तुंबाड: अंगावर येणारी लालसा(स्पॉयलर्स नाहीत)

Submitted by mi_anu on 14 October, 2018 - 02:54

"वारसाहक्काने मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर हक्क सांगणं शहाणपणाचं नसतं."
सतत मुसळधार पावसात भिजलेलं एक गाव, गरिबीत जगणारी एक विधवा आणि लहानपणीच बऱ्याच गोष्टींची समज आलेली तिची दोन मुलं.पैश्यासाठी भीतीदायक वाटूनही एक विशिष्ठ काम करत राहण्यातली अगतिकता.हे सगळं इतक्यावर थांबलं असतं.पण गरिबी पाहिलेली, पैश्याची अधिकाधीक लालसा बाळगणारी आणि हुशार होत जाणारी पुढची पिढी.

'डिल विथ द डेव्हील/सैतानाचा सौदा','इझी मनी' या संकल्पनेवर आज पर्यंत अनेक चित्रपट, कथा, मालिका बनल्या आहेत.कारण ती कल्पना नैसर्गिक आणि तितकी सार्वत्रिक आहे.हाती येणारा खूप पैसा, त्यासाठी अगदी थोडा वेळ पत्करावी लागणारी एक भयंकर जिवावरची जोखीम आणि त्यानंतर तो पैसा आटेपर्यंत मिळवलेलं ऐशआरामाचं आयुष्य-सुख-निवांतपणा.परत एकदा ती किळसवाणी आणि शहारवणारी जोखीम पत्करेपर्यंतच.एखादा विवेकी माणूस ही जोखीम फक्त पोटाची अडचण दूर होण्यापुरतीच पत्करेल.त्यानंतर कष्टाचे पैसे कमवून देणारा व्यवसाय चालू करून त्या मोहापासून आयुष्यभर लांब राहील.पण तुम्हा आम्हाला माहिती आहे- असं आतापर्यंत कधीच घडलं नाही.ही पैश्याची भूक, स्वतः वाढवलेल्या गरजा वाढतच जातात.परत परत त्या सैतानाकडे माणसाला घेऊन जातात.त्या मोबदल्यात गहाण ठेवलेलं आयुष्य, आत्मा, विवेक याबद्दलचे विचार कोपऱ्यात भिरकावून देऊन.

'हॅ, हे काय, अजिबातच भीती वाटली नाही' म्हणून बाहेर येणाऱ्या साठी हा चित्रपट नाही.त्या अपेक्षेने येत असाल तर बहुधा तुम्हाला ट्रेलर कळलं नाही.तुंबाड हा रूढ अर्थाने 'भयपट' नाही.त्यातले चेहरे तुम्हाला घाबरवणार नाहीत, रात्रीमागून रात्री स्वप्नात येऊन झपाटणार नाहीत.पण त्यातली माणसं, त्यांची पैश्याबद्दल लालसा, आणि त्यासाठी जे करावं लागेल ते करत राहण्यामागची अतृप्ती तुम्हाला जास्त घाबरवेल.हादरवेल.शेवट त्यातल्या अगतिकतेने, डिसगस्ट ने आणि हा शेवट माहीत असूनही परत परत त्या मोहात सापडणाऱ्या प्रवृत्ती बद्दल च्या संतापाने डोळ्यात पाणी आणेल.स्पॉईलर द्यायचे नाहीत त्यामुळे जास्त लिहीत नाही.पण असे चित्रपट बनायला हवेत, जास्तीत जास्त लोकांनी बघायला हवेत.रंगीबेरंगी रक्त, घाबरवणारे चेहरे दिसतील म्हणून नाही, तर यातली कथा नक्की काय सांगायचा प्रयत्न करते आहे ते ऐकण्यासाठी. एका छोट्या कथेत अनेक पदर आहेत, एका सरळ साध्या कथे मध्ये बऱ्याच घेण्यासारख्या गोष्टी आहेत.अनर्थ केव्हा झाला?जेव्हा भूक धान्य सोडून धनाकडे वळली.सगळंच गमावणार होतं तेव्हा किमान अर्धं वाचलं ते कशामुळे?धान्यामुळे.शेवटी जे हातात उरलं ते इतकी मोठी जोखीम घेण्याच्या बरोबरीचं तरी होतं का?खूप प्रश्न पडतात.मिळणारी उत्तरं स्वतःला हलवून जातात.

आणि तरीही मला खात्री आहे.पत्करलेली जोखीम मोठी आणि मोबदला खूप मोठा असेल तर आयुष्यात तुम्हीही त्या मोहाच्या आणि मृत्यूच्या दारात पुन्हापुन्हा जाल- थोडीशी चूक किंवा उशीर समोर काय भविष्य घेऊन येतोय हे उघड्या डोळ्याने पाहूनही.

- अनुराधा कुलकर्णी

(नवा लेख लिहायचा मोह आवरला नाही.मी एक्स्पर्ट परीक्षक नाही.पण असे पिक्चर लोकांनी बघायला हवेत.हे नाव जास्तीत जास्त वेळा डोळ्याखालून जायला हवं.मोठे स्टार, चकमकाट बघून थिएटर मध्ये एका दिवशी 8 शो ठेवणारे आणि शेवटी हाती भ्रमाचा मोठा भोपळा ठेवणारे चित्रपट सोडून.)

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तेव्ह त्याला अती झालं असं वाटतं आणि तो मुक्ती देतो. >> खरं तर विनायकला सावकाराला मारायच नसतं. पण सावकाराचा लोभीपणा नडला. सावकार भिंतीत चिनलेला असतांना विनायक आत जातो, तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी असतं. सावकाराची अवस्था बघून तो पण आतून हलतो. त्यातून हस्तर त्याचे हाल करायला लागल्यावर सावकार मदतीसाठी त्याला हाका मारतो, त्याने तो अजूनच कळवळतो. आणि त्याला मुक्ती देतो. विनायक लोभी असला तरी माणुसकी त्याच्यात जिवंत असते.
त्यामुळेच शेवटी तो पंचा घेवून बाहेर येतो तेव्हा 'बाळाऽ" म्हणून मुलाला आर्तपणे हाक मारतो. आपण गेलोच पण जाता जाता घरच्यांचे भले करावे असा त्याचा हेतू असावा कदाचित!

दादीची भूमिका सामदने केलीय असा व्हिडीओ मी पण पाहीला. बर्वेंना विचारा कोणीतरी!

सावकाराला मारायचं नसतंच.पण सावकाराने आपल्याला गंडवून बाईबरोबर बिझी ठेवून खजिन्याच्या इथे जायचा घाट घातला हे सलत असतंच.
विनायक जर अजून चांगला असता तर त्याने राघव ला त्या वाड्यात पाहून भेटून कोपच्यात घेऊन सर्व धोके सांगितले असते.अर्थात राघव ने तरीही धोके पत्करायचा निर्णय घेतला असताच. पण स्वतःला इतल्या मेहनतीने मिळालेले ज्ञान विनायक ने सहज का सांगावे?
सावकाराला हूल देऊन खाली जाताना त्याला मारावे/राक्षसातोंडी द्यावे हा हेतू नसेलच.सावकाराला हस्तर दिसून तो घाबरुन बाहेर येईल किंवा काही लिंक न लागून रिकामी जागा पाहून शेवटी नाद सोडून वर येईल असे काहीसे डोक्यात असावे.
सावकाराची अवस्था भयानक आहे. आजी पेक्षा जास्त भिती त्या सीन ला वाटली.
पूर्ण पिक्चर मध्ये खूप लाल लाल दृष्य आहे.भीतीदायक पणा वाढतो हे खरं, पण काही डिटेल्स मिस होतात.म्हणून दुसर्‍या वेळा बघावा लागला.

विनायक जर अजून चांगला असता तर त्याने राघव ला त्या वाड्यात पाहून भेटून कोपच्यात घेऊन सर्व धोके सांगितले असते >> मोहरांचे रहस्य तो उघड करेल असे वाटत नाही.

पूर्ण प्रोसिजर ची केटी नाही गं.
पण किमान 'नाणी मिळतात, पण प्रचंड धोका आहे' हे नीट समजवायला हवे.
बळी या कथेत विनायक कार्तिक परमार ला नाणी मिळतात तो मार्ग भयंकर आहे याचा थोडा ओव्हरव्ह्यू देतो.विनायक ला वडलांची डायरी मिळते आणि त्यावरून तो शोधून काढतो.
पण कार्तिक पण असाच विनायक ला न सांगता पौर्णिमेला वाड्यात कणिक गुलाल घेऊन जातो आणि मरतो.
शेवटी विनायक येतो तेव्हा त्याला कार्तिक मेलेलाच मिळतो.विनायक ला वाईट वाटतेच, पण नंतर कार्तिक चा मृतदेह वापरून तो नाणी मिळवायला अजून थोडा वेळ घेतो.

अहो, सरकार मेल्यानंतर वाड्यात होतेच कोण? ती जाते अन नाणे घेऊन येते मुर्तीपुढचे. सदाशिवला वापरण्याचा संबंधच कुठे येतो?>>>I think सदाशिवला डॉ. कडे नेण्यापुर्वीच तो गाडीतच मरतो. सावकार मेल्यावर तसेही तीने गाव सोडायचे ठरवलेलेच असते. सदाशिव मेल्यावर ती फक्त नाणे आणण्यासाठीच वाड्यावर जाते. ज्या मोहासाठि तीने इतकी वर्षे त्या आजीला आणि सावकाराला सान्भाळण्यात घातलेली असतात. कदाचित उरलेल्या एका मुलाच्या पुढील भविष्याची तरतुद? सदाशिव ची चिता जाळुन त्याबदल्यात ति वाड्यातील लालसा घेवुन जाते.(शेवटी प्रेमापेक्क्षा मोह लालसाच वरचढ ठरते. नाही? . जी बिभत्स लालसा ह्या फिल्मचा केन्द्रबिन्दु आहे.)

पूर्ण प्रोसिजर ची केटी नाही गं.
पण किमान 'नाणी मिळतात, पण प्रचंड धोका आहे' हे नीट समजवायला हवे.
बळी या कथेत विनायक कार्तिक परमार ला नाणी मिळतात तो मार्ग भयंकर आहे याचा थोडा ओव्हरव्ह्यू देतो.विनायक ला वडलांची डायरी मिळते आणि त्यावरून तो शोधून काढतो.
पण कार्तिक पण असाच विनायक ला न सांगता पौर्णिमेला वाड्यात कणिक गुलाल घेऊन जातो आणि मरतो.
शेवटी विनायक येतो तेव्हा त्याला कार्तिक मेलेलाच मिळतो.विनायक ला वाईट वाटतेच, पण नंतर कार्तिक चा मृतदेह वापरून तो नाणी मिळवायला अजून थोडा वेळ घेतो...>>> sorry पण काही कळले नाही.

स्नेहनील, मी सांगतेय ती बळी या धारप कथेची रूपरेषा आहे.तुंबाड चा अगदी थोडा भाग या कथेवरून आहे(श्रेय दिलेले आहे.)
बळी कथेत मेलेल्या कार्तिक ला(मित्र) बळदातून आलेली भुतं खात असतात तेव्हा विनायक नाणी गोळा करत असतो.

ह्या पिक्चरमध्ये केटीचाच मेन प्रॉब्लेम दिसतोय. म्हातारीलासुद्धा पूर्णतः केटी देणं शक्य नव्हतं, केवळ बोलून ह्या गोष्टी विनायकला कश्या सांगितल्या असतील हा मोठा प्रश्नंय. विनायकने पहिल्या वेळेला वाड्यात जाण्यात प्रचंड मोठी रिस्क होती, ती त्याने त्याच्या लालसेमुळे घेतलीच.

व्हर्जन मॅनेजमेंट टूल्स >> आत तुंबाड मध्ये गिट , एस्वीएन आल तर कशी असेल कथा? Light 1
तुम्ही लिहिता का एक मस्त लेख ह्यावर Proud

आजीला व्यवस्थित माहिती होतं नाणी कशी मिळवायची ते, पण हस्तरचा स्पर्श झाल्यास आपले काय होइल हे माहित नसावे, जे ती अनुभवत असते. त्या प्रमाणे तिला मुक्ती देण्याच्या बदल्यात विनायक तिच्याकडून सर्व वदवून घेऊन आपल्या बुद्धिने नाणी मिळवण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतो (पुढच्यास ठेच मागचा शहाणा)

याहू
तिसऱ्या वेळा बघणार
माझा नाही पण आईचा आहे प्राईम.

म्हणजे असं बघा, तुम्ही प्रेमिकेला प्रेमपत्र लिहिलं आणि नंतर बायकोला एक प्रिय पुढचं नाव बदलून तेच पत्र पाठवलं तर व्हर्जन मॅनेजमेंट मध्ये दोन्ही पत्रं ठेवल्यास तिथे लाल शेड मध्ये बदललेला कंटेंट म्हणजे बायको व प्रेमिकेचं नाव हायलाईट होईल.

आता बायको व प्रेयसी च्या नावाऐवजी एक हजार ओळींचा जावा प्रोग्राम आणि त्यात 3 वेगवेगळ्या माणसांनी कुठेतरी वेगवेगळ्या किंवा एकाच जागी बदललेल्या 30 ओळी आणि त्यामुळे होणारे गोंधळ कल्पून पहा.
"3 खोल्यांची जागा, भर बुधवारात, संडास बाथरूम स्वतंत्र"
ही जाहिरात एक कॉमा बदलल्यास
"3 खोल्यांची जागा, भर बुधवारात संडास, बाथरूम स्वतंत्र" अशी विनोदी बनते ☺️☺️
तसाच एक प्रोग्राम त्यात एका इफ नंतर कंसाची जागा चुकल्यास अतिशय विनोदी बनू शकतो

जर(भाजी नसेल तर)
{तवा तापवा
अंडी फोडा
ते घट्ट झाले की मीठ घाला
आम्लेट तयार}

जर(भाजी नसेल तर)
{ तवा तापवा
}
अंडी फोडा
त्यात मीठ घाला

असे लिहिल्यास अंडी तव्याऐवजी जमिनीवर फुटतात आणि त्यातच मीठाचा पसारा होतो आणि ओटा आवरायला अति कठीण.

एस व्ही इन आणि गिट आणि इतर अशीच ही एकाच ओट्यावर अनेक जणांना अंडी फोडू देणारी, मीठ टाकु देणारी, नीट आम्लेट करू देणारी आणि ओटा घाण झाल्यास कोणी घाण केला हे नेमकं दाखवून देणारी टूलस आहेत.

साष्टान्ग दन्डवत अनुराधा माते तुम्हाला _/\_
मज पामरास आपले शिष्यत्व द्याल का?
गुरु दक्षिणा म्हणून हवी ती मीठाई खाऊ घालीन (बाशा चा अनुभव आहेच Proud )

चित्रपट अमेझॉन प्राईम वर परत पाहिला.
विनायक ने राघव ला मुद्दामच धोक्यात टाकलंय.(सुरुवातीला लहान विनायक लहान सदाशिव ला 'खाना पकाया मैने है,अब तू खिला' म्हणून लहान भावाला आजीच्या दारात ढकलतो त्यावरून तो अगदी वाईट नसला तरी स्वतःच्या स्वार्थापुढे बऱ्या वाईट, सुष्ट, दुष्ट वागणुकीचा फारसा धरबंध बाळगत नाही असं दिसेल.)
राघव खाली वाड्यात शोध घेत असताना विनायक वरून चिडून बघून मानेला झटका देतो.(ते एक्सप्रेशन जरा भयंकर आहेत).नंतर मुद्दाम खिश्यात नाणी ठेवून डबा घेऊन (किंवा डब्यात 2 बाहुल्या ठेवून एक ऑफर करून दुसरी तशीच ठेवून नाणी गोळा करुन) आत जातो आणि बाहेर येऊन राघव बघत असेल हे जाणून नाणी खुळखुळवतो.
अर्थात आत गेल्यावर राघव ची अवस्था पाहून त्याला वाईट वाटतंच.
शिवाय पांडुरंग ने पहिल्या वेळी बाहुली नेण्याचा आगाऊपणा केलेला असताना तो पायात व्यंग असलेल्या पांडुरंग ला मागे येऊ देऊन स्वतः पुढे दोरावर चढतो.पांडुरंग ची वर येणाऱ्या हस्तर पासून अगदी निअर एस्केप आहे.

तो पायात व्यंग असलेल्या पांडुरंग ला मागे येऊ देऊन स्वतः पुढे दोरावर चढतो.

Proud

तो युनिव्हर्सल रूल आहे, मागे जाळ, आग अन चिंचोळा एस्केप असेल तर धडधाकट माणसाला आधी वाचवायचे असते,

पाय मोडका, कोमा वाला मध्येच अडकला तर सगळेच ओम फट स्वाहा होतात,

फायर ट्रेनिंग घ्या

चित्रपटाची करुन दिलेली ओळख आवडली.
>>>>>>>>>>तुझे लिखाण म्हणजे शॉर्ट स्कर्ट सारखे, लॉन्ग इनफ टू कव्हर द टॉपिक अ‍ॅन्ड शॉर्ट इनफ टू किप द इंटरेस्ट>>>>>>>>
@दक्षिणा +१

Pages