शी-शु पालन

Submitted by DJ. on 3 October, 2018 - 07:26

गेल्या वीकेन्ड ला गावी गेलो असताना समोरच्या घरात रहणार्‍या प्रा. काकींना महिनाभरापुर्वी नात झाली ही बातमी समजली. प्रा. काकींची एकुलती एक लेक. लग्नानंतर ३ वर्षांनी तिला हे पहिलेच कन्यारत्न. प्रा. काकी पहिल्यांदाच आज्जी झालेल्या. म्हटलं चला त्यांचे आणि दिदीचे अभिनंदन करुन येऊ.. लहान बाळाला पाहुन येऊ.. बाळासाठी गिफ्ट घेउन आम्ही जोड आणि आमची दोन मुले त्यांच्या घरी गेलो. त्यांना सर्वांना भेटुन आणि लहान बाळाचे कोड्कौतुक करुन आम्ही घरी परतलो आणि आमच्या हिने लगोलग आईला एक 'खबर' दिली की : प्रा. काकी, १ महिन्याच्या तान्ह्या बाळाला लंगोट/नॅपी पॅड घालताना त्या लंगोट/नॅपी पॅड मधे एक टिश्यु पेपर ची घडी ठेवतात जेणे करुन बाळाने 'शी' केली फक्त तेवढा टिश्यु पेपर बाजुला काढुन टॉयलेट मधे टाकुन फ्लश करायचा आणि लंगोट धुवायला टाकायचा. Light 1

मला प्रा. काकींनी बाळाच्या शी साठी योजिलेली ही युक्ती एकदम भनाट वाटली.. Proud Proud Proud

हे इथे मांडावयाचे कारण असे की बाळाच्या शी/शु चे मॅनेजमेंट करण्यासाठी प्रा. काकींच्या 'टिश्यु पेपर' सारखे अजुनही काही पर्याय इथे कुणी वापरलेत काय..? आपले मायबोलीकर जगभरात वावरत असताना वेगवेगळ्या देशांत वेगवेगळे पर्याय सापडले असतील तर ते इथे सांगावेत.. जेणेकरुन काही नवपरिणित जोडाप्यांना भविष्यात ते उपयोगी पडतील. Proud Proud Proud

Group content visibility: 
Use group defaults

दोन्ही मुलांना २४ x ७ डायपर घातले. दोन अडीच वर्षानी दोन्ही मुलं पॉटी ट्रेन झाली. हे अ‍ॅनेकडोटल आहे याची कल्पना आहे. इतके दिवस आम्हाला दोघांना अ‍ॅक्सिडेंट्स वगळता दिवस-रात्र शु शी स्वच्छ करण्यात अजिबात स्वारस्य न्हवते. अर्थात रॅश येणार नाही, आलातर बाळाची काळजी सगळ्यात आधी हे बेसिक नियम पाळूनच.
>> "झोप हवी असेल, तर बाळ जन्माला घालू नका." हे आमच्या पेडिअ‍ॅट्रीशियन मित्राचे तरूण आयांना सांगणे असते. >> आरारा, हे पोस्ट नक्की तुम्हीच लिहिले आहे हे दोन वेळा तपासले. एकतर फक्त तरुण आयांना ??? आणि डॉ रुग्णाचे श्रम हलके करतो, उपाय सुचवतो का आणखी वाढवतो? डायपर सोडून झोप घालवणार्‍या पुरेशा गोष्टी न्युबॉर्न करत असतात. त्यात डॉ. ने यात आणखी भर का बरं घालावी???

डायपर बायोडिग्रडेबल नसतात, आणि प्रचंड कचरा करतात हे खरं आहे. यात आपला वाटा कमी असावा सगळं मान्य आहे. पण... असो.

आरारांचं मलाही कैच्याकै वाटलं. त्यातनं झोप हवी तर मुलं जन्माला घालू नका हे कोणत्यातरी डॉक्टरचं सांगणं म्हणजे आणखीनच महान.
मी पण प्रो डायपर. वर अमित म्हणाला त्याच्याशी सहमत. कधीकधी सोय जास्त महत्वाची वाटते.

डायपर बायोडिग्रडेबल नसतात, आणि प्रचंड कचरा करतात हे खरं आहे. यात आपला वाटा कमी असावा सगळं मान्य आहे. पण... असो.>>>> प्रत्येक जण असच म्हणत राहिला तर असोच!!!! 2:5 वर्ष 24*7 डायपर म्हणजे किती कचरा होत असेल एकाच घरातून ???!!!!
तुर्तास पर्यावरण आणि त्याची हानी हे बाजूला ठेवू,पण सतत डायपर त्या बेबी ला किती uncomfirtable वाटत असेल याची थोडी कल्पना यावी तर ती दिवस भर घरात ऐडल्ट डायपर लावून येईल किवा पीरियड मध्ये बायकाना कधिकधी पैड लावून त्रास होतो त्याना विचारा. बिचारा बेबी काही बोलता येत नाही म्हनून आपण आपल्या सोयी साठी त्याला त्रास तर देत नाही ना हे आपणच आपल्याला विचारावे....

डायपर बायोडिग्रडेबल नसतात, आणि प्रचंड कचरा करतात हे खरं आहे. यात आपला वाटा कमी असावा सगळं मान्य आहे. पण... असो.>>>> प्रत्येक जण असच म्हणत राहिला तर असोच!!!! 2:5 वर्ष 24*7 डायपर म्हणजे किती कचरा होत असेल एकाच घरातून ???!!!!
तुर्तास पर्यावरण आणि त्याची हानी हे बाजूला ठेवू,पण सतत डायपर त्या बेबी ला किती uncomfirtable वाटत असेल याची थोडी कल्पना यावी तर ती दिवस भर घरात ऐडल्ट डायपर लावून येईल किवा पीरियड मध्ये बायकाना कधिकधी पैड लावून त्रास होतो त्याना विचारा. बिचारा बेबी काही बोलता येत नाही म्हनून आपण आपल्या सोयी साठी त्याला त्रास तर देत नाही ना हे आपणच आपल्याला विचारावे....

23 वर्षांपूर्वी डायपर प्रकार खूपच महाग असल्याने आमच्याकडे तो नव्हताच.
काॅटवर एक मोठे मेणकापड व रोज पलंगपोस धुवून बदलणे एवढ्या सामुग्रीवर मुलीचं बालपण उत्तम पार पडलं.
तासा दोन तासांनी मोरीत नेऊन नळ सोडून शू.... असा आवाज केला की काम होत असे. अगदी सुरवातीच्या दोन तीन महिन्यांत, पावसाळ्याच्या दिवसांत, एक नऊवारी लुगडं निर्या करून बाळाच्या बुडाखाली घालायचो व प्रत्येक शू नंतर एक एक निरी पुढे सरकवत दोन तीन तासांनी ते बदलायचो.

सव्वा वर्षातच, शी लागली की ती हात ताठ करून विशिष्ट हावभाव करून संदेश देत असे. मग आम्ही पळत पळत जाऊन पाॅटी आणायचो. नंतर नंतर तीच पळत जाऊन पाॅटी आणायची.

मी पण अँटी डायपर.

जेव्हा गरज होती तेव्हा. जुन्या सुती ओढण्या कापून चौकोनी नॅपी बनवल्या होत्या. व अगदी तान्हे बाळ असताना बेड खाली एक बारकी बादली अर्धी पाण्याने भरून त्यात डेटॉल घालून ठेवलेली. त्यात हे तुकडे ओले झाले की टाकायचे. दिवसाच्या फर्स्त व सेकं ड हाफ मध्ये प्रत्येकी हे तुकडे स्वच्छ धुवून वाळवायचे. कपड्याच्या नॅपी घेतल्या होत्या. त्यांचे ही तसेच. बाळाला झोपवायचे तिथे मेणकापड व वर सुती दुपटे.

नेपी पॅड आहे हे जाहिरात पाहोन कळले मग ते आणले रात्री पुरते ते कापड नॅपीत घालून झोपवायचे. चांगली झोप लागते. पँपर्स हे फक्त फॉर्मल ऑके जन ला जसे लग्न कार्य अशा जागी जाताना वापरले.

ट्रेनिन्ग मध्ये काहीही इशू झाला नाही. इण्डिअन टॉ यलेट. ती जुनी मुलां ना बाथरूम मधे नेउन सू म्हणायची पद्धत फार उपयुक्त आहे.

डायपर व सॅनिटरी नॅपकिन हा एक भयानक कचरा आहे. आमच्या बिल्डिंग मध्ये महिला जनरली कुठे ही वापरलेले सॅने व पालक लोक इतर कचर्‍यातच डायपर फेकतात. ह्या पासून गाय कुत्रे व इतर स्कॅवेम्जर प्राणी ह्यांना दूर ठेवणे अति कठीण जाते. साधा पेट बरोबर डॉग वॉक पण अशक्य घाणी शी सामना करत करावा लागतो. ते लोक आपसू क स्वभावतः ह्या कचर्‍या कडे खेचले जातात कारण वास.

ह्या दोन वस्तू बायो डिग्रेडेबल नाहीत. त्यांचे योग्य डिस्पोझल निदान भारतात तरी होत नाही.

आमच्या जुन्या घराच्या मजल्याव र एका वेळी दोन बेबीज, एक टॉडलर व तीन चार मेन्स्टृरुएटिन्ग एज महिला होत्या. त्यामुळे पॅसेज मध्ये कायम ही घाण साध्या काळ्या गार्बेज बॅग मध्ये पडलेली असे. कचरा उचलून नेइपरेन्त अवघड होत असे.

नॅपी पॅड आणि डायपर यात गुणात्मक फरक किती? नॅपी पॅडही फेकूनच देतो की आपण. डायपर कमी वापरा असं म्हणलं तर समजू शकते मी एकवेळ..
डायपरबाबत अमितवशी सहमत. घरच्या ज्युनियर मेंब्राला पॉटी ट्रेन होण्यात काहीही अडचण आली नाही. पेडिचे मतही दिवसा तुम्हाला हवं ते करा, रात्री डायपर घाला असंच होतं.

>>>> "झोप हवी असेल, तर बाळ जन्माला घालू नका." हे आमच्या पेडिअ‍ॅट्रीशियन मित्राचे तरूण आयांना सांगणे असते. >> हे कैच्या कै आहे. सगळ्यांनाच बाळ झोपले की झोपा , ते उठले की उठा असे करत ६ महिने पेड लिवची लक्झरी नसते आणि पूर्वीसारखे आरामाचे माहेरपण्+बाळंतपणही नसते. डायपर चेंज करण्या सोबत , मधले एक फिडिंगही पंप केलेल्या दुधाचे बाबा ने द्यायचे जेणे करुन आईला देखील थोडी सलग झोप मिळावी, कारण दोघेही दिवसभर कामावर जाणार अशी परीस्थिती. तासा दोन तासांनी बाळाला शू करायला नेणे हे ट्रेनिंग नव्हे, टायमिंग करणे झाले, ही अशी लक्झरी बर्‍याच पालकांना नाही. पाळणाघरात डिस्पोझेबल डायपर देणे अपेक्षित आल्यास डिस्पोझेबल डायपर परवडत नसले तरी वापरावे लागतात. इथे संस्थेकडून डायपर्सची मदत मिळेल हे कळल्यावर आईबाबांच्या चेहर्‍यावर एक ओझे उतरल्याचे भाव असतात. कचरा होतो हे मान्य पण आधीच अनेक शंका-कुशंकानी त्रस्त नवमातांना आश्वस्त करण्या ऐवजी झोप हवी तर मूल जन्माला घालू नका असे सांगणे मला स्वतःला तरी असंवेदनशील वाटते. मी पेडी बदलेन. सुदैवाने माझा पेडी हा स्वतःच्या ४ मुलांच्या संगोपनात सर्वप्रकारे सहभागी होणारा बाबा होता. त्याचे सल्ले नेहमीच आश्वस्त करणारे असत.

आमच्याकडे गर्बरचे क्लॉथ डायपर + कव्हर , डिस्पोझेबल डायपर, क्लॉथ डायपर + ट्रेनिंग लायनर, डिस्पोझेबल ट्रेनिंग पॅन्ट असे सगळे प्रकार होते. त्यातले गर्बर क्लॉथ डायपर + कव्हर हा कानांचा हट्ट ( देशात नात्यात बाळंतविड्यात आवर्जून महागडे डिस्पोझेबल डायपर पॅक गिफ्ट म्हणून देणे आणि इथे अमेरीकेत मात्र क्लॉथ डायपरचा आग्रह धरणे याला सासुरवास /खोड्साळपणा म्हणावे का?)
क्लॉथ डायपर प्रकरण - ३५ डायपर्स + ४ कव्हर्स+ अ‍ॅपल सायडर विनेगर आणि पाणी मिश्रण ठेवायला झाकण वाली बादली(यात रिन्स केलेले डायपर ठेवतात) . आठवड्यातून दोनदा अपार्टमेंटच्या कॉइन लॉण्ड्रीत जावून ते मशीन मधून धुणे वाळवणे यात दीड तास घालवणे . हा प्रकार बाळ १० दिवसाचे झाल्यापासून मी पुढे ४ महिने केला. काना भारतात, बाळ पाळणाघरात आणि मी हापिसात असे झाल्यावर डिस्पोझेबल डायपर. मुलगा वर्षाचा झाल्यावर रात्रभर डायपर कोरडा राहू लागला. पॉटी ट्रेनिंग कसलाही त्रास न होता झाले. देशात नात्यातील मुले क्लॉथ डायपर वापरणारी . काही व्यवस्थित पॉटी ट्रेण्ड झाली तर काही ३ वर्षाची झाली तरी पॉटी ट्रेनिंगला त्रास देत होती.
कचर्‍यात वाढ नको म्हणून ज्यांना शक्य आहे त्यांनी क्लॉथ डायपरचा पर्याय जरुर वापरावा पण त्याच वेळी सर्वांनाच तो पर्याय सोईचा असेलच असे नाही हे ही लक्षात घ्यावे.

भारतातले लोक तिथल्या हवामान/सोयीसुविधांनुसार् लिहीत आहेत बहुधा. जिथे मलमूत्र फरशीवरून सहज पूर्णपणे स्वच्छ करता येतं, गाद्या उन्हात वाळत टाकता येतात, खिडक्यादारं दिवसभर उघडी ठेवता येतात, आणि बाळोती धुण्यासाठी घरात किंवा मोली मदत सहजी मिळू शकते तिथे डायपर्स नकोसे वाटणं समजू शकतं.

आम्ही राहातो त्या घरांत वुडन फ्लोरिंग, अनेकदा त्यावर संपूर्णपणे कार्पेटचा थर असतो, दारंखिडक्या हवाबंद असतात - हा थंडीपासून बचाव असतो. अशा परिस्थितीत ते मलमूत्र स्वच्छ करणं, त्याचा दरवळ घालवणं हे जवळपास अशक्य होवून बसतं. इथे डायपरला पर्यायच नाही.

>>> झोप हवी तर मूल जन्माला घालू नका असे सांगणे मला स्वतःला तरी असंवेदनशील वाटते. मी पेडी बदलेन.
मीही.

माझी मुलं व्यवस्थित वेळेत पॉटी ट्रेन झाली. डायपर्समुळे काहीही बिघडलं नाही.

झोपही हवी अन बाळही हवे, हे एकत्र जमत नाही. सॅक्रिफाइस करावेच लागते, हा याचा अर्थ आहे. कीस काढायला हरकत नाही.

बाळ झोपले की झोपा अन उठले की उठा, हे ऑर्थोडॉक्स भारतीय संयुक्त कुटुंबात/नवरा १४ तास कामावर जातोय अशा न्युक्लिअर कुटुंबात *भारतात* करून दाखवा. एक कप चहा माझ्याकडून फुकट.

मागे एकदा मी कुठेतरी लिहिलं होतं, "अमेरिकन (पेडी) डॉक्टर घेतो तितकी फी मिळाली, व तसा ~वर्क लाइफ ब्यालन्स~ वगैरे जमला, तर बाळाला कडेवर घेऊन अंगाई गाऊन झोपवायचीही तयारी माझी आहे." तो एक व्हिडिओ आहे बघा, गाणं म्हणत बाळाला इंजेक्शन टोचणार्‍या डॉ चा.त्यापेक्षा भारी करून दाखवीन.
बाकी चालू द्या.

इथे डायपरला पर्यायच नाही.
<<
डायपरचा शोध अमेरिकेत किती साली लागला म्हणे? त्यापूर्वी तिकडे थंडीबिंडी पडत नसे किंवा कसे? त्या आधी काय करीत असत?

Lol

त्याआधी काय करायचे ते पहायला मी तेव्हा अमेरिकेत नव्हते, पण आत्ता काय करायचे ते मी आत्ताच्या परिस्थितीनुसार ठरवायचे की तेव्हाच्या?

>>> अमेरिकन (पेडी) डॉक्टर घेतो तितकी फी मिळाली, व तसा ~वर्क लाइफ ब्यालन्स~ वगैरे जमला, तर बाळाला कडेवर घेऊन अंगाई गाऊन झोपवायचीही तयारी माझी आहे <<<
असं कसं? प्रिन्सिपल म्हणजे प्रिन्सिपल, त्याला जरतर लावू नयेत.
अंगाई गाऊन मुलाला झोपवून देणारा पेडी मिळाला तर आम्हीही डायपर वापरणं बंद करू असंही म्हणते!

तो 'च' सद्यपरिस्थितीसाठी आहे हे मी तुम्हाला स्पेल आउट करून सांगायला हवे असेल तर तसे सांगा - आपली ना नै! Proud

शिवाय मूल पॉटी ट्रेन होईपर्यंत रात्रभर एकच डायपर लावून सुखाने झोपणारे आईबाप माझ्या पाहण्यात सुदैवाने नाहीत. दिवस असो वा रात्र, ठराविक वेळाने डायपर चेक करून आवश्यक असेल तर बदलावाच लागतो, आणि ते झोपेत करता येत नाही.

anyway i have already said what i wanted to say. DOnt have anything more to add to discussion here. so enjoy yourselves guys.

शेवटी काय तर आपल्याला जे परवडतं, पटतं आणि योग्य वाटतं तेच करावं. दुसर्‍यांना सल्ले देऊन पटवायला जाऊ नये. माझी मुलं डायपर घालून वाढली. मला तोच पर्याय बेस्ट वाटतो.
एक खरं की झोप हवी तर मुलं जन्माला घालू नका वगैरे सांगणार्‍या डॉक्टरच्या नादाला लागू नये.

"अमेरिकन (पेडी) डॉक्टर घेतो तितकी फी मिळाली, व तसा ~वर्क लाइफ ब्यालन्स~ वगैरे जमला, तर बाळाला कडेवर घेऊन अंगाई गाऊन झोपवायचीही तयारी माझी आहे." >> Biggrin अंगाई गाऊन झोपवू नका, पण म्हणून चुकीचे घाबरवून टाकणारे सल्ले देऊ नका.
मुलाला जन्माला घातल्यावर स्लिप लेस नाईट्स असणार आहेत या हेतूने ते वाक्य असते तर काहीच बोललो नसतो. झोप अजिबात सॅक्रिफाईज करायची नसेल तर बाळ जन्माला घालायचा निर्णय घेण्यापुर्वी विचार करा यात काहीच दुमत नाही. त्याचा संबंध डायपरशी जोडला, लंगोट किती चांगले, हल्लीच्या पालकांना कसे सगळे कमी श्रमात हवे, पुर्वीच्या काळी सगळं कसं बिनबोभाट घडत असे या रुळावर गाडी ती ही तुमच्या कडून गेली म्हणून आश्चर्य वाटलं इतकंच.
पुर्वी जेव्हा डायपर न्हवते तेव्हा अमेरिकेत बाया बाळंत होतच होत्या, आणि पोरं जगतंच होती... हे लॉजिक अशक्य आहे! पुर्वी काय काय न्हवतं आणि काय काय घडत होतं म्हणून आज ही करावं असं म्हणणं असेल तर राहिलं.

अद्वैत ला ताजं नवीन डायपर अगदी झोपायच्या वेळेला चढवायचं आणि बिनघोर झोपायचं. सूसू जास्तच झाली तरच पाहाटे उठवतो तो अदरवाईज नाही. अर्थात इथे एक ट्रिक आहे, आम्ही डायपर एक साईज मोठा वापरतो त्याला; त्यामुळे सोकिंग कॅपेसिटी जास्त असते आणि जरा ढिलं ढालं पण होत त्याला.
बाकी सध्यातरी आम्हाला डायपरचाच पर्याय सोयीच्या दृष्टीनं बरा पडतोय. आणि मी घरी असेल तर दोन-तीन तासांनी त्याला सूसू करता नेऊन आणतोय.

"आई बाबांनी लहानपणी डायपरची सवय लावली त्यामुळे अहो अजुनही शी-शू ला संडासला जायचे कळतच नाही" असा प्रौढ मनुष्य अजून पाहिलेला नसल्याने मुलांना कधी ना कधी संडासला जायची सवय लागते असा मी तर्क काढलेला आहे.
असाच अजून एक घडणारा संवाद म्हणजे तोंडात अंगठा घालून चोखणारी लहान मुले. अजून असा प्रौढ मला सापडायचा आहे.

थोडक्यात डायपर घालू'च' नये हा पाट्यावर वाटलेली चटणी मिक्सरपेक्षा चविष्ट, हाताने धुतलेले कपडे हे वॉशिंग मशिनपेक्षा स्वच्छ या जे जे स्त्रीचे जीवन सुलभ करते ते ते घातक असते या मानसिकतेतला विचार दिसतो.

बाळ झोपले की झोपा अन उठले की उठा, हे ऑर्थोडॉक्स भारतीय संयुक्त कुटुंबात/नवरा १४ तास कामावर जातोय अशा न्युक्लिअर कुटुंबात *भारतात* करून दाखवा. एक कप चहा माझ्याकडून फुकट.>>
नको. फुकटचे काही नको.
मी भारतातच वाढले. माझ्या बघण्यातील संयुक्त कुटुंबात तरी बाळंतीणीला पहिले तीन महिने तरी बाळ झोपले की झोपा, उठले की उठा इतपत सुख असते. नंतरही आलटून पालटून कुणी ना कुणी बाळ संभाळायला मदत करते, जागरण करते. कुटुंबातील स्त्रीयांसाठी मीच केलेत अशी जागरणं. कुटुंब न्युक्लिअर असेल आणि नवरा कामावर , बायको घरी असे असते तिथेही हे बर्‍यापैकी जमवले जाते. आता मूल हे फक्त आईची जबाबदारी असाच दृष्टीकोन असेल तर मग बोलणेच खुंटले.
रहाता राहीला प्रश्न अमेरीकेतल्या माझ्या पेडीचा तर त्याने समजून उमजून लहान गावात फॅमिली प्रॅक्टिस हा पेशा निवडलाय, इथे वर्क लाईफ बॅलन्सही नसतो आणि दणकट फी ही नसते. भारता बद्दल बोलायचे तर माफक फीत लहान गावात प्रॅक्टिस, रात्रीबेरात्री येणारे पेशंट्स, अपुरी साधने आणि तरीही शक्य तेव्हा रात्री बाबाने देखील मुलांसाठी जागणे हे माझ्याच आजोळी होते. आपल्या बाळाशी आपले बॉण्डिंग आणि जोडीला बाळाच्या आईला थोडी विश्रांती द्यायचे एकदा स्वतःच ठरवले तर होते शक्य.

>>>
थोडक्यात डायपर घालू'च' नये हा पाट्यावर वाटलेली चटणी मिक्सरपेक्षा चविष्ट, हाताने धुतलेले कपडे हे वॉशिंग मशिनपेक्षा स्वच्छ या जे जे स्त्रीचे जीवन सुलभ करते ते
ंंं<<<
माणसाचे. उदाहरण देताना स्त्रीचेच का?

थोडक्यात डायपर घालू'च' नये हा पाट्यावर वाटलेली चटणी मिक्सरपेक्षा चविष्ट, हाताने धुतलेले कपडे हे वॉशिंग मशिनपेक्षा स्वच्छ या जे जे स्त्रीचे जीवन सुलभ करते ते ते घातक असते या मानसिकतेतला विचार दिसतो.>>>>>>>>>>>>> +++++=११११११११

इथे ज्या बाया डायपर वापरल नाही म्हणत आहेत त्यांच्या घरी मदतीला कोणी होत कि नव्हत ? तसच बाळंतपणानंतर किती दिवस घरच्या लोकांकडून सेवा करून घेतली ? कामाला बाई होती कि नव्हती ? दुसरं बाळ असेल तर त्याची शाळेत ने आण कोण करीत होत ? जॉब करत होता का ? असाल तर किती दिवस लिव्ह घेतलेली? लिव्ह संपल्यावर बाळ डे केअर मध्ये जात होत कि नव्हत? स्वयंपाक कोण करत होतं ?

एकदा हे सगळ कसलीही मदत न घेता करून दाखवा पहिल्यांदा मग डायपर विषयी बोलुया. अजुनपर्यंत पाचव्यात जाणार का सातव्यात ह्या चर्चा होताना भारतात ऐकत आहे. बाळंतीणी बडदास्त बघितली तर इंग्लंडची राणी सुद्धा चक्कर येवुन पडेल.

अवांतर, बायडीकरता केलेले लाडू स्पेशली ते आळीवाचे आणि मेथीचे लई खुमासदार लागतेत... बायडीनं एखादा असेल खाल्लेला बाळंतपणात बाकी मी उडवलेत सगळे Happy

माणसाचे. उदाहरण देताना स्त्रीचेच का?
>>>
साधारण पुरुषाचे जीवन सुलभ करणार्‍या वस्तुंना भारतात विरोध नसतो. पाटा वापरायची वेळ पुरुषावर आली तर मिक्सर चालतो.

बापरे गाडी भलत्याच वळणावर वळली Lol

अमेरिकेत, पाळणाघरात इत्यादी ( डायपर न वापरणं अगदीच गैरसोयीचे आहे तिथे) काय करावं ( आणि एकूणच एरवीही) हा त्या त्या व्यक्तीचा प्रश्न आहे. जजमेंटल होण्याचं काहीच कारण नाही.

आरारांनी ज्या पेडीचं वाक्य लिहिलंय तशा प्रकारे बोलणारे डॉक्टर्स असतात की. स्वभाव असतो एकेकाचा.

मी मुलांना फारसे डायपर्स वापरले नाहीत याचं एकमेव कारण म्हणजे त्याचा निर्माण होणारा कचरा. बाकी ' स्त्रियांचं आयुष्य सुलभ करणार्या वस्तू' (मिक्सर इत्यादी) मी भरपूर वापरते.

डायपर्स वापरून पर्यावरण हानी होते - हे अगदी खरय .. पण त्यावरून दुसर्याला दोष देणार्यांनी आधी आपण पूर्ण पर्यावरण पोषक आयुष्य जगतो असं विचारपूर्वक आणि खरं विधान करून बघावं

माझ्या आयुष्याचा विचार करून बऱ्यापैकी वेळी डायपर वापरण्याचा निर्णय मी घेतला. योग्य काळजी घेतल्यानंतर माझ्या लेकीला तरी मुळीच त्रास झाला नाही ... योग्य वयात फार यातायात न होता डायपर्स सुटले सुद्दा

Pages