मराठी भाषा दिवस उपक्रम- सुलेखन

Submitted by मभा दिन संयोजक on 27 February, 2019 - 00:55

नमस्कार माबोकर,
म भा दिवस २०१९ निमित्त सुलेखनाचा उपक्रम जाहीर करत असताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
सुलेखन म्हणजे कॅलिग्राफी करून तुम्ही तुमची ह्या विषयातील कला सादर करू शकता.
नियम:
१. फक्त संयोजकांनी दिलेल्या वाक्यांचा वापरच सुलेखनाकरता करायचा आहे.
२. सुलेखन स्वतः केलेले असावे, टूल वापरून केले तरी चालेल.
३. स्वतःच्या हस्ताक्षरात सुलेखन केले तरीही चालेल.
४. सुलेखन प्रकाशचित्र स्वरूपात (.jpg image) सादर करावे. ही प्रकाशचित्रे याच धाग्यावर अपलोड करावीत.

सुलेखनासाठी खालीलपैकी कुठल्याही वाक्यांचा वापर करावा. एका आयडीने एकापेक्षा जास्त सुलेखने सादर केली तरी चालेलच.
१. वेडात मराठे वीर दौडले सात
२. निश्चयाचा महामेरू
बहुत जनांसी आधारू
३. बकुळफुलांच्या, प्राजक्तीच्या दळदारी देशा
४. कोसळताना वर्षा अविरत, स्नानसमाधीमध्ये डुबावे
५. अलगूज वाजं मनात, भलतंच झालंया आज
६. सावळे सुंदर रूप मनोहर
७. खळखळुद्या या अदय शृंखला हातापायांत
८. मी गाताना गीत तुला लडिवाळा हा कंठ दाटुनी आला
९. बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
१०. मेघांत अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला माऊस वापरुन एवढ्या सफाईदारपणे अक्षरं काढता येतील का ह्याची जाम शंका वाटते आहे.. ती सुद्धा एक सारखी छापल्यासारखी

छान झालीयेत सर्वांची सुलेखनं.
एखादच करून पहायचं असेल आणि पेंट व्यतिरिक्त काही टूल्स / सॉफ्टवेअर नसतील तर नेटवर देवनागरी सुलेखनाची सोय आहे का? हाताने / ब्रशने जमण्याइतकी चित्रकला चांगली नाही.

Happy

Happy

मी स्केचबुक हे ॲप आणि ॲप्पल पेन्सील वापरतो. स्क्रिनशॉट देतोय सोबत. हौशी कलाकारांसाठी उत्तम ॲप आहे. EDCADD62-79E3-47B5-825C-6AEDDE611B79.png

20190228_174641.jpg

धन्यवाद प्राचीन!
हर्पेन, अहो या उपक्रमाच्या नादाने समजले आपल्यालाही जमू शकते थोडे फार. त्यामुळे अतिउत्साहात सुरू आहे सगळे. अजुन आठ दिवस तरी हा उत्साह टिकेल की नाही माहीत नाही. Happy

अजुन आठ दिवस तरी हा उत्साह टिकेल की नाही माहीत नाही. Happy
>>>
अशी शंका असेल तर ताबडतोब सगळी वाक्ये सुलेखित कराच असा आग्रह धरतो.

दाटलेल्या कंठाच्या मानानी थेंब जरा जास्तच होताहेत एखादा पुरे Wink

मयुरी चवाथे-शिंदे>> खूपच छान सुलेखन !
शाली काही ऐकत नाही बुवा>> हो ! एकसे एक सुलेखनं रेखाटतायत !

हा धागा नंतर पण चालू राहिलच ना ? आत्ता नाही जमलं तर नंतर पोस्ट करायला ?

शाली on 1 March, 2019 - 12:42 >> सुरेख!

पॅपिलॉन, मयुरी - सुंदर आहेत सुलेखने.

अ प्र ती म रेखाटलयं रे सर्वांनी!! काय कला आहे , व्वा ! Happy

पॅपीलॉन, इतिहास जागवलात एका चित्रात .

शाली, तुम्ही तर ऑलराऊंडर आहात.

Pages