मराठी भाषा दिवस उपक्रम- सुलेखन

Submitted by मभा दिन संयोजक on 27 February, 2019 - 00:55

नमस्कार माबोकर,
म भा दिवस २०१९ निमित्त सुलेखनाचा उपक्रम जाहीर करत असताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
सुलेखन म्हणजे कॅलिग्राफी करून तुम्ही तुमची ह्या विषयातील कला सादर करू शकता.
नियम:
१. फक्त संयोजकांनी दिलेल्या वाक्यांचा वापरच सुलेखनाकरता करायचा आहे.
२. सुलेखन स्वतः केलेले असावे, टूल वापरून केले तरी चालेल.
३. स्वतःच्या हस्ताक्षरात सुलेखन केले तरीही चालेल.
४. सुलेखन प्रकाशचित्र स्वरूपात (.jpg image) सादर करावे. ही प्रकाशचित्रे याच धाग्यावर अपलोड करावीत.

सुलेखनासाठी खालीलपैकी कुठल्याही वाक्यांचा वापर करावा. एका आयडीने एकापेक्षा जास्त सुलेखने सादर केली तरी चालेलच.
१. वेडात मराठे वीर दौडले सात
२. निश्चयाचा महामेरू
बहुत जनांसी आधारू
३. बकुळफुलांच्या, प्राजक्तीच्या दळदारी देशा
४. कोसळताना वर्षा अविरत, स्नानसमाधीमध्ये डुबावे
५. अलगूज वाजं मनात, भलतंच झालंया आज
६. सावळे सुंदर रूप मनोहर
७. खळखळुद्या या अदय शृंखला हातापायांत
८. मी गाताना गीत तुला लडिवाळा हा कंठ दाटुनी आला
९. बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
१०. मेघांत अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाली, हर्पेन, माधव, दत्तात्रय, मनस्विता, रश्मी आणि सर्वांचे मनपूर्वक आभार
@ जाई >> अगदी पूर्ण व्यावसायिक नाही पण मी एक ग्राफिक आर्टिस्ट आहे
आणि कॅलिग्राफी ची जास्त आवड आहे विशेषतः मराठी Happy

Auto desk मध्ये, android phone वर, स्टायलस न वापरता, वापरला असता तर अजून फिनिशिंग जमवता येईल.
शिकण्यातच तीन दिवस घालवले, तरी जसं पाहिजे तसं जमलं नाहीये.

स्टायलस न वापरता केलय म्हणजे कमालच आहे.

हिम्सकुल जरा आगाऊपणा करतोय.
स्केच करताना प्रेडिक्टीव्ह स्ट्रोक अॉन ठेऊन लेव्हल ३ वर ठेवा.
चिझल टिप पेन सिलेक्ट करुन रोटेशन १३८ च्या आसपास ठेवा.
शक्य तेथे रुलर वापरा
कॅलिग्राफी गाईड लाईन्सचे एक लेयर वापरा. ते नंतर हाईड किंवा डिलीट करता येईल.
प्रत्येक गोष्टीसाठी स्वतंत्र लेयर वापरा. नंतर मर्ज करता येतील
CF67F654-130B-44F0-83F7-2BFA0BFD0CD9.jpeg

सगळी सुलेखनं आवडली...

मला या कलेचा काहीही गंध नाही, तरी ते अ‍ॅप डालो करायचा फार मोह झाला... पण आवरला,
कारण नाहीतर कामधाम विसरून मी तेच करत बसले असते. Lol

खरंच कसली सुंदर सुलेखन केलीयेत तुम्ही सगळ्यांनी
माझं पेन आणि कागद अजून दुकानातच आहे Wink . पण वेळ मिळाला कि नक्की प्रयत्न करणार
कामधाम विसरून मी तेच करत बसेन >> हि भीती मला पण आहे खरंच Proud

हिम्सकूल. तुमचे 'बलाकमाला'
मी चुकून
'चला कामाला' च वाचले Happy

बहूतेक काम सोडून माबोवर आल्याचा परिणाम असेल Lol

भारी!
स्टायलस न वापरता करताय म्हणजे कौतूकच आहे. अजुन टाका.

सातवं छिद्र मागच्या बाजूला आहे, वरचा स्वर लावण्यासाठी..
शाली तुम्हाला एक मेल केली आहे, बघून उत्तर द्या.

Pages