गेल्या वीकेन्ड ला गावी गेलो असताना समोरच्या घरात रहणार्या प्रा. काकींना महिनाभरापुर्वी नात झाली ही बातमी समजली. प्रा. काकींची एकुलती एक लेक. लग्नानंतर ३ वर्षांनी तिला हे पहिलेच कन्यारत्न. प्रा. काकी पहिल्यांदाच आज्जी झालेल्या. म्हटलं चला त्यांचे आणि दिदीचे अभिनंदन करुन येऊ.. लहान बाळाला पाहुन येऊ.. बाळासाठी गिफ्ट घेउन आम्ही जोड आणि आमची दोन मुले त्यांच्या घरी गेलो. त्यांना सर्वांना भेटुन आणि लहान बाळाचे कोड्कौतुक करुन आम्ही घरी परतलो आणि आमच्या हिने लगोलग आईला एक 'खबर' दिली की : प्रा. काकी, १ महिन्याच्या तान्ह्या बाळाला लंगोट/नॅपी पॅड घालताना त्या लंगोट/नॅपी पॅड मधे एक टिश्यु पेपर ची घडी ठेवतात जेणे करुन बाळाने 'शी' केली फक्त तेवढा टिश्यु पेपर बाजुला काढुन टॉयलेट मधे टाकुन फ्लश करायचा आणि लंगोट धुवायला टाकायचा.
मला प्रा. काकींनी बाळाच्या शी साठी योजिलेली ही युक्ती एकदम भनाट वाटली..
हे इथे मांडावयाचे कारण असे की बाळाच्या शी/शु चे मॅनेजमेंट करण्यासाठी प्रा. काकींच्या 'टिश्यु पेपर' सारखे अजुनही काही पर्याय इथे कुणी वापरलेत काय..? आपले मायबोलीकर जगभरात वावरत असताना वेगवेगळ्या देशांत वेगवेगळे पर्याय सापडले असतील तर ते इथे सांगावेत.. जेणेकरुन काही नवपरिणित जोडाप्यांना भविष्यात ते उपयोगी पडतील.
mi_anu+1
mi_anu+1
सल्ले देणारे हे गाढव आणि त्याच्या मालकाच्या गोष्टी सारखे असते. लोक गाढवावरही बसू देत नाहीत, त्याला खांद्यावरही घेऊ देत नाहीत अन त्याच्या बरोबरही चालू देत नाहीत. काळवेळेप्रमाणे आपणच ठरवायचे अन वागायचे हा माझा (फुकटचा , मानो या ना मानो) सल्ला.
>>> स्वाती, हो तेच ते.
>>> स्वाती, हो तेच ते.
थँक्यू थँक्यू! त्यातूनच मला प्रथमच काळी बाहुली, फू फू करून अंगारा फवारणे वगैरे मजेमजेच्या गोष्टी कळल्या होत्या!
भीतीही वाटली होती तेव्हा. वसुंधरा पौडवाल का त्या शेजारीण बाईंचं काम करणार्या अभिनेत्रीचं नाव? स्केअरी दिसायच्या खरंच.
डायपरमधून काय काय निघालं बघा!
आरारा, डॉक्टरचा अनुभव कधीही
आरारा, डॉक्टरचा अनुभव कधीही सगळ्यांपेक्षा जास्तच असतो. माझ्यासाठी बालरोगतज्ज्ञ हा त्याविषयातील छोट्यामोठ्या अडचणींविषयीवरचा सहसा 'शेवटचा शब्द' असतो/आहे. पण मग त्यांच्यातही एकवाक्यता का बरे नसते?
माझ्या ओळखीतला, आप्तेष्टांच्या ओळखीच्यांचा इत्यादि कुठल्याच बालरोगतज्ज्ञाने डायपरविरोधी मत दिलेले ऐकले नाहीये. पण इतर कुणाकुणाकडून डायपरविरोधी डॉक असतात हेही ऐकलं आहे. तेव्हा खरं कुणाचं मानायचं पालकांनी?
टॉयलेट ट्रेनिंग लवकर होत नाही (असे तुमचे तुमच्या वैद्यकीय अनुभवातून आलेले मत) आणि पर्यावरण सोडून आणखी काय वैद्यकीय कारणे असतात? मला जाणून घ्याय्ची इच्छा आहे.
बापरे! 'कुणी कुणाला सल्ले देऊ
बापरे! 'कुणी कुणाला सल्ले देऊ नयेत' इतक्या होमिओपॅथी वाक्यावर इतक्या प्रतिक्रिया (साईड इफेक्ट्स) येतील असं वाटलच नव्हतं.
होमिओपॅथी वाक्यावर >> यु
होमिओपॅथी वाक्यावर >>
यु मेड माय डे

(No subject)
होमिओपॅथी वाक्यावर इतक्या
होमिओपॅथी वाक्यावर इतक्या प्रतिक्रिया (साईड इफेक्ट्स) येतील असं वाटलच नव्हतं. Happy>>>
फेफा , आता आरारा येतील आणि अॅलोपथिक वाक्य लिहा म्हणुन सांगतील. लोल.
आरारा चिडू नका. तुमच्यामुळं उलट नेहमी मस्त चर्चा होते. आणि शिकायला पण मिळतं आणि खुप मजा येते मायबोलीवर. माझ्यासारखे ,नुस्त तुमचं नाव पाहून आवर्जून तुमची पोस्ट वाचणारे लोक आहेत. भले मग तुमची मतं पटोत अथवा नाही. तुमच्या लिहिण्यात प्रचंड पॅशन असते एवढ खरं. अगदी जेन्युइनली सांगती आहे.
माझ्यासारखे ,नुस्त तुमचं नाव
माझ्यासारखे ,नुस्त तुमचं नाव पाहून आवर्जून तुमची पोस्ट वाचणारे लोक आहेत. भले मग तुमची मतं पटोत अथवा नाही.
>>
+++११११
मी फक्त वाचतेय सगळं शांतपणे.
आरारा, लिहीत राहा.तुमच्या
आरारा, लिहीत राहा.तुमच्या पोस्ट एक 'जादा ओव्हर रिऍक्ट मत कर बे, लॉजिकल है वो कर' वाला अँगल देतात तो उपयोगी पडतो.
(No subject)
Mi anu शी सहमत.
Mi anu शी सहमत.
माझ्यासारखे ,नुस्त तुमचं नाव
माझ्यासारखे ,नुस्त तुमचं नाव पाहून आवर्जून तुमची पोस्ट वाचणारे लोक आहेत. भले मग तुमची मतं पटोत अथवा नाही.>>>> +११११ पोस्ट लिहित रहा.
मला 9 जूनला मुलगी झाली... आता
मला 9 जूनला मुलगी झाली... आता ती सव्वा महिन्याची आहे.. जवळपास सुरवातीचे 25 दिवस सगळं ठीक होतं पण 15-20 दिवस झाले ती सतत potty करतेय.. दिवसातून 3-4 वेळा पतली potty करते अन् 15 - 20 वेळा अगदी थोडी थोडी potty करते... यावर कोणाला काही उपाय माहीत असेल तर plz सांगा..
५ आठवड्याच्या बाळाविषयी सल्ला
५ आठवड्याच्या बाळाविषयी सल्ला द्यायला कोणीही मायबोलीकर लायक नाहीत .. बाकीच्या धाग्यांवरच्या पोस्ट्स बघा लक्षात येईल तुमच्या.
जोक्स अपार्ट , खरचं डॉक कडे लवकर सल्ला घ्या. आता डॉकची अपॉइटमेंट कोव्हिड मुळ मिळत नसेल तर फोन करा आणि बोलुन घ्या. तोवर ,
ब्रेस्ट फीड करत असाल तर तुमच्या खाण्यावर तोवर लक्ष ठेवा. बाळाला डिहायड्रेशन होवु नये यासाठी दक्षता घ्या.
@सीमा : तिला त्रास सुरू झाला
@सीमा : तिला त्रास सुरू झाला तेव्हा पाचव्याच दिवशी मी डॉक्टरांना दाखवलं... पण ते म्हणाले की feeding आणि urination proper आहे तर औषध देऊ नका... पण आता 20 दिवस झालेत सतत potty चालूच आहे....तिचे कपडे बदलून मी पण खूप थकून जाते म्हणून इथे कोणाला काही घरगुती उपाय माहीत असेल तर विचारलं..
सव्वा महिन्याची म्हणजे अगदीच
सव्वा महिन्याची म्हणजे अगदीच लहान आहे. अशा वेळी अगदी तुमच्या आई/सासूबाई यांनाच काही खात्रीशीर घरगुती उपाय ठाऊक असेल तरच करा. नाही तर काही दिवस वाट बघा. बाळांना होतं असं. काही दिवसांनी सुरळीत होईल. वाटल्यास डॉ. शी परत एकदा बोलून बघा.
मोक्षू, हो खरच कंटाळा येत
मोक्षू, हो खरच कंटाळा येत असेल कपडे बदलून. टोटली अंडरस्टँड. त्यात पावसाळा आहे. पण बाळ खुप लहान आहे गं. म्हणुन सांगितल.
वावे म्हणते तसं खात्रीशीर,घरच्यांचा कुणाचातरी सल्ला घे वाटल्यास.
(हा तज्ज्ञ सल्ला नाही.)
(हा तज्ज्ञ सल्ला नाही.)
पावसाळा थंडीत तसंही प्रमाण वाढतं.आपलंही वाढतं.फीड आणि बाकी सर्व नॉर्मल असले तर काळजीचं कारण नाही.जर पॉटी गॅस वाली (सॉरी हे वाचायला याक्क वाटेल) असेल तर स्वतःचा आहार तपासून त्यातून वातूळ काढून सोपे पचणारे पदार्थ टाकावे.तसेच गरम (कोमट) पाणी ओवा घेत राहावे घोट घोट.
बाळाला थंडी कितपत वाजते पाहून छाती गरम ठेवल्यास शी शू ची फ्रिक्वेन्सी किंचित कमी होईल.
वाट कशाची बघताय.. लवकरात लवकर
वाट कशाची बघताय.. लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क करा. पाच सहा वेळा ठीक आहे. पंधरा वीस वेळा म्हणजे खूप जास्त होतंय. ती एकदम कोमेजून जाईल.
प्लीज बाळाचे डिहायड्रेशन
प्लीज बाळाचे डिहायड्रेशन सांभाळा. भरपूर दूध पाजा.
Thanks mi_anu... आहार तर अगदी
Thanks mi_anu... आहार तर अगदी साधा आहे... पण ओवा आणि कोमट पाणी घेऊन बघते..
वाट कशाची बघताय.. लवकरात लवकर
वाट कशाची बघताय.. लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क करा. पाच सहा वेळा ठीक आहे. पंधरा वीस वेळा म्हणजे खूप जास्त होतंय. ती एकदम कोमेजून जाईल.>>>मी वर सांगितल्याप्रमाणे डॉ सांगितलं आहे ते नॉर्मल आहे म्हणाले... शिवाय माझ्या काही नातेवाईकांना पण विचारलं ते पण म्हणतात की होतं असं कधी कधी... पण माझी वेडी आशा की असेल काही उपाय तर करून बघते..
मोक्षू, असा धीर सोडु नका.
मोक्षू, असा धीर सोडु नका. सगळं व्यवस्थीत होईल. एखाद्या लहान बाळांच्या डॉक्टर ला नक्की फोन करा आणि समस्या सांगुन काही उपाय मिळतो का ते बघा. एवढ्या लहान बाळाला घरगुती उपाय तोंडावाटे देणे पण जिकिरीचे आहे. तरी घरातील जुन्या - जाणत्या व्यक्तींना विचारा कदाचीत ते तुम्हाला हिंगाचं पाणी बाळाच्या बेंबी भोवती लावण्याचा सल्ला देतील. मातेच्या आहारात बदल करुन पहा. मातेला बिना तिखट-मीठाचं साधारण अळणी वरण्+ज्वारीची भाकरी, दूध्+ज्वारीची भाकरी, दूध्+भात, तुप्+भात असं ३-४ दिवस पत्थ्य पाळा शिवाय उकळलेलं आणि रुम टेंपरेचरच पाणी पिण्यासाठी द्या.या ऊपायांनी बाळाच्या पोटाच्या समस्येवर उतार पडतो का ते पहा. जास्त त्रास होत असेल तर डॉक्टरला भेटावे हे सर्वोत्तम.
नवीन Submitted by मोक्षू on
नवीन Submitted by मोक्षू on 20 July, 2020 - 19:09 >>>>>
घरात आजी वगैरेना विचारले नाही का? बाळ फारच लहान आहे. १५-२० दिवस त्रास आहे तर डॉनी पुन्हा पहायला हवे होते. पण शेवटी त्यांचा अनुभव + ज्ञान + अधिकार आपल्यापेक्षा जास्तच..... आपण भावनिक होतो. ते प्रॅक्टीकल + शास्त्रीय दृष्टीने बोलतात.
मी डॉक्टर नाही. घरातल्या मोठ्या बायकांचे निरीक्षण आणि त्यांच्या उपायानी पडणारा फरक यावरून हे लिहीत आहे.
तुम्हाला योग्य वाटले तर पहा.
काळजी ---
१. पहिल्या २५ दिवसात व नंतर तुमच्या आहारात काय फरक पडला ते बघा. आईच्या आहाराचा अंश दुधात येतो. तुमच्या खाण्यात काही पदार्थ, औषधे इत्यादि रोज / जास्त प्रमाणात असेल आणि नेमकी तिला त्याची अॅलर्जी वगैरे असू शकेल ?
२. स्तनपाना बरोबर बाहेरचे दूध / पाणी देत असाल त्यातून काही संसर्ग होऊ शकतो. दूध / पाणी भरपूर उकळून द्या. वाटी चमचा बाटली नीट स्वच्छ करा. पाण्याचा कॅन आणला तरी तिच्यापुरते पाणी पातेल्यात उकळून घ्या. पावसाळ्यात विशेष.
३. रडते म्हणून चुपणे / चोखणी देत असाल तर प्रत्येक वेळेला स्वच्छ धुवून द्या. धूळ किंवा ओल्या-दमट हवेने त्यावर जंतू वाढू शकतात.
४. काही बाळे पोट भरल्यावर लगेच थांबतात तर काही पीत रहातात. तुम्ही लक्ष ठेवून दुधाचे प्रमाण / वेळापत्रक बघा. ती भुकेने रडण्याआधीच पुढचे दूध पाजले जात असेल व जास्त पोट भरल्याने अपचन होत असेल. प्रत्येक वेळेला थोडे कमी दूध पाजणे किंवा दोन पाजण्यातला वेळ वाढवणे यापैकी काही करून बघा.
५. प्रत्येक वेळेला -- दूध पाजल्यावर -- बाळ झोपवून न ठेवता आपल्या खांद्यावर उभे धरून ठेवतात + पाठीवर हलके थोपटतात -- त्याला ढेकर येईपर्यंत.
६. शी आंबट वासाची / फेसाळ वगैरे असेल तर डॉना सांगा व काही औषध देतात का बघा.
७. पोट कडक / फुगीर असेल तर गॅस झालेला असू शकतो.
८. वाटीभर ( घरी उकळून थंड केलेल्या) पाण्यात २-३ चिमूट ओवा टाकून उकळा. थंड / कोमट झाले की तिला २-३ चमचे एका वेळेला असे मधून मधून पाजा ( दोन दुधांच्या मधल्या वेळेत ). ओव्याचे दाणे तिच्या तोंडात जाणार नाहीत हे पहावे लागेल. मिरमिरीत चवीमुळे प्यायली नाही तर उकळताना पाव चमचा साखर घालून पहा. हे पाणी ताजे, लागेल तसे, दिवसातून दोनदा वगैरे करा. खूप एकदम करू नका.
९. ग्लासभर ( घरी उकळून थंड केलेल्या) पाण्यात १०-१५ वावडिंग दाणे टाकून उकळा. थंड / कोमट झाले की दाणे गाळून तिला २-३ चमचे एका वेळेला असे मधून मधून पाजा ( दोन दुधांच्या मधल्या वेळेत ). याची चव नसते. साखर लागणार नाही. हे ही पाणी ताजे, लागेल तसे, दिवसातून दोनदा वगैरे करा. खूप एकदम करू नका. दुसर्या दिवशी चव बदलते.
वावडिंग आयुर्वेदिक जडीबुटी / चूर्ण विकणार्या दुकानात किंवा वाण्याकडे मिळेल. गुजराती वाण्याकडे मिळेलच. मिरीसारखे छोटे काळे /तपकिरी गोल दाणे असतात. खास वास, चव नसते मसाल्याच्या वस्तूसारखी.
१०. वरील ८-९ पैकी एका दिवशी एकच द्या. एकदम सगळे प्रयोग नको. २-३ दिवस ओवा पाणी, एक दिवस गॅप मग २-३ दिवस वावडिंग पाणी मग गॅप पुन्हा ओवा पाणी असे करता येईल.
११. घरी उकळून थंड केलेल्या पाण्यात लिंबू सरबतही देता येईल. जास्त पाणी घालून कमी आंबट.... तिला सोसवेल असे. डिहायड्रेशन वर उपाय + लिंबाचा पोटाला फायदा. मात्र आंबटपणामुळे दुधाच्या वेळेशी नीट जुळवून घ्यावे लागेल. ५-६ लिंबांचा रस, पुरेशी मीठ, साखर घालून थोड्या पाण्यात विरघळवून फ्रीजमध्ये काचेच्या बाटलीत ठेवा. लागेल तसे पाण्यात मिसळून सरबत तयार होईल.
उपाय --
१. लहान बाळांना जुलाबासाठी जायफळ देतात. सहाणेवर उगाळून छोटा चमचाभरच चाटवायचे. घेतले नाही तर सोबत खडीसाखर उगाळायची किंवा १-२ थेंब मध घालता येईल. जायफळ प्रमाण आता तिला किती त्रास आहे आणि एकदा दिल्यावर कसा फरक पडतो यावर ठरेल. ६-८ तासानी पुन्हा देता येईल किंवा दिवसातून दोनदा.
जायफळ जास्त झाले तर ती गाढ किंवा जास्त वेळ झोपेल. तेव्हा एका वेळेला प्रमाण / मात्रा कमी ठेवायचे. लागेल तसे पुन्हा द्यायचे.
सहाण आणि जायफळ वापराआधी स्वच्छ धुतलेले हवे आणि नंतर नीट सुकवून ठेवा. पावसाळी हवेने बुरशी येऊ शकते. गॅसच्या / बल्बच्या धगीजवळ ठेवून पूर्ण कोरडे करायचे.
सहाण नसेल तर जायफळाच्या किसणीवर किसून / कुटून पूड करून पाण्यात / दुधात / मधात मिसळून चाटवता येईल. पूड बारीक हवी. भरड किंवा तुकडे नको.
तिला बसती करून चाटवा म्हणजे ठसका लागणार नाही. कारण तिला पातळ दूध/पाणी गिळता येतेय सद्ध्या. चाटण थोडे दाट होईल. वरून २ चमचे पाणी द्या लागले तर. पूर्ण गिळले, तोंडात / गालात काही धरून ठेवले नाही याची खात्री करून मगच झोपवा.
२. बेलफळाचे सरबत पाण्यात मिसळून देता येईल. नेहमीच्या सरबता सारखे. सरबत न मिळाल्यास बेलफळाचा मुरांबा पाण्यात मिसळून देत येईल. मुरांबा आयुर्वेदिक ब्रँडेड औषधे विकणार्या दुकानात मिळेल. नेहमीच्या कंपन्या / दक्षिण भारतीय फार्मसीचे मिळेल. सरबतही मिळेल तिथे नाहीतर मग मॉल, सुपरमार्केट सारख्या ठिकाणी बघावे लागेल. अपचन, जुलाब, पोटातील जिवाणू संसर्ग यावर बेलफळ गुण देते.
तिला चालण्यासारखे सद्ध्या इतकेच. अजून काही सुचले तर पुन्हा लिहीन. छकुलीला लौकर बरे वाटू दे.
शुभेच्छांसह, कारवी
ग्राईप वॉटर मिळतं का आता?
ग्राईप वॉटर मिळतं का आता?
हो मिळते ना. ईथे (NJ)पटेल मधे
हो मिळते ना. ईथे (NJ)पटेल मधे पण दिसले होते.
पोटात द्यायच्या गोष्टी
पोटात द्यायच्या गोष्टी डॉक्टरांशी बोलून अपाय नाहीना एवढं बघून द्या
सोपेचा अर्क मिळतो मेडिकल shop
सोपेचा अर्क मिळतो मेडिकल shop मध्ये
त्याचा एखादा थेंब बाळाच्या पोटाच्या विकारावर गुणकारी आहे. अर्थात हे dr ना किंवा घरात मोठ्या कोणाला तरी विचारून द्यावा.
ओव्यांचा अर्क सुद्धा मिळतो खास बाळासाठी, ह्याबद्दल ऐकून आहे.
बाकी जास्त dr नि सांगितलं आहे तर काळजी करू नकाकारण तान्ह्या बाळाला पोटाचे त्रास होतात थोडेफार , ते सामान्य आहे
छकुलीला बरे वाटले जी जरूर सांगा
सीमा,वावे, mi_anu, गणेश
सीमा,वावे, mi_anu, गणेश चव्हाण, सायो, DJ, कारवी, स्नेहमयी, किल्ली तुम्ही सगळ्यांनी आपुलकीने प्रतिसाद दिलात, काही उपाय सुचवले त्याबद्दल मनापासून धन्यवाद...
मी परवा दोन उपाय करून पाहिले. पहिला म्हणजे माझ्या काकूंच्या सांगण्यावरून मी दुधामध्ये एक चमचा तूप टाकून दूध घेतले.. उष्णता वाढली की असं होत असावं.. आणि दुसरा उपाय म्हणजे सासुबाईंच्या सल्ल्यानुसार तिला 'क्युरेटा' या होमिओपॅथीक औषधी च्या 3 गोळ्या दुधातून दिल्या (साबांनी पाण्यातून द्यायला सांगितले पण मी तिला पाणी देत नाही.)
परवा मी हे दोन उपाय करून पाहिले तर काल तिचा त्रास खूप कमी झाला....दोनपैकी नक्की कशाने कमी झाला ते माहित नाही.
बाकी कारवी यांनी सांगितल्याप्रमाणे जायफळ उगाळून द्यायला पण सांगितलं आहे काकूंनी.. मी अजून दिलं नाही.. तसं गुटीतून देते.. पण गरज वाटलीच तर वेगळं देऊन बघेल..
बरं वाटलं ना बाळूला.ते
बरं वाटलं ना बाळूला.ते महत्वाचे. काळजी घ्या.
Pages