माझी सैन्यगाथा (भाग १६)

Submitted by nimita on 10 November, 2018 - 12:57

आज बऱ्याच दिवसांनंतर, म्हणजे ऑलमोस्ट दीड महिन्यानंतर हा पुढचा भाग लिहायला घेतलाय. सर्वप्रथम या दिरंगाई बद्दल खूप मोठ्ठं 'सॉरी'...पण गेले काही दिवस सणवार आणि बाकी सोशल ऍक्टिव्हिटीज् मधे इतकी व्यग्र होते, त्यामुळे गाथा लांबणीवर पडत गेली.असो.. आता नमनाला घडाभर तेल वाया न घालवता मूळ मुद्द्यावर येते.

बऱ्याच दिवसांपासून माझ्या काही वाचक मित्र मैत्रिणींकडून सातत्यानी एक फर्माईश होते आहे- आणि ती म्हणजे- त्यांना armed forces मधले प्रोटोकॉल्स, एटिकेट्स वगैरे जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे. तेव्हा आता या आणि पुढच्या काही भागांत त्यांची ही मागणी पूर्ण करायचा प्रयत्न करते.

आमच्या लग्नानंतर नितीन वेळोवेळी मला आर्मी मधल्या प्रोटोकॉल्स आणि एटिकेट्स बद्दल सांगतच होता पण मी सुद्धा माझे डोळे आणि कान कायम उघडे ठेवून माझ्या सभोवतालच्या माणसांचं वागणं बोलणं अगदी लक्ष देऊन बघत होते.त्यामुळे मी लवकरच या लाईफ मधे रुळले.

खरं म्हणजे हे जे लिखित आणि अलिखित नियम आहेत ना ते सगळे अगदी साधे, सोपे आणि लॉजिकल आहेत हो !

म्हणजे बघा ना....जर एखादा कार्यक्रम किंवा एखादी पार्टी अटेंड करायची असेल तर त्यासाठीचा ड्रेस कोड ठरलेला असतो -अगदी कपड्यांपासून ते फुटवेअर पर्यंत! आणि त्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत तसा उल्लेखही केलेला असतो. कार्यक्रमाचं स्वरूप फॉर्मल आहे का सेमी फॉर्मल...का informal, casual....त्या प्रमाणे निमंत्रण पत्रिकेत खाली ड्रेस कोड चा उल्लेख असतो...उदाहरणार्थ ''lounge suit',' 'combination', 'open collar' वगैरे. अर्थात, हे ऑफिसर्स करता लागू असतं हे तुमच्या लक्षात आलंच असेल. पण ladies नी सुद्धा प्रसंगानुरूप कपडे घालणं अपेक्षित असतं.. साधारणपणे कुठल्याही फॉर्मल कार्यक्रम किंवा पार्टी मधे साडी हे सर्वमान्य परिधान आहे. पण असा काही नियम नाही हं! सलवार कमीज किंवा evening gowns वगैरे ही घालतात बऱ्याच जणी.. पण स्त्रियांकरता एक नियम मात्र नक्की आहे....त्यांचे कपडे हे निदान 'neck to knee' असणं आवश्यक आहे.

यात थोडं अजून सविस्तर सांगायचं झालं तर 'mess function' आणि 'पार्टी' यात ही फरक आहे. Mess function हे खूपच फॉर्मल असतं, त्याचं स्वरूप पूर्णपणे ऑफिशियल असतं. आणि यासाठी ऑफिसर्स चे ठरलेले mess dresses असतात..Blue patrol, White patrol, 6B वगैरे.

मुख्यत्वेकरून सगळे नियम हे ऑफिसर्स करता असतात, स्त्रियांच्या बाबतीतले सगळे नियम मात्र अलिखित, अध्याहृत (but mostly in line with the officers).

जेव्हा एखाद्या कार्यक्रमाचं किंवा पार्टीचं invitation card घरी येतं ना तेव्हा त्यात स्पष्टपणे लिहिलेलं असतं..Officers to be present at ...

Ladies are cordially invited.

मोस्टली, फॉर्मल कार्यक्रमांमधे किंवा फॉर्मल मेस फंक्शन अथवा पार्टीज् मधे मुलांना यायची परवानगी नसते. अशा वेळी ज्यांची मुलं लहान असतात त्या स्त्रियांनी तो कार्यक्रम अटेंड केला नाही तरी चालतं.

वर उल्लेख केलेल्या ड्रेस कोड मधे काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत...

फॉर्मल कार्यक्रमांत लाईट कलरचा शर्ट आणि डार्क कलरची ट्राउजर ही रंगसंगती योग्य मानली जाते. सॉक्स चा रंग हा ट्राउजर च्या रंगाशी मॅचिंग असला पाहिजे.

त्याचप्रमाणे रुमाल हा शक्यतो पांढरा असावा, पण जर रंगीत असेल तर त्याचा रंग टाय शी मिळताजुळता असावा, पण फक्त रंगच हं... रुमालावर टाय सारखं डिझाइन नसावं.

फक्त कपडेच नाही तर फुटवेअर चे पण काही नियम आहेत बरं का! फॉर्मल कार्यक्रम आणि मेस मधे जाताना काळे किंवा ब्राऊन रंगाचे शूज अपेक्षित आहेत आणि तेही with laces. चप्पल, स्लीपर्स, किंवा स्पोर्ट्स शूज यांना सक्त मनाई.

आता काही सोशल एटिकेट्स बद्दल...

जेव्हा दोन व्यक्ती पहिल्यांदाच एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांची ओळख करून देताना पण काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात..उदाहरणार्थ:

जर एक पुरुष आणि स्त्री पहिल्यांदा भेटत असतील तर नेहेमी पहिल्यांदा पुरुषाची स्त्रीला ओळख करून दिली जाते.

त्याचप्रमाणे भेटणाऱ्या व्यक्तींपैकी जी जास्त वयस्क आहे तिला दुसऱ्या व्यक्तीची प्रथम ओळख करून दिली जाते.

जर दोन ऑफिसर्स भेटत असतील तर नेहेमी आधी ज्युनिअर ऑफिसर ची सीनिअर ऑफिसर ला ओळख करून दिली जाते.

थोडक्यात काय तर ज्या व्यक्तीला जास्त आदर द्यायचा तिला आधी दुसऱ्या व्यक्तीची ओळख करून द्यायची....आहे ना रोचक माहिती!

आणि अजून एक खास बात...armed forces मधे सगळ्याच स्त्रियांना खूप आदर आणि सन्मान दिला जातो..

जर एखादा ऑफिसर युनिफॉर्म मधे असेल आणि अशा वेळी जर तो एखाद्या लेडीला भेटला, तर तो तिला सॅल्यूट करतो... irrespective of his age and his rank.

त्याचप्रमाणे,एखाद्या फॉर्मल किंवा इन्फॉर्मल कार्यक्रमात जेव्हा एखादी स्त्री त्या ठिकाणी येते, तेव्हा सर्व पुरुष उठून उभे राहतात...आणि जोपर्यंत ती उभी असते तोपर्यंत तेही सगळे उभेच राहतात..

पार्टीमधे जेवणाच्या वेळी पण काही प्रोटोकॉल्स पाळतात…. जर त्या पार्टी मधे मुलांना पण बोलावलं असेल तर सगळयात आधी मुलं जेवायला सुरुवात करतात, त्या नंतर ladies आणि सगळ्यात शेवटी ऑफिसर्स. आणि इथेही रँक ची hierarchy पाळली जाते…. सगळ्यात सिनियर ऑफिसर सगळ्यात आधी आणि ज्युनिअर सगळ्यात शेवटी. स्त्रियांकरता असा काही लिखित नियम नाहीये, पण सीनिअर लेडीज ना आदर आणि सन्मान देण्यासाठी म्हणून इतर ज्युनियर लेडीज त्यांच्या नंतर जेवायला सुरुवात करतात.

Armed forces मधे वक्तशीरपणा ला खूप महत्त्व दिलं जातं. प्रत्येक जण दिलेली वेळ पाळतो. कुठल्याही कार्यक्रमात मुख्य अतिथीला जी वेळ दिली असेल त्याच्या थोडी आधीची वेळ इतरांना दिली जाते, जेणेकरुन जेव्हा प्रमुख पाहुणे येतात तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी बाकी सगळे सज्ज असतात.

पण यात ही अजून एक संकल्पना आहे..ती म्हणजे 'service time' ..म्हणजे दिलेल्या वेळेच्याही पाच मिनिटं आधी हजर राहणे....

अश्या अजून बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या.... पण त्या पुढच्या काही भागांत सांगते. आज इथेच थांबते..

आणि हो.. पुढचा भागही लवकरच येईल !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे सगळे प्रोटोकॉलस जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना पण लागू होतात का? उदा, एखाद्या जवानाची बायको समोर आली तर उच्च अधिकारी तिलाही एखाद्या ऑफिसरच्या पत्नीला करेल तसा सॅल्युट करतो का?

बोक्या ह्याला ब्युरोक्रसी नाही म्हणत, कल्चर म्हणतात. नीटनेटके राहावे. दुसऱ्याचा आदर करावा. ह्या गोष्टी खरे तर यच्चयावत जगातल्या जनतेनं पाळल्या पाहिजेत. दुर्दैवाने आज काल फक्त सैन्यातच अश्या प्रकारचे कल्चर शिल्लक आहे. सैन्य एकसंध कुटुंबाप्रमाणे असावे लागते. धाडस, देशाविषयीचे प्रेम, सहकार्यांविषयीची निष्ठा यातून समोरून गोळ्यांचा पाऊस पडत असताना विरोधात उभे राहायचा बळ येते. ९ ते ५ एमएनसी मधली पाट्या टाकण्याची नोकरी करण्याइतके युद्ध सोपे असते तर प्रत्येक सोम्या गोम्या जगज्जेता झाला असता.

ह्या असल्या शिष्टाचारांमुळे एक कुटुंब असल्याची भावना खरोखरच निर्माण होते का एकमेकांबद्दल राग आणि मत्सरच वाढीस लागतो हे तपासायला हवे.
असले शिष्टाचार पाळल्यामुळे भारतीय सैनिक जगज्जेते ठरतील ह्या भ्रमात रहाणे हे फारच हास्यास्पद आहे.

सोहा तुमचे म्हणणे अगदी योग्य आहे. सैनिकांमध्ये शिष्टचार शिस्त काही नसावीच. मर्सिनरी टोळी करायला पाहिजे त्यांना.

सोहा, तुमचा प्रतिसाद वाचला ..मला वाटतंय की तुमची काहीतरी गल्लत झालीये. शिष्टाचार पाळल्यामुळे लोकांमधे द्वेष, मत्सर जागा झाल्याचं मी तरी आजपर्यंत बघितलं नाहीये. याउलट जेव्हा लोक शिष्टाचार विसरतात तेव्हा त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याची कितीतरी उदाहरणं आहेत.
दुसरी महत्त्वाची गोष्ट... आपले armed forces त्यांच्या कामात खूप सक्षम आहेत आणि वेळोवेळी त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे. पण ही professionalism शिष्टाचार पाळल्यामुळे येते असं जर तुम्हांला वाटत असेल तर कठीण आहे. Our soldiers give their sweat and blood , they undergo rigourus training continuously and that makes them one of the best armed forces in the whole world.
And every Indian should be proud of them. Not just proud but thankful also.

Our soldiers give their sweat and blood , they undergo rigourus training continuously and that makes them one of the best armed forces in the whole world.
And every Indian should be proud of them. Not just proud but thankful also. +१११११११११११ _/\_

लेख छान

उपाशी बोका जी,
तुम्हाला Armed forces आणि beurocracy यांत काय साम्य दिसलं हे जरा स्पष्ट करून सांगाल तर बरं होईल.

वत्सला,armed forces मधे जेव्हा स्त्रियांना आदर, सन्मान द्यायची वेळ येते तेव्हा ऑफिसरची बायको, जवानची बायको इतकेच नव्हे तर civilian स्त्रियांना पण एकसारखाच सन्मान दिला जातो.

<<< त्यासाठीचा ड्रेस कोड ठरलेला असतो -अगदी कपड्यांपासून ते फुटवेअर पर्यंत! आणि त्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत तसा उल्लेखही केलेला असतो. >>>

एटिकेट्स एकवेळ समजू शकतो, पण प्रोटोकॉल्स या शब्दातच ब्यूरोक्रसी दडली आहे असे वाटत नाही का? म्हणजे दुसर्‍या देशाचा चीफ ऑफ आर्मी स्टाफ दौर्‍यावर येणार असेल तर त्याचे स्वागत करायला आपला चीफ ऑफ आर्मी स्टाफ जाणार की डिफेन्स मिनिस्टर जाणार की पंतप्रधान जाणार की राष्ट्रपती जाणार की कुणीच जाणार नाही? हा प्रकार प्रोटोकॉल्सचा आहे म्हणजे ब्यूरोक्रसीचाच ना?

तसेच मोजे काळे घालायचे की निळे, पट्टा काळा वापरायचा की ब्राऊन, डार्क कलरची ट्राउजर असेल तर लाईट कलरचा शर्ट ही ब्यूरोक्रसीच झाली. ऑफिसरचे स्टार्स किती आहेत ते बघून त्याची पत ठरवणे आणि त्याप्रमाणे त्याने कधी जेवायचे हे ठरवणे हा पण ब्यूरोक्रसीचाच भाग, मग भले त्याला प्रोटोकॉल्सचे गोंडस नाव दिले तरी.

आणि हे प्रोटोकॉल्सचे कौतुक करणारी आर्मी. जेव्हा त्यांचे सर्वोच्च फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ दिवंगत झाले तेव्हा कुठे होते? ५ स्टारच्या या ऑफिसरच्या अंत्यविधीला राष्ट्रपती, पंतप्रधान, डिफेन्स मिनिस्टर, तिन्ही दलांचे (भूदल, नौदल, वायुदल) चीफ ऑफ स्टाफ कुणीही हजर न्हवते. नुसते फुसके कौतुक त्या प्रोटोकॉल्सचे.

उपाशी बोकाजी,
एखादं काम जर systematically, as per procedure केलं तर ते यशस्वीरीत्या आणि खात्रीशीर पूर्ण होतं... जे तर जगजाहीर आहे.. आपल्या दैनंदिन व्यवहारात पण आपल्याला याचा पदोपदी प्रत्यय येतो..
हेच social आणि professional पातळीवरही लागू पडतं.. मग त्याला तुम्ही ब्युरोक्रसी म्हणा, प्रोटोकॉल म्हणा किंवा अजून काही....The fact remains the same..
Armed forces मधली शिस्तबद्ध कार्यपद्धती अजूनही टिकून आहे आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा civil administration फेल होतं तेव्हा प्रत्येक वेळी आपल्या देशाचे armed forces परिस्थिती कंट्रोल मधे आणायला धावून येतात....या बद्दल कोणाचंच दुमत नसावं.
अजून एक महत्वाची गोष्ट..Armed forces मधे ऑफिसर ची रँक(स्टार्स) बघून त्याची पत ठरत नाही....याउलट त्याची पत बघून, परखून मग त्याला त्याची रँक दिली जाते.. आणि म्हणूनच प्रत्येक ऑफिसर ला त्याच्या रँक चा रास्त अभिमान असतो.
राहता राहिला फील्ड मार्शल मनेकशाँ यांच्या अंतिम संस्कार चा प्रश्न...या बाबतीत मी तुमच्याशी पूर्ण सहमत आहे.

हो की. पण मला आधी जाम हसू आले. का? तर चिडकु अस आय डी घेतलेल्या व्यक्तीने छान, संयमीत उत्तर दिले, तर उ बोका या आय डीने, आय डीशी सुसंगत प्रतीसाद लिहीला.

निमीता, खूप छान लिहीलेस. थोडक्यात पण छान परीचय करुन दिलास. तुझ्या पेशन्सला पण मानलं पाहीजे.

they undergo rigourus training continuously and that makes them one of the best armed forces in the whole world. >> मग आम्हालाही ह्या असल्या शिष्टाचारांपेक्षा त्या rigourus training बद्दल अधिक माहिती करून घ्यायला आवडेल.
आर्म्ड फोर्सेस मधील लोकांनी इतर प्रोफेशन मधील लोकांना कमी लेखणं आणि 'खरी देशभक्ती दाखवणे म्हणजे सैन्यात दाखल होणं' ह्या प्रचाराचा आता कंटाळा येऊ लागला आहे.
९ ते ५ एमएनसी मधे नोकरी करणारा, प्रामाणिक पणे टॅक्स भरणारा आणि देशाचे कायदे पाळणारा प्रत्येक माणूस हा आर्मी मधल्या कोणत्याही ऑफिसर इतकाच देशभक्त असतो.
Infact, तो टॅक्स भरतो, कायदे पाळतो ह्यामुळे आर्म्ड फोर्सेस मधल्या लोकांना मदतच होते. त्याबद्दल कधी आर्म्ड फोर्सेसच्या लोकांनीपण अश्या प्रामाणिक लोकांना धन्यवाद द्यावेत.

Soha,
'देशभक्ती सिद्ध करण्यासाठी सैन्यात भरती व्हावं लागतं' - या मताशी मी देखील अजिबात सहमत नाहीये. माझ्या दृष्टींनी सीमेवर शत्रूशी लढणारा सैनिक तर देशभक्त आहेच पण रोज सकाळी शहरातले रस्ते झाडणाऱ्या कचरा गोळा करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या मनातही तितकाच जाज्वल्य देशाभिमान असू शकतो.... प्रत्येक देशाच्या उन्नतीसाठी सैनिकांबरोबरच निष्णात आणि प्रामाणिक डॉक्टर्स, इंजिनिअर्स, शिक्षक, scientists,राजनेते वगैरे विविध professionals ची गरज असते.
प्रत्येक सैनिक हा स्वेच्छेने देशासाठी लढायला, आपला जीव द्यायला तयार असतो...आणि तो स्वतः शक्यतो या गोष्टीचा कधीच गाजावाजा करत नाही.पण मला वाटतं की जर देशातले बाकी नागरिक प्रामाणिकपणे त्यांचं त्यांचं काम इमाने इतबारे करत असतील तर अशा देशबांधवांसाठी शत्रूशी लढताना त्या सैनिकाला अजून मानसिक बळ मिळेल.
अजून एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते..इतर लोकांप्रमाणेच प्रत्येक सैनिक ही वेळच्या वेळी टॅक्स भरतो.

सोहा प्लस वन.

थँकफुल व ग्रेट् फुल असावे हा आग्रह का?

आभारी वा कृतज्ञ असावे असे लेखिकेने कुठेच म्हणलेले नाही, शिवाय किमान दोन पिढ्या युद्ध न बघितलेल्या, अनुभवलेल्या देशात त्याची अपेक्षाही असू नये.

निमिता, तुमचे लेखन व प्रतिसाद आवडले.

लेखिका स्वतः आर्मी ऑफिसर नाही तर ऑफिसरची पत्नी आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे. सान्निध्यामुळे बरीच माहिती असली तरी सैनिक अथवा सैनिकी अधिकाऱ्यांचे दैनंदिन काम, त्यातील तणाव आणि व्यक्ती अथवा संस्था म्हणून नागरी आयुष्याहून निराळेपण हे सर्वस्वी वेगळे आणि खोल विषय आहेत. ते एखादा अधिकारीच सांगू शकेल. लेखिका एका वेगळ्या विश्वाची ओळख करून देतीय, ती वाचावी आणि नाही आवडली/पटली तर सोडून द्यावी. त्यावरून समग्र सैन्याच्या अस्तित्वाबद्दल शंका उपस्थित करण्याचा अधिकार व वकूब आपल्याकडे आहे का? याचाही विचार व्हावा.

आपण टॅक्स भरतो म्हणून त्यावर या देशाचे अख्खे सैन्य चालते हा गोड गैरसमज असणाऱ्यांनी सरकारी आमदनीचे प्रकार, त्यांचा विनियोग याचा जरूर सम्यक अभ्यास करावा.

सैनिकी पेशा ही प्रथमतः दिल्या कामाचा उचित मोबदला देणारी नोकरी आहे आणि आपले व्यक्तिगत व सामाजिक कर्तव्य निगुतीने करणारा प्रत्येकजण स्वतःविषयी तितकाच अभिमानी असू शकतो, मग याच न्यायाने सैनिकही अभिमान बाळगू शकतात. मात्र चांगले नेते, प्रशासनिक अधिकारी, शास्त्रज्ञ, समाजसुधारक, खेळाडू यांच्या जगण्याचे ध्येय जसे केवळ रोजचा पगार मिळवणे इतकेच नसते, तर त्याहूनही अधिक असते, तसेच सैनिकी पेशात हे ध्येय बाय डिझाईन भौतिक कमाईहून अधिक असते, असे मला जरूर वाटते.

थँकफुल व ग्रेट् फुल असावे हा आग्रह का?>>>

लेखात लेखिकेने धरलाय का तसा आग्रह?

भारतात सैन्यात जाणे ऐच्छिक आहे. तिथे पगार मिळतो, बाकी सुविधा मिळतात तसाच जीव कायम धोक्यातही असतो. तरुणपणी गेलेल्या सैनिकांच्या ज्या बातम्या रोज वाचायला मिळतात त्यावरून सैनिक अगदी मजेत जगतात असे वाटत नाही.

बाकी जीव कुठेही जाऊ शकतो, अगदी रस्ता क्रॉस करतानाही. पण म्हणून रस्ता क्रॉस करताना आपण जीव जायची तयारीही ठेवलीय म्हणत तो क्रॉस करत नाही. पण सैन्यात जाताना ही तयारी ठेवावी लागते. सैनिकांची इथली फॅमिली असते त्यांच्या मनात कायम ही भीती असते. सैनिक गेल्यावर त्याच्या कुटुंबाला पेट्रोल पंप मिळत असतील चालवायला. पण म्हणून कुणी त्यासाठी सैन्यात जात नाही.

आपल्यासाठी जे काम करतात, भले पैसे घेऊन किंवा फुकट, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली तर काही फारसे बिघडत नाही. आणि कृतज्ञ राहाच हा आग्रहही कुणी धरत नाही.

अमेय, साधना, धन्यवाद.
अमा, तुम्ही माझी आतापर्यंतची लेखमाला वाचली असेल तर त्यात मी कुठेही 'आभार किंवा कृतज्ञतेची ' अपेक्षा किंवा मागणी केलेली नाही.
कारण 'Respect and gratitude is earned and cannot be demanded.' हे मलाही माहीत आहे.
ही लेखमाला लिहिण्यामागे माझा एकच उद्देश होता/आहे....
अजूनही बऱ्याच जणांना असं वाटतं की सैन्यदलातल्या अधिकाऱ्यांच्या आणि जवानांच्या बायका या फक्त पार्टीज् अटेंड करतात, त्यांच्या हाताखाली खूप नोकर चाकर असतात .. सैनिक हे देशासाठी आपला जीव पणाला लावतात। पण त्यांची बायका मुलं मात्र सरकारी घरात राहतात आणि देशभर फिरतात.'
ज्या लोकांना असं वाटतं त्यांचा हा गैरसमज दूर करायचा प्रामाणिक प्रयत्न म्हणजे माझी ही लेखमाला!
आणि आभार किंवा कृतज्ञता व्यक्त करण्याविषयी म्हणाल तर...... एखाद्या शॉपिंग मॉल मधे आपल्या रिकाम्या पिशव्यांची देखभाल करणाऱ्या तिथल्या स्टाफ ला पण आपण 'thank you' म्हणतो....आणि इथे आपल्या देशाची, आपल्या जीवाची रक्षा करणाऱ्या सैनिकांचे आभार मानावे की नाही असे प्रश्न विचारले जातात.
काय ही विडंबना!

प्रॉब्लेम त्यांच्यातले - सगळेच नाही पण तरीही काही जण विशेषतः हायर रॅकंचे सामान्य नागरिकांना ब्लडी सिविलियन म्हणून संबोधतात, दापोडी सीएमई इथले ऑफिसर्स बाहेर आल्यावर जवळपासच्या नागरिकांना शिवीगाळ, मारहाण करतात तेव्हा होतो. जिथे अ‍ॅफ्स्पा लागू आहे त्या प्रदेशातील सैनिकांचे नागरिकांप्रती असलेले वर्तन हा तर मानवाधिकार आयोगाच्या चिंतेचा विषय आहे.

Pages