तुमचा विकान्ताचा मेन्यू काय असतो?

Submitted by स्वप्नाली on 29 November, 2018 - 16:23

विक-डे मध्ये फारसे काही वेग ळे करायची सोय नसते, मुले सुद्धा तेच तेच खावून कन्टाळतात...
तेव्हा चला चर्चा करूया तुमचा विकान्ताचा मेन्यू (घरी केलेला ) काय असतो?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कालचेच हॉटेलातील उरलेले चायनीज (चि. क्रिस्पी, चि.ह. नूडल्स आणि चिंट्रीशे राईस) सर्व उरलेसुरले एकत्र ढवळून संपवायचे आहे. >>>> घरचं फूड चालतं, पण हॉटेलमधलं फूड दुसऱ्या दिवशी नक्कीच खाऊ नये. सरळ बीनमध्ये पाठवावे. चायनीज तर अजिबातच नाही

घरचं फूड चालतं, पण हॉटेलमधलं फूड दुसऱ्या दिवशी नक्कीच खाऊ नये. सरळ बीनमध्ये पाठवावे. चायनीज तर अजिबातच नाही >>>> + ११११११

खरंय, पण एका माणसाचे उरतेच.. आणि ते नॉनवेज असेल तर मलाच खावे लागते.. काय करणार, असे अन्न टाकयलाही जीवावर येते.. आणि त्यातही एकवेळ घरचे टाकायला फारसे वाटत नाही, पण बाहेरचे जास्तीचे पैसे मोजून विकत आणलेले फेकायला जास्त जीवावर येते. मिडलक्लास मेंटेलिटी !

बाकी मी पचवू शकतो बाहेरचे. आठवड्यातील १४ पैकी ९-१० वेळा मी बाहेरचेच खातो. बॉडीला सवय झालीय.

बाकी मी पचवू शकतो बाहेरचे. आठवड्यातील १४ पैकी ९-१० वेळा मी बाहेरचेच खातो. बॉडीला सवय झालीय>>>> हे तर खूप वाईट

आता नाही पण कालांतराने त्रास होऊ शकतो

हो, कल्पना आहे. पण काही नाईलाज, काही सवय वा व्यसन म्हणा, चुकतेय हे समजूनही सध्या असे चालू आहेच.

कृष्णा ते गोल काय आहे? अन कसली आमटी / भाजी? अन ते काय आहे मिरचीचा ठेचा का?>>>

उडदाची आमटी, ज्वारीची भाकरी, हिरव्या मिरचीचा ठेचा, आणि रात्रीच्या पोळीचा गुळतूप लाडूची स्वीट डीश. Happy

<<उडदाची आमटी, ज्वारीची भाकरी, हिरव्या मिरचीचा ठेचा,<,
येस्स.. आमच्याकडे ही शनिवारी हमखास हाच मेन्यु असतो.

उडदाची आमटी, >>> बुळबुळीत नाही का लागत??? >> आमच्या कडे उडदाच्या डाळीची करतात. डाळ थोडी भाजून घेतात म्हणजे बुळबुळीत नाही होत.

उडदाची डाळ... आम्ही त्या डाळीचा विचार फक्त पोळ्यांसाठीच केलाय... करुन पहायला हवी मग ती डाळ. थोडं वेगळं Happy
ठेचा मला आवडतो.. पण नाहि येत बनवायला .

उडदाची आमटी, >>> बुळबुळीत नाही का लागत???>>>>
अजिबात नाही छान होते एकदम लसून, कांदा भाजून, मिरची ह्यांचे छान वाटण करून लावायचे. थोडे तिखट हवे.. भाकरी बरोबर एकदम भारी. Happy

काली उडद दाल : काळ्या पाठीची उर्फ साल न काढलेल्या उडीद डाळीची झणझणीत काळ्या मसाल्यात बनवलेली डिश खानदेशात फेमस आहे.

<<काली उडद दाल : काळ्या पाठीची उर्फ साल न काढलेल्या उडीद डाळीची झणझणीत काळ्या मसाल्यात बनवलेली डिश खानदेशात फेमस आहे.<<
येस्स.. अशीच करतात. Happy

क्रुष्णा, आरारा, dj. रेसीपीज टाका प्लीज. इथे विंटर मध्ये छान वाटलीत या सगळ्या उडदाच्या रेसीपीज. आमच्याकडे घरी उडीद होतो शेतात. आजी उडदाच्या पीठाची आमटी आणि ओल्या दाण्याची उसळ करायची थंडीत खास.

आमच्या सातारा भागात उडीद डाळीचं घुटं करतात ते ओरपायला मिळालं की स्वर्गसुख समजावं..!
>>>
मम! हो मला प्रचंड आवडतं :यम्मः हे घुटं म्हणजेच का उडदची आमटी?

कोकणात उडदाची आमटी करतात ह्याला (बहुतेक)उडदवणी म्हणतात. मला पर्सनली अजिबात आवडत नाही. विचित्र वास नी चव.

आमच्या गावी उडीद आला शेतातुन की झाले सुरु उडदाचे प्रकार.
डांगर, उडीद मेथी वरण,उडदाचे कढण हे थंडीत तर पार मे महिन्यात पापड घालून उडीद संपेपर्यण्त. मला अधीमधी बरे वाटतात पण नकोसे होतात थंडीत तेच तेच.

कढण तेवढं थंडीत प्यायला बरे वाटते. अक्खे उडीद भाजून, पाखडून मग जात्यावर दळून घ्यायची आजी.
पाट्यावर अक्खाच चुलीत भाजलेला लसुण गड्डा तसाच ठेचून, अक्खी एक खोबर्‍याची वाटी भाजून आणि भाजलेला कांदा वाटायची.
दोन पळ्या भरून घरचे तूप कढईत घालून भरमसाठ लसणाच्या सालीसकट काड्या तळायची. मग सुकी लाल मिरची व कांदा तळायची. मग वरचे वाटण, घरचा काळा मसाला आणि खडा हिंग घालून तो तळून हे उडीद पीठ त्या फोडनीत कोरडेच परतायची. वरून गरम पाणी ओतले की झाले कढण. उकळी आली की तयार. सजावाटीला कोथींबीर. सर्दी पळायची. भाकरी बरिबर मस्त लागते.

IMG_7146 (2).jpg

आमचा मागच्या विकान्ताचा मेन्यू
अन्डा पुलाव
ब्रुशेतो
सलाड
<<स्पे श ली पन्जा-डीश मध्ये >>

ती पोट्य्यांसाठीची डिश वाटत्येय, ते खरं असेल आणि त्यांची पोरं हे अगदी ५-६ पानांचे सॅलेड ते ही ड्रेसिंग न घालता खात असतील तर मी त्याला नक्कीच सॅलेड म्हणायला तयार आहे Happy Proud

Pages