माझी सैन्यगाथा (भाग १६)

Submitted by nimita on 10 November, 2018 - 12:57

आज बऱ्याच दिवसांनंतर, म्हणजे ऑलमोस्ट दीड महिन्यानंतर हा पुढचा भाग लिहायला घेतलाय. सर्वप्रथम या दिरंगाई बद्दल खूप मोठ्ठं 'सॉरी'...पण गेले काही दिवस सणवार आणि बाकी सोशल ऍक्टिव्हिटीज् मधे इतकी व्यग्र होते, त्यामुळे गाथा लांबणीवर पडत गेली.असो.. आता नमनाला घडाभर तेल वाया न घालवता मूळ मुद्द्यावर येते.

बऱ्याच दिवसांपासून माझ्या काही वाचक मित्र मैत्रिणींकडून सातत्यानी एक फर्माईश होते आहे- आणि ती म्हणजे- त्यांना armed forces मधले प्रोटोकॉल्स, एटिकेट्स वगैरे जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे. तेव्हा आता या आणि पुढच्या काही भागांत त्यांची ही मागणी पूर्ण करायचा प्रयत्न करते.

आमच्या लग्नानंतर नितीन वेळोवेळी मला आर्मी मधल्या प्रोटोकॉल्स आणि एटिकेट्स बद्दल सांगतच होता पण मी सुद्धा माझे डोळे आणि कान कायम उघडे ठेवून माझ्या सभोवतालच्या माणसांचं वागणं बोलणं अगदी लक्ष देऊन बघत होते.त्यामुळे मी लवकरच या लाईफ मधे रुळले.

खरं म्हणजे हे जे लिखित आणि अलिखित नियम आहेत ना ते सगळे अगदी साधे, सोपे आणि लॉजिकल आहेत हो !

म्हणजे बघा ना....जर एखादा कार्यक्रम किंवा एखादी पार्टी अटेंड करायची असेल तर त्यासाठीचा ड्रेस कोड ठरलेला असतो -अगदी कपड्यांपासून ते फुटवेअर पर्यंत! आणि त्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत तसा उल्लेखही केलेला असतो. कार्यक्रमाचं स्वरूप फॉर्मल आहे का सेमी फॉर्मल...का informal, casual....त्या प्रमाणे निमंत्रण पत्रिकेत खाली ड्रेस कोड चा उल्लेख असतो...उदाहरणार्थ ''lounge suit',' 'combination', 'open collar' वगैरे. अर्थात, हे ऑफिसर्स करता लागू असतं हे तुमच्या लक्षात आलंच असेल. पण ladies नी सुद्धा प्रसंगानुरूप कपडे घालणं अपेक्षित असतं.. साधारणपणे कुठल्याही फॉर्मल कार्यक्रम किंवा पार्टी मधे साडी हे सर्वमान्य परिधान आहे. पण असा काही नियम नाही हं! सलवार कमीज किंवा evening gowns वगैरे ही घालतात बऱ्याच जणी.. पण स्त्रियांकरता एक नियम मात्र नक्की आहे....त्यांचे कपडे हे निदान 'neck to knee' असणं आवश्यक आहे.

यात थोडं अजून सविस्तर सांगायचं झालं तर 'mess function' आणि 'पार्टी' यात ही फरक आहे. Mess function हे खूपच फॉर्मल असतं, त्याचं स्वरूप पूर्णपणे ऑफिशियल असतं. आणि यासाठी ऑफिसर्स चे ठरलेले mess dresses असतात..Blue patrol, White patrol, 6B वगैरे.

मुख्यत्वेकरून सगळे नियम हे ऑफिसर्स करता असतात, स्त्रियांच्या बाबतीतले सगळे नियम मात्र अलिखित, अध्याहृत (but mostly in line with the officers).

जेव्हा एखाद्या कार्यक्रमाचं किंवा पार्टीचं invitation card घरी येतं ना तेव्हा त्यात स्पष्टपणे लिहिलेलं असतं..Officers to be present at ...

Ladies are cordially invited.

मोस्टली, फॉर्मल कार्यक्रमांमधे किंवा फॉर्मल मेस फंक्शन अथवा पार्टीज् मधे मुलांना यायची परवानगी नसते. अशा वेळी ज्यांची मुलं लहान असतात त्या स्त्रियांनी तो कार्यक्रम अटेंड केला नाही तरी चालतं.

वर उल्लेख केलेल्या ड्रेस कोड मधे काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत...

फॉर्मल कार्यक्रमांत लाईट कलरचा शर्ट आणि डार्क कलरची ट्राउजर ही रंगसंगती योग्य मानली जाते. सॉक्स चा रंग हा ट्राउजर च्या रंगाशी मॅचिंग असला पाहिजे.

त्याचप्रमाणे रुमाल हा शक्यतो पांढरा असावा, पण जर रंगीत असेल तर त्याचा रंग टाय शी मिळताजुळता असावा, पण फक्त रंगच हं... रुमालावर टाय सारखं डिझाइन नसावं.

फक्त कपडेच नाही तर फुटवेअर चे पण काही नियम आहेत बरं का! फॉर्मल कार्यक्रम आणि मेस मधे जाताना काळे किंवा ब्राऊन रंगाचे शूज अपेक्षित आहेत आणि तेही with laces. चप्पल, स्लीपर्स, किंवा स्पोर्ट्स शूज यांना सक्त मनाई.

आता काही सोशल एटिकेट्स बद्दल...

जेव्हा दोन व्यक्ती पहिल्यांदाच एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांची ओळख करून देताना पण काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात..उदाहरणार्थ:

जर एक पुरुष आणि स्त्री पहिल्यांदा भेटत असतील तर नेहेमी पहिल्यांदा पुरुषाची स्त्रीला ओळख करून दिली जाते.

त्याचप्रमाणे भेटणाऱ्या व्यक्तींपैकी जी जास्त वयस्क आहे तिला दुसऱ्या व्यक्तीची प्रथम ओळख करून दिली जाते.

जर दोन ऑफिसर्स भेटत असतील तर नेहेमी आधी ज्युनिअर ऑफिसर ची सीनिअर ऑफिसर ला ओळख करून दिली जाते.

थोडक्यात काय तर ज्या व्यक्तीला जास्त आदर द्यायचा तिला आधी दुसऱ्या व्यक्तीची ओळख करून द्यायची....आहे ना रोचक माहिती!

आणि अजून एक खास बात...armed forces मधे सगळ्याच स्त्रियांना खूप आदर आणि सन्मान दिला जातो..

जर एखादा ऑफिसर युनिफॉर्म मधे असेल आणि अशा वेळी जर तो एखाद्या लेडीला भेटला, तर तो तिला सॅल्यूट करतो... irrespective of his age and his rank.

त्याचप्रमाणे,एखाद्या फॉर्मल किंवा इन्फॉर्मल कार्यक्रमात जेव्हा एखादी स्त्री त्या ठिकाणी येते, तेव्हा सर्व पुरुष उठून उभे राहतात...आणि जोपर्यंत ती उभी असते तोपर्यंत तेही सगळे उभेच राहतात..

पार्टीमधे जेवणाच्या वेळी पण काही प्रोटोकॉल्स पाळतात…. जर त्या पार्टी मधे मुलांना पण बोलावलं असेल तर सगळयात आधी मुलं जेवायला सुरुवात करतात, त्या नंतर ladies आणि सगळ्यात शेवटी ऑफिसर्स. आणि इथेही रँक ची hierarchy पाळली जाते…. सगळ्यात सिनियर ऑफिसर सगळ्यात आधी आणि ज्युनिअर सगळ्यात शेवटी. स्त्रियांकरता असा काही लिखित नियम नाहीये, पण सीनिअर लेडीज ना आदर आणि सन्मान देण्यासाठी म्हणून इतर ज्युनियर लेडीज त्यांच्या नंतर जेवायला सुरुवात करतात.

Armed forces मधे वक्तशीरपणा ला खूप महत्त्व दिलं जातं. प्रत्येक जण दिलेली वेळ पाळतो. कुठल्याही कार्यक्रमात मुख्य अतिथीला जी वेळ दिली असेल त्याच्या थोडी आधीची वेळ इतरांना दिली जाते, जेणेकरुन जेव्हा प्रमुख पाहुणे येतात तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी बाकी सगळे सज्ज असतात.

पण यात ही अजून एक संकल्पना आहे..ती म्हणजे 'service time' ..म्हणजे दिलेल्या वेळेच्याही पाच मिनिटं आधी हजर राहणे....

अश्या अजून बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या.... पण त्या पुढच्या काही भागांत सांगते. आज इथेच थांबते..

आणि हो.. पुढचा भागही लवकरच येईल !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भविष्यकाळात एखाद्या राष्ट्राचं बळ हे केवळ त्याच्या सैनिकी सामर्थ्यावर ठरणार नसून, जागतिक अर्थकारणातले त्या राष्ट्राचे योगदान ही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. आत्ताही थोडीफार तशीच परिस्तिथी आहे. असे असताना देशातले नागरिक सैनिकांचा सतत उदोउदो करतील अशी अपेक्षा बाळगण चुक नाही का? - सोहा

सोहा, मी स्वतः कधीच कोणाला सांगितलं किंवा लिहिलं नाहीए की भारतीय सैनिकांचा सतत उदोउदो करा. आणि खरं सांगायचं तर सीमेवर ऊन पावसात, आणि बर्फाच्या कड्यांवर उभ्या राहिलेल्या सैनिकाची पण अशी अपेक्षा नसते.. त्याच्या मनात असलेल्या देशभक्तीमुळे तो सैन्यात दाखल होतो... लोकांकडून वाहवा मिळावी म्हणून नाही.
या क्षणी एक मराठी म्हण आठवते आहे...'*गरज सरो वैद्य मरो*

भविष्यकाळात एखाद्या राष्ट्राचं बळ हे केवळ त्याच्या सैनिकी सामर्थ्यावर ठरणार नसून, जागतिक अर्थकारणातले त्या राष्ट्राचे योगदान ही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. आत्ताही थोडीफार तशीच परिस्तिथी आहे. असे असताना देशातले नागरिक सैनिकांचा सतत उदोउदो करतील अशी अपेक्षा बाळगण चुक नाही का? >>

सतत उदो उदो करा असे निमिता यांच्या कोणत्याच लेखात मला तरी दिसले नाही.
आपले सैनिक तिकडे प्राण पणाला लावुन सीमेवर बसलेत म्हणुन तुम्ही आम्ही ईथे निवांत की बोर्ड बडवत शांतपणे लिहु शकतोय..
उद्या या सैनिकांनी आपलं काम सोडुन दिलं तर हे सगळं लिहिण्याची पण परिस्थिती राहाणार नाहीये...जागतिक अर्थकारणात योगदान देण्यासाठी त्या देशातले लोक आणि तो देश स्वतंत्र आणी सुरक्षित तरी राहिले पाहिजेत ना...

लेख कशाबद्दल होता आणि ही चर्चा आता कुठे भरकटत निघाली आहे...असो..
निमिता, तुम्ही "इग्नोरास्त्र" मारा Happy

असे प्रोटोकॉल अस्तित्वातच मुळात का आले असावेत ?
जगातल्या - आपल्या आजू-बाजूला अस्तित्वात असलेल्या उत्तमतेला , उत्तुंगतेला त्यांच्याप्रतीचा आदर व्यक्त करणे या भावनेतून ?
तसे असेल तर मग ती दुधारी वस्तू आहे... त्या मिळणार्या मरातबाला साजेल असे कर्तुत्व आचरणात आणणे ही नैतीक जबाबदारी तिथेच त्या व्यक्तीला - त्या पदाला अध्यर्हुत होउन जाते. ते तसे मिळणार्या मानाला "शोभेल" असे "जगणे" हेच त्या मिळणार्या मनाची फरश्रुती असते.

पार्टीप्रसंगी कसं वागायचं त्याचे काटेकोर मॅनर्स आणि एटिकेट्स पाळणार्‍यांना समाजात कसं वागावं हे कळत नाही?

https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharas...

एखादा सैनिक बेशिस्त असणं वेगळं पण इथे तर १०० जवानांनी ठरवून हल्ला केला आहे.

https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharas...

हॅलो मॅडम,

तुमचे एक दोन लेख वाचले. आवडले. सवडीनुसार सर्व लेख वाचून कळवेनच.

छान लिहिताय. Happy

नमिताजी तुम्ही इग्नोरास्त्र मारा. आपण ब्लडी सिव्हिलियन्स का आहोत हे इथले प्रतिसाद वाचून उदाहरणासहित सिद्ध झालंय. इथे कुणीतरी त्या सैनिकाच्या देशभक्तीची तुलना AC मध्ये बसून टॅक्स भरणाऱ्या देशभक्ताशी (?) केली आणि ते वाचून मी खरंच धन्य झालो (नोकरी करणार्याला टॅक्स चोरायचा ऑप्शन नसतो म्हणून तो भरला जातो, धंदा करणारे किती जण टॅक्स भरतात आणि भरतात ते किती इमानदारीत भरतात हा संशोधनाचा विषय आहे).
आपला देश, आपली लोकशाही अबाधित राहावी म्हणून दिवस-रात्र प्राण तळहातावर घेऊन उभ्या असणाऱ्या तमाम सैनिकांना आणि त्यांच्या पाठीशी ठाम पणे उभे असणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत.
एक गोष्ट फार दुःखाने सांगावी लागतेय नमिताजी, आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य फारच हलक्यात घेणाऱ्या आपल्या पुचाट सिव्हिलियन्स कडून आभाराची अपेक्षा नाही ठेवाल तेच बरं. (जी तुम्ही एनीवे नाहीच ठेवलीय)
तळटीप : हा प्रतिसाद सरसकट सगळ्यांना लागू होत नाही.
धन्यवाद

Pages