"वारसाहक्काने मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर हक्क सांगणं शहाणपणाचं नसतं."
सतत मुसळधार पावसात भिजलेलं एक गाव, गरिबीत जगणारी एक विधवा आणि लहानपणीच बऱ्याच गोष्टींची समज आलेली तिची दोन मुलं.पैश्यासाठी भीतीदायक वाटूनही एक विशिष्ठ काम करत राहण्यातली अगतिकता.हे सगळं इतक्यावर थांबलं असतं.पण गरिबी पाहिलेली, पैश्याची अधिकाधीक लालसा बाळगणारी आणि हुशार होत जाणारी पुढची पिढी.
'डिल विथ द डेव्हील/सैतानाचा सौदा','इझी मनी' या संकल्पनेवर आज पर्यंत अनेक चित्रपट, कथा, मालिका बनल्या आहेत.कारण ती कल्पना नैसर्गिक आणि तितकी सार्वत्रिक आहे.हाती येणारा खूप पैसा, त्यासाठी अगदी थोडा वेळ पत्करावी लागणारी एक भयंकर जिवावरची जोखीम आणि त्यानंतर तो पैसा आटेपर्यंत मिळवलेलं ऐशआरामाचं आयुष्य-सुख-निवांतपणा.परत एकदा ती किळसवाणी आणि शहारवणारी जोखीम पत्करेपर्यंतच.एखादा विवेकी माणूस ही जोखीम फक्त पोटाची अडचण दूर होण्यापुरतीच पत्करेल.त्यानंतर कष्टाचे पैसे कमवून देणारा व्यवसाय चालू करून त्या मोहापासून आयुष्यभर लांब राहील.पण तुम्हा आम्हाला माहिती आहे- असं आतापर्यंत कधीच घडलं नाही.ही पैश्याची भूक, स्वतः वाढवलेल्या गरजा वाढतच जातात.परत परत त्या सैतानाकडे माणसाला घेऊन जातात.त्या मोबदल्यात गहाण ठेवलेलं आयुष्य, आत्मा, विवेक याबद्दलचे विचार कोपऱ्यात भिरकावून देऊन.
'हॅ, हे काय, अजिबातच भीती वाटली नाही' म्हणून बाहेर येणाऱ्या साठी हा चित्रपट नाही.त्या अपेक्षेने येत असाल तर बहुधा तुम्हाला ट्रेलर कळलं नाही.तुंबाड हा रूढ अर्थाने 'भयपट' नाही.त्यातले चेहरे तुम्हाला घाबरवणार नाहीत, रात्रीमागून रात्री स्वप्नात येऊन झपाटणार नाहीत.पण त्यातली माणसं, त्यांची पैश्याबद्दल लालसा, आणि त्यासाठी जे करावं लागेल ते करत राहण्यामागची अतृप्ती तुम्हाला जास्त घाबरवेल.हादरवेल.शेवट त्यातल्या अगतिकतेने, डिसगस्ट ने आणि हा शेवट माहीत असूनही परत परत त्या मोहात सापडणाऱ्या प्रवृत्ती बद्दल च्या संतापाने डोळ्यात पाणी आणेल.स्पॉईलर द्यायचे नाहीत त्यामुळे जास्त लिहीत नाही.पण असे चित्रपट बनायला हवेत, जास्तीत जास्त लोकांनी बघायला हवेत.रंगीबेरंगी रक्त, घाबरवणारे चेहरे दिसतील म्हणून नाही, तर यातली कथा नक्की काय सांगायचा प्रयत्न करते आहे ते ऐकण्यासाठी. एका छोट्या कथेत अनेक पदर आहेत, एका सरळ साध्या कथे मध्ये बऱ्याच घेण्यासारख्या गोष्टी आहेत.अनर्थ केव्हा झाला?जेव्हा भूक धान्य सोडून धनाकडे वळली.सगळंच गमावणार होतं तेव्हा किमान अर्धं वाचलं ते कशामुळे?धान्यामुळे.शेवटी जे हातात उरलं ते इतकी मोठी जोखीम घेण्याच्या बरोबरीचं तरी होतं का?खूप प्रश्न पडतात.मिळणारी उत्तरं स्वतःला हलवून जातात.
आणि तरीही मला खात्री आहे.पत्करलेली जोखीम मोठी आणि मोबदला खूप मोठा असेल तर आयुष्यात तुम्हीही त्या मोहाच्या आणि मृत्यूच्या दारात पुन्हापुन्हा जाल- थोडीशी चूक किंवा उशीर समोर काय भविष्य घेऊन येतोय हे उघड्या डोळ्याने पाहूनही.
- अनुराधा कुलकर्णी
(नवा लेख लिहायचा मोह आवरला नाही.मी एक्स्पर्ट परीक्षक नाही.पण असे पिक्चर लोकांनी बघायला हवेत.हे नाव जास्तीत जास्त वेळा डोळ्याखालून जायला हवं.मोठे स्टार, चकमकाट बघून थिएटर मध्ये एका दिवशी 8 शो ठेवणारे आणि शेवटी हाती भ्रमाचा मोठा भोपळा ठेवणारे चित्रपट सोडून.)
हा हा वाटलंच मला या लेखाचे
हा हा वाटलंच मला या लेखाचे टायमिंग बघून
पाहताना लै ग्रेट वाटला, पण
पाहताना लै ग्रेट वाटला, पण संपल्यावर इफेक्ट फारच लवकर ओघळतो,
नक्की कशाची भीती दाखवतायत हे कळल्यावर तर भय हा रसच निघून जातो.>>>
सहमत, कथेला महत्व नाहीय. नक्की काय गूढ आहे यालाही महत्व नाहीय (म्हणजे आहे गूढकथा पण खूपच कॉमन, प्रेडिक्टेबल). तेव्हा एखादं थरारक कथानक बघायला मिळणार अशी अपेक्षा ठेवून गेल्यास विरस होईल.
चपखल वातावरण निर्मिती, व्हिज्युअल्स, संवादापेक्षा दृश्यातूनच कथानक उभे करण्याचे कसब (जे हिंदी चित्रपटांत क्वचितच दिसते) या करता चित्रपट पाहण्यासारखा आहे.
यात दाखवलेली ती जुनी कुलूपे खूप आवडली.
छान लिहल आहे अनु.
छान लिहल आहे अनु.
भारी लिहिलय. पिक्चर पहावा असं
भारी लिहिलय. पिक्चर पहावा असं वाटायला लागेल आहे.
चित्रपटाचे पोस्टर ही अतिशय
चित्रपटाचे पोस्टर ही अतिशय प्रभावी आहे.
आणि तुझे लिखाण म्हणजे शॉर्ट स्कर्ट सारखे, लॉन्ग इनफ टू कव्हर द टॉपिक अॅन्ड शॉर्ट इनफ टू किप द इंटरेस्ट
तुझे लिखाण म्हणजे शॉर्ट
तुझे लिखाण म्हणजे शॉर्ट स्कर्ट सारखे, लॉन्ग इनफ टू कव्हर द टॉपिक अॅन्ड शॉर्ट इनफ टू किप द इंटरेस्ट> वा वा
"पाहावा का सिनेमा ?
भीती वाटेल, नको" <- असच चालुये माझ अजुन तरी
लेख भारी
हेहे..शॉर्ट स्कर्ट
हेहे..शॉर्ट स्कर्ट
अॅमी, बघा सिनेमा.
अॅमी, बघा सिनेमा.
तुम्हाला आवडेल असे वाटते. निगेटिव्ह रिव्ह्यु वाले फार पाचकळ मुद्द्यांवरून झोडपताहेत असे माझे मत आहे.
निगेटिव्ह riview असे नाही हो.
निगेटिव्ह riview असे नाही हो...
आत्ता बोलताना इतक्या कड्या जोडल्या जातायत,
चित्रपट पाहताना हे लूज इन्ड्स वाटतात, त्यामुळे असे एक्दम लै भारी असा वाटत नाही
राधिका आपटेला "माझ्या नव
राधिका आपटेला "माझ्या नव-याची बायको" स्पेशालिस्ट म्हणून घेतलेलं दिसतंय.
इथंही तेच
इकडे स्पॉयलर्स नकोत.
इकडे स्पॉयलर्स नकोत कारण शीर्षकात नो स्पॉयलर आहे.
स्पॉयलर्स ला किरणुद्दीन चा धागा आहे.त्यावर उत्तम चर्चा चालू आहे.
(मला स्वतःला स्पॉयलर मिळूनही काही फरक पडत नाही पिक्चर बघताना.कहानी,सैराट चा एन्ड माहित होता.पण लोक स्पॉयलर वाचून आपली मतं बनवून 'हॅ, इतकंच आहे तर मला नाही बघायचा' ठरवतात यावर प्रॉब्लेम.अगदी बद्री की दुल्हनिया किंवा मिस्टर या मिस सुद्धा बिना स्पॉयलर भावी दर्शकाला सिनेमा बघावा की न बघावा हा निर्णय घेऊ द्यायचा मॉरल हक्क बाळगतात.)
मला सगळे स्पोईलर्स वाचून
मला सगळे स्पोईलर्स वाचून जायला जास्त आवडते. चार लोकांना जे कळले नाही ते आपल्याला नीट लक्ष देऊन पाहता येते. आज अंधाधून पाहणार आहे, धागा आधीच वाचून झाला.
मग त्यापेक्षा धारपांची मूळ
मग त्यापेक्षा धारपांची मूळ कथाच वाचा की. इथं कुणीही सांगेल त्यापेक्षा भारी पद्धतीने सांगितलीय त्यांनी.
>>
हो. तसंच करावं लागेल. किरणुद्दीन यांच्या धाग्यावरचे प्रतिसाद वाचून झाले पण काही कळत नाहीये.
गानू आजी कथा वाचली आहे. आता हस्तरची शोधून वाचते.
हस्तरची शोधू>> सापडली कि
हस्तरची शोधू>> सापडली कि सान्गा , मलही हवीये
चित्रपट आणि धारप कथा या दोन
चित्रपट आणि धारप कथा या दोन वेगळ्या एंटिटी आहेत.चित्रपटात 2 धारप कथामधल्या फक्त थोड्या कल्पना वापरल्या आहेत.फाफे, दुनियादारी, इट वरून आपण पाहिलंय की कितीही प्रभावी पुस्तक असलं तरी दृश्य मीडिया मध्ये आणताना बदल करावेच लागतात.जे तुम्हाला पुस्तकात 10 पानात वाचायला भावलं ते पिक्चर मध्ये अर्धा तास बघायला आवडणार नाही.
तरीही वाचायच्याच असल्या तर बळी(पडछाया) आणि आजी या दोन कथा वाचा.
ही कुठलीच रेडीमेड कथा नाही.
ही कुठलीच रेडीमेड कथा नाही. एका कथेवरून सुचलेला सिनेमा आहे. कथा राही बर्वेंचीच आहे.
आम्ही एकदा आपण सारी धरणीमातेचीच लेकरं वरून एक शॉर्ट फिल्म (हौशी) बनवायचा प्रयत्न केला होता. व्हीएक्सएफ साठी मित्राने फ्री व्यवस्था करून दिलेली. पण एकंदरच ते नाही जमलं. आम्हाला काय पाहीजे ते त्याला समजत नव्हतं आणि त्याला जे काही पोहोचत होतं ते अपील होत नव्हतं. शिवाय वाचताना दाटलेली भीती कॅमे-याने टिपता येईना. मग नाद सोडून दिला. आता तो व्हिडीओ आम्ही एक विनोदी शॉफॉ म्हणून पाहतो कधी कधी.
किरणूद्दीन, नक्की बनवा. त्या
किरणूद्दीन, नक्की बनवा. त्या व्हिडीओची लिंक पण द्या आम्हाला बघायला.
असला प्रकाश नको या कथेचा व्हिडीओ जबरदस्त बनेल.पण खर्च जास्त येईल.
त्या व्हिडीओची लिंक पण द्या
त्या व्हिडीओची लिंक पण द्या आम्हाला बघायला. >>> व्हिडीओ कॅसेटच्या जमान्यातला आहे. फिल्म इंडस्ट्री एका धडाडीच्या प्रॉडक्शन हाऊसला मुकली.
सांगायचा मुद्दा - जबरदस्त पेशन्स लागतो. हौशी लोकांचं काम नाही. इतकी वर्षे पाठपुरावा हे तर खायचं काम नाही.
> अॅमी, बघा सिनेमा.
> अॅमी, बघा सिनेमा.
तुम्हाला आवडेल असे वाटते. > नाह. एकंदर चित्रपटाची फिलॉसॉफी पटणारी होती आणि 'यातली भुतं माणसाना घाबरतात' हे रोचक वाटलेलं म्हणून पहायचा विचार करत होते. पण तुमची त्या दुसऱ्या धाग्यावरची चर्चा वाचून नाही पहायचा ठरवलं. या फॉरमॅटमध्ये बघायला नाही आवडणार मला ही फिलॉसॉफी...
राधिका आपटे नाही हो....राधिका
राधिका आपटे नाही हो....राधिका सुभेदार...राधिका वहिनी...
एनिवे मला तरी मुव्ही खूप आवडला. सोहम शाह, ती 3 मुलांपैकी एक मुलगा मुस्लिम आहे अश्या लोकांनी आपले उच्चार वळवून मराठीतलं हिंदी करण्यासाठी किती मेहनत घेतली असेल ते दिसतं.
मला पहिला च सिन म्हणजे पाऊस , अंधारलेल, ढगाळ वातावरण, वाडा आणि ती आलवणी आई हे सर्व अंगावर आलेलं...
मला तरी खूप आवडला मुव्ही.
जेव्हा 15 लोक एखाद्या मुव्ही ला चांगलं म्हणतायत आणि 2 लोक बकवास किंवा इतका पण चांगला नाही वगैरे बोलतात तेव्हा तो मुव्ही जाऊन बघण्यात काही हरकत नसावी असं मला वाटत.
मी इथल्या सर्व कमेंट्स वाचून च मुव्ही ला गेले. पण मला यातली एक ही कमेंट ना आठवता किंवा निगेटिव्ह कमेंट चा त्रास न होता मी मन लावून मुव्ही पहिला. आणि मला तो खूप आवडला.
राही अनिल बर्वे आणि सोहम शाह च विशेष कौतुक. पण त्या तीन ही लहान मुलांनी बाप अभिनय केलाय. आणि त्यांच्या आई ने पण... राधिका वहिनी बिचाऱ्या च दाखवल्यात इथे पण.
थोडक्यात काय तर 1 दा हा मुव्ही थिएटर मध्येच जाऊन बघण्यात हरकत नाही...
राही अनिल बर्वे यांचा पुढचा
राही अनिल बर्वे यांचा पुढचा प्रोजेक्ट रक्तब्रह्मान्ड आहे.जी ए कुलकर्णी कथा विदूषक वर.
तोही सॉलिड असेल.
http://www.zeemarathidisha
http://www.zeemarathidisha.news/details?newsid=4832714295926330403&title...§ionid=5287385052749269301§i
http://www.zeemarathidisha.news/Details?NewsId=5741300022840638268&title...
आताच एक मुलाखत पहिली सोहम शाह
आताच एक मुलाखत पहिली सोहम शाह च्या मुलाचा ज्याने रोल केलाय त्याच मुलाने त्या गानू आजी सारख्या आजीचा ( सुरुवातीची ) तिचा ही रोल केलाय. इंटरेस्टरिंग ना !
ओह, मी विचारणार होते आजी चा
ओह, मी विचारणार होते आजी चा रोल कोणी केलाय.खूप टॅलेंट चे काम आहे.
https://youtu.be/_inPqw6RgsE
ओह्ह्ह... आत्ताच पाहिला विडिओ
ओह्ह्ह... आत्ताच पाहिला विडिओ.... खरच खुपच छान काम केलंय त्याने.... आणी अगदी surprise element आहे की त्यानेच आज्जीचा रोल केलाय....
पाहिला फायनली. आवडला सुध्दा.
पाहिला फायनली. आवडला सुध्दा. प्रत्येक फ्रेम नेटकी झालीये तेही कुठेही लांबड न लावता अन् व्हिज्युअल इफेक्ट्स हे प्लस पॉइंट आहेत. खरंच वेगळा अनुभव देऊन जातो तुंबाड. थोडक्यात सांगायचं तर देखणा झालाय मूव्ही व एकदा मस्ट वॉच आहे अन् तोही थेटर मधे. वर लिहिल्याप्रमाणे खरंच असे मूव्ही बनायला हवेत.
आधी सिनेमा हिंदी त असणे मला
आधी सिनेमा हिंदी त असणे मला खटकले की सगळी गोष्ट मराठी असताना याची काय गरज होती . पण हिंदी चित्रपट बहुतेक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो म्हणून हे लौजिक असावे कदाचित.
ओह्ह्ह... आत्ताच पाहिला विडिओ
ओह्ह्ह... आत्ताच पाहिला विडिओ.... खरच खुपच छान काम केलंय त्याने.... आणी अगदी surprise element आहे की त्यानेच आज्जीचा रोल केलाय.... >>>>>>> चित्रपटाच शुटिन्ग चालू होत तेव्हा तो लहान, १२ वर्षाचा होता कदाचित. इन्टरव्ह्यु मध्ये तो मोठा दिसतोय. चित्रपटाला बरीच वर्ष दयावी लागली अस राही म्हणत होता. मग आता हया मुलाच वय किती आहे?
18
18
मी हा चित्रपट अजून पाहिला
मी हा चित्रपट अजून पाहिला नाहिये.सोहम शाह कोण झालाय? विनायक?
Pages