तुमचा विकान्ताचा मेन्यू काय असतो?

Submitted by स्वप्नाली on 29 November, 2018 - 16:23

विक-डे मध्ये फारसे काही वेग ळे करायची सोय नसते, मुले सुद्धा तेच तेच खावून कन्टाळतात...
तेव्हा चला चर्चा करूया तुमचा विकान्ताचा मेन्यू (घरी केलेला ) काय असतो?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

माझा माहेर फलटण चा, तिकडे शेजारी बनवायचे गुळवणी आणि पोळी कमी गोड असायची. परंतु माझी आई गोड पोळ्या करायची, आम्ही फक्त दुधात तूप टाकून त्याबरोबर खायचो. कटाची आमटी प्यायची मधून मधून.
पुरणपोळी गुळवणी बरोबर खाताना पाहिलं आहे तसेच आमटी बरोबर. सोलापूर च्या मैत्रिणीकडे अक्षय तृतीयेच्या दिवशी पुरणपोळी आमरस चा नेवैद्य दाखवतात अर्थात खातात ही. पुण्यात लोक बासुंदी बरोबर खाताना पहिला आहे. कशाशी ही खा. ज्याच्या त्याच्या आवडीचं प्रश्न. मी मात्र पोळी च्या गोडीवर depend करेल कशाशी खायचा ते तसेच असावे बहुधा. हो आणि आंब्याच्या मोसमात खाऊन पहा आमरस बरोबर, मला तर नाही आवडला तसा.

रवा - मैद्याची पुपो करायला खुप कठीण असते, पण चव अप्रतिम, अगदी तोंडात घालताच विरघळते पोळी.>>>>>रेसिपी/प्रमाण टाका.

Submitted by देवकी on 7 January, 2019 - 13:17>>>> देवकीताई माझ्या एका मैत्रिणीला पण हवी होती ही रेसिपी म्हणून नवीन धागा काढलाय पुपोच्या रेसिपीचा☺️

साबुदाणा वडे खूप आवडीचे, पण त्यात पोषक असे काहीच नसते म्हणून वर्षातून एखादं वेळेलाच करतो.
आज मम्मी ने मिक्स पिठाची थालीपीठ अन उपमा केला नाश्त्याला☺️

काल सायंकाळी पाणी पुरी. म्हणजे विकतच्या पुऱ्या आणि घरी बनवलेलं पाणी.. मनसोक्त पाणी पुरी..
आज रविवार.. म्हणून ब्रंच.. इडली, सांबार आणि चटणी.! हेपण खूप हेवी झालं.. मग आता संध्याकाळी.. फक्त दाल खिचडी, लोणचं आणि पापड..! Happy

आज संडे सुट्टी -
सकाळी नाश्ता - एक साधा डोसा
जेवण - छोले भाजी आणि पोळी
संध्याकाळी - एक भेळपुरी
आता - चिकन बिर्याणी

पोट टम्म फुगलय!

थँक्स श्रद्धा!

आज सकाळी मस्त शुद्ध तुपातला शिरा!

photo_2019-01-27_22-11-29.jpg

दुपारी तवा चिकनचं रस्सेदार मॉडीफिकेशन चापल्यानंतर, संध्याकाळी थोडं हलकं खायचं होतं. म्हणून,

रस्सम, भात अन डाळ्यांची चटणी उर्फ गनपावडर केली.

photo_2019-01-27_22-11-24.jpg

Pages