शी-शु पालन

Submitted by DJ. on 3 October, 2018 - 07:26

गेल्या वीकेन्ड ला गावी गेलो असताना समोरच्या घरात रहणार्‍या प्रा. काकींना महिनाभरापुर्वी नात झाली ही बातमी समजली. प्रा. काकींची एकुलती एक लेक. लग्नानंतर ३ वर्षांनी तिला हे पहिलेच कन्यारत्न. प्रा. काकी पहिल्यांदाच आज्जी झालेल्या. म्हटलं चला त्यांचे आणि दिदीचे अभिनंदन करुन येऊ.. लहान बाळाला पाहुन येऊ.. बाळासाठी गिफ्ट घेउन आम्ही जोड आणि आमची दोन मुले त्यांच्या घरी गेलो. त्यांना सर्वांना भेटुन आणि लहान बाळाचे कोड्कौतुक करुन आम्ही घरी परतलो आणि आमच्या हिने लगोलग आईला एक 'खबर' दिली की : प्रा. काकी, १ महिन्याच्या तान्ह्या बाळाला लंगोट/नॅपी पॅड घालताना त्या लंगोट/नॅपी पॅड मधे एक टिश्यु पेपर ची घडी ठेवतात जेणे करुन बाळाने 'शी' केली फक्त तेवढा टिश्यु पेपर बाजुला काढुन टॉयलेट मधे टाकुन फ्लश करायचा आणि लंगोट धुवायला टाकायचा. Light 1

मला प्रा. काकींनी बाळाच्या शी साठी योजिलेली ही युक्ती एकदम भनाट वाटली.. Proud Proud Proud

हे इथे मांडावयाचे कारण असे की बाळाच्या शी/शु चे मॅनेजमेंट करण्यासाठी प्रा. काकींच्या 'टिश्यु पेपर' सारखे अजुनही काही पर्याय इथे कुणी वापरलेत काय..? आपले मायबोलीकर जगभरात वावरत असताना वेगवेगळ्या देशांत वेगवेगळे पर्याय सापडले असतील तर ते इथे सांगावेत.. जेणेकरुन काही नवपरिणित जोडाप्यांना भविष्यात ते उपयोगी पडतील. Proud Proud Proud

Group content visibility: 
Use group defaults

विषय डायपरचा चाललाय म्हणून नोंदवून ठेवतो. अ‍ॅडल्ट डायपर वापरवून घ्यायची वेळ आलेली. हॉस्पिटलच्या फार्मसीतून मिळालेले ते बांधा-चिकटवायचे डायपर कसे बांधाचिकटवायचे , त्याचा स्ट्रेस. हॉस्पिटलमधलं वास्तव्य आणि त्यात या डायपर प्रकरणामुळे पॉटी ट्रेनिंग पार विसरून गेलेला पेशंट. सकाळी त्या भिजलेल्या डायपरची विल्हेवाट लावायचं काम.
डायपर असूनही बिछाना ओला होऊ शकतो, असा लागलेला शोध.
मग ते निकर टाइप डायपर मिळाल्यावर जरा हायसं वाटलं. प्लास्टिक शीट आयती आणून मिळाली.
पण शेवटी डायपर सोडवता आला, त्याचं खूपच हायसं वाटलं.

इथे ज्या बाया डायपर वापरल नाही म्हणत आहेत त्यांच्या घरी मदतीला कोणी होत कि नव्हत ? - नव्हतं. मी व नवरा पुण्यात, सासर सातार्‍यात, माहेर नासिकला!
तसच बाळंतपणानंतर किती दिवस घरच्या लोकांकडून सेवा करून घेतली ?- नववा लागल्यावर माहेरी गेलेले. डिलेव्हरी नंतर २ महिने माहेरी होते. पण साधारण सव्वा महिन्याने बाळाचे सर्व मीच करायचे. कारण सवय व्हावी. सासरी बाळाचे करायला कोणी येणार नव्हते. सव्वा महिन्याने बाळासाठी कपडे पण मीच शिवलेले.
कामाला बाई होती कि नव्हती ? - नव्हती. बाळ रात्री १२ ला उठायचे ते ३ / ३.३० पर्यंत खेळत रहायचे. ब्रं आपण झोपवे म्हटले तर ते पण शक्य नव्हते. ते खेळायचे , शू करायचे, मग भूक लागायची. डोळे तारवटून जायचे अक्षरशः
दुसरं बाळ असेल तर त्याची शाळेत ने आण कोण करीत होत ? - पहिलीच वेळ
जॉब करत होता का ? - जॉब नव्हता, पण टेलरिंग सुरु होते.
असाल तर किती दिवस लिव्ह घेतलेली? लिव्ह संपल्यावर बाळ डे केअर मध्ये जात होत कि नव्हत? - नाही
स्वयंपाक कोण करत होतं ? - स्वयंपाक / कपडे /भांडी सर्व बाहेर्ची कामे मीच करत होते. का? विचारु नका.
सुदैवाने मुलगा शांत होता. त्यामुळे ते दिवस धकून गेले. पण ह्या सर्व धबडग्यात मुलाचे बालपण अनुभवणे हातातून सुटून गेले. Sad

एकंदर तान्ह्या मुलांना डायपर वापरणे हे सध्याच्या जगात अत्यंत सोपे आणि उपयोगी आहे.. त्याला तोडीसतोड पर्याय अजुनतरी उपलब्ध नाही.

पण ह्या सर्व धबडग्यात मुलाचे बालपण अनुभवणे हातातून सुटून गेले. Sad>>>> विनिताजी या वाक्याबद्द्ल वाइट वाट्ले. तुमच्याबद्दल सहानुभुति. आता मुलाबरोबर क्वालिटि टाइम घालवा......

एकंदर तान्ह्या मुलांना डायपर वापरणे हे सध्याच्या जगात अत्यंत सोपे आणि उपयोगी आहे.. त्याला तोडीसतोड पर्याय अजुनतरी उपलब्ध नाही.>> गैरसमज आहे. त्याचे पर्यावर्णावर भयानक परिणाम होत आहेत. व ही डायपर वाली मुले मोठी होतील तेव्हा त्यांच्या समोर समस्या उभ्या राहतील.
कापडाची नॅपी हा साधा सोपा व स्वस्त पर्याय आहे. फर्स्ट वर्ल्ड जीवन शैली रिसोर्सेस दुप्पट वापरते व जबाबदारी घ्यायला खळखळ.

काल मी मोठा प्रतिसाद पुराव्यासहित लिहीला होता तो लोड करताना चारदा एरर आली. मग सोडून दिले अल्गोरिथम बनवलाय का तसा?!

अमा, पर्यावरणाचा मुद्दा मान्य.
त्यावरून सहज लक्षात आलं म्हणून विचारते - आता भारतात प्लॅस्टिक बॅग्जवर बंदी आली, तुम्ही तुमच्या श्वानमित्रांना चालायला नेता तेव्हा स्वच्छतेचं कसं जमवता?

>>> दिवस धकून गेले. पण ह्या सर्व धबडग्यात मुलाचे बालपण अनुभवणे हातातून सुटून गेले.
ही रुखरूख टाळण्यासाठी तुम्ही उपलब्ध आणि आवाक्यात असलेले सगळे पर्याय वापरणं पसंत करणार नाही का?

सुदैवाने मुलगा शांत होता. त्यामुळे ते दिवस धकून गेले. पण ह्या सर्व धबडग्यात मुलाचे बालपण अनुभवणे हातातून सुटून गेले. Sad>>>
विनिता , कुचकटपणे नाही म्हणत आहे पण डायपर वापरले असते तर कदाचीत थोड इझी झाल असतं . Happy कधी कधी इस्पेशिअली ज्या गोष्टी परत कधीच मिळविता येत नाहीत (उदा मुलांच बालपण, करिअरचे सुरुवातीचे दिवस, लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस ) अशावेळी कन्व्हिनिअन्स बघायला काहीच हरकत नाही. माफ करा, तुमचा गिल्ट अधिक इंटेन्सिफाय करण्याचा अज्जिब्बातच उद्देश्य नाही. माझा मुद्दा रेटताना तस होत असेल तर क्षमा करा.
मी जर रोज चपाती घरी करण्याचा हट्ट धरला तर मुलांना संध्याकाळी बघता येत नाही. पण तेच चपाती (ताज्या,मशीन मेड) विकत आणल्या तर मुलांबरोबर अर्धा तास घालविता येतो. आता छान तव्यावरच्या , पापुद्रा सुटलेल्या नाही आहेत त्या. पण मग प्रायोरिटी ही आहे कि मी वेळ मुलाबरोबर घालवण.
आणखी एक डायपर पर्यावरण पोषक नाहीत हे अगदी मान्य. पण ते बाकीचे मुद्दे, मुलांना नीट चालता येत नाही वगैरे वगैरे त्यामुळ डायपर वापरू नये याला माझा विरोध आहे.
दुधाची बाटलीचही तसच आहे. भारतातल्या पेडी बरोंबर बोलताना बाटलीला विरोध का आणि वाटी चमच्यानेच दुध का पाजायचे यावर हायजिन हे उत्तर पेडी कडून मिळाल. आपल्याकडे धुळीच प्रमाण भरपूर, गरम पाणि इझीली उपलब्ध नाही . बाटली सॅनिटाइझ करून वापरण्यापेक्षा वाटी चमचा सोपे आहे. पण लोक बाटली मुळ ओठ मोठे होतात वगैरे कारण सांगून नव्या आईची गोची करून ठेवतात.

वाटी चमच्यानेच दुध का पाजायचे यावर हायजिन हे उत्तर पेडी कडून मिळाल >>> अशी सेन्सिबल उत्तरं सगळेच डॉक देत नाहीत हा एक इश्युच आहे.

अमा (आणि डायपरला पर्यावरणासाठी विरोध करणारे इतर), बाईंना पडलाय तो प्रश्न मला पण पडला होता. पर्यावरणाचा मुद्दा कितीही पटला तरी पर्यावरणाचा र्‍हास करणार्‍या अनेक गोष्टी ज्या दैनंदिन जीवनाचा भाग झाल्या आहेत त्या तुम्ही कायमच्या त्यागल्या आहेत का हा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. खरोखरीच त्यागल्या असतील तर एक धागा आहे मायबोलीवरच, तिथे कृपया लिहा.

एकुणातच चर्चा कुठे सुरू झाली आणि कुठे चालली आहे, नव्यातली जुनी मायबोली आठवली Happy

ज्या त्या पालकांचा प्रेफरन्स आणि प्रश्न आहे.
आम्हालाही पेडी ने डायपर अजिबात घालू नका (बाळाला) असं सांगितलं होतं. पण आम्ही झोप प्रिय प्राणी असल्याने रात्री १२ ते सकाळी ५ डायपर घालायचो. बाकी टॉयलेट ट्रेनिंग लगेच झालं.(साबा आणी श्शु आवाज क्रेडिट).पॉटी ची पण फार गरज लागली नाही.
आमच्या सारख्या लोकांकडून ते दिवस स्मूथ कसे गेले असा प्रश्न आता पडतोच Happy

पेडी ने डायपर अजिबात घालू नका (बाळाला) >> Rofl
सिरियस नोट: भारतातले सगळेच पेडी असं सांगतात का? आणि पाश्चात्य देशात एकही डॉ. असं का सांगत नाही?
परवडलं, रुचलं तर वापरा. रॅश आला तर/ येऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची हे सांगितलं, यात चांगलं काय/ वाईट काय याची दोन मिनिटे चर्चा केली आणि हे सेहत के लिये हानिकारक नक्कीच नाही तर शेवटचा निर्णय आई-बापांवर सोपवला असं का नाही करत? पेशंटने काय करायचं याचा निर्णय (हे ब्लॅक आणि व्हाईट नसल्याने) डॉ. इतका स्टाँगली का घेतात? पेशंटला अक्कल नाही, आणि मी सांगतो तेच करा मला फार अक्कल आहे असं का वाटतं? आणि त्यात खरंच हानी असेल तर ते नीट सांगत का नाहीत. पॉटी ट्रेन उशिरा होतात म्हणून कदापि वापरुच नका!!!???? पॉटी ट्रेन लवकर करायचं का नाही हा निर्णय सरकार घेतं का डॉ? का पालक?
सांगायाल वेळ नसतो, पेशंट रेशो गडबडलेला असतो, या सबबी अनंत काळ सांगत रहाणार का? यावर पँप्लेट प्रिंट करुन देणे, नर्सने सांगणे इ. उपाय होऊ शकत नाहीत का?

अमितव,
भारतात 'डायपर शक्यतो टाळा, बाळं खूप इरिटेट होतात, डायपर रॅश ला योग्य क्रीम शोधेपर्यंत, बाळाला गरम होतं, याउप्पर वापरायचे असल्यास तुमचा प्रश्न' या सुरात जुने अनुभवी पेडी सांगतात.परदेशात थंडी, वास बाहेर घालवता न येणे, बाकी अनेक इश्यू असतात.भारतात अगदी खात्या पित्या घरवाल्याना पण 20 रु एक डायपर हे गणित जड जाते.(अमेझॉन सेल आणि डी मार्ट ला वाट पाहून 100 डायपर एकदम खरेदी करणारे नवे पालक आजूबाजूला आहेत.)
पेडीनेच 'डायपर वापरा, सोपं पडतं' सांगितल्यास भारतात तो न परवडणारे लोकही 'डॉ ने सांगितलंय वापरा' म्हणून दबाव/गिल्ट खाली येतील असाही एक मुद्दा वाटतो.
तसंही पेडी ने सांगितलेलं 100% भारतात कोण ऐकतां?मोठ्या कुटुंबात तरी आपले पाहिले बाळ कसे वाढवावे, पोसावे, धुवावे याबद्दल पेडी/मैत्रिणी/इनलॉ/इनलॉ ज्यांना मानतात ते लोक/शेजारी यांचे सल्ले ऐकून त्याचा एक एव्हरेज किंवा मिडीयन काढून बाळ विषयक स्ट्रॅटेजी ठरतात.कोणताही विषय कुठेही जातो.आज बाळ 15 मिनिटं रडले तर 'ती बाई बसमध्ये काल कौतुकाने बघत होती' पासून ते 'कुलदैवताला कबुल केलं होतं पण गेला नाहीत' पर्यंत कोणतंही लॉजिक लागू होतं. ☺️☺️

माझी मुलगी पण पहिल्या दिवसापासून डायपरवर होती. आमच्याकडे नव्हते बॉ एवढे मनुष्यबळ ओला-लंगोट-सुका-लंगोट करत खेळत बसण्याएवढे. सुदैवाने आमचे डॉक्टरही डायपरविरोधी गटात नव्हते. योग्य त्या साईझचे डायपर, योग्य ते क्रीम वगैरे वापरल्याने एकदाही रॅशचा त्रास झाला नाही. दोन - तीन वर्षे पूर्ण झाल्यावर तिला विचारले, डायपर सोडायचा का? तेव्हा नाही म्हटली म्हणून अजून काही महिने वापरले, मग स्वतःहून म्हटली ती 'आता डायपरला बाय करूया'. आणि खरेच सोडले. (हे एवढे स्मूथ ट्रान्झिशन कसे झाले, याबाबत अजूनही कधीकधी नवल वाटते) स्वतःच्या मनाने सोडले म्हणून नंतर ऍकसिडेंट्स पण खूप नगण्य झाले. पाय वगैरे काही फाकवून चालली नाही डायपरमुळे. तो काय लाकडाचा तुकडा आहे का, त्याचा आकार न बदलल्याने फेंगडे चालायला?

डायपरमुळे वयाच्या दुसऱ्या महिन्यापासून तिचे झोपेचे रुटीन सेट झाले. रात्री 12 ते सकाळी 6 सलग झोपायला लागली. आणि आम्हालाही झोप मिळू लागली. अखंड तारवटलेल्या डोळ्यांनी जागरण करण्याची सुपरपॉवर माझ्यात नाही. त्यापेक्षा योग्य ती झोप घेऊन मुलीशी दिवसा व्यवस्थित खेळण्यात वेळ घालवणे जास्त योग्य वाटले. म्हणून वरदा म्हणाली तसे डायपरच्या शोधाबद्दल मीही ऋणी आहे गॉर्डन बाईंची.

आज इतर काहीच वाचण्यासारखं सापडत नाहीय त्यामुळे हे वाचलं Lol

> काल मी मोठा प्रतिसाद पुराव्यासहित लिहीला होता तो लोड करताना चारदा एरर आली. मग सोडून दिले अल्गोरिथम बनवलाय का तसा?! > नवीन लेख लिहा अमा. मला "ही डायपर वाली मुले मोठी होतील तेव्हा त्यांच्या समोर समस्या उभ्या राहतील." याच्याबद्दल जाणून घ्यायचंय.

आता मुलाबरोबर क्वालिटि टाइम घालवा......>> हो रॉकस्टार, तसेही मुलगा मनाने माझ्या खूप क्लोज आहे. Happy धन्यवाद __/\__

डायपर वापरले असते तर कदाचीत थोड इझी झाल असतं >> त्या वेळी बाजारात इतके डायपर आलेले नव्हते भारतात.
डायपर वापरले नाहीत म्हणून तो जागायचा असे नाहीये. तो रात्री खेळत बसायचा. उजडायचं त्याला Happy
तसेही पहिल्या वेळी नवमातांना पण बर्‍याच गोष्टी माहित नसतात.
डायपर वापरुच नका असे म्हणने नाहीये. पण अगदी गरज असेल तिथेच वापरावेत. Happy

कधी कधी इस्पेशिअली ज्या गोष्टी परत कधीच मिळविता येत नाहीत >> पहिलटकरणीला बाळाच्या बाबतीत बरेच काही घडून गेल्यावर जाणवते. दुसर्‍याच्या वेळी ती अनुभवाने बरेच काही शिकलेली असते.

ही रुखरूख टाळण्यासाठी तुम्ही उपलब्ध आणि आवाक्यात असलेले सगळे पर्याय वापरणं पसंत करणार नाही का? >> रुखरुख नाहीये, वाईट वाटते. पण कधी कधी परिस्थिती पुढे तुम्ही काहीच करु शकत नाही. त्याने वयानुसार चांगली प्रगती केली, मी त्याला जेव्हा जेव्हा जे मिळायला हवे ते सर्व करतच होते, त्यामुळे मी समाधानी आहे हे तितकेच खरे! कुठलाही गिल्ट मनात नाहीये.

बाळ जन्माला घालणं हे आनंददायक आहे, पण तितकंच जबाबदारीच पण आहे. २४ तास मूल तुमच्या अंगावर रहाते. त्याच्या चांगल्यासाठी थोडे श्रम तर घ्यावेच लागतात. त्यासाठी मनाची तयारी लागते. ती झाली की सगळे सुसह्य होते. संगोपन कसे करायचे हे व्यक्तिनुसार बदलते. Happy

भारतात डॉक डायपर घालु नका असं सांगतात?
मला नाही सांगितल. दुसर्‍या मुलाच्या वेळी तर त्याला पहिल्या दिवसापासुनच डायपर घातलेला. नर्स-आयानी स्वतःच.
आम्हालाच ते पटत नव्हतं. की एक्दोन दिवसाच्या बाळाला डायपर काय घालतात .
कारण मोठी मुलगी नऊ वर्षापुर्वी जन्मली तेव्हा डायपर फक्त बाहेर जाण्यासाठी घालायचो.

आमच्या पेडिअॅट्रिशिअननी एक ३-४ पानी पॅंप्लेटच दिलं होतं. त्यात किती दिवस ब्रेस्टफीड करा, त्यात काय अडचणी येऊ शकतात, त्या कशा सोडवायच्या, आईने काय खावं प्यावं , बाळं साधारणपणे कशामुळे जास्त रडतात, कॉलिकवर काय उपाय, ढेकर कशी काढायची, मालिश कसं करावं अशा अनेक गोष्टी होत्या. शिवाय कुठल्या परिस्थितीत इमर्जन्सीत घेऊन या, तेही होतं. यापलीकडे काही शंका असतील तर विचारा म्हणाले Happy डायपरबद्दल त्यात काही नव्हतं आणि आम्हीही काही विचारलं नाही. कारण रोज घालावा अशी गरज वाटली नाही कधी.

सस्मित +१
दुसऱ्या मुलाला जन्मल्यापासून डायपर घातलेला होता हॉस्पिटलमध्ये असेपर्यंत. घरी आल्यावर मग आम्ही ते बंद केलं आणि फक्त कारणपरत्वे घालायला लागलो.

सस्मित, सगळे डॉक सांगत नसावेत. त्यातही वेगवेगळी मते आहेत.
वाटी चमचा वाले बरेच डॉक सांगतात. आम्हाला कधी कोणी सांगितले नाही.साधा मीमी चा प्लास्टिक सिपर वापरायचो आणि वापरल्यावर साध्या पाण्याने स्वच्छ धुवून उन्हात वाळत घालायचो.
मुद्दा हा की डायपर किती, हो की नको,दूधाला बाटली का चमचा,ब्रेस्ट फीड किती कधी वगैरे हा ज्याचा त्याचा उपलब्ध सोयींप्रमाणे/मेडिकल परिस्थितीप्रमाणे/वेळेप्रमाणे ठरवायचा कॉल आहे.

घरी आल्यावर मग आम्ही ते बंद केलं आणि फक्त कारणपरत्वे घालायला लागलो.> हो मी पण. कापडी लंगोट वापरले दोन्ही मुलांना. दिवसा रात्री.
कधी तरी एखाद रात्री डायपर. पण अगदी दिवसरात्र मुलांना डायपर घालुन ठेवणं मलाच बरं वाटलं नाही.
पण प्रत्येक आईची सोय / गरज वेगवेगळी. Happy
आणि रात्री आपल्याला झोप हवी म्हणुन मुलांना डायपर घालणं काही जास्त उपयोगाची आयडिया नाहीये माझ्या मते.
फारतर लंगोट बदलायचा त्रास नाही.
कारण मुलं फक्त सु शी केल्यावरच रडत नाहीत. काही मुलं रडवीच असतात. उगीच रडतात. (आई शांत झोपलीये हे बघुन रडत असतील Happy )
कधी भुक लागलीये म्हणुन, काही मुलं अंधार केल्यावर रडतात. अशी रडण्याची बरीच कारणं असतात.
तर रात्री मुलांना डायपर घातलत तरी झोपायला मिळेलच ह्याची काय ग्यारंटी नाही आयांना (आईच अनेकवचन) Happy

डायपर किती, हो की नको,दूधाला बाटली का चमचा,ब्रेस्ट फीड किती कधी वगैरे हा ज्याचा त्याचा उपलब्ध सोयींप्रमाणे/मेडिकल परिस्थितीप्रमाणे/वेळेप्रमाणे ठरवायचा कॉल आहे.>>>> +१

आई शांत झोपलीये हे बघुन रडत असतील >>>> Lol
मी ही कधी लेकाला फारसे डायपर वापरले नाही.ज्या दिवशी फार दगदग वाटली त्या दिवशी मात्र झोपताना, दुपारच्या वेळी, थंडी सुरु झाल्यावर, मांड्यावर जेव्हा इंजेक्शन असायचे अश्या वेगवेगळ्या कारणांनी त्या त्या वेळी डायपर वापरले.

माझी सख्खी आत्या निष्णात आणि अनुभवी नर्स होती. पहिल्या प्रेग्नन्सीत तिच्या देखरेखीखाली असताना तिने बाटलीला सक्त विरोध केल्यामुळे बाटलीचा विचारसुद्धा कधी केला नाही Happy नंतर पेडिअॅट्रिशिअनच्या पॅंप्लेटमधेपण वाटी चमचा वापरायला सांगितलं होतं.
एकूण, वर अनुने लिहिलं आहे तेच खरं. <<मोठ्या कुटुंबात तरी आपले पाहिले बाळ कसे वाढवावे, पोसावे, धुवावे याबद्दल पेडी/मैत्रिणी/इनलॉ/इनलॉ ज्यांना मानतात ते लोक/शेजारी यांचे सल्ले ऐकून त्याचा एक एव्हरेज किंवा मिडीयन काढून बाळ विषयक स्ट्रॅटेजी ठरतात>>

नवीन लेख लिहा अमा. मला "ही डायपर वाली मुले मोठी होतील तेव्हा त्यांच्या समोर समस्या उभ्या राहतील." याच्याबद्दल जाणून घ्यायचंय. <>> अमा, लिहाच

बाळाला डायपर ने त्रास होत होता. कापडी पर्याय हवा होता.

LUKZER Reusable New Adjustable Washable Baby Cloth Diaper, 0-2 Years (Multicolour) https://www.amazon.in/dp/B075VRF2FD/ref=cm_sw_r_cp_apa_i_hjfWBbGZYDED7

आम्ही हे असले डायपर वापरले बाळासाठी. 3-4 तास जातात, कधी जास्त कधी कमी. आपण हात लावून पहायचे ओला वाटतोय का ते नी बदलायचा. मायक्रोफायबर लायनर येतात यातले लायनर पुरेसे वाटत नसतील तर.
पहिल्या महिन्यात आणलेले, बाळ वर्षाचे झाले तरी वापर होतोय, अजूनही पुढे होईल.

दोन्ही मुलींसाठी ,अगदी लहान असताना सुती साड्या, धोतर यांचे मोठे रुमाल बनवले होते, घडी करून पॅड सारखे कॉटन लंगोटात ठेवायचे,
शु झाली तर हा रुमाल+लंगोट खराब होतो पण खालची चादर वाचते, नुसती शु असेल तर दिवसभराचे बादलीत साठवून ठेवायचे, रात्री डेटॉल घातलेल्या पाण्याचे मशीन लावायचे.

पण साधारण 6 महिने ऑनवर्ड्स डायपर वापरात असूनही potty ट्रेनिंग ला फारसा त्रास झाला नाही.

डायपर्स, क्विक ड्राय शीट्स अशा उत्तम प्रॉडक्ट्समुळे बालसंगोपन जर सुटसुटीत होत असेल तर जरूर लाभ घ्यावा. ती दुपटी, बाळोती, लंगोट धुणे, मदतीला बाई लावणे, यात सगळ्यात जाणारा वेळ याचं गणित डायपर्सची किंमत आणि वाचणारे कष्ट यांपेक्षा फार वेगळे होत नाही. डायपर्स तसेही ऑनलाईन किमान २५ टक्के किंवा जास्त स्वस्त मिळतातच. डायपर रॅश लंगोट नीट वापरले नाहीत तर त्यातूनही होतो. व्यवस्थित काळजी घेऊन वापरलं तर डायपर्सचाही अजिबात त्रास होत नाही. पर्यावरण हा मुद्दा सोडला तर डायपरला विरोध असायचं कु ठलंही व्यावहारिक कारण दिसत नाही.

पर्यावरणाचा मुद्दा समजतो. पण त्याची पर्यायी किंमत ही त्या बाळाच्या आईलाच सहसा चुकवावी लागते कारण बहुतांशी 'प्रायमरी केअरगिव्हर' आईच असते. झोपेचा त्याग वगैरे तर डायपर वापरले तरी बर्‍यापैकी करावाच लागतो. तेव्हा त्या आईने आणि बाबाने जर डायपरचा पर्याय निवडला असेल तर डॉक, घरादारातले ज्येना, काना आणि यच्चयावत दुनिया यांना कुठलाही विरोधी सल्ला बाळाच्या आईबाबांना द्यायचा काहीही अधिकार नाही. डायपर्स वापरले तर योग्य कसे वापरायचे यावर डॉक्सनी सल्ला द्यावा.
आणि सॅनॅ आणि डायपर्स यांनी पर्यावरणाची हानी होतेच, पण आपण इतर हजारो गोष्टी सोय म्हणून वापरतच असतो ना? त्या तिथे शक्य तितक्या कमी कराव्यात आणि इथे या उत्पादनांच्या वापरावर काट मारण्यापेक्षा त्याची योग्य विल्हेवाट कशी लावता येईल याचे मार्ग शोधणे जास्त सयुक्तिक आहे.

बाटली विरुद्ध वाटीचमचा - यात हायजिनचा मुद्दा असल्याने जुन्या पिढीतले लोक आणि डॉक्स बाटली नको म्हणतात हे ठीके. पण आता दीडदोन हजारापासून चांगल्या दर्जाचे स्टरलायजर्स मिळतात की भारतात पण. झटपट आणि खात्रीशीर बाटल्या निर्जंतुक होतात. बालसंगोपनातील इतर खर्च बघता बहुतेक पालकांना आणखी दीडदोन हजार फार जड नसावेत असे वाटते.

आपल्या भारतीय मानसिकतेत सतत नव्या आईला सल्ले देणं हे फार रुजलेलं असतं. तसंच त्या बाळासाठी खस्ता काढल्या नाहीत (हगरं बाळसं/ मुतरं बाळसं/ रात्र रात्र जागरणं) आणि सरळ पद्धतीने सुटसुटीत बालसंगोपन केले, कष्ट वाचवले तर ते बालसंगोपन बहुतांशी आसपासच्या आम जनतेला रुचत नाही, त्यावर टिकाटिप्पणी होते/ भोचक सल्ले दिले जातात असं फारा वर्षां पासूनचं निरिक्षण आहे... (कदाचित त्या खस्ता त्यांना काढाव्या लागल्या आणि नव्या पिढीला आरामात मॅनेज करता येतंय याचीही नकळती असूया असू शकते) Proud

हो हे खरं.१ तास ताट भार भात भरवण्याच्या आधी बाळाच्या आधी आईने खाऊन घेतलं तरी 'स्वार्थी आप्पलपोटी आई' असते. Happy

Pages