता. त्यामुळे तिचे लग्न ठरत नव्हते. दिसायला देखणी आणि चांगल्या पगाराची नोकरी असुनही लग्न ठरण्यात अडाचणी येऊ लागल्या तेव्हा त्या काकांनी तिच्या जन्माचा दिवसच बदलुन घेतला. १ दिवस आधी जन्मवेळ दाखवल्यामुळे तिच्या पत्रिकेतुन मंगळ आपोआप अंतर्धान पावला आणि लगेच लग्न ठरले. तिच्या लग्नाला आता १० वर्षं झाली. २ मुले आहेत. सगळे सुरळीत चालु आहे.

मला अजुनही आठवते की मी एकदा आजीला विचारले होते की तिचे लग्न कुंडली पाहुन झाले का? तर ती "नाही" म्हणाली होती. माझ्या आई-वडिलांचे लग्न देखिल कुंडली न बघताच झालेले. म्हणजे कुंडली पहाण्याचे फॅड गेल्या २०-३० वर्षांपासुन सुरु झाले असावे असा माझा कयास.

कुंडली आणि पत्रिका हे थोतांड आहे यावर मी ठाम आहे पण एखाद्या अंधपणे विश्वास ठेवणार्‍याला खालील प्रश्न विचारले तर मात्र त्यावर समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत :

- चांगली वेळ पाहुन मुल जन्माला घालायला लावणारे निसर्गाच्या विरोधात जाऊन बाळाचे भविष्य सुरक्षीत करु शकत असावेत का?
- सिझरेयन बाळाची जन्मवेळ खरी मानावी का?
- कुंडली आणि पत्रिका यांवर विसंबुन लग्ने ठरवणार्‍यांच्या आजि-आजोबांनी पत्रिका पाहुन लग्न केलं होतं का?
- कुंडली/पत्रिका या फक्त ठराविक धर्मातील मुला/मुलींनाच कशा काय लागु होतात?
- मंगळ ग्रह एखाद्या मुस्लिम, जैन, परशी, शीख, बौद्ध,ख्रिस्ती समाजातील मुलांना/मुलींना त्रासदायक कसा काय नसतो?

हे सर्व थोतांड आहे हे थोड्या विचाराअंती कोणालाही कळु शकेल परंतु ज्यांची उपजिविका या गोरख धंद्यावर चालते त्यांनी अशा कुंडाल्या-पत्रिका बघुन समाजाला फसवण्याचा उद्योग अविरत चालु ठेवला आहे आणि तो फोफावतो आहे हे बघुन समाज कोणत्या दिशेस जातोय हा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. सरकार अशा फसवेगिरी करणार्‍यांवर वचक ठेवण्यास कमी पडत आहे तरिही आपण आपल्या घरच्यांना, नातेवाईकांना, परिचितांना समजावुन सांगुन या थोतांडापासुन नक्कीच दूर ठेऊ शकु असे वाटते.

Group content visibility: 
Use group defaults

हिंदू धर्मातील चांगली शिकवण ह्या वर कधीच चर्चा होत नाही>> तुम्ही का सुरु करत नाही त्यावर धागा..? कुणी अडवलंय का..?? की ग्रहदशा ठीक नाहीय सद्ध्या..?? Wink

@Rajesh188

धाग्यातल्या चर्चा विश्याचा हिन्दू धर्माशी काय सम्बन्ध?

अंधश्रद्धा सर्वच धर्मात आहेत फक्त हिंदूंच्या च चवट्यावर आणायच्या आणि हिंदू ची बदनामी करायची हा उद्योग आपल्या देशात तेजीत आहे>>
सफाईची सुरुवात स्वतःच्या घरातून करायची की दुसऱ्याच्या?

पोलिस कमिश्नर गुलाबराव पोळ यांनी नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा तपास करण्याकरिता प्लँचेंट करुन दाभोळकरांच्याच आत्म्याला कमिश्नर ऑफिसमध्ये बोलवले तेही पुरोगामी आघाडी सरकारच्या कारकीर्दीत. म्हणजे प्लँचेट वर सरकारी मोहर लागली. सबब प्लँचेट ही अंधश्रद्धा नाहीच.

पोलिस कमिश्नर गुलाबराव पोळ यांनी नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा तपास करण्याकरिता प्लँचेंट करुन दाभोळकरांच्याच आत्म्याला कमिश्नर ऑफिसमध्ये बोलवले तेही पुरोगामी आघाडी सरकारच्या कारकीर्दीत. >> कारकीर्द कुणाची का असेना अंधश्रद्धाळुंना आणि त्यांना फसवणार्‍या भामट्यांना काहीही फरक पडत नाही.

शिक्षण जसे वाढेल तस लोक स्वतः विचार करतील
आणि अंध श्रद्धा नष्ट होतील.
आता पहिल्या पेक्षा खूप सुधारणा झाली आहे .
पण श्रद्धा आणि अंध श्रद्धा ह्यातील सीमा रेषा धूसर असते त्या मुळे टीका केली किंवा तीव्र विरोध केला की निगेटिव्ह परिणाम दिसतो

अतिशिक्षित आणि शिक्षित इंजिनिअर डॉक्टर लोकांची संख्या मोठी आहे अंधश्रद्धाळू लोकामध्ये... शिक्षणाने आपोआप अंधश्रध नष्ट होत नसतात. खासकरून तेव्हा, जेव्हा अंधश्रद्धांना खतपाणी घालून आपले धंदे चालवणारे मार्केटिंग करत असतात....

घरात काही धार्मिक कार्यक्रम आहे म्हणून पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या (ज्यांचा शोध विज्ञानाने लावला) घेणार्‍या (त्याचे दुष्परिणाम माहिति असुन आणि भोगुनसुद्धा) कित्येक बायका उच्चशिक्षित आणि स्वतः डॉक्टर असलेल्याही असतात. ह्याला अंधश्रद्धा नाही म्हणायचं? आयुष्य उध्वस्त करणारी कसली ही श्रद्धा? हाबद्दल बोलायचे नाही? बोलले तर हिंदूद्रोही ठरवले जातील... आपल्याच जातीधर्मातल्या स्त्रियांना त्रास होत असेल तर बोलायचे नाही मात्र दुसर्‍या धर्मातल्या ओ कि ठो न कळणार्‍या तलाक प्रकरणात नाक घालून फुर्र फुर्र करायचे एवढेच ह्या प्रतिगामी ढेकूणांना माहित असते.

हेला
एकतर तुमचा अभ्यास कच्चा आहे किंवा द्वेष खूप आहे मनात
पहिले mc चे पूर्ण पाच दिवस स्त्री ल कशालाच
हात लावायला मनाई होती
आज स्त्रिया हे सर्व पाळत नाहीत 90% घरात.
पुनर्विवाह होत आहेत.
स्त्रिया शिकत आहेत
अजून किती उदाहरणे देवू द्वेष सोडा

<<< शिक्षण जसे वाढेल तस लोक स्वतः विचार करतील आणि अंध श्रद्धा नष्ट होतील. >>>
नाही होणार. जोपर्यंत लोक रॅशनल विचार करत नाहीत, तोपर्यंत हे होणे नाही. मग शिक्षण कितीही असू दे. नाहीतर मंगळयान पाठवण्याआधी पूजा घालणारे इस्रोचे महाभाग दिसले नसते.

कुंडली/पत्रिका : खरे की थोतांड
पुण्यवंत साधकांसाठी खरे,
अधर्मी,नास्तिकांसाठी थोतांड.

हयात नास्तिकतेचा प्रश्न कसा काय येवू शकतो ? मी देवाला मानतो पण कर्मकाण्डावर विश्वास नाही ठेवत तर कर्मवाद श्रेष्ठ मानला मग आता सांगा की मी कुंडली / पत्रिका ह्यावर विश्वास ठेवतो की नाही ठेवत ! Wink

Hindu धर्म हा ईश्र्वरावर विश्वास ठेवणारा धर्म आहे .
त्यामुळे इस्त्री मध्ये जे झाले ते श्रध्देचा भाग आहे .
त्याला अंध श्रद्धा म्हणता येणार नाही .

इस्रो मध्ये पूजा केली गेली ह्या मध्ये कोणाच्या पोटात दुखण्याची काही गरज नाही आम्ही आस्तिक आहोत आणि ईश्वर वर विश्वास ठेवणार च
कोणाला पटत नसेल तर ते मत स्वतः जवळ ठेवावे हिंदू ना शहाणपण शिकवू नये

हिंदु असुनही मी पत्रिका/कुंडली मानत नाही आणि ती मानावी म्हणुन कोणी पोटावळ्या हिंदुने शहाणपणा शिकवु नये.

अतिशिक्षित आणि शिक्षित इंजिनिअर डॉक्टर लोकांची संख्या मोठी आहे अंधश्रद्धाळू लोकामध्ये... शिक्षणाने आपोआप अंधश्रध नष्ट होत नसतात. खासकरून तेव्हा, जेव्हा अंधश्रद्धांना खतपाणी घालून आपले धंदे चालवणारे मार्केटिंग करत असतात....

+१ लाख

तुम्हाला काय वाटतं तुम्हाला जास्त विश्वाची माहीत आहे .
जे यशस्वी डॉक्टर , इंजिनिअर,संशोधक,उद्योगपती, उच्विद्याविभूषित असून ईश्वर मानतात त्यांना तुमच्या पेक्षा कमी बुध्दी आहे त्यांना तुम्ही शहाणपण सांगणार

महाअशय, बुद्धि कमी-जास्त असण्यावर मुर्खपणा करणे-न करणे अवलंबुन असते तर आजवर समस्त पोटावळ्यांच्या पोटावर लाथ बसली असती. पण तसे नाही म्हणुन तर अजुनही पोटावळे ना-ना क्र्लुप्त्या काढुन बुद्धिवंतांना गंडवुन त्यंचे पैसे हडप करत आहेत Proud

Pages