आठवणीतली बडबडगीतं

Submitted by मृण्मयी on 28 March, 2009 - 12:57

निषादची लहानपणची 'नर्सरी र्‍हाइम्सची' काही पुस्तकं अचानक सापडली. ती उघडून सगळ्या कविता पुन्हा एकदा वाचताना मला माझ्या लहानपणीची 'बडबडगीतं' आठवायला लागली. लहान मुलांच्या कवितांकरता इतकं समर्पक नाव सुचणार्‍या महाभागाचं कौतुक!
जशी आठवतील तशी आपापल्या बालपणीची , आठवणीतली गाणी इथे लिहून काढलीत तर वाचायला (बहुतेक सगळ्यांना) आवडेल. (अभ्यासक्रमातल्या कविता जुन्या हितगुजवर कुठेतरी लिहील्या आहेत. पण बडबडगीतं सापडली नाही.)

माझी एक आवडती कविता...
ह्या कवितेतला चित्ता खूप हावरट वाटायचा. कुणाला ह्या कवितेचे कवी आठवत असतील तर सांगा.

एकदा एक चित्ता
हातात घेऊन अडकित्ता
चित्ता आला दुपारी
मागु लागला सुपारी
मी म्हंटले "कशाला?"
तेव्हा चित्ता म्हणाला,
"नुकतेच जेवण झाले फक्कड,
खाऊन टाकले बारा बोकड.
बारा बोकड सोळा शेळ्या,
बघता बघता फस्त केल्या.
नंतर थोडी गंमत म्हणून,
तीन कोंबड्या टाकल्या खाऊन.
जेवण जरा जडच झाले,
भलते अंगावरती आले.
म्हंटले खावी सुपारी,
म्हणून आलो दुपारी."

किशोर मासिकातली एक...
आलगट्टी गालगट्टी
शोन्याशी गट्टी फू

तुला मी घेणार घेणार नाही
चॉकलेट गोळ्या देणार नाही
आलास तर घेईन गालगुच्चा
अंगावर सोडीन भू

पमगाडी, कूकगाडी
शेतावरची हम्मागाडी
आम्ही सगळे भूर जाऊ
एकटाच राहशील तू

पप्पु, बिट्टी, वेदा, राणी
आम्ही घेळू छापापाणी
तूच एकटा बाथरुममधे
रडके डोळे धू

(अशी दुष्ट प्रवृत्तीची बालगीतं आवडंत असल्याचं बघून आई-वडलांनी 'बाळीचे पाय पाळण्यातच ओळखले'.! Proud )

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेपटीवाल्या प्राण्याची ... अजुन एक कडव आहे
खार म्हणाली
पडेल थंडी ,
पडेल थंडी तेव्हा
माझ्या शेपटीची मलाच बंडी ....

अरुंधती ते बेडकाच गाण आम्ही पण म्हणायचो. पण मला मधली कडवी माहित नव्ह्ती. आणि लाडकी बाहुली तर माझं एक्दम फेव्. मला कायम रडु यायचं हे गाण म्हणताना.

एकदा रानात जत्रा जमली

अस्वल बनले दुकानदार
खेळणी मांडली शानदार

झाडावरून खार आली
दुकान पाहून धुंद झाली Happy

तिने घेतल्या लेमन गोळ्या
दहा पैशाच्या मिळाल्या सोळा

सर्कशी मधून वाघोबा आले
अस्वल दुकान टाकून पळाले.

अंजली, माझीही काही ती कविता तोंडपाठ नाहीए गं, मधल्या ओळी, काही शब्द आठवतच नव्हते. खात्री केली आणि इथे पोस्टली! Happy

आपल्या सगळ्यान्चं अग्दी मंजे अग्दी खूप्प्प फेवरेट :

सान्ग सान्ग भोलानाथ
पाउस पडेल काय?
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ?

भोलानाथ दुपारी आई झोपेल काय?
लाडू हळूच घेताना आवाज होयेल (असच ऐकू येतं कॅसेट्मधे Happy ) काय ?
भोलानाथ भोलानाथ

भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर
पोटात माज्या कळ येऊन दुकेल का रे ढोपर ?
भोलानाथ भोलानाथ

भोलानाथ भोलानाथ खरं सान्ग एक्दा
आठवड्यातनं रविवार येतील का रे तीनदा?
भोलानाथ भोलानाथ

सान्ग सान्ग भोलानाथ
पाउस पडेल काय?
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ?

बुगू बुगू बुगू बुगू बुगू बुगू बुगू बुगू बुगू बुगू बुगू बुगू

आणि कित्ती गोडुले आहेत नै त्या कॅसेटीतल्या छोटुल्यान्चे आवाज Happy

यावरून मला अस्सावा सुंदर चॉकलेटचा बंगला आठवलं. ज्याला पूर्ण येतंय त्यानी लिहावे आणि पूर्ण चॉकलेट खावे.

एक होती परी
खूप खूप गोरी

तिला सापडली एकदा
लांब लांब दोरी.
दोरी बांधली खांबाला,
परी लागली चढायला.

दोरी तुटली कचकन,
परी पडली धपकन.
परी लागली रडायला
चांदोबा लागला हसायला.

हे गाण माझी आई म्हणायची आमच्या लहानपणी.

..

एक होता चिंकु
एक होता पिंकु
दोघे निघाले फिरायला
नदीतुन पोहायला
त्यांना दिसला लाल फुगा
दोघे म्हणाले त्यावर बसा
चिन्कु पिंकु बसले फुग्यावर
फुगा चालला उडत
तिकडुन पाहिले घारीने
चोच मारली चोचीने
फुगा फुटला फाटकन
चिंकु पिंकु पडले धापकन
अशी झाली चिंकु पिंकु ची फजीती

आणखी एक छान बडबडगीत होते , त्याच्या फक्त शेवट्च्याच ओळी आठवतायेत.
कोकणातला आंबा आणि फणस, टांगा आणि मोटारीतुन मुंबईला चालले आहेत अशी काहीशी सुरवात होती.
शेवटच्या ओळी अशा होत्या ..

टांगा मोटार झाली टक्कर
फणसबुवांना आली चक्कर
फणसाचा झाला लोळागोळा
आंबा झाला पिवळा पिवळा
आम्हाला नको मुंबईची हवा
कोकण आपले बरे बुवा

गाई पाण्यावर काय म्हणूनि आल्या
का गं गंगा यमुनाही या मिळाल्या
उभय पितरांच्या चित्त चोरटीला
कोण माझ्या बोलले छबेलीला

उष्ण वारे वाहती नासिकात
गुलाबाला सुकविती काश्मिरात
नंदनातील हलविती वल्लरीला
----------------------

तुला लंकेच्या पार्वतीसमान
पाहोनीया होवोनी साभिमान
पहा त्यातील बोलली एक कोण
अहा आली ही पहा भिकारीण

रत्न सोने मातीत जन्म घेते
राजराजेश्वर निज शिरी धरी ते
पंकसंपर्के कमळ का भिकारी
धुलीसंपर्के रत्न का भिकारी
--------आणखी हिरा मोती
कशी तु ही मग मजमुळे भिकारी

देव देतो सद्गुणी बालकाना
काय म्हणूनी आम्हा करंट्याना
आता त्याच्या गावास जावोनिया
गूढ येतो हे त्यास पुसोनिया

म्याव म्याव म्याव
येउ का घरात
कोण आहे आत
स्वयपाकघरात

अगं बाई या कोण आजीबाई
मग तर मी येतच नाही
झाले जरी पिकले पान
तिखट आहे अजुनी कान

पुढचे नीट आठवत नाहीये ...
हे अजुन एक

असावा सुंदर चॉकोलेट चा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला

>>यावरून मला अस्सावा सुंदर चॉकलेटचा बंगला आठवलं.
मला पण Happy

माझ्या भाचीबरोबर खूप वेळा ऐकल्/म्हणले आहे

असावा सुंदर चॉललेट चा बंगला,
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला [हे "चां" चहा मधल च आहे]

चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचे दार
शेपटीच्या झुपक्याने झाडून जाईल खार

गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
हॅलो हॅलो करायला छोटासा फोन

बिस्किटांच्या गच्चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुले लाल लाल

चांदीच्या झाडामागे चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलातुनी लपाछपी खेळतो, हो लपाछपी खेळतो

उंच उंच झोक्यांचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला

किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला..
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला...

गोरी गोरी पान फुलासारखि छान
गोरी गोरी पान फुलासारखि छान
दादा मला एक वहिनी आण
दादा मला एक वहिनी आण

वहिनीला आणायला चांदोबाची गाडि
चांदोबाची गाडि तिला हरणांची जोडी.
हरणांची जोडी तुडवि गुलाबाचे रान
दादा मला एक वहिनी आण

गोर्‍या गोर्‍या वहिनीची अंधाराची साडी
अंधाराची साडी तिला चांदण्याची खडी.
चांदण्याच्या पदराला बिजलीचा बाण (धन्स मनकवडा Happy )
दादा मला एक वहिनी आण

वहिनीशी गट्टी होता
तुला दोन थापा
तुला दोन थापा तिला साखरेचा पापा
बाहुल्यांच्या परि आम्हि दोघि होउ सान
दादा मला एक वहिनी आण

कोणास ठाऊक कसा
पण सिनेमात गेला ससा

सशाने हलविले कान,
घेतली सुंदर तान
सा, नि, ध, प, म, ग, रे, सा
दिग्दशर्क म्हणाला, व्वा व्वा !
ससा म्हणाला, चहा हवा.

कोणास ठाऊक कसा,
पण सर्कशीत गेला ससा
सशाने मारली उडी,
भरभर चढला शिडी
विदुषक म्हणाला, छान छान !
ससा म्हणाला, काढ पान

कोणास ठाऊक कसा,
पण शाळेत गेला ससा
सशाने म्हटले पाढे
बे एकं बे, बे दुणे चार, बे त्रिक सहा, बे चोक आठ
आणि भरभर वाचले धडे
गुरुजी म्हणाले, शाबास !
ससा म्हणाला, करा पास

नाच रे मोरा, आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच

काळा काळा कापूस पिंजला रे
ढगांशी वारा झुंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच,
नाच रे मोरा ...

झरझर धार झरली रे
झाडांची भिजली इरली रे
पावसात न्हाऊ, काहीतरी गाऊ
करुन पुकारा नाच,
नाच रे मोरा ...

थेंब थेंब तळयात नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघात, खेळ खेळू दोघांत
निळया सवंगडया नाच,
नाच रे मोरा ...

पावसाची रिमझिम थांबली रे
तुझी माझी जोडी जमली रे
आभाळात छान छान सात रंगी कमान
कमानीखाली त्या नाच,
नाच रे मोरा ...

यातल "निळया सवंगडया" आणी "आभाळात छान छान सात रंगी कमान" मला फार आवडत Happy

छडी लागे छमछम विद्या येई घमघम,
छमछमछम छमछमछम!

केवढ्या मोठ्या मिशा, डोळे एवढे एवढे लाल
दंतौजीचा पत्ता नाही, खप्पड दोन्ही गाल
शाळेमधल्या पोरांना हा वाटे दुसरा यम
छमछमछम छमछमछम!

तंबाखूच्या पिचकार्‍यानी भिंती झाल्या घाण
पचापचा शिव्या देई खाताखाता पान
मोर्‍या, मूर्खा, गोप्या, गद्ध्या देती सर्वा दम
छमछमछम छमछमछम!

छडी लागे छमछम विद्या येई घमघम,
छमछमछम छमछमछम!

बारीकराव होते बारीक
त्याना आवडे भारी खारीक

खारीक खाता कडम कडम्
बाता मारी गरम गरम्

एकदा म्हणाले मारीन कुस्ती,
वाघ सिंहाची जिरवीन मस्ती
हत्तीचा ओढीन सुपाएवढा कान
जिराफाची मोडेन उंच मान

....पुढचे आठवत नाहिये आता

मी ऐकलेलं नाच रे मोराचं विडंबन आहे...

नाच रे उंदरा शेंगाच्या डब्यात
नाच रे उंदरा नाच

दुडू दुडू डब्यात धावतो रे
कुडू कुडू शेंगा फोडतो रे
आमची मनीमाऊ करडी
बसते त्याच्या नरडी
शिकवील त्याला धडाच

नाच रे उंदरा...

गाई पाण्यावर काय म्हणूनि आल्या
का गं गंगा यमुनाही या मिळाल्या
उभय पितरांच्या चित्त चोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला?

उष्ण वारे वाहती नासिकांत
गुलाबाला सुकविती काश्मिरात
नंदनातील हलविती वल्लरीला
कोण माझ्या बोलले छबेलीला?

शुभ्र नक्षत्रे चंद्र चांदण्यांची
दूड रचलेली चिमुकली मण्यांची
गडे! भूईवर पडे गडबडून
का ग आला उत्पात हा घडून?

विभा विमला आपटे- प्रधानांच्या
अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या
गौर चैत्राची तशा सजुनि येती,
रेशमाची पोलके छिटे लेती

तुला लंकेच्या पार्वतीसमान
पाहोनीया होवोनि साभिमान
काय त्यातील बोलली एक कोण
'अहा!- आली ही पहा- भिकारीण!'
मुली असती शाळेतल्या चटोर;
एकमेकीला बोलती कठोर;
काय बाई! चितात धरायाचे
शहाण्याने ते शब्द वेड्यांचे?
रत्न सोने मातीत जन्म घेते
राजराजेश्वर निज शिरी धरी ते
कमळ होते पंकात , तरी ते
वसंतश्री स्त्कार करायाते
पंकसपर्के कमळ का भिकारी?
धुलीसंसर्गे रत्न का भिकारी?
सूत्रसंगे सुमहार का भिकारी?
कशी तूही मग मजमुळे भिकारी!

देव देतो सद्गुणी बालकाना
काय म्हणूनी आम्हा करंट्याना
आता त्याच्या गावास जावोनिया
गूढ येतो हे त्यास पुसोनिया

'गावि जातो' ऐकता त्याच काली
पार बदलुनि ती बालसृष्टि गेली!
गळा घालुनि करपाश रेशमाचा
वदे 'येते मी' पोर अज्ञ वाचा!

कवी बी

कवितेत आणखी १५ कडवी आहेत. अर्थ स्पष्ट होण्यापुरती आरंभीची काही व शेवटली २ दिली आहेत.

मयेकर,तुम्हाला कुठे हि मिळाली? मी हि कविता नुसती एकून होते. संक्षिप्त अर्थ माहितीय की मुलगी गरीब असल्याने तिला चिडवतात पण कवितेतील प्रत्येक कडव्यात एक उपमा वापरून मस्त अर्थ सांगितलाय. मी विसरले आता अर्थ. कोणी लिहिल का त्याचा अर्थ? धन्यवाद.
दुसरी कविता माहीतीय? सवे सेना भूपाळ निघालाहे....

माझ्याकडे 'आठवणीतल्या कविता'चे ३ भाग आहेत. (एक भाग कोणीतरी वाचायला नेऊन परत केला नाही)...कवीची मुलगी रडत घरी येते..ती काहीच बोलत नाही..पण कवीच वेगवेगळे तर्कवितर्क करत राहतो, समजाऊ पाहतो...पण मुलगी रडतेच आहे..शेवटी तो म्हणतो आमच्यासारख्या करंट्यांना अशी नक्षत्रासारखी मुलगी का दिली असे त्या देवालाच विचारतो त्याच्या गावी जाऊन्....गावी जातो हे ऐकताच मुलीचा मूड चटकन बदलतो आणि ती म्हणते मी पण येते. कवितेचे शीर्षक - माझी कन्या.

चिदेव , मी अत्ता तेच सांगणार होते, आठवणीतल्या कविततंमधे मिळतील तुम्हाला. थँक्स भरत. ते एकंदरीत किती भाग आहेत ३ कि ४ ?

अजुन एक गाणं
पाउस खुळा किती पाउस खुळा
शिंपडुन पाणी आई भिजवी फुला
नाचे किती वेड्यापरी
बडबडे काहीतरी
झोडपतो उगाच हा वेलीच्या मुला
जाउ का मी अंगणात ?
पुसू डोके अंग पाय
काकडून गेला किती माझा छकुला !
निजवुया गादिवर
पांघरुण घालुवर
सांग काय आणुन मी देउ ग तुला ( हे नक्की आठ्वत नही)

(मग आई म्हणते .....)

नको जाउ पावसात,
फुल पावसाचे मुल
ऊन येता चमकेल त्याच्या डोईला !!

( मुलगा म्हणतो....)
मज वेडा म्हणतील
फुल शहाणे होईल
मग वेडी म्हणतील सगळे तुला

भरत थँक्स. Happy
अरुंधती, तुला वाटाणा फुटाणा शेंगदाणा हि कविता येते का , मी सुरवातीला पोस्टलीये, पण पुर्ण येत नाही. मला हवीये गं ही कवीता. मी खुप शोधतेय.

Pages