गेल्या वीकेन्ड ला गावी गेलो असताना समोरच्या घरात रहणार्या प्रा. काकींना महिनाभरापुर्वी नात झाली ही बातमी समजली. प्रा. काकींची एकुलती एक लेक. लग्नानंतर ३ वर्षांनी तिला हे पहिलेच कन्यारत्न. प्रा. काकी पहिल्यांदाच आज्जी झालेल्या. म्हटलं चला त्यांचे आणि दिदीचे अभिनंदन करुन येऊ.. लहान बाळाला पाहुन येऊ.. बाळासाठी गिफ्ट घेउन आम्ही जोड आणि आमची दोन मुले त्यांच्या घरी गेलो. त्यांना सर्वांना भेटुन आणि लहान बाळाचे कोड्कौतुक करुन आम्ही घरी परतलो आणि आमच्या हिने लगोलग आईला एक 'खबर' दिली की : प्रा. काकी, १ महिन्याच्या तान्ह्या बाळाला लंगोट/नॅपी पॅड घालताना त्या लंगोट/नॅपी पॅड मधे एक टिश्यु पेपर ची घडी ठेवतात जेणे करुन बाळाने 'शी' केली फक्त तेवढा टिश्यु पेपर बाजुला काढुन टॉयलेट मधे टाकुन फ्लश करायचा आणि लंगोट धुवायला टाकायचा.
मला प्रा. काकींनी बाळाच्या शी साठी योजिलेली ही युक्ती एकदम भनाट वाटली..
हे इथे मांडावयाचे कारण असे की बाळाच्या शी/शु चे मॅनेजमेंट करण्यासाठी प्रा. काकींच्या 'टिश्यु पेपर' सारखे अजुनही काही पर्याय इथे कुणी वापरलेत काय..? आपले मायबोलीकर जगभरात वावरत असताना वेगवेगळ्या देशांत वेगवेगळे पर्याय सापडले असतील तर ते इथे सांगावेत.. जेणेकरुन काही नवपरिणित जोडाप्यांना भविष्यात ते उपयोगी पडतील.
अहो nappy pad म्हणजे kinda
.
अहो nappy pad म्हणजे kinda
अहो nappy pad म्हणजे kinda tissue असतो आणि ते वापरायची पद्धत तशीच आहे, फक्त flush करावा का कसं ते महानगरपालिका आणि सोसायटी काय म्हणते त्यानुसार.
आत्ता इथे link टाकायला म्हणून amazon वर गेले तर तिथे diaper liner नावाचं product दिसलं. तर, तात्पर्य :- समय के साथ चलो !
रबर मॅट टाकून त्या वर चेंजिंग
रबर मॅट टाकून त्या वर चेंजिंग पॅड/पेपर अंथरून बाळाला नागडे झोपवणे हा एक पर्याय आहे.
डायपर बेस्ट पर्याय आहे पण.
आमच्याकडे जन्मल्यापासून पहीला
आमच्याकडे जन्मल्यापासून पहीला बरोब्बर महिनाभर लंगोट बिन्नेस. नंतर डायपर्स सरळ. आधी एका प्रकारानी जरा रॅश वगैरे आला पण ब्रँड बदलला आणि काम झालं.
खरोखरीच फार सोयीचं काम आहे हे. रात्री त्याचीही झोप नीट होते आणि आपलीही. दिवसासुद्धा काही प्रॉब्लेम नाही. इथे-तिथे शू करून ठेवण नाही. आणि ते पुसापुसीची कीटकीट नाही.
डायपर्स खरेच खुप उपयोगी आहेत
डायपर्स खरेच खुप उपयोगी आहेत यात शंकाच नाही. आपले पुर्वज किती सोशिक असतील याची कल्पना करवत नाही. परंतु डायपर्स्/लंगोट मधे शी च्या जागी टिश्यु पेपर ठेउन पुढील कीट्कीट अत्यंत कमी करण्यापर्यंत मनुष्यप्राण्याने उत्क्रांती केल्याबद्दल खरेच कौतुक वाटते..
डायपर ही वस्तू प्रचंड
डायपर ही वस्तू प्रचंड सोयीस्कर आहे. त्यामुळे प्रवासात मी दोन्ही मुलांसाठी नेहमी वापरले होते.
पण रोज वापरणं मला बरोबर नाही वाटलं. कारण केवढा कचरा निर्माण करतो आपण, असं वाटलं.
मूल सात-आठ महिन्यांचं झालं की त्याची शूची फ्रिक्वेन्सी लक्षात घेऊन साधारण अर्धा तास किंवा पाऊण तासाने बाथरूममध्ये नेऊन शू करायला लावायची ही युक्ती मला माझ्या आत्याने सांगितली होती. ती मला दोन्ही मुलांसाठी खूप उपयोगी पडली
शी च्या जागी फक्त टिशू पेपर
शी च्या जागी फक्त टिशू पेपर ठेवला तर त्याचा काही भाग चिकटून राहू शकतो आणि त्याने बाळाला त्रास होऊ शकतो असे मला वाटते. डायपर चालू शकतील पण त्यानेसुद्धा रॅश उठतात. त्यापेक्षा लंगोट नीट धुवून बदलावेत. नवजात बाळासाठी थोडाफार त्रास सुरुवातीला काढावाच लागतो.
डायपर वगैरे बाहेर / प्रवासात
डायपर वगैरे बाहेर / प्रवासात ठिक आहेत. पण २४ तास वापरणे कितपत बरोबर?
अशानेच बाळांना शू / शीवर कंट्रोल करणे लक्षात येत नाही. आजकाल बर्याच मुलांना ही समस्या आहे.
ह्याचा मानसिक परीणाम पण गंभीर होवू शकतो.
बाळ चालायला लागल्यावर शक्यतो
शी च्या जागी फक्त टिशू पेपर ठेवला तर त्याचा काही भाग चिकटून राहू शकतो आणि त्याने बाळाला त्रास होऊ शकतो असे मला वाटते.> हो
आणि बाळाची स्किन नाजूक असते त्यामुळे टिशु पेपर ने पण रैशेस होऊ शकतात
बाळ चालायला लागल्यावर शक्यतो डायपर वापरू नये. रात्री किंवा प्रवासात ठीक आहे. बाळाची चाल बदलते आणि बसणे, उठणे या क्रिया सहज पणे होत नाहीत . नात्यातली एक मुलगी कायम डायपर वापरल्यामुळे पाय फाकवूनच चालायची. त्यापेक्षा ८/९ महिन्यापासुन शु साठी बाथरूम मध्ये न्यायची सवय केली कि मुले शु झाली कि स्वतःहून सांगतात. इरा ला बसायला लागल्यावर शी साठी पॉटी सिट ची सवय केली . आता ती शी, शु झाली कि स्वतःहून सांगते .
सात-आठ महिन्यांचं झालं की
सात-आठ महिन्यांचं झालं की त्याची शूची फ्रिक्वेन्सी लक्षात घेऊन साधारण अर्धा तास किंवा पाऊण तासाने बाथरूममध्ये नेऊन शू करायला लावायची ही युक्ती मला माझ्या आत्याने सांगितली होती
>>> कसं शक्य आहे, इतकी लहान मुले कशी ट्रेन होऊ शकतात? तुम्ही घेऊन जाल बाथरूम मध्ये पण तिथे शु करायला हवी ना.
कसं शक्य आहे, इतकी लहान मुले
कसं शक्य आहे, इतकी लहान मुले कशी ट्रेन होऊ शकतात? तुम्ही घेऊन जाल बाथरूम मध्ये पण तिथे शु करायला हवी ना.>
शु झाली असेल तर करतात, नसेल तर नाही करत. पण त्यांना हे कळायला लागते कि शु इथेच करायची .
२४ तास डायपर वापरू नयेत
२४ तास डायपर वापरू नयेत ,बाहेर जाताना वापरावे
हवा खेळती असावी.
<<<<<<अहो nappy pad म्हणजे kinda tissue असतो आणि ते वापरायची पद्धत तशीच आहे, फक्त flush करावा का कसं ते *महानगरपालिका आणि सोसायटी काय म्हणते त्यानुसार*.>>>>>>>
सुरूवात स्वता:पासून करा, कोणीही Flush करूच नयेत Drainage line choke होवू शकते
कसं शक्य आहे, इतकी लहान मुले
कसं शक्य आहे, इतकी लहान मुले कशी ट्रेन होऊ शकतात? तुम्ही घेऊन जाल बाथरूम मध्ये पण तिथे शु करायला हवी ना.>> ट्रेन नाही होत ( लगेच). म्हणजे बाथरूममध्ये नेलं नाही तर बाहेर करतातच. पण बाथरूममध्ये नेलं, कपडे काढले आणि आपण तोंडाने शू ऽऽ असा आवाज काढला की करतात शू ( आता हे जरा जास्तच सविस्तर होतंय ) . सवयीचा भाग आहे. तेवढेच धुवायचे कपडे जरा कमी आणि एकूणच आवरायचं कमी होतं आपलं काम.
डायपरची सवय लागते याच्याशी सहमत. ओळखीची एक मुलगी ५ वर्षांची होऊनही तिला असेल तिथे शू करून टाकायची सवय होती कारण पार ३-४ वर्षांची होईपर्यंत कायम डायपरची सवय.
आणि आपण तोंडाने शू ऽऽ असा
आणि आपण तोंडाने शू ऽऽ असा आवाज काढला की करतात शू >>> अगदी खरंय.५-६ महिन्यांपासून ही सवय लावली होती.७-८ महिन्याचा असताना मुंबईवरून गोव्याला, बसने नेले होते.त्यावेळी डायपर वापरला नव्हता.परत येताना मात्र डायपर खरेदी करून लावला.तोही बाकीच्यांना त्रास नको म्हणून.
>>शु झाली असेल तर करतात, नसेल
>>शु झाली असेल तर करतात, नसेल तर नाही करत. पण त्यांना हे कळायला लागते कि शु इथेच करायची .<< हो... माझी १ वर्शाची मुलगी तिला शु आलि कि बेड वर असेल तर स्वतहुन खालि उतरते... मांडीवर असेल तर खाली उतरण्यासाठी चिड्चिड करते.. आणि टॉयलेटच्या दारापाशी जाते हे सवयीने लक्शात आले आमच्या.. तरीही दिवसभर तिला डायपर नाही वापरत आम्ही.. रात्री झोपताना मात्र तिला डायपर घालुन झोपवतो..! इथुन पुढे डायपर बंद करु हळु हळु..!!
माझ बाळ ६ महिन्याच आहे.
माझ बाळ ६ महिन्याच आहे.
सुरुवातीपासुनच तिला आम्ही लंगोट वापरतो दिवसभर आणि रात्री झोपताना तसेच बाहेर जाताना डायपर वापरतो.... आणि हल्ली आठवडाभरापासुन तिला बाथरुममध्ये उभं करुन शु... असा आवाज करतो. तिला खरच शु झाली असेल तर करते ती.
इथुन पुढे डायपर बंद करु हळु
इथुन पुढे डायपर बंद करु हळु हळु..!! >>
रात्री झोपताना तसेच बाहेर जाताना डायपर वापरतो..>>
छान नवमातांचे कौतुक आहे.
रात्री झोपण्यापूर्वी शू करुन घ्या. शक्यतो डाय्पर वापरण बंद करा.
कसं शक्य आहे, इतकी लहान मुले
कसं शक्य आहे, इतकी लहान मुले कशी ट्रेन होऊ शकतात >> हळूहळू होतात हो
आम्ही ट्रेनिंग बद्दल बोलतोय. लहान मुलंच लवकर शिकू शकतात.
रात्री झोपण्यापूर्वी शू करुन
रात्री झोपण्यापूर्वी शू करुन घ्या. शक्यतो डाय्पर वापरण बंद करा. > मलाही लेकीचे रात्रीचे डायपर वापरणे बंद करायचे आहे. मी मोठी ड्राय शीट मागवली आहे. बघूया कसे जमतेय ते.
दुसऱ्याकडे जाताना कृपया
Unrelated post, deleted
मि माझ्या मूलाला diaper नाही
मि माझ्या मूलाला diaper नाही वापरला जास्त, सुरवातीला लंगोट . त्याने 6 महिन्याचा असल्या पासून रात्री झोपेत शू करणं बन्द केल , दिवसापण बाथरूम मध्ये नेऊन थोड्या थोड्या time ने सू करायला लावायचे so त्याला सू वर control फार लवकर आला आणि कुठे बाहेर जाताना dieper लावला तरी त्यात सू सू करत नसे .जितका dieper चा वापर कमी तितके मुल लवकर शिकते आणि पर्यावरणा ला पण कमी नुकसान .सुरवातीला मुलासाठी थोडा त्रास सहन केला तर पुढचे complications avoid करता येतात
अवांतर..
अवांतर..
शिकवण्यावरुन आठवले....मुलाने एक बनी पाळली होती, ती पण टॉयलेटमधे जाऊन शू करायची.
रात्री झोपण्यापूर्वी शू करुन
रात्री झोपण्यापूर्वी शू करुन घ्या. शक्यतो डाय्पर वापरण बंद करा. > ++ १
झोपतांना ड्राय शीट टाकायची खाली. क्विक ड्राय च्या शीट्स मस्त असतात. मी दोन्ही मुलांना घरात कधीही डायपर नाही वापरले.. फक्त बाहेर जातांनाच.
>>झोपतांना ड्राय शीट टाकायची
>>झोपतांना ड्राय शीट टाकायची खाली. क्विक ड्राय च्या शीट्स मस्त असतात.<< ते ठीक आहे पण माझी मुलं एकाजागी शांतपणे झोपतच नाहीत. रात्री झोपेत पुर्ण ३६० अंशाच्या कोनात फिरतात व ड्राय शीट्स च्या बाहेर जाउन शु करतात.. त्यामुळे झोपताना मुलांना डायपर घालावा लागतो.
डायपर मध्ये प्रॉब्लेम काय आहे
डायपर मध्ये प्रॉब्लेम काय आहे. शीट वर सुसू करून बाळ त्यावरच झोपणार, त्यापेक्षा डायपर बरा की.
त्यामुळे झोपताना मुलांना
त्यामुळे झोपताना मुलांना डायपर घालावा लागतो.>>>> रात्री खरंच डायपर घाला.दोघांनाही चांगली झोप मिळेल.
<<मुलाने एक बनी पाळली होती,
<<मुलाने एक बनी पाळली होती, ती पण टॉयलेटमधे जाऊन शू करायची. Lol>> माझ्या कडून पण अती अवांतर- आमच्या घरातील मांजराची छोटी पिल्ले पण बाथरूममधे जाऊन कोपर्यातील जाळीवर ( auto correct जातीवर असे झाले होते ) शू करायची.
आता विषयाबद्दल - तूरू यांचा सल्ला +1
माझ्या मुलीने तीला थोडे
माझ्या मुलीने तीला थोडे कळायला लागल्या पासून कधीच nappy मध्ये शु केली नाही. अक्षरक्ष nappy काढून शु करायची. कित्येक nappy तसेच फेकले. याच कारण शु आवाज काढून शु करायला लावली आणि शी साठी कधिच potty वापरली नाही. Direct toilet मधे उभे करून. साबा ची क्रपा.
माझ्या माहितीप्रमाणे डायपर
माझ्या माहितीप्रमाणे डायपर बनवताना लहान बाळांची त्वचा, त्या डायपरमध्ये जमा होणारे "घटक", इ. विचार केलेला असतो. टिशु पेपरनं बाळाच्या त्वचेला आणि नाजूक भागांना हानी पोचू शकेल असं वाटतं. तेव्हा पुढल्या वेळेस तुमच्या शेजारच्या दिदीला हा उपाय योग्य आहे की कसा हे पेडिला विचारून घ्यायला सांगा.
एकुणातच तान्ह्या बाळांच्या बाबतीत हे असे काहीबाही उपाय करू नयेत. आणि कितीही यडछाप शंका असली तरी ती तज्ञांकडूनच- तज्ञ म्हण्जे ज्येना किंवा मायबोलीकर नव्हे तर चार-सहा वर्षे ** घासून त्या विषयात पदवी घेतेलेले- निरसन करून घ्यावी.
डायपर घालणे चुकीचे आहे. अनेक
डायपर घालणे चुकीचे आहे. अनेक कारणे आहेत, पैकी महत्वाचे म्हणजे, मुलं टॉयलेट ट्रेन होत नाहीत लवकर.
"झोप हवी असेल, तर बाळ जन्माला घालू नका." हे आमच्या पेडिअॅट्रीशियन मित्राचे तरूण आयांना सांगणे असते.
बाकी तुमची इच्छा.
सगळ्यात महत्वाचे. डायपर नामक आयटम 'नॉन-वोव्हन प्लॅस्टिक'ची पिशवी असतो. सेम अॅज युअर अॅव्हरेज पॉपुलर सॅनिपॅड. "तिकडे" प्लॅस्टिक पिशव्यांबद्दल आपण काय बोलत होतो ते जरा प्रत्येका/कीने आठवून पहा.
Pages