तुमचा विकान्ताचा मेन्यू काय असतो?

Submitted by स्वप्नाली on 29 November, 2018 - 16:23

विक-डे मध्ये फारसे काही वेग ळे करायची सोय नसते, मुले सुद्धा तेच तेच खावून कन्टाळतात...
तेव्हा चला चर्चा करूया तुमचा विकान्ताचा मेन्यू (घरी केलेला ) काय असतो?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

एयर फ्राईड पापलेट,
wk2.jpgwk3.jpg
विथ एअर बेक्ड सॉरी, पॅन फ्राईड व्हेजिटेबल्स.
wk1.jpg

यम्मी झालं होतं जेवण.

ते फोटो बघून एअर फ्रायर घ्यायची खूप ईच्छा होते
<<
साधे ओव्हन किंवा कन्व्हेक्शन वाला मायक्रोवेव्ह असेल तर त्यातही छान होईल. एयर फ्रायर फार महाग नाहीत.. पण एक सिंगल काम करणारे अर्थात कधी-मधी लागणारे मशिन म्हणून जागा अडवून बसू शकतं ते.

सोनाली, आमच्याकडे सुंठ अन गूळ पाण्यात उकळून गुळवणी करतात. पुरणपोळी खाताना ताटात पुरणपोळी ठेवून त्यावर तूप, दूध अन गुळवणी एकत्र कालवून खातात , सोबत तोंडलावणी म्हणून बटाट्याची भाजी, भजी अन पापड.
ज्यांना पुपो कालवून खायची नसते, ते वर फोटोत दिल्याप्रमाणे वाटीत गुळवणी अन दूध घेऊन त्यात पोळी बुडवून खातो.

पुरणपोळी एवढी गोड असताना पुन्हा गुळवणी? कुठल्या ठिकाणची पद्धत आहे? ?(म्हणजे कुठल्या भागात असे करतात.. कुतुहल आहे म्हणून विचारतेय).

कुतुहल आहे म्हणून विचारतेय >>> अगदी अगदी. मला पण आहे कुतूहल. आमच्याकडे तूप, दुध किंवा नारळाच्या दुधाबरोबर खातात पुरणपोळी. कटाची आमटी केली तरी पोळी त्याबरोबर खात नाहीत, काही ठिकाणी कटाच्या आमटीबरोबर खातात.

काही भागात गोडाबरोबर पण खायची पद्धत आहे. आमरसाबरोबर पण खातात पण ही पद्धत कोकणात नाही बघितली. कोकणात पुपो तशी कमी प्रमाणात केली जाते, इथेही आम्ही होळीला करतो आणि कधी श्रावण महिन्यात.

फोटो मस्त आहे VB.

आरारा, तुमच्या बेक्ड भाज्या पण कन्वेक्शन मोडवर होतात का? त्या धाग्यावर तुम्ही नुसतेच सेंटीग्रेड बद्दल लिहीलय, किती सेंटीग्रेड ते पण लिहा Wink

झंपी आणि अंजु, सेम पिंच. मला पण हेच प्रश्न पडले की आधीच गोड असलेली पुरणपोळी गुळाच्या पाण्याबरोबर का आणि कुठल्या प्रदेशात खातात? माझ्यासाठी हे अगदीच नवीन आहे. साधं दूध / साजूक तूप/ नारळ दूध किंवा अगदीच म्हणजे कटाच्या आमटीबरोबर (खरं तर आमटी बरोबर नाहीच) खाल्लेलं पाहिलं आणि ऐकलं आह, पण गुळाच पाणी का? कि पोळी गोड करत नाहीत? जसा सुधारस (बंडल फेक रेसिपी Proud ) पुरीबरोबर खातात तसं हे गुळाच पाणी डाळ स्टफ केलेल्या पराठ्याबरोबर खातात का?

Vb आणि sonalis हजार प्रश्न आहेत,पटापट उत्तर द्या Happy

Sonalis तू तर पुरणपोळी तूप आणि गुळाचा खडा याबरोबर खाण्याचा उल्लेख केला आहेस. कुछ समझा नहीं

देशस्थ लोक पुपो गुळवणी सोबत खातात.
आम्ही कोकणी जास्त पुपो करत नाही. होळी ला करतो. कधी संक्रांतीला वैगेरे.
पण देशावर वरचेवर पुपो करतात.

>>>आमच्याकडे तूप, दुध किंवा नारळाच्या दुधाबरोबर खातात पुरणपोळी. कटाची आमटी केली तरी पोळी त्याबरोबर खात नाहीत, काही ठिकाणी कटाच्या आमटीबरोबर खातात.
काही भागात गोडाबरोबर पण खायची पद्धत आहे. आमरसाबरोबर पण खातात पण ही पद्धत कोकणात नाही बघितली. कोकणात पुपो तशी कमी प्रमाणात केली जाते, इथेही आम्ही होळीला करतो आणि कधी श्रावण महिन्यात.<<<<
+१

अगदी अगदी.
मला वाटते ते देशावर खुप असे करतात. आमरस-पुपो वगैरे.

>>>>आम्ही कोकणी जास्त पुपो करत नाही. होळी ला करतो. कधी संक्रांतीला वैगेरे.<<<
गहु कुठे पिकतो कोकणात. .. पुपो तर होळी, श्रावण आणि नवरात्रीत देवीला अष्टमील. बस. कोकणातुन इंदोरलो गेलेले आमचे पुर्वज कोकणी रीतीच पाळत ज्यास्त.

मला वाटते ते देशावर खुप असे करतात. आमरस-पुपो वगैरे. >>> देशावर म्हणजे नक्की कुठे???

आमच्याकडे म्हणजे कोल्हापुरात खातात अशी पोळी. अन पोळी गोडच असते. अन गुळवणी पण. एकदा अशी पुपो खाऊन तरी बघा, खुप आवडेल Happy

मी वर लिहीलेय तसे एका ताटात पुपो घ्यायची त्यावर सढळ हाताने तुप घ्यायचे, मग दुध मिसळलेली गुळवणी. आणी बिल्कुल न लाजता सगळे एकत्र कालवायचे अन खायचे. हे मिश्रण शक्यतो पातळच ठेवायचे, मध्ये मध्ये कटाच्या आमटीचा भुरका मारायचा, बटाटाची भाजी अन पापड खायचे तोंडलावणी म्हणुन.

एकदा करुन पहा असे, माझ्यामते नक्कीच आवडेल Happy

गहु कुठे पिकतो कोकणात. . >>> झंपी आम्ही पण गव्हाच्या नाही करत पुपो, रवा-मैद्याच्या करतो.

रवा - मैद्याची पुपो करायला खुप कठीण असते, पण चव अप्रतिम, अगदी तोंडात घालताच विरघळते पोळी.

पुरणपोळी एवढी गोड असताना पुन्हा गुळवणी? >>>>> सुधारसाबरोबर जिलबी नाहीतर रबडीबरोबर जिलबी (हे मस्त लागते) खाणारे लोक आहेत की.
रच्याकने पुपो, क.आ/दूध्+साखर+तूप /ना.दूध+गूळ याबरोबर खाल्ली जाते.

रवा - मैद्याची पुपो करायला खुप कठीण असते, पण चव अप्रतिम, अगदी तोंडात घालताच विरघळते पोळी.>>>>>रेसिपी/प्रमाण टाका.

अहो, रवा आणि मैदा , गव्हापासूनच असतो हो. एकुणात , गव्हाचे पदार्थ कमीच कोकणात असे म्हणायचे होते.
कोल्हापुर कुठे कोकणात गणतात?

गुळवणी + पुरणपोळी + तूप+दुध हे डेडली कॉम्बीनेशन जास्त करुन सांगली जिल्ह्यात असते. एकदा हे प्रकरण ट्राय करुन बघाच.

Sonalis तू तर पुरणपोळी तूप आणि गुळाचा खडा याबरोबर खाण्याचा उल्लेख केला आहेस. कुछ समझा नहीं>> अशी पद्धत नाही पण तशी आवडते म्हणून खाल्ली जाते.

बिल्कुल न लाजता सगळे एकत्र कालवायचे अन खायचे. हे मिश्रण शक्यतो पातळच ठेवायचे, मध्ये मध्ये कटाच्या आमटीचा भुरका मारायचा,>>अगदी अगदी.
मला भाकरी आणि रस्सा असाच कालवून खायला आवडतो. एकदा मैत्रिणीकडे कोंबडीचा बेत होता. मी वेगळे ताट मागितले, त्यात भाकरी चुरली वरून रस्सा घेतला न जेवायला सुरुवात केली तर ती म्हणते कि अशी का खातेस? म्हटले मला असेच आवडते. Happy

त्याला तेलच्या-गुळवण्या म्हणत हा पदार्थ नक्कि काय आहे ते माहिती नाही पण आता तो फार कुठ बनत नसेल , देशावर पुरणपोळ्या भरपुर बनतात अर्थात गव्हाच उत्पादन भरपुर त्यामूळेच... पुरणपोळी- आमरस खायची पण पद्धत आहे ,अप्रतिम लागतो.

प्रत्येक सणासुदीला पुरणपोळी करायची पद्धत मी पहिल्यांदा श्रीरामपुरला, ज्यांच्या घरात आम्ही राहायचो त्यांच्याकडे बघितली होती. माझ्यासाठी नवीन होतं ते, मला कौतुकही वाटलं एवढं सतत त्यांचं असा घाट घालण्याचं.

Btw आ. रा. रा. यांचं पॅन फ्राईड वेजिटेबल्स सॉलिड.

आमरस पुपो नगर जिल्ह्यातले मूळ असणारे इथे राहतात त्यांच्याकडे बघितलं, मला नाही फार आवडलं. तसंही मला फार गोड नाही आवडत पण हापूस आंब्याचा आमरस नुसता किंवा पुरीबरोबर आवडतो.

माझ्या मम्मीने जणू माझा डायट यशस्वी होऊ न द्यायची शपथ घेतली आहे.

आज शनिवार सरप्राईज म्हणून माझे आवडते साबुदाणा वडे आहेत ब्रेफाला☺️

IMG_20190112_090957.jpg

Pages